Monday, 8 September 2025

राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार 'फार्मर कप' उपक्रमाची अंमलबजावणी

 राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार

'फार्मर कपउपक्रमाची अंमलबजावणी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 'फार्मर कपद्वारे १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दीष्ट
  • राज्य शासन आणि पानी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

 

मुंबईदि. ४ : राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये राज्य शासन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'फार्मर कपया उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाची उच्चस्तरीय समिती व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यात २०२६-२७ या वर्षासाठी १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे. शेतीमध्ये उत्पादकता वाढविणेशेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध पातळीवर अनेक उपाययोजना करत आहे. २३ मार्च २०२५ रोजी झालेल्या पाणी फाउंडेशनच्या वार्षिक कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात सत्यमेव जयते फार्मर कप ची घोषणा करण्यात आली. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमाला व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी राज्य शासन पाणी फाउंडेशनला सहकार्य करेल. फार्मर कप या उपक्रमाला राज्य शासनाशी जोडल्याने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील शेतकरी उत्पादक संघटना तसेच शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलत आहेत. विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये कृषी विकासाला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. त्याच दृष्टीने राज्यातील हा उपक्रम देखील महत्वपूर्ण ठरेलअसे मुख्यमंत्री यांनी सांगितले

जगभरात २.२ अब्ज लोकांना दृष्टीदोषाचा त्रास असून,

 जगभरात २.२ अब्ज लोकांना दृष्टीदोषाचा त्रास असूनत्यातील किमान १ अब्ज प्रकरणे टाळता येऊ शकतात. भारतात जवळपास ५३ टक्के दृष्टीदोष हे अपूर्ण दृष्टीदोष दुरुस्तीमुळे (Refractive Errors) निर्माण होतात. यामध्ये प्रत्येक दहा शाळकरी मुलांपैकी एका मुलाला दृष्टीविषयक समस्या भेडसावते. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेमार्फत  स्पेक्स २०३० ही योजना सुरू करण्यात आली असून २०३० पर्यंत सर्वसामान्यांना स्वस्त व दर्जेदार चष्म्यांचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

            जागतिक आरोग्य संघटनेमार्फत गडचिरोलीसह आसाम (धुब्री)ओडिशा (कलाहांडी)राजस्थान (अलवर) आणि उत्तर प्रदेश (प्रयागराज) या राज्यांतील निवडक भागांमध्ये आशा किरण मॉडेलच्या आधारे सेवा राबवली जाणार आहे. या मॉडेलमध्ये आशा सेविकांमार्फत घराघरात प्राथमिक नेत्रतपासणीप्राथमिक आरोग्य केंद्रांवर रेफ्रॅक्शन व चष्म्यांचे वितरण तसेच शासकीय रुग्णालयांत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशा सर्व टप्प्यांवर नेत्रआरोग्यसेवा पुरवली जाणार आहे.

            या कार्यक्रमांतर्गत स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व क्षमता वृद्धीसमुदायामध्ये जनजागृती मोहीमशाळा व ग्रामपंचायत पातळीवर आरोग्यविषयक संवादस्थानिक स्वयंसेवी संस्था व माध्यमांद्वारे प्रचार-प्रसार तसेच कार्यक्षमता व परिणामकारकता मोजण्यासाठी डेटा संकलन व विश्लेषण अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

आशा किरण मॉडेल”च्या आधारे दृष्टीदोषाचा त्रास

 जगभरात २.२ अब्ज लोकांना दृष्टीदोषाचा त्रास असूनत्यातील किमान १ अब्ज प्रकरणे टाळता येऊ शकतात. भारतात जवळपास ५३ टक्के दृष्टीदोष हे अपूर्ण दृष्टीदोष दुरुस्तीमुळे (Refractive Errors) निर्माण होतात. यामध्ये प्रत्येक दहा शाळकरी मुलांपैकी एका मुलाला दृष्टीविषयक समस्या भेडसावते. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेमार्फत  स्पेक्स २०३० ही योजना सुरू करण्यात आली असून २०३० पर्यंत सर्वसामान्यांना स्वस्त व दर्जेदार चष्म्यांचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

            जागतिक आरोग्य संघटनेमार्फत गडचिरोलीसह आसाम (धुब्री)ओडिशा (कलाहांडी)राजस्थान (अलवर) आणि उत्तर प्रदेश (प्रयागराज) या राज्यांतील निवडक भागांमध्ये आशा किरण मॉडेलच्या आधारे सेवा राबवली जाणार आहे. या मॉडेलमध्ये आशा सेविकांमार्फत घराघरात प्राथमिक नेत्रतपासणीप्राथमिक आरोग्य केंद्रांवर रेफ्रॅक्शन व चष्म्यांचे वितरण तसेच शासकीय रुग्णालयांत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशा सर्व टप्प्यांवर नेत्रआरोग्यसेवा पुरवली जाणार आहे.

            या कार्यक्रमांतर्गत स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व क्षमता वृद्धीसमुदायामध्ये जनजागृती मोहीमशाळा व ग्रामपंचायत पातळीवर आरोग्यविषयक संवादस्थानिक स्वयंसेवी संस्था व माध्यमांद्वारे प्रचार-प्रसार तसेच कार्यक्षमता व परिणामकारकता मोजण्यासाठी डेटा संकलन व विश्लेषण अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

भ .बुद्ध एक भौतिकशास्त्रज्ञ*

 *भ .बुद्ध एक भौतिकशास्त्रज्ञ*


*अनिल वैद्य,*

माजी न्यायाधीश 


आधुनिक विज्ञानाच्या इतिहासात अणू, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्या शोधाने विश्वाचे रहस्य समजून घेण्याचे नवीन दालन उघडले. 1897 मध्ये जे. जे. थॉमसन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला, तर 1917–1920 मध्ये अर्नेस्ट रदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध घेतला. 20व्या शतकात वैज्ञानिकांनी अणूचे स्वरूप व त्यातील कणांचे गतीमान अस्तित्व सिद्ध केले.

परंतु, आश्चर्य म्हणजे 2600 वर्षांपूर्वी तथागत बुद्धांनी कोणत्याही उपकरणाशिवाय, फक्त ध्यानाच्या सामर्थ्याने आणि अंतर्ज्ञानाच्या प्रकाशाने, हेच सत्य प्रत्यक्ष अनुभवलं होतं.

त्यांनी सांगितले –

“सब्बो पज्जलितो लोको, सब्बो लोको पकम्पितो।”

(संपूर्ण लोक प्रज्वलित आहे, संपूर्ण लोक प्रकंपित आहे.) 

लोक म्हणजे विश्व.

भौतिक जगाचे स्वरूप  कलाप सिद्धांत

बुद्धांच्या अनुभवांतून उमगले की आपल्याला दिसणारे शरीर व जग ठोस नाही. ते केवळ तरंग आहेत,हे भासमान सत्य आहे (Conventional Truth) 

बुद्ध म्हणतात परमसत्य असे की जगातील सर्व पदार्थ सूक्ष्मतम घटकांनी  (कलापांनी) बनलेले आहेत.

कलाप म्हणजे अणूपेक्षाही सूक्ष्म कण

बुद्धांनी कलाप हा शब्द वापरला. बुद्ध म्हणतात

तो कोणताही स्थिर कण नसून तरंगांचा पुंज आहे.

एका कलापात आठ घटक – पृथ्वी, जल, अग्नी, वायु व त्यांच्या गुणधर्मांचा समूह असतो. 

त्यामुळे त्याला अष्टकलाप असे म्हणतात,

हे कलाप प्रतिक्षण उत्पन्न होतात व नष्ट होतात. त्यामुळे वस्तू आपल्याला ठोस भासते पण वास्तविक तो बुड बुदबुदा असतो. बुद्धांनी याला संततिघन म्हटले.

 विज्ञानाने जे "Sub-atomic Vibrations" म्हणून मांडले, त्याचा अनुभव बुद्धांनी प्रत्यक्ष ध्यानातून घेतला होता.

आता आधुनिक काळात 

आधुनिक भौतिकशास्त्र मानते की विश्वातील प्रत्येक कण सतत गतिशील आहे. अणूतील इलेक्ट्रॉन प्रोटॉन हे स्थिर नसून अखंड गतीत आहेत. फिरत आहेत.

बुद्धांनी याच सत्याला अनित्यता(Impermanence) असे नाव दिले.

त्यांच्या मतेप्रत्येक वस्तू उदय–व्ययधर्मी आहे.

उत्पन्न होणे व नष्ट होणे, अनित्य आहे हीच तिची प्रकृती आहे. 

म्हणूनच शरीर वा जग काहीही शाश्वत नाही.

यामुळे बुद्धांचे म्हणणे विज्ञानाशी असलेले साम्य आपल्याला ठळकपणे दिसते. नव्हे बुद्धाने ते 2600 वर्ष पूर्वी शोधले.

आधुनिक विज्ञान सत्य शोधण्यासाठी प्रयोगशाळेचा वापर करते.

बुद्धांनी  मन व शरीर हीच प्रयोगशाळा मानले.

बुद्धाने सतीपठ्ठान हा उपदेश केला. आणापानं सती व चार स्मृती उपस्थान सांगितले. ही बुद्धाची ध्यान पद्धती आहे.

यामध्ये ध्यान करणारा आपले श्वास, संवेदना, विचार व प्रतिक्रिया यांचे निरपेक्ष निरीक्षण करतो.

यामुळे त्याला भासमान सत्यापलीकडे जाऊन सूक्ष्म परमसत्याचा अनुभव येतो.

शरीर व चित्त हे तरंगांचे समूह आहेत, हे प्रत्यक्ष अनुभूतीत उतरते.

बुद्धांनी सांगितले की "दर्शन म्हणजे मत नव्हे, तर जाण्यता आहे."

म्हणजेच, सत्य हे मतांत, कल्पनांत वा परंपरेत नाही, तर प्रत्यक्ष अनुभूतीत आहे. 

बुद्ध – मनोविज्ञानाचे जनकसुद्धा होते.

बुद्धांचे योगदान फक्त भौतिक सत्यापुरते मर्यादित नाही, तर ते मानवी मानसशास्त्राचेही जनक आहेत.

त्यांनी दुःखाचे मूळ तृष्णा व अज्ञान यात शोधले.

त्यांनी मानवी स्वभाव बदलण्याचा मार्ग – आर्य अष्टांगिक मार्ग – दिला.

त्यांनी ध्यानाद्वारे मनाचे शुद्धीकरण व विचारांचे रूपांतर करण्याची पद्धत जगाला दाखवली.

आज आधुनिक मानसशास्त्र "Mindfulness", "Behavioural Therapy" यांची चर्चा करते. पण त्यांची मूळ प्रेरणा बुद्धांच्या ध्यानशास्त्रात अर्थात सतीपठ्ठान मध्ये आहे. भौतिक व मानसिक जगाची 

साधन प्रयोगशाळा मन व शरीर हेच आहे

आज विज्ञानाने जे सिद्ध केले आहे ते बुद्धांनी आधीच अनुभवलं आहे.

म्हणून बुद्धांचे विचार सिद्ध करण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता नाही. उलट विज्ञानालाच बुद्धांच्या अनुभूतीतून दिशा मिळते.

बुद्ध हे केवळ धर्मसंस्थापक नव्हते; ते जगातील पहिला महान भौतिक, वैद्यक आणि महान मनोवैज्ञानिक होते.

त्यांनी जगाला शिकवले की 

सत्य हे  प्रत्यक्ष अनुभूतीत आहे.

 अनेक वैज्ञानिक, तत्त्वज्ञ आणि न्यूरोसायन्स तज्ञांच्या दृष्टिकोनातून बुद्धांच्या शिकवणुकींचे वैज्ञानिक दृष्ट्या आकलन, त्यांचे गुण, आणि त्यांच्या विचारांच्या सुव्यवस्थितपणे संज्ञानात्मक आणि भौतिकशास्त्रीय अर्थांची चर्चा केली आहे:

प्रसिद्धवैज्ञानिकांच्या बुद्धा विषयीच्या टिप्पणी अशा की,

निल्स बोहर (Niels Bohr) यांनी, आणि

जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांनी,आणि  अल्बर्ट आइंस्टीन यांनी बुद्धांच्या विचारांमध्ये आधुनिक भौतिकशास्त्राशी साम्य असल्याचे स्पस्ट केले आहे.

दलाई लामा यांनी विज्ञान आणि बुद्धधर्म यांची तर्कशुद्ध तुलना केली आहे.

“मी माझा विश्वास विज्ञानाप्रमाणेच बुद्धधर्मही सत्याचा शोध अनुभवातून घेण्याचा मार्ग मांडतो... जर विज्ञानाने निर्विवादपणे बुद्धधर्मातील कोई गोष्ट खोटी ठरवली तर आम्ही ती स्वीकारून त्याला सोडून द्यायला तयार आहोत.३. तत्त्वज्ञ आणि न्यूरोसायन्समध्ये संतुलन

बी ॲलन वाल्स 

(B. Alan Wallace) म्हणतात की बुद्धधर्म एक सुव्यवस्थित तत्त्वज्ञ आणि अनुभव-आधारित प्रणाली आहे, विशेषतः मानसिक अवस्थांवर केंद्रित आहे (ज्ञान-मनोविज्ञान) — जे विज्ञानाला पूरक आहे.

रॉबर्ट तुरुमन 

(Robert Thurman) बुद्धाच्या ध्यानाला “आंतरिक विज्ञान” (inner science) म्हणतात आणि चेतनेच्या अभ्यासाला भौतिकवादाच्या सीमापलीका म्हणून 

पाहतात.

ट्रिंग जुहान थूआन 

(Trịnh Xuân Thuận,) खगोलशास्त्रज्ञ, बुद्धधर्म आणि विज्ञान यांना समांतर ज्ञानाचे दोन मार्ग मानतात आणि “उभय दृष्टिकोनांत संवाद फायद्याचा ठरू शकतो” असा विश्वास व्यक्त करतात.

या वरून तथागत बुद्ध किती महान संशोधक होते याची कल्पना यावी! 


संदर्भ

1. संयुक्त निकाय, १.१.१६८, उपचालासुत्त

2. क्या बुद्ध नास्तिक थे? गोयंका, एस. एन

पुस्तक : क्या बुद्ध नास्तिक थे.?पृष्ठ90लेखक : एस एन गोयंका


*अनिल वैद्य* 

✍️✍️✍️✍️

गडचिरोलीतील नागरिकांना आता ‘स्पेक्स २०३०’ उपक्रमाद्वारे नेत्रसेवा

 गडचिरोलीतील नागरिकांना

आता ‘स्पेक्स २०३०’ उपक्रमाद्वारे नेत्रसेवा


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


· सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेचा उपक्रम

            मुंबई, दि. ४ : गडचिरोलीसारख्या आदिवासी व मागास जिल्ह्यांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती व उपचार पोहोचविण्यासाठी तसेच तेथील नागरिकांना परवडणाऱ्या व गुणवत्तापूर्ण नेत्रसेवा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या "स्पेक्स २०३०" या प्रकल्पामुळे मुलांचे शिक्षण, तरुणांसाठी रोजगार व संपूर्ण समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत राबविण्यात येणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात यावा, असे आवाहन केले. जागतिक आरोग्य संघटनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका आता डोळ्यांसंदर्भातील आरोग्यसेवेच्या दृष्टीने देशभरात आदर्श ठरणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा ‘स्पेक्स २०३०- वन साईट कार्यक्रम” राज्य सरकारच्या आरोग्य विभाग आणि वन साईट एसीलॉर लक्सोटिका फाऊंडेशन यांच्या सहकार्याने गडचिरोलीसह देशातील पाच मागास जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम राष्ट्रीय अंधत्व निवारण व दृष्टिदोष नियंत्रण कार्यक्रम (NPCBVI) अंतर्गत राबविला जाणार आहे.

अजून नाचा dj लावून समोर pl share

 डि जे पुढे  नाचल्यामुळे काय होते बघा किती गंभीर आहे हे प्रकरण केवळ  जन जागृतीनेच ह्या प्रकारात बदल घडु शकतो 😢


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ हजार युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त

७५ हजार युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी

- मंत्री मंगलप्रभात लोढा

 

मुंबईदि. ५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७५ वा वाढदिवस असून हा दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी कौशल्य विभाग रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा साजरा करत आहे. या अनुषंगाने राज्यातल्या सुमारे ७५ हजार युवक आणि युवतींना कौशल्यविषयक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. येत्या १७ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवडा सुरु राहणार असून १ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे.

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने कौशल्यरोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक उद्योगांच्या मागणीनुसार प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबवत आहेत. तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात राज्यातील आयटीआयमध्ये रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही आता अत्याधुनिक अल्पकालीन अभ्यासक्रम सुरु होत आहेत. कौशल्य विकासाद्वारे युवक व युवतींचे सक्षमीकरण हा यामागचा मूळ उद्देश आहे. मात्र अनेकांना नियमित कार्यशाळेत जाऊन  वेळेअभावी किंवा इतर कारणास्तव प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत नाहीअशा होतकरू युवकांना आणि युवतींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  प्रत्येक जिल्ह्यात अल्पकालीन अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आयटीआयच्या नियमित वर्गाच्या व्यतिरिक्त इतर उपलब्ध वेळेत हे अभ्यासक्रम घेण्यात येतील.

Featured post

Lakshvedhi