Sunday, 7 September 2025

प्रधानमंत्री मातृ वंदन योजना ही महिला व बालकल्याण

 प्रधानमंत्री मातृ वंदन योजना ही महिला व बालकल्याण विभागाकडे अंमलबजावणीसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. विभागाने मागील प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचा आढावा घेऊन त्यांना लाभ देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सोयी सुविधा मिशन अंतर्गत राज्यात मंजूर असलेल्या विविध कामांसाठी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलकडे प्रलंबित असलेल्या परवानग्या तातडीने प्राप्त करून घ्याव्यात.

आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात येणाऱ्या तात्पुरत्या रुग्णालयाची सुविधा असणारे भीष्म क्यूबनियमितपणे देखरेखीखाली असावेअशा निर्देशही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले.

 

मुख्यमंत्र्यांनी बैठकीत अमृत २.० अभियान१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पायाभूत आरोग्य सुविधाप्रधानमंत्री मातृ वंदना योजनाप्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सोयी सुविधा मिशन या योजनांचा विस्तृत आढावा घेतला.

गणपती विसर्जन मिरवणूक मुरुड रायगड


 

आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यक क्षेत्रात

 आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यक क्षेत्रात उपलब्ध मनुष्यबळ आणि भविष्यात लागणारे मनुष्यबळाचा अभ्यास करावा. यामध्ये विशेषतः पॅरामेडिकलमध्ये लागणाऱ्या मनुष्यबळाचा विचार करावा. नर्सिंग महाविद्यालयांना परवानगी देताना तेथ पायाभूत सुविधा असल्याच खात्री करून घ्यावी. त्यानंतरच परवानगी देण्यात यावी. आरोग्य क्षेत्रात तातडीने मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी धोरण तयार करावेअसे निर्देशाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

प्रकल्प पूर्णत्वातील विलंब टाळण्यासाठी

 प्रकल्प पूर्णत्वातील विलंब टाळण्यासाठी प्रकल्प होऊ घातलेल्या जागेच्या परवानग्या प्राप्त करून घ्याव्यात. त्यानंतरच प्रकल्पाचे काम सुरू करण्यात यावेसे निर्देश देत मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणालेविविध विभागयंत्रणांकडून काम सुरू करण्यासाठी सबंधित परवानगी आगाऊ स्वरूपात दिल्यास काम तातडीने सुरू होऊ शकते. टप्पानिहाय कामांमध्ये पाहिल्या टप्प्याचे काम सुरू करून पुढील टप्पा पूर्ण होईपर्यंत परवानगी प्राप्त करून घ्यावी. नागरी भागातील नागरिकांना दर्जेदार व आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हेल्थ अँड वेलनेस सेंटरची कामे पूर्ण करावीत.

 

अमृत २.० अभियानाचा आढावा

 अमृत २.० अभियानाचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेनागरी भागात पाणीपुरवठामलनिःसारणहरित उद्याने व सरोवर पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र शासनाकडून अमृत अभियानांतर्गत निधी देण्यात येत आहे. नागरी भागात जनसामान्यांच्या जीवनात लाग्र बदल  घडवून त्यांचे जीवन सुसह्य करण्याची क्षमता या अभियानात आहे. त्यामुळे यंत्रणांनी मिशन मोडवर या अभियानांतर्गत प्रलंबित असलेल सर्व कामे ३१ मार्च २०२६ पूर्वी पूर्ण करावीत. अभियानांतर्गत प्रलंबित असलेल्या प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात याव्यात. तसेच नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेंकडून त्यांचा सहभाग उपलब्ध करुन द्यावा.

 

जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

 जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • सामाजिक क्षेत्र वॉर रूम मधील योजनांची आढावा बैठक

 

मुंबईदि. २२ : जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजनाउपक्रम व अभियानांची अंमलबजावणी करीत असते. या सर्वांचे प्रभावी कार्यान्वयन करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. यंत्रणांनी योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र कुठेही मागे पडणार नाहीयाबाबत यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मासूम या प्रकल्पासंदर्भात Mpower व आदित्य बिर्ला

 मुलांच्या कुटुंबियांनाही समुपदेशनाची सुविधा दिली जाते.  पालकांचे समुपदेशन केल्याने मुले घरी परतल्यावर त्यांना  पुर्वीप्रमाणे मोकळे वातावरण मिळेल हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.  मासूम प्रकल्प हा राज्यातील बालसंगोपन संस्थांमध्ये मानसिक आरोग्य सेवांना बळकटी देणारा ठरला असून मुलांच्या पुनर्वसन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

या प्रकल्पासंदर्भात Mpower व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापिका व अध्यक्षा नीरजा बिर्ला म्हणाल्या की,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या मानसिक आरोग्याला दिलेले प्राधान्य हे दूरदर्शी नेतृत्वाचे द्योतक आहे. या सार्वजनिक-खागी भागीदारीद्वारे Mpower चे कार्य म्हणजे अडचणीत असलेल्या व विधी संघर्षीत मुलांना त्वरित ट्रॉमा रिलिफ व सर्वसमावेशक मानसशास्त्रीय आधार देणे. प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञांच्या मदतीने विद्यमान प्रणालीला बळकटी देऊन मुलांच्या पुनर्वसन व समाजात पुन्हा समावेशक होण्यासाठी सुरक्षित व सहाय्यकारी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

00000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

Featured post

Lakshvedhi