Saturday, 23 August 2025

गणेशोत्सव काळात भारतीय रेल्वेच्या गणपती विशेष ३८० फेऱ्या Pl share

 गणेशोत्सव काळात भारतीय रेल्वेच्या 

गणपती विशेष ३८० फेऱ्या

 

नवी दिल्ली, २२ : भारतीय रेल्वेने यावर्षीच्या गणेश उत्सवाच्या काळात भाविकांसाठी आणि प्रवाशांसाठी सुसह्य आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी ३८० गणपती विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील प्रवासांची मोठी मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या २९६पश्चिम रेल्वेच्या ५६कोंकण रेल्वेच्या ६ तर दक्षिण रेल्वेच्या २२ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.


१,८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार रु.२५,०००/- भांडवली अनुदान https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर अर्ज

 राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदानऑनलाईन अर्ज २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर२०२५ 

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

राज्यभरातील १,८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी

मिळणार रु.२५,०००/- भांडवली अनुदान

 

मुंबईदि. २२ : यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यानिमित्ताने राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांचे आायोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील १,८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी रु.२५,०००/- भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहेअशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

            याबाबतचे ऑनलाईन अर्ज २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर२०२५ या कालावधीत https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या अनुदानाचा लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

गणेशोत्सवाला "राज्य महोत्सव" दर्जा

 गणेशोत्सवाच्या १० दिवसाच्या काळात आपापल्या विभागात विशेष उपक्रमस्पर्धारोषणाई आदींसह विशेष उपक्रम अंतर्गत "ऑपरेशन सिंदूर"द्वारे माजी सैनिकांचा जिल्हानिहाय सत्कार करण्यात यावा. तसेच आत्मनिर्भर भारत व स्वदेशी संकल्पना यांचा गौरव करण्यात यावाअसेही निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी या बैठकीत दिले.

 गणेशोत्सवाला "राज्य महोत्सव" दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीत भर पडली आहे. लोकसहभागडिजिटल प्रसारआंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

गणेशोत्सव सर्व धर्म, जात, भाषांना जोडणारा

 गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता २२ देशांमध्ये साजरा होतो. सार्वजनिक तसेच घरगुती पद्धतीने आणि आता राज्य शासनामार्फतही साजरा होणारा हा गणेशोत्सव सर्व धर्मजातभाषांना जोडणारा उत्सव असावा. या गणेशोत्सव काळात तालुका ते राज्य स्तरावरील विविध सांस्कृतिक स्पर्धांसाठी १० कोटी रुपयांची बक्षिसे ठेवली जाणार असून समाजमाध्यमांवरून विशेष मोहीम राबवली जावी. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक विभागाने नाट्यसंगीतसांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील वर्ल्ड युनोस्कोचा दर्जा मिळालेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्लेऑपरेशन सिंदूरआत्मनिर्भर भारतस्वदेशी संकल्पना असे विषय घेऊन कार्यक्रम राबविण्यात यावेत. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो-व्हिडिओ जगभरातून अपलोड करता यावेतयासाठी विशेष प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यात प्रमुख मंडळांचे थेट प्रक्षेपण सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर चित्रपट महोत्सवशैक्षणिक कार्यक्रम आदी विषयांवर निबंधचित्रकलाब्लॉग स्पर्धा आयोजित करण्यात याव्यातअशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

राज्य महोत्सव” गणेशोत्सवाकरिता प्रत्येक शासकीय विभागाने सहभागीता वाढवावी

 राज्य महोत्सव गणेशोत्सवाकरिता

प्रत्येक शासकीय विभागाने सहभागीता वाढवावी

– सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबईदि. २२ : गणेशोत्सव हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सव घोषित केले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवात सहभागी असते. आता गणेशोत्सव’ प्रथमच राज्य शासन साजरा करत असल्याने हा उत्सव आता अधिक व्यापक प्रमाणात साजरा करून त्यात लोकसहभाग वाढवावा. यासाठी प्रत्येक विभागांनी विविध उपक्रमातून आपली सहभागीता वाढवून आपापल्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावीअशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी उपस्थित सर्व राज्य आणि केंद्र सरकारी अधिकाऱ्यांना दिल्या.

गडचिरोली, नागपूर व भंडारा जिल्ह्यांमध्ये वैविध्यपूर्ण विकास प्रकल्प

 

  • गडचिरोलीनागपूर व भंडारा जिल्ह्यांमध्ये वैविध्यपूर्ण विकास प्रकल्प

 

मुंबईदि. २२ : "आदिवासी समुदायाचे जीवनमान उंचावणे, त्यांच्या जीवनात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्राचा सहभाग आवश्यक आहे. कृषी आधारित वैविध्यपूर्ण योजना राबवल्या जात असून त्यांच्या शाश्वत विकासासाठी मॉयल लिमिटेड’ चे योगदान महत्त्वपूर्ण आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "नीती आयोगाने (NITI Aayog) देशातील निवडक आकांक्षी जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश केला आहे. स्वयंसेवी संस्थाचा सहभाग व 'मॉयल लिमिटेड’ च्या योगदानातून विविध जिल्ह्यातील आदिवासी समुदायासाठी शाश्वत परिणामकारक उपाययोजना राबविण्यात येतील. यात सहभागी सामाजिक क्षेत्रातील जलसंवर्धनकृषी व वन-आधारित उपजीविका या क्षेत्रात ‘बायफ’ संस्थेचे विकासात्मक दीर्घकालीन कार्यही चांगले आहे ," असे त्यांनी नमूद केले. या योगदानासाठी मॉयल लिमिटेड’ चे अभिनंदन केले.

आदिवासींच्या शाश्वत विकासासाठी

 आदिवासींच्या शाश्वत विकासासाठी

मॉयल लिमिटेडच्या महत्त्वपूर्ण योगदानातून अनेक उपक्रम

— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • गडचिरोलीनागपूर व भंडारा जिल्ह्यांमध्ये वैविध्यपूर्ण विकास प्रकल्प

 

Featured post

Lakshvedhi