Saturday, 23 August 2025

१,८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार रु.२५,०००/- भांडवली अनुदान https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर अर्ज

 राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदानऑनलाईन अर्ज २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर२०२५ 

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

राज्यभरातील १,८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी

मिळणार रु.२५,०००/- भांडवली अनुदान

 

मुंबईदि. २२ : यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यानिमित्ताने राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांचे आायोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील १,८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी रु.२५,०००/- भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहेअशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

            याबाबतचे ऑनलाईन अर्ज २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर२०२५ या कालावधीत https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या अनुदानाचा लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi