गणेशोत्सव काळात भारतीय रेल्वेच्या
गणपती विशेष ३८० फेऱ्या
नवी दिल्ली, २२ : भारतीय रेल्वेने यावर्षीच्या गणेश उत्सवाच्या काळात भाविकांसाठी आणि प्रवाशांसाठी सुसह्य आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी ३८० गणपती विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील प्रवासांची मोठी मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या २९६, पश्चिम रेल्वेच्या ५६, कोंकण रेल्वेच्या ६ तर दक्षिण रेल्वेच्या २२ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
No comments:
Post a Comment