Friday, 22 August 2025

“राज्य महोत्सव” गणेशोत्सवाकरिता प्रत्येक शासकीय विभागाने सहभागीता वाढवावी

 राज्य महोत्सव गणेशोत्सवाकरिता

प्रत्येक शासकीय विभागाने सहभागीता वाढवावी

– सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबईदि. २२ : गणेशोत्सव हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सव घोषित केले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवात सहभागी असते. आता गणेशोत्सव’ प्रथमच राज्य शासन साजरा करत असल्याने हा उत्सव आता अधिक व्यापक प्रमाणात साजरा करून त्यात लोकसहभाग वाढवावा. यासाठी प्रत्येक विभागांनी विविध उपक्रमातून आपली सहभागीता वाढवून आपापल्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावीअशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी उपस्थित सर्व राज्य आणि केंद्र सरकारी अधिकाऱ्यांना दिल्या.

कुटुंबांच्या उत्पन्न वाढीसाठी व जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवल्या

  तसेच मॉयल लिमिटेड’ या सार्वजनिक उपक्रमाकडून मंजूर निधीतून मार्च २०२८ पर्यंत नागपूर व भंडारा जिल्ह्यातील चार हजार कुटुंबांच्या उत्पन्न वाढीसाठी व जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवल्या जाणार आहेतपारंपरिक बोडी-आधारित शेती प्रणालीजलसंपदा विकास आणि महिला सक्षमीकरण कार्यक्रमांचे एकत्रीकरण करून समुदाय-आधारित उपजीविकेला प्रोत्साहन दिले जात आहेत.

            याबरोबर शासनाचे विविध विभाग व स्वयंसेवी संस्थामार्फत संयुक्त सहकार्याने जिल्ह्यात कृषीवन उत्पादनेग्रामीण उत्पादनेपायाभूत सुविधा व व्यवस्थापन सुविधा यांचा विकास साधला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

स्वयंसेवी संस्थांमार्फत उपक्रमाची अंमलबजावणी

 स्वयंसेवी संस्थांमार्फत उपक्रमाची अंमलबजावणी

  केंद्र सरकारच्या अंगीकृत मिनीरत्न मॉयल लिमिटेड’ या सार्वजनिक उपक्रमाच्यावतीने विविध जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढण्यासाठी व जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

'मॉयल लिमिटेडने आदिवासी क्षेत्रातील सामाजिक कामासाठी ‘बायफ इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल लाइव्हवूड्स अँड डेव्हलपमेंट (बीआयएसएलडी)’ या स्वयंसेवी संस्थेची निवड करत निधी उपलब्ध करून दिला आहे. ही संस्था राबवत असलेल्या उपक्रमांतून गडचिरोली जिल्ह्यातील १८ हजार कुटुंबांना आधार देण्यासाठी उपजीविकेशी संबंधित विविध उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांमुळे अनेक ग्रामीण कुटुंबांसाठी शाश्व

आदिवासींच्या शाश्वत विकासासाठी ‘मॉयल लिमिटेड’च्या महत्त्वपूर्ण योगदानातून अनेक उपक्रम

 आदिवासींच्या शाश्वत विकासासाठी

मॉयल लिमिटेडच्या महत्त्वपूर्ण योगदानातून अनेक उपक्रम

— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • गडचिरोलीनागपूर व भंडारा जिल्ह्यांमध्ये वैविध्यपूर्ण विकास प्रकल्प

 

मुंबईदि. २२ : "आदिवासी समुदायाचे जीवनमान उंचावणे, त्यांच्या जीवनात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्राचा सहभाग आवश्यक आहे. कृषी आधारित वैविध्यपूर्ण योजना राबवल्या जात असून त्यांच्या शाश्वत विकासासाठी मॉयल लिमिटेड’ चे योगदान महत्त्वपूर्ण आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "नीती आयोगाने (NITI Aayog) देशातील निवडक आकांक्षी जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश केला आहे. स्वयंसेवी संस्थाचा सहभाग व 'मॉयल लिमिटेड’ च्या योगदानातून विविध जिल्ह्यातील आदिवासी समुदायासाठी शाश्वत परिणामकारक उपाययोजना राबविण्यात येतील. यात सहभागी सामाजिक क्षेत्रातील जलसंवर्धनकृषी व वन-आधारित उपजीविका या क्षेत्रात ‘बायफ’ संस्थेचे विकासात्मक दीर्घकालीन कार्यही चांगले आहे ," असे त्यांनी नमूद केले. या योगदानासाठी मॉयल लिमिटेड’ चे अभिनंदन केले.

प्रत्येक खासगी भागीदारांचे योगदान अत्यंत मोलाचे

 प्रत्येक खासगी भागीदारांचे योगदान अत्यंत मोलाचे असूनसरकारी योजनांची सखोल माहिती व सहयोगाने गावोगावी उत्तम परिणाम साधता आला आहे.  व्हीएसटीएफ आणि भागीदार असलेल्या खासगी कंपन्यांमुळे ग्राम विकास परिवर्तनात चांगले काम झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

व्हीएसटीएफ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात अनेक खासगी कंपन्यांनी व सामाजिक उत्तरदायित्व क्षेत्रातील भागीदारांनी

 व्हीएसटीएफ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात अनेक खासगी कंपन्यांनी व सामाजिक उत्तरदायित्व क्षेत्रातील भागीदारांनी केवळ आर्थिक सहाय्यच नव्हे तर धोरणात्मक बदलनवी तंत्रज्ञानडेटा आधारित प्रक्रिया आणि नाविन्यपूर्ण उपाय सुचवून शासनाच्या प्रयत्नांना बळकटी दिली. हे परिवर्तन केवळ योजना राबवणे नव्हेतर गावात समर्पित व्यक्तींची उपस्थितीसामाजिक बांधिलकीने काम करणारे फेलोज आणि स्थानिक पातळीवर संस्था उभ्या करण्यावर लक्ष केंद्रीत होतेअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

व्हीएसटीएफच्या पहिल्या टप्प्यात अनेक गावांमध्ये राबविलेल्या योजनांचा

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीव्हीएसटीएफच्या पहिल्या टप्प्यात अनेक गावांमध्ये राबविलेल्या योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून त्याच्या मूल्यमापनाचे परिणाम उत्साहवर्धक  आहे. या टप्प्यात काही त्रुटी राहिल्या असल्या तरी त्या सुधारून दुसऱ्या टप्पा अधिक प्रभावीपणे राबवून तो यशस्वी करू. ग्राम परिवर्तन उपक्रमाची अंमलबजावणी करताना व्हीएसटीएफचे फेलोज गावातून बाहेर पडल्यावर तेथील परिवर्तनाचा वेग मंदावल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या पुढील काळात गावातच उपलब्ध मनुष्यबळावर आधारित संस्थात्मक संरचना उभी करणे गरजेचे आहे. गावांमध्ये योजनांची अंमलबजावणी करताना प्रत्येक गावाची गरज ओळखून योजनांमध्ये बदल केल्यास परिवर्तनाची गती वाढेल.

Featured post

Lakshvedhi