तसेच ‘मॉयल लिमिटेड’ या सार्वजनिक उपक्रमाकडून मंजूर निधीतून मार्च २०२८ पर्यंत नागपूर व भंडारा जिल्ह्यातील चार हजार कुटुंबांच्या उत्पन्न वाढीसाठी व जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवल्या जाणार आहेत, पारंपरिक बोडी-आधारित शेती प्रणाली, जलसंपदा विकास आणि महिला सक्षमीकरण कार्यक्रमांचे एकत्रीकरण करून समुदाय-आधारित उपजीविकेला प्रोत्साहन दिले जात आहेत.
याबरोबर शासनाचे विविध विभाग व स्वयंसेवी संस्थामार्फत संयुक्त सहकार्याने जिल्ह्यात कृषी, वन उत्पादने, ग्रामीण उत्पादने, पायाभूत सुविधा व व्यवस्थापन सुविधा यांचा विकास साधला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
No comments:
Post a Comment