आदिवासींच्या शाश्वत विकासासाठी
‘मॉयल लिमिटेड’च्या महत्त्वपूर्ण योगदानातून अनेक उपक्रम
— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- गडचिरोली, नागपूर व भंडारा जिल्ह्यांमध्ये वैविध्यपूर्ण विकास प्रकल्प
मुंबई, दि. २२ : "आदिवासी समुदायाचे जीवनमान उंचावणे, त्यांच्या जीवनात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्राचा सहभाग आवश्यक आहे. कृषी आधारित वैविध्यपूर्ण योजना राबवल्या जात असून त्यांच्या शाश्वत विकासासाठी ‘मॉयल लिमिटेड’ चे योगदान महत्त्वपूर्ण आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "नीती आयोगाने (NITI Aayog) देशातील निवडक आकांक्षी जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश केला आहे. स्वयंसेवी संस्थाचा सहभाग व 'मॉयल लिमिटेड’ च्या योगदानातून विविध जिल्ह्यातील आदिवासी समुदायासाठी शाश्वत परिणामकारक उपाययोजना राबविण्यात येतील. यात सहभागी सामाजिक क्षेत्रातील जलसंवर्धन, कृषी व वन-आधारित उपजीविका या क्षेत्रात ‘बायफ’ संस्थेचे विकासात्मक दीर्घकालीन कार्यही चांगले आहे ," असे त्यांनी नमूद केले. या योगदानासाठी ‘मॉयल लिमिटेड’ चे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment