शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देऊन नव्या पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचवण्यासाठी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले. परंपरागत खेळांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आगामी काळात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात परंपरागत देशी खेळांचे आयोजन केले जाईल असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 22 August 2025
तन-मनाने सुदृढ करणाऱ्या परंपरागत खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन
तन-मनाने सुदृढ करणाऱ्या परंपरागत खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांचे मैदान अल्पावधीत उभारण्यात आले. परंपरागत देशी खेळ सामान्यतः ग्रामीण भागात खेळले जातात, मात्र लोढा यांनी मुंबईसारख्या शहरात या खेळांचे आयोजन करून खऱ्या अर्थाने देशी खेळांना पुनरुज्जीवित केले. परंपरागत कबड्डी, खो-खो, कुस्ती, पंजा लढवणे, तलवारबाजी, पावनखिंड दौड (मॅरेथॉन)रस्सीखेच, विटी-दांडू, मल्लखांब,फुगडी आणि मंगळागौर यासारख्या १८ देशी खेळांच्या या स्पर्धेत २७ हजार खेळाडूंनी मैदान गाजवले. ४५० खेळाडूंना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि कौशल्य विकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी लेझीमसह लाठीकाठी, तलवारबाजी या साहसी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पारंपरिक क्रीडा महाकुंभ भरवणार
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पारंपरिक क्रीडा महाकुंभ भरवणार
- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि.२२ : परंपरागत देशी खेळ केवळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारेच नाहीत तर या खेळांमुळे संस्कृती संवर्धनाचे बहुमूल्य कामही होत असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले. कुर्ला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे पारितोषिक वितरण आणि समारोप झाला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त १३ ऑगस्टपासून क्रीडा भारतीच्या सहयोगाने या पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभचे आयोजन करण्यात आले.
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारे परंपरागत देशी खेळ, संस्कृती संवर्धनाचेही माध्यम - सभापती प्रा.राम
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारे परंपरागत देशी खेळ,
संस्कृती संवर्धनाचेही माध्यम - सभापती प्रा.राम शिंदे
- ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाची जल्लोषात सांगता
- तब्बल २७ हजार स्पर्धकांनी गाजवले देशी खेळांचे मैदान
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पारंपरिक क्रीडा महाकुंभ भरवणार
मुख्यमंत्र्यांनी बैठकीत अमृत २.० अभियान
मुख्यमंत्र्यांनी बैठकीत अमृत २.० अभियान, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पायाभूत आरोग्य सुविधा, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सोयी सुविधा मिशन या योजनांचा विस्तृत आढावा घेतला.
प्रधानमंत्री मातृ वंदन योजना ही महिला व बालकल्याण
प्रधानमंत्री मातृ वंदन योजना ही महिला व बालकल्याण विभागाकडे अंमलबजावणीसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. विभागाने मागील प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचा आढावा घेऊन त्यांना लाभ देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सोयी सुविधा मिशन अंतर्गत राज्यात मंजूर असलेल्या विविध कामांसाठी ' नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल' कडे प्रलंबित असलेल्या परवानग्या तातडीने प्राप्त करून घ्याव्यात.
आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात येणाऱ्या तात्पुरत्या रुग्णालयाची सुविधा असणारे ' भीष्म क्यूब' नियमितपणे देखरेखीखाली असावेत, अशा निर्देशही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले.
आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यक क्षेत्रात
आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यक क्षेत्रात उपलब्ध मनुष्यबळ आणि भविष्यात लागणारे मनुष्यबळाचा अभ्यास करावा. यामध्ये विशेषतः पॅरामेडिकलमध्ये लागणाऱ्या मनुष्यबळाचा विचार करावा. नर्सिंग महाविद्यालयांना परवानगी देताना तेथे पायाभूत सुविधा असल्याची खात्री करून घ्यावी. त्यानंतरच परवानगी देण्यात यावी. आरोग्य क्षेत्रात तातडीने मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी धोरण तयार करावे, असे निर्देशाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...