प्रधानमंत्री मातृ वंदन योजना ही महिला व बालकल्याण विभागाकडे अंमलबजावणीसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. विभागाने मागील प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचा आढावा घेऊन त्यांना लाभ देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सोयी सुविधा मिशन अंतर्गत राज्यात मंजूर असलेल्या विविध कामांसाठी ' नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल' कडे प्रलंबित असलेल्या परवानग्या तातडीने प्राप्त करून घ्याव्यात.
आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात येणाऱ्या तात्पुरत्या रुग्णालयाची सुविधा असणारे ' भीष्म क्यूब' नियमितपणे देखरेखीखाली असावेत, अशा निर्देशही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले.
No comments:
Post a Comment