महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पारंपरिक क्रीडा महाकुंभ भरवणार
- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि.२२ : परंपरागत देशी खेळ केवळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारेच नाहीत तर या खेळांमुळे संस्कृती संवर्धनाचे बहुमूल्य कामही होत असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले. कुर्ला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे पारितोषिक वितरण आणि समारोप झाला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त १३ ऑगस्टपासून क्रीडा भारतीच्या सहयोगाने या पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभचे आयोजन करण्यात आले.
No comments:
Post a Comment