Thursday, 14 August 2025

व्हिजन तयार करण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर तयारी झाली आहे.

 नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम म्हणालेव्हिजन तयार करण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर तयारी झाली आहे. मंत्रालयातील विविध विभागाच्या सचिवांसह लाखो लोकांच्या सूचना मिळाल्या आहेत. त्या माहितीतून त्याची प्रकरणे (चॅप्टर्स) तयार झाले असून ते सध्या मसुदा अवस्थेत आहेत. राज्याचे रूपांतर घडवून आणण्यासाठी काही मोठ्या कल्पनाजलद अंमलबजावणी योग्य उपाय सुचवणे हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते. ही चर्चा सचिवांनी आजवर जे काम केले आहेत्याचाच एक भाग आहे. या सर्व कल्पना एकत्र करूनत्या योजनामध्ये समाविष्ट केल्या जातील आणि त्याचा पहिला मसुदा सादर करण्यात येईलअसे श्री. सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.

या कार्यशाळेत रोजगार संधीपायाभूत सुविधासक्षमीकरण आणि जीवनमानाची गुणवत्तासंस्थात्मक क्षमता आणि सुशासन या प्रमुख चार मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

विकसित महाराष्ट्र २०४७ करिता मांडलेल्या संकल्पना राज्याच्या दीर्घकालीन विकास आराखड्यासाठी उपयुक्त

 विकसित महाराष्ट्र २०४७ करिता मांडलेल्या संकल्पना

राज्याच्या दीर्घकालीन विकास आराखड्यासाठी उपयुक्त

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र २०४७ बिग आयडियाज ब्रेनस्टॉर्मिंग कार्यशाळा संपन्न

 

मुंबईदि. १३ : विकसित महाराष्ट्र २०४७ - बिग आयडियाज ब्रेनस्टॉर्मिंग कार्यशाळेत मांडण्यात येणाऱ्या संकल्पना या महाराष्ट्र राज्याच्या दीर्घकालीन विकास आराखड्यासाठी उपयुक्त आहेत. या कार्यशाळेतील चर्चेतून मांडलेल्या संकल्पना पुढील २०-२५ वर्षांसाठी प्रभावी दस्तावेज तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

सह्याद्री अतिथिगृह येथे नियोजन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विकसित महाराष्ट्र २०४७ - बिग आयडियाज ब्रेनस्टॉर्मिंग कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेविकसित भारत घडवण्यासाठी महाराष्ट्राने सर्वाधिक चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. त्यामुळेच नीती आयोगाने महाराष्ट्राबाबत विशेष लक्ष दिले आहे. या संवाद प्रक्रियेतून राज्याच्या विकासाला चालना देणाऱ्या मोठ्या कल्पना’ समोर येतीलअसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आजचा दिवस "विकसित भारत" या ध्येयाच्या दिशेने

 राजशिष्टाचार मंत्री श्री. रावल म्हणाले कीभारताने जागतिक स्तरावर आपल्या संबंधांना आणखी बळकट केले आहे. विविध देशांसोबत द्विपक्षीय करारसंरक्षणव्यापारआणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढले आहे. यामुळे भारताची भूमिका जागतिक व्यासपीठावर अधिक महत्त्वाची झाली आहे.

आजचा दिवस "विकसित भारत" या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारा आहे. त्याचबरोबर "विकसित महाराष्ट्र" हे देखील त्याचे अभिन्न अंग आहे. या दोन्ही ध्येयांच्या पूर्ततेसाठी सर्वच देशांच्या प्रतिनिधींची सोबत महत्त्वाची आहे.

महाराष्ट्र देशाचे आर्थिक ग्रोथ इंजिन आहे

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीदेशाच्या एकूण प्रगतीत महाराष्ट्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र देशाचे आर्थिक ग्रोथ इंजिन आहे आणि गेल्या दशकात या राज्यानेही विकासाच्या दिशेने भरारी घेतली आहे. परकीय गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र देशात अग्रेसर असून४०% पेक्षा जास्त एफडीआय महाराष्ट्रात झाली आहे. मुंबई ही देशाची स्टार्टअप राजधानी बनली आहे. पुणेनाशिकछत्रपती संभाजीनगरनागपूरसारख्या शहरांमध्येही स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणारी पर्यावरणनिर्मिती करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञानऔद्योगिक क्षेत्रकृषी प्रक्रिया उद्योगआणि हरित ऊर्जा या क्षेत्रांमध्ये विशेष भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीचे नवे शिखर गाठले आहे

 गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीचे नवे शिखर गाठले आहे. ११व्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था आता चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून, ही भरारी प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दूरदर्शी धोरणांमुळे शक्य झाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध देशांच्या वाणिज्य दूतांसोबत आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.


पंतप्रधानांनी शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवत भारताला केवळ प्रगत राष्ट्र बनवण्याचे नव्हेतर संपूर्ण जगाच्या विकासाचे इंजिन बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीगेल्या दशकात पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक झाली आहे. नव्या रस्त्यांचे जाळेआंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळबुलेट ट्रेन प्रकल्पवाय-फाय सिटीज आणि स्मार्ट सिटी योजनेतून शहरांचे रूपांतर घडवले जात आहे. या कालखंडात तब्बल २५ कोटी नागरिक दारिद्र्यरेषेच्या वर आले असूनही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. रोजगारनिर्मितीडिजिटल सेवांचा विस्तार आणि कृषीउत्पादन व सेवा क्षेत्रातील सुधारणांनी सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले

सर्व्हर देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे दस्त नोंदणी तीन दिवस बंद राहणार

 सर्व्हर देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे

दस्त नोंदणी तीन दिवस बंद राहणार

 

मुंबईदि. १४ : नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येत असुन यास्तव १४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२ वाजेपासून ते १७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत 'आय-सरीताप्रणाली अंतर्गत दस्त नोंदणीसह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहतील.

संबंधित पक्षकार आणि दस्त नोंदणी करणारे व्यावसायिक यांनी याची नोंद घ्यावीअसे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय)महाराष्ट्र राज्यपुणे उदयराज चव्हाण यांनी केले आहे.

00000

बीडीडीवासियांच्या घरांची स्वप्नपूर्ती वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील इमारतींचे व सदनिकांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

                                                             

बीडीडीवासियांच्या घरांची स्वप्नपूर्ती

वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील इमारतींचे व सदनिकांची

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

 

मुंबई, दि14 : वरळीतील बीडीडी चाळीत अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांसाठी आजचा दिवस विशेष ठरला. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण झालेल्या दोन पुनर्वसन इमारतीतील सदनिकांच्या वाटप कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी इमारतीची व सदनिकेची पाहणी केली. 

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे खासदार मिलिंद देवरामंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲड.आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरगृहनिर्माण व नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ताम्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते. भर पावसात बीडीडी वासियांनी उपस्थित राहून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे स्वागत केले. 

मुख्यमंत्री श्री. फडणवीसउपमुख्यमंत्री श्री. शिंदे व श्री. पवार यांच्यासह सर्व मान्यवरांनी इमारतीच्या 40 व्या मजल्यावर जाऊन सदनिकेची पाहणी केली व कामाबद्दल समाधान व्यक्त केले. मुख्याधिकारी श्री. बोरीकर यांनी प्रकल्पाची माहिती दिली.

Featured post

Lakshvedhi