Thursday, 14 August 2025

विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक

 विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी

आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १३ : जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था आहे. विकसित भारत सोबतच विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यात येत आहे. विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक असून यामध्ये कंपनी आपले योगदान देईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

लोढा वर्ल्ड टॉवर येथील आयबीएम कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढासामान्य प्रशासन (माहिती व तंत्रज्ञान) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन - नैनुटीयामुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसेआयबीएम कंपनीचे भारत आणि दक्षिण आशिया विभागाचे महाव्यवस्थापक हान्स डेक्करव्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल उपस्थित होते.

आयबीएम कंपनीने मुंबईमध्ये कार्यालय सुरू केल्याबाबत मुख्यमंत्री श्री.फडणवीस समाधान व्यक्त करीत म्हणालेआयबीएम राज्य शासनासोबत कॉन्टम कम्प्युटिंगकृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान यावर आधारित राज्याच्या विकासासाठी काम करेल. 'कॉन्टम कम्प्युटिंगतंत्रज्ञानामुळे आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल होत आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रभाव सर्वच क्षेत्रात वाढत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रही या तंत्रज्ञानाच्या सोबतीने प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होणार आहे. त्यामुळे आयबीएम सोबत राज्याच्या प्रगतीसाठी करण्यात आलेला सामंजस्य करार महत्त्वाचा आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेकृषी क्षेत्रासमोर हवामान बदलामुळे मोठी आवाहने निर्माण झाली आहे. शाश्वत कृषीच्या विकासासाठी हे तंत्रज्ञान मोलाची भूमिका निभावणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी समोरील समस्या निकाली काढण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होणार आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आयबीएम कंपनी आणि महाराष्ट्र शासन यांच्यात नाविन्यतातंत्रज्ञान देवाण घेवाण बाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Wednesday, 13 August 2025

नागरिकांना सकस व निर्भेळ प्रतीचे अन्न उपलब्ध करून देण्यास प्राधान्य

 नागरिकांना सकस व निर्भेळ प्रतीचे 

अन्न उपलब्ध करून  देण्यास प्राधान्य

- अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार

·         "सण महाराष्ट्राचासंकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान" शुभारंभ

·         सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान

 

मुंबईदि. १३ :- राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे 'सणासुदीचे विशेष तपासणी अभियानराबविण्यात येणार आहे. ग्राहकांना निर्भेळ शुद्ध, स्वच्छ व उत्तम प्रतीचे अन्न उपलब्ध करून देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी केले.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने आयोजित "सण महाराष्ट्राचासंकल्प अन्न सुरक्षितता अभियान" शुभारंभ अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आला. या अभियानांतर्गत अन्न व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 'सणासुदीचे विशेष तपासणी अभियानराबविण्यात येणार आहे.

एक्साईड इंडस्ट्रीच्या कामगारांना कामावर परत घेण्याबाबत व्यवस्थापनाने दहा दिवसात निर्णय घ्यावा

 एक्साईड इंडस्ट्रीच्या कामगारांना कामावर परत घेण्याबाबत

व्यवस्थापनाने दहा दिवसात निर्णय घ्यावा

- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

 

मुंबईदि. १३ :- चिंचवड येथील एक्साईड इंडस्ट्रीच्या काढून टाकलेल्या कामगारांना कामावर घेण्याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाने दहा दिवसात निर्णय घेऊन कार्यवाही करावीअसे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज दिले.

         विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली एक्साईड इंडस्ट्रीज व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीस पिंपरी चिचंवड सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरेपुणे अतिरिक्त कामगार आयुक्त बाळासाहेब वाघउपायुक्त निखिल वाळकेसहायक कामगार आयुक्त गजानन शिंदेकक्ष अधिकारी संदीप पाटीलएक्साईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापन प्रतिनिधी संतोष चव्हाण आणि कामगार उपस्थित होते.

          उपाध्यक्ष श्री. बनसोडे म्हणाले कीएक्साईड कंपनीने काढून टाकलेल्या १० कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे असे सुचित करताना याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी. एक्साईड कंपनी व्यवस्थापनाने विविध कारणे देऊन काही कामगारांना दोन ते तीन वर्षापासून कामावरून काढून टाकले होते तसेच त्यांना त्याबाबत कोणतीही भरपाई देण्यात आली नव्हती. यामुळे संबंधित कामगार आंदोलन व उपोषण करून त्यांच्या प्रकरणात निर्णय घेण्याबाबत मागणी करत होते. दोन-तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात विधानसभा उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांनी कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्याशी समन्वय राखत बैठकीद्वारे मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला.

            कंपनी व्यवस्थापनाने या कामगारांना दुसऱ्या ठिकाणी बदली करुन रुजू होण्याचे सुचविले आहे. परंतूते कामगार सेवानिवृत्तीच्या जवळ असल्याने वयोमानामुळे त्यांना इतर ठिकाणी काम करणे शक्य होणार नाही. निर्णय घेताना मागील 2 वर्षापासून त्यांना कामावरुन काढले असल्याने त्यांच्या अडचणी व आर्थिक नुकसानीबाबत देखील विचार केला जावा असे उपाध्यक्ष श्री बनसोडे यांनी सांगितले.

      यावेळी बैठकीमध्ये कामगार विभागाचे अधिकारीकंपनीचे अधिकारी व कामगार प्रतिनिधी यांनी माहिती दिली.

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका

 गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका

- मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

मुंबईदि. १३ : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका असून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील. या प्रकल्पग्रस्तांना नियमाप्रमाणे सर्व लाभ देण्यात यावेत अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिल्या. मंत्रालयात आज गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसदर्भात आयोजित बैठकीवेळी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल बोलत होते.

 यावेळी पुनर्वसन उपसचिव श्री. बागडेगोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता जयंत गवळी यांच्यासह संबंधित अधिकारीप्रकल्पग्रस्त उपस्थित होते. तर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्रीजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरभंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

 गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या नियमाप्रमाणे मिळणारे मात्र प्रलंबित असेलेले सर्व लाभ लवकरात लवकर देण्याच्या सूचना देऊन राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले कीधरणग्रस्तांचे दाखले देण्याची प्रक्रिया गतीने करावी. वाढीव कुटुंबांचा लाभ नियमानुसार देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. पुनर्वसीत गावातील नागरी सुविधा पूर्ण कराव्यात. तसेच पर्यटनमासेमारी आणि गाळपेरीबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव तयार करावा अशा सूचनाही राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी दिल्या.

बालविवाह प्रथा समुळ नष्ट करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार

 बालविवाह प्रथा समुळ नष्ट करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि. 13 : बालविवाह प्रथा समुळ नष्ट करण्याच्या दृष्टीने शासन धोरणात्मक निर्णय घेणार आहे. बालविवाह प्रथेमुळे शाळेतून मुलींचे प्रमाण कमी होणेकमी वयात गर्भधारणा आणि कुपोषण अशा समस्या वाढतात या सर्व दुष्परिणामांना आळा बसण्यासाठी बालिका पंचायतच्या सहभागाने बालप्रथेविरोधात अभियान राबविणे गरजेचे असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

बालविवाह प्रथा राज्यातून समुळ नष्ट करण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयात युनिसेफ संस्थेसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी युनिसेफचे राज्याचे मुख्य अधिकारी संजय सिंगबालसंरक्षण तज्ज्ञ अल्पा वोरान्युट्रीशीयन तज्ज्ञ राजी नायर उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या कीबालकांच्या सुरक्षेसाठी आणि बालविवाहास प्रतिबंध घालण्यासाठी मुलींच्या सहभागातून बालिका पंचायत राबविण्यात येते. याचबरोबर मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी लेक लाडकी योजना राबविण्यात येत असूनया योजनेचे अनुदान थेट शाळेचे शुल्क भरण्यासाठी देता येईल का यासंदर्भात्‍ सकारात्मक विचार करण्यात येत आहे. जेणेकरून या योजनेचा थेट संबंधित लाभार्थी मुलींना फायदा होईल आणि शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.

इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात बाल विवाहाचे प्रमाण कमी असूनयासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले जातात. ज्या राज्यात बालविवाह रोखण्यासाठी अभियान यशस्वी ठरले आहे अशा राज्यांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.  बालविवाह प्रथा समुळ नष्ट केल्यासकिशोरवयीन मुलींचे सक्षमीकरणउच्च शिक्षणात त्यांचे वाढते प्रमाणकमी वयातील गर्भधारणेस आळा बसणे तसेच कुपोषण रोखण्यास सहकार्य लाभणार आहे.

रायगड जिल्ह्यातील बसस्थानकांच्या नुतनीकरणाची कामे गतीने पूर्ण करावे

 रायगड जिल्ह्यातील बसस्थानकांच्या नुतनीकरणाची कामे

गतीने पूर्ण करावे

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई दि. १३ : रायगड येथील रोहाम्हसळाश्रीवर्धनमाणगांवतळा येथील नागरिकांच्या सुविधेसाठी बसस्थानाकाच्या नुतनीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

श्रीवर्धन येथील रोहातळामाणगांवश्रीवर्धनम्हसळा येथील एस.टी.डेपोच्या दुरूस्तीच्या कामासंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचेमुंबई सेंट्रलचे व्यवस्थापकीय संचालकविभागीय नियंत्रक आणि डेपो मॅनेजर उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या कीतळा येथील वाहनतळ समतल करण्याचे काम पूर्ण झाले असूनकुपणभिंतप्रसाधनगृह व त्यावर चालक/मालकाचे विश्रांतीगृहाचे नुतनीकरण कामकाजासाठी अंदाजपत्रक सादर करावे. तसेच रोहा येथील कामकाजासाठी रस्त्यांची डागडुजी आणि निवासस्थानाच्या कामकाजासाठी वेगळे अंदाजपत्रक तयार करावे. माणगाव बसस्थानकात बैठक व्यवस्थेचे काम पूर्ण असूनउर्वरित काम तातडीने पूर्ण करावे. तसेचम्हसळा येथील काम जलद गतीने सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

महाराष्ट्रातील 15 सरपंच स्वातंत्र्यदिनी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार नऊ महिला सरपंचांचा समावेश

 महाराष्ट्रातील 15 सरपंच स्वातंत्र्यदिनी

विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

नऊ महिला सरपंचांचा समावेश

 

नवी दिल्ली, 13 : राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 210 ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 15  सरपंचांचा समावेश असून यात नऊ महिला सरपंच असून केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाकडून या सर्व  सरपंचांचा विशेष सन्मान होणार आहे.

सन्मानित होणाऱ्या सरपंचांनी आपल्या गावांमध्ये पायाभूत सुविधासार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सुधारणा घडवल्या आहेत. ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण’, ‘मिशन इंद्रधनुष’ यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनांचे शंभर टक्के प्रभावी कार्यान्वयन करताना स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रमही राबवले आहेत.

महाराष्ट्रातून निवड झालेले ग्रामपंचायत सरपंच खालीलप्रमाणे आहेत: श्री. प्रमोद नरहरी लोंढे (लोंढेवाडीता. माढाजि. सोलापूर)श्रीमती जयश्री धनंजय इंगोले (खासळा नाकाता. कामठीजि. नागपूर)श्री. संदीप पांडुरंग ढेरंगे (कोरेगाव भीमाता. शिरूरजि. पुणे)श्रीमती डॉ. अनुप्रिता सचिन भांडे (म्हातोडीता. अकोलाजि. अकोला)श्रीमती नयना अशोक भुसारे (भावसेता. शहापूरजि. ठाणे)श्रीमती सुनिता दत्तात्रय मिटकरी (ढोरखेडाता. मालेगावजि. वाशिम)श्रीमती अपर्णा नितीन राऊत (कोंढाळाता. देसाईगंजजि. गडचिरोली)श्रीमती संजीवनी वैजनाथ पाटील (खर्डाता. जामखेडजि. अहिल्यानगर)श्री. चंद्रकुमार काशीराम बहेकार (भेजपारता. सालेकसाजि. गोंदिया)श्रीमती रोमिला रामेश्वर बिसेन (केसलवाढा/पवारता. लाखनीजि. भंडारा)श्री. सूरज संतोष चव्हाण (चिंचाळीता. दापोलीजि. रत्नागिरी)श्रीमती पार्वती शेषराव हरकल (कुंभारीता. जिंतूरजि. परभणी)श्री. प्रमोद किसन जगदाळे (बिदलता. मानजि. सातारा)श्री. शशिकांत माधवराव मांगले (कसबेगव्हाणता. अंजनगाव सुर्जीजि. अमरावती)श्रीमती  प्रभावती राजकुमार बिराजदार (बामणीता. उदगीरजि. लातूर) असे एकूण 15 सरपंच आहेत.

गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी  या विशेष अतिथींचा औपचारिक सत्कार होणार असूनयावेळी केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंहकेंद्रीय राज्य मंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आत्मनिर्भर पंचायतविकसित भारताची ओळख या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI) आधारित ‘सभा सार’ अ‍ॅप लाँच होणार असून, ‘ग्रामोदय संकल्प’ मासिकाचा 16 वा अंक प्रकाशित केला जाणार आहे

Featured post

Lakshvedhi