नागरिकांना सकस व निर्भेळ प्रतीचे
अन्न उपलब्ध करून देण्यास प्राधान्य
- अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार
· "सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान" शुभारंभ
· सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान
मुंबई, दि. १३ :- राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे 'सणासुदीचे विशेष तपासणी अभियान' राबविण्यात येणार आहे. ग्राहकांना निर्भेळ शुद्ध, स्वच्छ व उत्तम प्रतीचे अन्न उपलब्ध करून देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी केले.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने आयोजित "सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षितता अभियान" शुभारंभ अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आला. या अभियानांतर्गत अन्न व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 'सणासुदीचे विशेष तपासणी अभियान' राबविण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment