Wednesday, 13 August 2025

आयटीआयमध्ये २० नवीन शॉट टर्मचे अभ्यासक्रम १५ सप्टेंबर पासून सुरू होणार

 आयटीआयमध्ये २० नवीन शॉट टर्मचे

अभ्यासक्रम  १५ सप्टेंबर पासून सुरू होणार

            मंत्री श्री.लोढा म्हणाले की,आयटीआय मध्ये २० नवीन शॉर्ट टर्म कालावधीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. आयटीआय मध्ये तांत्रिक शिक्षणासोबत इतर अनुषंगिक व्यक्तीमत्व विकासाचे अभ्यासक्रम १५ सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळविण्यासाठी अधिकचे कौशल्य प्राप्त होतील. आयटीआय मध्ये व्यवस्थापन क्षेत्रातील बिझनेस अ‍ॅनालिटिक्स (चार महिने), मार्केटिंग मॅनेजमेंट (तीन महिने), प्रॉडक्शन मॅनेजमेंट (साडे तीन महिने),फायनान्शियल मॅनेजमेंट (तीन महिने)बिहेव्हियरल मॅनेजमेंट (साडे तीन महिने) हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. सॉफ्ट स्किल्स मध्ये अ‍ॅडव्हान्स्ड कम्युनिकेटिव इंग्लिश अ‍ॅण्ड प्रोफेशनल स्किल्स ट्रेनर (तीन महिने), फंडामेंटल्स ऑफ कॉन्टेन्ट रायटिंग (तीन महिने), कम्युनिकेटिव इंग्लिश ट्रेनर (तीन महिने), पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड ग्रूमिंग (साडे तीन महिने)कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट (CRM) (तीन महिने) हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.   

        सेवा क्षेत्रातील अभ्यासक्रम अ‍ॅडव्हान्स्ड कोर्सेस इन गार्डनिंग (साडे तीन महिने)इलेक्ट्रिशियन अ‍ॅण्ड प्लम्बिंग (तीन महिने), नर्सिंग (तीन महिने), फ्रंट डेस्क कोऑर्डिनेटर  (तीन महिने), हाउसकीपिंग सुपरवायझर (साडे तीन महिने) हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. काळानुरूप विशेष अभ्यासक्रमामध्ये एआय मशीन लर्निंग डेव्हलपरचा (तीन महिने), सोलर पॅनल इन्स्टॉलेशन अ‍ॅण्ड मेंटेनन्स साडे (तीन महिने), ड्रोन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड ऑपरेशन्स (तीन महिने), ईव्ही मेकॅनिक (साडे तीन महिने), इंडस्ट्रियल रोबोटिक्स अ‍ॅण्ड डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग टेक्निशियन (चार महिने) हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. स्थानिकांच्या मागणीनुसार अन्य पाच अभ्यासक्रमही संबंधित आयटीआयना निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. अर्बन सिटी एरियाज- को-ऑप. हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट कोर्स,कोस्टल रिजन - फिश प्रोसेसिंग, ऑर्नामेंटल फिशरीज, अ‍ॅग्रिकल्चरल बेल्ट -अ‍ॅग्रो प्रोसेसिंगफूड प्रोसेसिंग टेक्निशियन  हे देखील अभ्यासक्रम सुरू  करता येतील, अशी माहिती देण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनानिमित्त मुंबईत खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे आयोजन

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनानिमित्त

मुंबईत खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे आयोजन

 मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईत 'ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचेआयोजन करण्यात आले आहे. येत्या १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान कुर्ला येथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानातमुंबईकरांना पारंपरिक खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे. या क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिमफुगडी आणि लगोरीविटी दांडूसह शिवकालीन पारंपरिक खेळांना पूनर्वैभव मिळवून देणार आहे.

            पारंपरिक खेळांच्या या क्रीडा महाकुंभात कब्बडीखो-खोलगोरीलेझीमरस्सीखेच,मल्लखांबपावनखिंड दौडकुस्ती,पंजा लढवणेविटी-दांडू,दोरीच्या उड्याफुगडी आणि योग या क्रीडा प्रकारात महिला आणि पुरुष गटातील सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.  कुर्ला येथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात होणाऱ्या या क्रीडा महाकुंभात ही जनतेने सहभागी व्हावे असे आवाहनही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

दरम्यान ज्या संस्थांना आणि क्रीडा मंडळांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८६७०६६५०६ अथवा ९७६८३२७७४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे क्रीडा भारतीकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण २०२५” ला मान्यता

 मंत्री श्री.लोढा म्हणाले कीमहाराष्ट्र स्टार्टअपउद्योजकता आणि नाविन्यता धोरण २०२५ ला मान्यता देण्यात आली असून या धोरणाची अधिकृत अंमलबजावणी  करण्यात येणार आहे. हे धोरण महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राबविले जाणार आहे. या धोरणाद्वारे महाराष्ट्रात भारतातील सर्वात गतिशील व भविष्यवेधी स्टार्टअप केंद्र उभारण्याचा उद्देश आहे.या धोरणात पुढील पाच वर्षांसाठी महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन मांडण्यात आला असून १.२५ लाख उद्योजक घडवणे व ५०,००० स्टार्टअपना मान्यता देण्याचे उद्दिष्ट आहे. शहरीग्रामीणमहिला आणि युवा उद्योजकांसह सर्व क्षेत्रांतील उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि वंचित समुदायांवर लक्ष केंद्रित केले जाईल. या धोरणातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे निवडलेल्या उमेदवारांना वित्तीय संस्थांच्या भागीदारीतून रु.५.०० लक्ष ते रु.१०.०० लक्ष पर्यंत कर्ज साहाय्य दिले जाईल. पाच वर्षांच्या कालावधीसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी (corpus) उभारला जाईल. महाराष्ट्र स्टार्टअप वीक अंतर्गत निवड झालेल्या स्टार्टअप्सना राज्यशासन विभागांसोबत थेट काम करण्याची संधी मिळेल आणि रुपये २५ लाखांपर्यंतचे प्रायोगिक तत्वावर कार्यादेश दिले जातील. राज्यातील प्रत्येक विभाग आपल्या वार्षिक तरतुदीपैकी ०.५% निधी नाविन्यता व उद्योजकतेसाठी  उपलब्ध करेल. यामधील सर्व योजना महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्या सहाय्याने राबवण्यात येतीलजी राज्यातील नाविन्यता व उद्योजकता क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून काम करेल

आयटीआय मध्ये तांत्रिक शिक्षणासोबत व्यक्तीमत्व विकासाचे २० अभ्यासक्रम १५ सप्टेंबर पासून सुरू होणार

 मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड’या योजनेंतर्गत

जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणार

आयटीआय मध्ये तांत्रिक शिक्षणासोबत व्यक्तीमत्व विकासाचे

२० अभ्यासक्रम १५ सप्टेंबर पासून सुरू होणार

- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

 

मुंबई,दि.५: महाराष्ट्र स्टार्टअपउद्योजकता व नाविन्यता धोरण २०२५ मध्ये "मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड"योजना राबविण्यात येणार आहे. विविध तंत्रशिक्षण प्राप्त ३० लाख युवक-युवतींची शासनाकडे नोंद आहे. या सर्वांना ईमेल करून त्यांची एआयद्वारे परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये पाच लाख युवक-युवतींची विविध पद्धतीद्वारे निवड करण्यात येईल. यातून पुन्हा चाळणी करून १ लाख उमेदवारांची मूल्यांकन चाचण्या,स्पर्धा व हॅकाथॉनच्या माध्यमातून निवड केली जाईल. अंतिम टप्प्यात २५,००० निवडक उमेदवारांना त्यानंतर तांत्रिक सहाय्यआर्थिक मदत आणि प्रशिक्षण देऊन यशस्वी उद्योजकस्टार्टअप्स तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. आयटीआय मध्ये तांत्रिक शिक्षणासोबत इतर अनुषंगिक व्यक्तीमत्व विकासाचे २० अभ्यासक्रम १५ सप्टेंबर पासून सुरू होणार असल्याची माहिती कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

            मंत्रालयात कौशल्य, रोजगार व उद्योजकता नाविन्यता विकास विभागाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी कौशल्य विकास आयुक्त लहुराज माळी उपस्थित होते

मंत्र्यांकडून महिलांना मार्गदर्शन आणि आश्वासन

 मंत्र्यांकडून महिलांना मार्गदर्शन आणि आश्वासन

प्रत्येक स्टॉलला भेट देत मंत्री श्री. गोरे यांनी उत्पादनांची माहिती घेतली आणि महिलांना विक्री व ब्रँडिंगसंबंधी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले कीया उपक्रमांद्वारे ग्रामीण महिलांना आर्थिक संधी उपलब्ध होत असूनशासनाची भविष्यातही अशीच साथ राहणार आहे.

 

या भेटीदरम्यान उमेदच्या लाडक्या बहिणींनी मंत्री श्री.गोरे यांना राखी बांधली. या वेळी उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागरअवर सचिव धनवंत माळीतसेच इतर मान्यवर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००

ग्रामीण महिलांना मुंबईत व्यासपीठ

 ग्रामीण महिलांना मुंबईत व्यासपीठ

राष्ट्रीय हातमाग दिन आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रदर्शनात पालघरपनवेलकर्जतपेण आणि जळगाव जिल्ह्यांतील एकूण 10 महिला बचत गटांनी सहभाग घेतला. या गटांनी तयार केलेल्या वस्तूंमध्ये आकर्षक राख्यापौष्टिक लाडूपारंपरिक तोरणहस्तनिर्मित दागिनेजामजेली आणि ज्यूस यांचा समावेश आहे. तसेच, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत भारतीय राष्ट्रध्वज "तिरंगा" देखील विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.

सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार



 सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार

 

नवी दिल्ली, 7: सोलापूरचे प्रख्यात हातमाग कारागीर राजेंद्र सुदर्शन  अंकम यांना हातमाग  क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी संत कबीर  हथकरघा राष्ट्रीय  पुरस्कारानेसन्मानित करण्यात आले.

 

11व्या राष्ट्रीय हाथकरघा दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित भव्य समारंभात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री. गिरिराज सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

1962 मध्ये सोलापूर येथे जन्मलेले राजेंद्र अंकम गेल्या 48 वर्षांपासून पारंपारिक विणकरच्या रूपात हातमाग कला जोपासत आहेत. त्यांनी आपल्या वडिलांकडून विणकामाचे कौशल्य आत्मसात करून, 100 विणकारांना प्रशिक्षण देऊन या कलेला नवसंजीवनी दिली आहे. त्यांच्या कार्याने सोलापूरच्या हातमाग उद्योगाला नवे आयाम मिळाले असूननवीन पिढीला प्रेरणा मिळाली आहे.

 

हा कार्यक्रम स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ आणि हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात येतो. यावेळी 24 उत्कृष्ट कारागिरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यामध्ये 6 महिला आणि 1 दिव्यांग कारागीरांचा समावेश आहे. त्यांच्या हातमाग क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवण्यात आले. कार्यक्रमात परराष्ट्र व्यवहार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्री. पबित्र मार्गेरिटाग्राहक व्यवहारअन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन जयंतीभाई बांभनियाखासदार  कंगना रनौतवस्त्रोद्योग सचिव नीलम शमी रावअतिरिक्त सचिव (वस्त्रोद्योग) रोहित कंसलहाथकरघा आयुक्त डॉ. एम. बीना,  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

 केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी हातमाग क्षेत्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मिती क्षेत्र असल्याचे सांगितले . तसेचडिझायनर्स आणि विणकारांनी एकत्र येऊन तरुणांना आकर्षित करणारी आधुनिक हातमाग उत्पादने तयार करण्याचे आवाहन केले. यावेळी हातमाग प्रदर्शन, ‘वस्त्र वेदा’ फॅशन शो आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ( NIFT) मुंबईच्या कॉफी टेबल बुकचे अनावरणही करण्यात आले.

00000

Featured post

Lakshvedhi