Wednesday, 13 August 2025

नवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे देशांतर्गत बाजारातही मत्स्य विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत

 नवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे

देशांतर्गत बाजारातही मत्स्य विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबईदि. 13 : अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर मोठ्या प्रमाणावर टेरिफ वाढवले आहे. त्यामुळे भारतीय उत्पादने अमेरिकेत महाग होऊन त्याची मागणी घटण्याची शक्यता आहे. देशातून मोठ्या प्रमाणावर मत्स्योत्पादन अमेरिकेत निर्यात केले जाते. या टेरिफ वाढीच्या पार्श्वभूमीवर मत्स्योत्पादनासाठी नवनवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे. तसेच देशांतर्गत बाजारातही मत्स्यविक्री आणि मत्स्य पुरवठा वाढण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

 अमेरिकेने केलेल्या टेरीफ वाढीचा मत्स्योद्योगआंबा आणि काजू निर्यातीवर होणाऱ्या परिणांमाविषयी आढावा घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मंत्री राणे यांनी सूचना दिल्या. या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन रामास्वामीमत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडेमत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठकमहाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 टेरीफ वाढीमुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करून सागरी उत्पादन विकास प्राधिकरणाची बैठक आयोजित करावी असे सूचित करुन मंत्री राणे म्हणाले कीइतर देशातील बाजारांचा विचार करत असतानाच देशांतर्गत बाजारातही जास्तीत जास्त मासळी विशेषतः कोळंबी विक्रीसाठी कशी आणता येईल. यासाठी शासनस्तरावरून कशा स्वरुपे योजना आणता येईल. तसेच निर्यातदारांना कशा प्रकारे मदत करता येईल याचा प्रारुप आराखडा सादर करण्यात यावा. तसेच देशांतर्गत बाजारपेठेत मासळी पुरवठा वाढवण्याविषयी या व्यवसायातील खासगी संस्थांशी बैठक आयोजित करावी. आंबा निर्यातीसोबतच देशातील महत्वाच्या शहरांमध्ये जसे दिल्लीबेंगलोरग्वाल्हेरजबलपूर येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करून आंब्याची देशांतर्गत मागणी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेतअशा सूचना मंत्री राणे यांनी यावेळी दिल्या.

ग्राहक भांडारांचा सप्टेंबरमध्ये मेळावा

 ग्राहक भांडारांचा सप्टेंबरमध्ये मेळावा

राज्यातील ग्राहक भांडारांना ऊर्जितावस्था मिळावीज्या संस्था उत्कृष्ट काम करीत आहेतत्यांचे काम इतरांना प्रेरणादायी ठरावेया उद्देशाने सर्व ग्राहक भांडारांचा मेळावा सप्टेंबर महिन्यात नाशिक येथे आयोजित करण्यात यावाअसे निर्देश पणन मंत्री श्री.रावल यांनी महासंघाला दिले. यामध्ये इतर राज्यांमध्ये चांगले काम करणाऱ्या संस्थांचेइ कॉमर्स जाणणाऱ्या व्यक्तीसंस्थांचेआधुनिक तंत्रज्ञानाचे सहकार्य घ्याअसेही त्यांनी सांगितले.

            प्रारंभी कार्यकारी संचालक श्री. रसाळ यांनी महासंघाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

००००

राज्यात 'अपना भांडार'च्या माध्यमातून खरेदी विक्रीची साखळी उभारणार

 राज्यात 'अपना भांडार'च्या माध्यमातून

खरेदी विक्रीची साखळी उभारणार

- पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 13 : राज्यात महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा लाभ होईलया उद्देशाने 'अपना भांडारया नावाने बहुउद्देशीय ग्राहक भांडारे चालवली जातात. भविष्यात सर्व जिल्ह्यांमध्ये अशी भांडारे उभारून खरेदी-विक्रीची साखळी उभारण्यात येईलअसे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या कामकाजाचा मंत्री श्री.रावल यांनी मुंबईतील महासंघाच्या कार्यालयात जाऊन आढावा घेतला. यावेळी महासंघाच्या प्राधिकृत समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसलेकार्यकारी संचालक विकास रसाळमहासंघाचे संचालक जयसिंग गिरासेसंचालक गोकुळ परदेशी यांच्यासह संबंधित पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

पणन मंत्री श्री.रावल म्हणालेमहासंघाच्या मालकीच्या जागांचा पुनर्विकास करुन त्या सुस्थितीत करुन घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जेथे भाडेतत्वावर जागा आहेतत्यांची मालकी मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयकृषी उत्पन्न बाजार समितीबचत गटांसाठी उभारले जाणारे मॉल्स आदी ठिकाणी अपना भांडार’ सुरू करण्यात यावेत तसेच याठिकाणी महिला बचत गटांच्या उत्पादनांना सहभागी करुन घ्यावे. राज्यात ग्राहक महासंघाच्या माध्यमातून खरेदी विक्रीची प्रभावी साखळी तयार करून राज्यात एक ब्रँड निर्माण करावाअशी सूचनाही त्यांनी केली.

*माहेरचा बाळकृष्ण* 🌹

 🌹 *माहेरचा बाळकृष्ण* 🌹


---------------------------------------------------

अशोककाका कुलकर्णी

९०९६३४२४५१

---------------------------------------------------


पूर्वीपासून लग्नामध्ये आई आपल्या मुलीला गणपती , बाळकृष्ण व अन्नपूर्णा यांच्या मूर्ती देत असे . त्याचे कारण खूप वेगळे आहे . पूर्वी खूप लहानपणी  लग्न होत होती . बाल वयामध्ये लग्न झाल्यामुळे मुलींचे वय खूपच कमी आसे व पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती . घरामध्ये आजी-आजोबा , पणजोबा असे  एकत्र कुटुंबातील सदस्य संख्या वीस ते पंचवीस असे . पण मग  हे नवीन लग्न झाले की मुलगी घरात आल्यानंतर ती सर्वात लहान असल्यामुळे तिला सर्वांचा धाक वाटत असे . त्या काळात फोन नव्हते व पत्र लिहिणे सुद्धा अशक्य होते . त्यामुळे आपल्याला नवीन घरातील वातावरण किंवा आपल्याला असलेला धाक  , आपल्याबद्दल सासरी झालेल्या घडामोडी , आई वडिलांना कळवण्याची काहीही सोय नव्हती . त्यामुळे आई मुलीला लग्नामध्ये गणपती देत असे , अन्नपूर्णा व बाळकृष्ण देत असे . तो बाळकृष्ण माहेरचा पाठीराखा म्हणून सासरी येत असे . ही मुलगी सकाळ संध्याकाळ देव घरामध्ये बसून आपल्या मनातले सगळं सुख दुःख  बाळकृष्णाला कथन करत असे . तो एक माहेरचा पाठीराखा आहे असे समजून सर्व मनातील सुखदुःख त्याच्यापुढे उघड केली जात असे व आपले मन हलके केले जात असे . पूर्वी संपर्काची कोणती साधने नव्हती . आजकाल मोबाईल फोन मुळे एकमेकांशी संपर्क साधणे खूप सोपे झाले आहे . पण तरीही आपल्या देवघरातील बालकृष्ण अन्नपूर्णा आणि गणपती आपला माहेरचा आहे असं समजून प्रत्येक सासूरवाशिन त्या मूर्तींची आत्मीयतेने पूजा करते . कारण तो शेवटी माहेरची पाठीराखा असतो . गणपती याकरता दिला जात असे की नवीन संसाराची सुरुवात होण्यासाठी सुरुवातीपासून गणपतीचे पूजन करावे म्हणून गणपतीची मूर्ती दिली जात असे . पूर्वी सर्व कुटुंब शेतीवर अवलंबून असल्यामुळे अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा अन्नाचा सुकाळ व्हावा यासाठी मुलीला दिली जात असे . आपल्या मुलीला अन्नाची ददात कधी पडू नये म्हणून तिला अन्नपूर्णेची मूर्ती देऊन त्याचे पूजा करावी असे शास्त्रात सांगितले आहे . आजकाल सर्व बदलले आहे पण तरीही प्रत्येक घराघरांमध्ये अन्नपूर्णा बालकृष्ण आणि गणपती असल्यामुळे त्यांची आत्मीयतेने पूजा केली जाते .

जय श्री राम

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहनhttps://hmas.mahait.org

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी

अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. १३ : मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील इतर मागास वर्गविमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील  उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना लागू करण्यात आली आहे.

       सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून इतर मागास वर्गविमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व भटक्या जाती -क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यास पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लढा घेण्यासाठी पात्र लाभार्थीनी सन २०२५ - २६ या वर्षासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी मुंबई शहरसाठी सहाय्यक संचालकइतर मागास बहुजन कल्याण विभागमुंबई शहर/मुंबई उपनगर४ था मजलानवीन प्रशासकीय इमारतआर.सी.मार्गचेंबूर (पू.)मुंबई - ७१ येथे संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त पात्र लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी केले आहे.

अनुकंपा तत्त्वावरील नोकरी बाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशील रहावे

 अनुकंपा तत्त्वावरील नोकरी बाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशील रहावे

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१३६ उमेदवारांना एसटी महामंडळात नियुक्ती

 

मुंबईदि. १३ : आपल्या परिवारातील कर्ता पुरुष गेल्यानंतर आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी अनुकंपा तत्त्वावरील नोकरीची अत्यंत गरज असते. अशावेळी अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहून संबंधित पात्र उमेदवाराला लवकरात लवकर नोकरी देऊन त्याला आर्थिक स्थैर्य कसे मिळेल हे पाहिले पाहिजेअसे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

 एसटी महामंडळाच्या मुख्यालयात ७० उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नोकरीचे नियुक्तीपत्र देण्याच्या समारंभात ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरवित्तीय सल्लागार व  मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख यांच्यासह उमेदवारांचे कुटुंबीय व एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

              मंत्री श्री. सरनाईक म्हणालेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात  शासनाच्या धर्तीवर  रा.प. सेवेत असताना अधिकारी/कर्मचारी मृत झाल्यास त्यांच्या अवलंबितांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद आहे. त्यानुसार  सन २०१६ पासून प्रलंबित असलेले अनेक अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचे प्रस्ताव मार्गी लावण्यात आले आहेत. या बरोबरच विभागीय स्तरावर आणखी ६६ उमेदवारांना ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत अनुकंपा तत्त्वावर नोकरीचे नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत. अशा रीतीने वाहतूक निरीक्षकप्रभारकलेखाकारसहाय्यक सुरक्षा निरीक्षकलिपिक-टंकलेखक अशा विविध पदांवर तब्बल १३६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर एसटी महामंडळाच्या नोकरीमध्ये सामावून घेण्यात आले आहे.

पारंपरिक देशी खेळाडूंना शासकीय नियुक्त्यांबाबत प्रयत्न करणार

  पारंपरिक देशी खेळाडूंना शासकीय नियुक्त्यांबाबत प्रयत्न करणार

- क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत

मंत्री मंगलप्रभात लोढा

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभ उद्घाटन

 

मुंबई, दि. १३ : पारंपरिक देशी खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कारशासकीय लाभ आणि नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी कुर्ला येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभ उद्घाटन कार्यक्रमात दिले. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत, असे मत कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

मंत्री ॲड.कोकाटे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महाकुंभचे उद्घाटन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानाचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या देशी मैदानी खेळांच्या खेळाडूंना शासकीय लाभ मिळण्याबाबतची मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली होती.

Featured post

Lakshvedhi