पारंपरिक देशी खेळाडूंना शासकीय नियुक्त्यांबाबत प्रयत्न करणार
- क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे
दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत
- मंत्री मंगलप्रभात लोढा
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभ उद्घाटन
मुंबई, दि. १३ : पारंपरिक देशी खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कार, शासकीय लाभ आणि नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी कुर्ला येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभ उद्घाटन कार्यक्रमात दिले. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत, असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
मंत्री ॲड.कोकाटे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महाकुंभचे उद्घाटन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानाचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या देशी मैदानी खेळांच्या खेळाडूंना शासकीय लाभ मिळण्याबाबतची मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली होती.
No comments:
Post a Comment