Wednesday, 13 August 2025

*माहेरचा बाळकृष्ण* 🌹

 🌹 *माहेरचा बाळकृष्ण* 🌹


---------------------------------------------------

अशोककाका कुलकर्णी

९०९६३४२४५१

---------------------------------------------------


पूर्वीपासून लग्नामध्ये आई आपल्या मुलीला गणपती , बाळकृष्ण व अन्नपूर्णा यांच्या मूर्ती देत असे . त्याचे कारण खूप वेगळे आहे . पूर्वी खूप लहानपणी  लग्न होत होती . बाल वयामध्ये लग्न झाल्यामुळे मुलींचे वय खूपच कमी आसे व पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती . घरामध्ये आजी-आजोबा , पणजोबा असे  एकत्र कुटुंबातील सदस्य संख्या वीस ते पंचवीस असे . पण मग  हे नवीन लग्न झाले की मुलगी घरात आल्यानंतर ती सर्वात लहान असल्यामुळे तिला सर्वांचा धाक वाटत असे . त्या काळात फोन नव्हते व पत्र लिहिणे सुद्धा अशक्य होते . त्यामुळे आपल्याला नवीन घरातील वातावरण किंवा आपल्याला असलेला धाक  , आपल्याबद्दल सासरी झालेल्या घडामोडी , आई वडिलांना कळवण्याची काहीही सोय नव्हती . त्यामुळे आई मुलीला लग्नामध्ये गणपती देत असे , अन्नपूर्णा व बाळकृष्ण देत असे . तो बाळकृष्ण माहेरचा पाठीराखा म्हणून सासरी येत असे . ही मुलगी सकाळ संध्याकाळ देव घरामध्ये बसून आपल्या मनातले सगळं सुख दुःख  बाळकृष्णाला कथन करत असे . तो एक माहेरचा पाठीराखा आहे असे समजून सर्व मनातील सुखदुःख त्याच्यापुढे उघड केली जात असे व आपले मन हलके केले जात असे . पूर्वी संपर्काची कोणती साधने नव्हती . आजकाल मोबाईल फोन मुळे एकमेकांशी संपर्क साधणे खूप सोपे झाले आहे . पण तरीही आपल्या देवघरातील बालकृष्ण अन्नपूर्णा आणि गणपती आपला माहेरचा आहे असं समजून प्रत्येक सासूरवाशिन त्या मूर्तींची आत्मीयतेने पूजा करते . कारण तो शेवटी माहेरची पाठीराखा असतो . गणपती याकरता दिला जात असे की नवीन संसाराची सुरुवात होण्यासाठी सुरुवातीपासून गणपतीचे पूजन करावे म्हणून गणपतीची मूर्ती दिली जात असे . पूर्वी सर्व कुटुंब शेतीवर अवलंबून असल्यामुळे अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा अन्नाचा सुकाळ व्हावा यासाठी मुलीला दिली जात असे . आपल्या मुलीला अन्नाची ददात कधी पडू नये म्हणून तिला अन्नपूर्णेची मूर्ती देऊन त्याचे पूजा करावी असे शास्त्रात सांगितले आहे . आजकाल सर्व बदलले आहे पण तरीही प्रत्येक घराघरांमध्ये अन्नपूर्णा बालकृष्ण आणि गणपती असल्यामुळे त्यांची आत्मीयतेने पूजा केली जाते .

जय श्री राम

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहनhttps://hmas.mahait.org

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी

अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. १३ : मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील इतर मागास वर्गविमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील  उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना लागू करण्यात आली आहे.

       सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून इतर मागास वर्गविमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व भटक्या जाती -क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यास पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लढा घेण्यासाठी पात्र लाभार्थीनी सन २०२५ - २६ या वर्षासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी मुंबई शहरसाठी सहाय्यक संचालकइतर मागास बहुजन कल्याण विभागमुंबई शहर/मुंबई उपनगर४ था मजलानवीन प्रशासकीय इमारतआर.सी.मार्गचेंबूर (पू.)मुंबई - ७१ येथे संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त पात्र लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी केले आहे.

अनुकंपा तत्त्वावरील नोकरी बाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशील रहावे

 अनुकंपा तत्त्वावरील नोकरी बाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशील रहावे

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१३६ उमेदवारांना एसटी महामंडळात नियुक्ती

 

मुंबईदि. १३ : आपल्या परिवारातील कर्ता पुरुष गेल्यानंतर आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी अनुकंपा तत्त्वावरील नोकरीची अत्यंत गरज असते. अशावेळी अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहून संबंधित पात्र उमेदवाराला लवकरात लवकर नोकरी देऊन त्याला आर्थिक स्थैर्य कसे मिळेल हे पाहिले पाहिजेअसे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

 एसटी महामंडळाच्या मुख्यालयात ७० उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नोकरीचे नियुक्तीपत्र देण्याच्या समारंभात ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरवित्तीय सल्लागार व  मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख यांच्यासह उमेदवारांचे कुटुंबीय व एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

              मंत्री श्री. सरनाईक म्हणालेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात  शासनाच्या धर्तीवर  रा.प. सेवेत असताना अधिकारी/कर्मचारी मृत झाल्यास त्यांच्या अवलंबितांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद आहे. त्यानुसार  सन २०१६ पासून प्रलंबित असलेले अनेक अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचे प्रस्ताव मार्गी लावण्यात आले आहेत. या बरोबरच विभागीय स्तरावर आणखी ६६ उमेदवारांना ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत अनुकंपा तत्त्वावर नोकरीचे नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत. अशा रीतीने वाहतूक निरीक्षकप्रभारकलेखाकारसहाय्यक सुरक्षा निरीक्षकलिपिक-टंकलेखक अशा विविध पदांवर तब्बल १३६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर एसटी महामंडळाच्या नोकरीमध्ये सामावून घेण्यात आले आहे.

पारंपरिक देशी खेळाडूंना शासकीय नियुक्त्यांबाबत प्रयत्न करणार

  पारंपरिक देशी खेळाडूंना शासकीय नियुक्त्यांबाबत प्रयत्न करणार

- क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत

मंत्री मंगलप्रभात लोढा

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभ उद्घाटन

 

मुंबई, दि. १३ : पारंपरिक देशी खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कारशासकीय लाभ आणि नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी कुर्ला येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभ उद्घाटन कार्यक्रमात दिले. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत, असे मत कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

मंत्री ॲड.कोकाटे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महाकुंभचे उद्घाटन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानाचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या देशी मैदानी खेळांच्या खेळाडूंना शासकीय लाभ मिळण्याबाबतची मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली होती.

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशासनाची जय्यत तयारी; मंत्रालयात ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम

 स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशासनाची जय्यत तयारी;

मंत्रालयात ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम

 

मुंबईदि. 13 : भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण समारंभाची सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागाने जय्यत तयारी केली आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.05 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा होणार आहे. यानिमित्त आज राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव सुनील सोनार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन रंगीत तालीम पार पडली.

यावेळी पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढेमुख्यमंत्री सुरक्षाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद कुरडेश्रीनिवास घाडगे यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारीसार्वजनिक बांधकामपोलीस दलातील अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

श्री. सोनार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजाला सलामी देण्यात आली. संचलनात मुंबई पोलीसराज्य राखीव पोलीस दलमध्यप्रदेश पोलीस दल आणि घोडेस्वार सामील झाले होते.

स्वातंत्र्यदिनाला यांची असणार उपस्थिती

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशलोकायुक्तमुंबईतील मंत्रीखासदारआमदारमुख्य सचिवपोलीस महासंचालकमुख्य निवडणूक आयुक्तमुख्य माहिती आयुक्तमहावाणिज्य दूतावासातील अधिकारीसेवा हक्कचे मुख्य आयुक्तमॅटचे अध्यक्षएमपीएससीचे अध्यक्षमहिला हक्क आयोगाच्या अध्यक्षमानवी हक्क आयोगाचे अध्यक्षमुंबई विद्यापीठाचे कुलगुरूभारतीय सेनानौसेनावायुसेनाभारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

000000

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी

 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

'ऑपरेशन सिंदूरआणि 'स्वदेशीविषयी जनजागृती करावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा

गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठक

मुंबईदि. 13 : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावाअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत ऑपरेशन सिंदूरवर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवा दरम्यान गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीतत्यापद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आढावा घेताना बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवारकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढागृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरगृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदममुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे मूर्तीकरांनाही सलग पाच वर्ष परवानगी देण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमूर्तीकारांनी या परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण करावे. परवानगीसाठी महापालिके मार्फत सुरू करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीवर आधारित एक खिडकी योजनेचा लाभ घेण्यात यावा. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या आणि उंच मूर्तींचे खोल समुद्रात विसर्जनासाठी बोटींची संख्याही समुद्रकिनारी वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेगणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राज्य शासनातर्फे हा महोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विस्तृत नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी दिलेल्या सर्व सवलती याही वर्षी कायम ठेवण्यात येतील. हा उत्सव साजरा करताना कायद्याचे योग्य पालन करावे. ईद ए मिलाद सणही गणेशोत्सवा दरम्यान येत असल्याने समन्वयाने धार्मिक सौहार्दता ठेवत कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाहीयाची दक्षता घेण्यात यावी. गणेशोत्सवादरम्यान ध्वनिक्षेपकांना दिलेल्या परवानगीचे दिवस वाढविण्यासाठी न्यायालयाच्या अधीन राहून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यालयांसाठी मालमत्ता कराची आकारणी करताना या कार्यालयांचा व्यावसायिक कारणासाठी उपयोग होत नसल्याबाबत मंडळांनी प्रशासनाला लेखी दिल्यासअशा मंडळांच्या कार्यालयांवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येणार नाहीअसा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

 स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत;

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

 

मुंबईदि. 11 : भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पुढील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावेअसे सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Featured post

Lakshvedhi