Wednesday, 13 August 2025

लेझिम, फुगडी आणि लगोरी, विटी दांडूसह, पावनखिंड दौड, पंजा लढवणे, रस्सीखेच, कुस्ती आणि मल्लखांब यासारख्या शिवकालीन पारंपरिक खेळांना पूनर्वैभव

 आपले पारंपरिक खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून तो आपला सांस्कृतिक ठेवा ही आहे. काळाच्या ओघात पारंपरिक खेळ दुर्मीळ होत चालले आहेत. नव्या  पिढीला त्या शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख करून देण्याची वेळ आली असल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले. या क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिमफुगडी आणि लगोरीविटी दांडूसहपावनखिंड दौडपंजा लढवणेरस्सीखेचकुस्ती आणि मल्लखांब यासारख्या शिवकालीन पारंपरिक खेळांना पूनर्वैभव मिळवून देणार असल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी म्हटले आहे. या क्रीडा महाकुंभात सहभागी होऊन आपल्या संस्कृतीचा ठेवा अबाधित ठेवावाअसे आवाहनही मंत्री श्री लोढा यांनी जनतेला उद्देशून केले आहे.

संस्थांना आणि क्रीडा मंडळांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८६७०६६५०६ अथवा ९७६८३२७७४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे क्रीडा

 क्रीडा भारती या संस्थेच्या माध्यमातून मुंबई परिसरातून मोठ्या प्रमाणात या स्पर्धेसाठी नोंदणी सुरु करण्यात आली असून आतापर्यंत १५ हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी विविध खेळांसाठी नोंदणी केली आहे. शाळा, आयटीआय आणि महाविद्यालयांनीही क्रीडा भारती यांच्याशी संपर्क केला आहे. दरम्यान ज्या संस्थांना आणि क्रीडा मंडळांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८६७०६६५०६ अथवा ९७६८३२७७४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे क्रीडा भारतीकडून सांगण्यात आले आहे. मुंबईमध्ये यापूर्वीही मंत्री श्री. लोढा यांच्यावतीने अशा प्रकारच्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या पारंपरिक क्रीडा स्पर्धांना जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद पाहता आता मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही मुंबई,

 डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही

मुंबईदि. १२ : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर करणारी मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद ही रो रो सेवा मार्च अखेर पर्यंत कार्यान्वित करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी मंत्री श्री. राणे यांनी या सूचना दिल्या.

   बैठकीस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेमहाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

   दिघी आणि काशीद या दोन्ही ठिकाणच्या जेटीच्या कामांना गती देण्याच्या सूचना देऊन मंत्री श्री. राणे म्हणाले कीमुंबईतून कोकणात जाण्यासाठी रो रो सेवा हा एक उत्तम पर्याय असणार आहे. या सेवेमुळे वेळेची ही बचत होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या कामांना गती द्यावी. जेटीचे काम सुरू असतानाच इतर परवानग्यांचे प्रस्ताव पाठवून मंजुरी घ्यावी. मार्च अखेर पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करावीत.

  दरम्यान यावेळी आमदार महेश बालदी यांच्या उपस्थिती मच्छीमार नौकाना द्यावयाच्या डिझेल परतावा या विषयी बैठक झाली. यावेळी एकही पात्र मच्छीमार नौका डिझेल परतावा पासून वंचित राहणार नाही असे मंत्री राणे यांनी सांगितले. तसेच मच्छीमार संस्थानी त्यांच्या बोटी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी उपलब्ध करून द्याव्यात. या विषयी मच्छीमारांना समाधानकारक निर्णय घ्यावाअशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

००००

Tuesday, 12 August 2025

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो रो सेवा मार्च पर्यंत कार्यान्वित करावी

 मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो रो सेवा 

मार्च पर्यंत कार्यान्वित करावी

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

·         डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही

मुंबईदि. १२ : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर करणारी मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद ही रो रो सेवा मार्च अखेर पर्यंत कार्यान्वित करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी मंत्री श्री. राणे यांनी या सूचना दिल्या.

   बैठकीस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेमहाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

   दिघी आणि काशीद या दोन्ही ठिकाणच्या जेटीच्या कामांना गती देण्याच्या सूचना देऊन मंत्री श्री. राणे म्हणाले कीमुंबईतून कोकणात जाण्यासाठी रो रो सेवा हा एक उत्तम पर्याय असणार आहे. या सेवेमुळे वेळेची ही बचत होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या कामांना गती द्यावी. जेटीचे काम सुरू असतानाच इतर परवानग्यांचे प्रस्ताव पाठवून मंजुरी घ्यावी. मार्च अखेर पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करावीत.

  दरम्यान यावेळी आमदार महेश बालदी यांच्या उपस्थिती मच्छीमार नौकाना द्यावयाच्या डिझेल परतावा या विषयी बैठक झाली. यावेळी एकही पात्र मच्छीमार नौका डिझेल परतावा पासून वंचित राहणार नाही असे मंत्री राणे यांनी सांगितले. तसेच मच्छीमार संस्थानी त्यांच्या बोटी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी उपलब्ध करून द्याव्यात. या विषयी मच्छीमारांना समाधानकारक निर्णय घ्यावाअशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

००००

दिनांक ११ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत अंमलबजावणी, जनजागृती नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व दर्जेबाबत तक्रारी असल्यास १८००-२२२-३६५ या टोल-फ्री

दिनांक ११ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत  अंमलबजावणी, जनजागृती नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व दर्जेबाबत तक्रारी असल्यास १८००-२२२-३६५ या टोल-फ्री.                                                              दिनांक ११ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत  अंमलबजावणीजनजागृती आणि प्रचार-प्रसिद्धी या तीन मुख्य घटकांवर भर दिला जाणार आहे. अन्न व्यवसायिकांनी कायद्याच्या सर्व तरतुदींचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

गणपतीईदनवरात्रदसरादिवाळी या सणांच्या काळात मिठाईमोदकफराळप्रसाद या सारख्या खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. या वाढत्या मागणीत काही अन्न व्यावसायिकांकडून अयोग्य किंवा भेसळयुक्त अन्न तयार व विक्री होण्याचा धोका असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. अभियानाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळेमिठाई उत्पादकमोदक व फराळ तयार करणारे महिला बचत गट यांच्यासाठी अन्न स्वच्छतेवरील कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.

नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व दर्जेबाबत तक्रारी असल्यास १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर कळवाव्यातअसे आवाहनही सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी केले आहे.


सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान

 सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे

विशेष तपासणी अभियान

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे अन्न व्यवसायिकांसाठी 

प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबईदि. १२ :- राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 'सणासुदीचे विशेष तपासणी अभियानराबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत उद्या, १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरनरीमन पॉईंटमुंबई येथे अन्न व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण सेंटरयेथे होणाऱ्या  कार्यक्रमाचा शुभारंभ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राज्यमंत्री योगेश कदमसचिव  धीरज कुमार आणि  अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सफाई कामगारांच्या मुलांकरिता अंबरनाथ परिसरातील शाळेचे बांधकाम डिसेंबर पर्यंत पूर्ण करा

 सफाई कामगारांच्या मुलांकरिता अंबरनाथ परिसरातील

शाळेचे बांधकाम डिसेंबर पर्यंत पूर्ण करा

- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

        मुंबई, दि. 12 : अनुसूचित जाती-जमातीमधील सफाई कामगारांच्या मुलांकरिता अंबरनाथ परिसरातील शाळेचे बांधकाम डिसेंबर पर्यंत पूर्ण करा. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भव्य कन्हवेन्शन सेंटर उभारण्याची कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

                मंत्रालयात विविध विषयांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, आमदार डॉ.बालाजी किणीकर उपस्थित होते.

मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, अनुसूचित जाती-जमातीमधील सफाई कामगारांच्या मुलांकरिता  अंबरनाथ परिसरातील शाळेचे बांधकाम डिसेंबर पर्यंत पूर्ण करावी. उल्हासनगर परिसरात १०० मुले व मुलींचे वसतीगृहाकरिता जागा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच उल्हासनगर येथे संविधान भवन उभारण्याबाबत संबधित समाजकल्याण आयुक्त यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

***

Featured post

Lakshvedhi