Wednesday, 13 August 2025

लेझिम, फुगडी आणि लगोरी, विटी दांडूसह, पावनखिंड दौड, पंजा लढवणे, रस्सीखेच, कुस्ती आणि मल्लखांब यासारख्या शिवकालीन पारंपरिक खेळांना पूनर्वैभव

 आपले पारंपरिक खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून तो आपला सांस्कृतिक ठेवा ही आहे. काळाच्या ओघात पारंपरिक खेळ दुर्मीळ होत चालले आहेत. नव्या  पिढीला त्या शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख करून देण्याची वेळ आली असल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले. या क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिमफुगडी आणि लगोरीविटी दांडूसहपावनखिंड दौडपंजा लढवणेरस्सीखेचकुस्ती आणि मल्लखांब यासारख्या शिवकालीन पारंपरिक खेळांना पूनर्वैभव मिळवून देणार असल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी म्हटले आहे. या क्रीडा महाकुंभात सहभागी होऊन आपल्या संस्कृतीचा ठेवा अबाधित ठेवावाअसे आवाहनही मंत्री श्री लोढा यांनी जनतेला उद्देशून केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi