Monday, 11 August 2025

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार,संगणक केंद्रे व प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

 राज्यात विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  • संगणक केंद्रे व प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबईदि. २३ : ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावीतसेच आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी  विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहेअशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीराज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाईतसेच तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर हे मान्यवर उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले कीराज्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत सहकार्य  करण्यासाठी संगणक सुविधांसह सुसज्ज अशी 'विद्यार्थी सहाय्यता केंद्रेस्थापन करण्यात येत आहेत. ही केंद्रे विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियाआवश्यक कागदपत्रांची तपासणीसमुपदेशन आणि मार्गदर्शन याबाबत मदत करतील.

प्रत्येक जिल्ह्यातील दोन नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ही 'विद्यार्थी सहाय्यता केंद्रेकार्यान्वित केली जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणेऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक सहाय्यता देणेतसेच विविध शंका निरसन करणे ही केंद्रांची प्रमुख भूमिका असेल.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू होणाऱ्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत या केंद्रांची मदत होईल, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

राज्य कामगार विमा योजनेचा लाभ गरजू कामगारांपर्यंत पोहोचवावा

 राज्य कामगार विमा योजनेचा लाभ गरजू कामगारांपर्यंत पोहोचवावा

- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबईदि. 23 : राज्य कामगार विमा योजना ही केंद्र सरकार व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात असून या योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा उत्तम प्रकारच्या असून यांचा लाभ तळागाळातील गरजू कामगारांपर्यंत पोहोचवावेतअसे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राज्य कामगार विमा महामंडळाच्या कामकाजाबाबतच्या आढावा बैठकीत श्री.आबिटकर बोलत होते. यावेळी राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त रमेश चव्हाणजिल्हाधिकारी जितेंद्र डूडीराज्य कामगार विमा महामंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी सुकांतचंद्र दासकामगार विमा सोसायटीचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. बालकृष्ण रंगदळबिबवेवाडी येथील विमा महामंडळाच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिमन्यू पांडा आदी मान्यवर उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेया योजनेत कामगारांची नोदणी वाढविण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतळेगावरांजणगावचाकणइ. कामगार असोसिएशनचे सहकार्य घ्यावे. ‘एमआयडीसी’ मधील विविध कंपन्या तसेच इतर आस्थापनांनी कामगारांच्या विमा नोंदणीसाठी शिबीराचे आयोजन करावे व या माध्यमातून जास्तीत जास्त कामगारांना या योजनेत सहभागी करुन घ्यावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्य कामगार विमा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उद्दीष्ट निश्चित करुन जास्तीत जास्त कामगारांपर्यंत या योजनेचा प्रचार प्रसार करुन पुणे जिल्ह्यातील २१ कामगार सेवा दवाखान्यात नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेतअशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणालेबिबवेवाडीच्या कामगार रुग्णालयाचे काम उत्तमप्रकारे सुरू असून त्याठिकाणी दुय्यम आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. पुणे जिल्हा रुग्णालयात उत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करावा. पुणे जिल्ह्यातील कामगारांसंबंधित सर्व आस्थापनांनी समन्वय साधून विमा कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करुन एका महिन्यात उद्दीष्ट साध्य करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त रमेश चव्हाण यांनी कामगार विमा योजनेंतर्गत येणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली व आभार मानले

शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा प्रत्येक गरजू रुग्णांना लाभ देण्याकरिता

 डॉ.ओमप्रकाश शेटे म्हणालेशासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा प्रत्येक गरजू रुग्णांना लाभ देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे रुग्णालयाने पात्र रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देवून सहकार्य करावेया कामात हलगर्जीपणा होणार नाहीयाबाबत रुग्णालय व्यस्थापनाने दक्षता घ्यावीअसेही डॉ. शेटे म्हणाले.

यावेळी पिंपरी-चिंचवड मोहन नगर येथील राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाला आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी भेट देऊन बाहय रुग्ण विभागआंतररुग्ण विभागऔषधी भंडारआहार विभागयांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रुग्णांशी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या. रुग्णांना चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी डॉक्टर व प्रशासन यांनी अधिक काळजीपूर्वक लक्ष द्यावे व दर्जेदार सेवा द्याव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

रुग्णालयांनी गरजू रुग्णांना योजनांचा लाभ प्रभावीपणे द्यावा

 रुग्णालयांनी गरजू रुग्णांना योजनांचा लाभ प्रभावीपणे द्यावा

- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबईदि. 23 : धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनांचा गरजू रुग्णांना प्रभावीपणे लाभ द्यावाया कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत न झालेल्या रुग्णालयानी नोंदणी करुन घ्यावीयाकामी राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईलअसे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

यशदा येथे आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटीलआयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटेराज्य आरोग्य हमी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाणआरोग्य उपसंचालक डॉ. कैलास बाविस्करडॉ.प्रशांत वाडीकर ,जिल्हा शल्यचिसक डॉ. नागनाथ यमपल्लेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्यासह रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेआयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्वाच्या योजना आहे. धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत जिल्ह्यात विविध रुग्णालये नोंदणीकृत असून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याकरिता पुढाकार घेतला पाहिजे.

धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी प्रत्येकी १० टक्के याप्रमाणे एकूण २० टक्के खाटा आरक्षित करणे बंधनकारक असून त्याअनुषंगाने धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी प्रभावीपणे काम करावेशासनाच्या निर्देशाप्रमाणे रुग्णांना खाटा उपलब्ध करुन द्याव्यात.

पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या तसेच वैद्यकीय उपचाराकरिता येणाऱ्या खर्चाचा विचार करता धर्मादाय रुग्णालयाची मोठी जबाबदारी आहे. गरजू रुग्णांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात. सेवा दिल्यानंतर रुग्णांमध्ये रुग्णालयाप्रती समाधानाची भावना निर्माण झाली पाहिजेयादृष्टीने काम करावेअसेही मंत्री श्री. आबिटकर म्हणाले.

जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात

 जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 24 : महसूल विभागाचे काम गतिमानपारदर्शक आणि लोकाभिमुख होण्यासाठी विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. जनसंवादलोकशाही दिन आदी माध्यमातून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावाअसे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित कामांचा आढावा मंत्री श्री.बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री श्री.बावनकुळे म्हणालेराज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये रायगड जिल्हा प्रशासन मागे राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करुन लाभार्थ्यांना घरांसाठी पट्टे उपलब्ध करुन द्यावेत. नवीन वाळू धोरण आणि मार्गदर्शक सूचनांनुसार वाळू उपलब्ध करुन द्यावी. भूमि अभिलेख विभागाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून खर्च करण्यात यावा. पाणंद रस्त्यांना क्रमांक देऊन दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात यावी. लोकअदालत सारख्या माध्यमांतून अर्धन्यायिक प्रकरणांच्या सुनावण्या येत्या तीन महिन्यात पूर्ण कराव्यात. याचबरोबर जिवंत सातबारातुकडेबंदीशेतरस्ताभोगवटादार 2 मधून 1 मध्ये करण्याची तसेच आकारी पड जमिनीची प्रकरणेस्वामित्व योजनेचा लाभ देणे आदी कामे देखील कालमर्यादेत मार्गी लावावीतअसे निर्देश त्यांनी दिले.

रायगड जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांनी यावेळी सुरू असलेल्या विविध कामांचा अहवाल सादर केला.

०००००

सर्व शालेय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे

 सर्व शालेय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी

सुयोग्य नियोजन करावे

- शालेय शिक्षण मंत्री डॉ.पंकज भोयर

 

मुंबईदि. 24 :- विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास हेच शासनाचे उद्दिष्ट असून शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता आणि आधुनिकतेचा समन्वय साधला जावा. यासाठी या सर्व शालेय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाने सुयोग्य नियोजन करावेअसे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.

मंत्रालयात शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीमुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना आणि पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी या विषयांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस प्रधान सचिव रणजितसिंह देओलशालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह (दूरदृश्य प्रणालीद्वारे), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार (दूरदृश्य प्रणालीद्वारे)प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावीउपसचिव समीर सावंतउपसचिव तुषार महाजन आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणालेराज्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक आत्मीयता निर्माण व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना अंतर्गत राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.

००००

गडचिरोलीत कृषिभवन उभारण्यास मान्यता

 गडचिरोलीत कृषिभवन उभारण्यास मान्यता

- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

  मुंबई, दि. २४ :  गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण व्हाव्यातकृषी विषयक सेवा एका छताखाली मिळाव्यात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा या व्यापक हेतूने गडचिरोलीत नवे कृषिभवन इमारत बांधकामास मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

     या प्रकल्पासाठी ११.६७ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असूनहे भवन सोनापूर येथील फळरोपवाटिकेच्या जागेत उभारले जाणार आहे. या निर्णयामागे शेतकऱ्यांना तातडीनेप्रभावी व आधुनिक सेवा मिळाव्यात हा मूळ उद्देश आहे. कृषी विभागाची जिल्हा व तालुक्यामधील सर्व कार्यालये एकाच ठिकाणी सुसज्ज इमारतीमध्ये असावीत, जेणेकरून कामकाजात सुलभता येईल आणि शेतकरी आणि प्रशासनाच्या दृष्टीने सोयीस्कर होणार आहे.

        जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारीगडचिरोली यांनी सोनापूर कॉम्प्लेक्सता. व जि. गडचिरोली येथे नवीन कृषिभवन इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत्तचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. नव्याने होणाऱ्या कार्यालयामध्ये जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारीउपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा तसेच शेतकरी प्रशिक्षण गृह याचा या बांधकामामध्ये समावेश असणार आहे. या कामासाठी ११ कोटी ६७ लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय दि.२२ जुलै २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

Featured post

Lakshvedhi