Thursday, 17 July 2025

गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत मिलच्या एक तृतियांश जमीन संपादनाच्या नियमाची अंमलबजावणी

 गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत मिलच्या

एक तृतियांश जमीन संपादनाच्या नियमाची अंमलबजावणी

मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. १६ : मुंबईतील गिरणी जमिनीसंदर्भात 2019 पासून लागू असलेल्या नियमावलीनुसार (कलम 58आणि नवीन डीसीपीआर (कलम 35अंतर्गतगिरणीच्या जागेचे तीन सम भाग करून त्यातील एक तृतीयांश (वन थर्ड) जमीन महानगरपालिकेस बगीचे व क्रीडांगणासाठीएक तृतीयांश गिरणी कामगारांच्या घरांसाठी आणि उर्वरित भाग मालकासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या नियमाची मुंबईत अंमलबजावणी सुरू असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.

उद्योग मंत्री सामंत म्हणाले कीया नियमानुसार आतापर्यंत 13,500 घरे बांधण्यात आली असून उर्वरित जमिनीवर काम सुरू आहे. खटाव मिलच्या संदर्भात, 10,228.69 चौरस मीटर जमीन मुंबई महापालिकेला मिळणार असून तितकीच जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी वापरली जाईल. या जागेतून 900 ते 1000 नवीन घरे उभारली जातील.

जर काही मिल कंपाउंडने अद्याप वन थर्ड जमीन दिली नसेलतर ती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत जागा उपलब्ध न झाल्यास ठाणेवसई-विरारपरिसरातही कामगारांसाठी घरे देण्यात येतीलअसेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

००००

दिव्यांग शाळेतील गैरप्रकारांवर तातडीची कारवाई; प्रशासकाची नेमणूक

 दिव्यांग शाळेतील गैरप्रकारांवर तातडीची कारवाईप्रशासकाची नेमणूक

- दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

 

मुंबईदि. १६ : मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद मुलामुलींच्या निवासी शाळेमधील गैरप्रकारांवर तातडीने कारवाई करण्यात आली असून या शाळेवर प्रशासक नेमण्यात आले असल्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य संदीप जोशी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना दिव्यांग कल्याण मंत्री श्री. सावे बोलत होते.

याबाबत प्रशासक नियुक्तीला स्थगिती मिळाली नाहीतर पुढील तीन वर्षांसाठी प्रशासक नेमण्याचा विचार केला जाईल असे सांगून मंत्री श्री. सावे म्हणाले कीशासनाकडे अहवाल सादर करून योग्य ती शिस्तभंग कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संस्थाचालकाने बंदुकीचा धाक दाखवल्याचा प्रकार घडला असेल तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून बंदुकीचा परवाना रद्द करण्यात येईलअसेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

दिव्यांग आयुक्ताविरोधात आलेल्या तक्रारींची चौकशी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यासह निलंबनाची प्रक्रिया सुरू केली जाईल. दिव्यांगांच्या शाळेत झालेल्या प्रकारांना राज्य शासनाने गंभीरतेने घेतले असूनदोषींवर कठोर कारवाई केली जाईलअसे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

राज्यातील उद्वाहन तपासणीची प्रक्रिया अधिक गतिमान करणार

 राज्यातील उद्वाहन तपासणीची प्रक्रिया अधिक गतिमान करणार

                                                                        — ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबईदि. १६ : महाराष्ट्रातील उद्वाहन तपासणी अधिक कार्यक्षमसुरक्षित आणि वेळेवर व्हावी, यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर विधान परिषदेत सांगितले.

सदस्य भाई जगताप यांनी नियम ९३ अन्वये राज्यातील उर्जा विभागाच्या विद्युत आणि उद्वाहन निरीक्षक कार्यालयाकडून होणाऱ्या उद्वाहन तपासणीसंदर्भात सूचना मांडली होती.

ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले कीसध्या महाराष्ट्रात एकूण २,१७,६५२ लिफ्ट्स कार्यरत असूनउच्च न्यायालयाच्या २७ सप्टेंबर २०१२ रोजीच्या आदेशानुसार वर्षातून एकदा या लिफ्ट्सची तपासणी होणे बंधनकारक आहे. यापूर्वी ही जबाबदारी फक्त २ विद्युत निरीक्षकांच्या अधिपत्याखालील १२ सहाय्यक निरीक्षक आणि ३० अभियंत्यांवर होतीमात्र हे मनुष्यबळ अत्यल्प असल्यामुळे तपासणी प्रक्रिया मर्यादित प्रमाणातच होत होती.

२८ एप्रिल २०२५ पासून लिफ्ट तपासणीच्या सेवांचे विकेंद्रिकरण केले आहे. आता ४० विद्युत निरीक्षक७८ सहाय्यक विद्युत निरीक्षक आणि ३९७ सहाय्यक अभियंते या कामात सहभागी झाले असून एकूण २८८ अधिकाऱ्यांची यंत्रणा उभी करण्यात आली आहे. तसेच तपासणीची गती वाढवण्यासाठी यापूर्वी कार्यरत असलेल्या ७१ अधिकाऱ्यांचे इतर गरजेच्या ठिकाणी समायोजन करण्यात येणार असूनयासाठी आवश्यक निर्णय पुढील ८ ते १५ दिवसांत घेतले जातीलअसेही त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे उद्वाहन वापरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वर्षातून एकदा नव्हेतर दोनदा तपासणी करण्याचाही विचार करता येईलअसेही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.

एसटी महामंडळातील दोषी अधिकाऱ्याला तातडीने बडतर्फ करणार

 एसटी महामंडळातील दोषी अधिकाऱ्याला तातडीने बडतर्फ करणार

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

•          स्पष्टकायदेशीर  स्पीकिंग ऑर्डर देत बडतर्फ करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबईदि. 16 : गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळात  झालेल्या अनियमिततेची माहिती समोर आली असून ती धक्कादायक आहे. नियमबाह्य खरेदी प्रकरणांत दोषी असलेल्या अधिकाऱ्याला तातडीने बडतर्फ करण्यात येईलअसे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य ॲड अनिल परब यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दापोडी येथील मध्यवर्ती भांडार खरेदीत झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.

परिवहन मंत्री श्री.सरनाईक म्हणाले कीएसटी महामंडळातील गंभीर गैरव्यवहारांप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर अनेक गंभीर आरोप असल्याने त्यांना निलंबित करण्यात येईल. तथापि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सांगितले कीसंबंधित अधिकाऱ्याला केवळ निलंबित करून करून भागणार नाहीतर स्पष्ट कायदेशीर नोटीस देत त्याचे म्हणणे ऐकून घेऊन नंतर स्पीकिंग आर्डर देऊन बडतर्फ केले जावे. त्यावर परिवहन मंत्री यांनी स्पीकिंग ऑर्डरचे निर्देश देऊन त्या अधिकाऱ्याला बडतर्फ केले जाईलअसे सांगितले.

000

गोंदिया जिल्ह्यातील वीजप्रश्न लवकरच मार्गी लागणार

 गोंदिया जिल्ह्यातील वीजप्रश्न लवकर मार्गी लागणार

                                        – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील विजेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून येत्या काही महिन्यांत वीजपुरवठा सुरळीत होईलसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया जिल्ह्यातील विजेच्या प्रश्नासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीगोंदिया जिल्ह्यात 50 एमबीए क्षमतेचं उच्चदाब रोहित्र नादुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हे संयंत्र मोठे असल्याने लगेचच नवीन रोहित्र उपलब्ध करून देता आले नाही. त्यामुळे तात्पुरती उपाययोजना म्हणून 25 एमबीए क्षमतेच रोहित्र बसवण्यात आल आहे. मात्र यामुळे काही प्रमाणात विजेचा विस्कळीत पुरवठा होत आहे. हे लक्षात घेऊन नवीन 50 एमबीए क्षमतेचं रोहित्र बसवण्याच काम सुरू असून ते 22 जुलैपर्यंत ते पूर्ण होईल.

या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून  देवरी येथे 100 एमबीए क्षमतेचे नवीन ईएचव्ही सबस्टेशन उभारण्यात येत आहे. त्यासोबतच  दुसरे एक ईएचव्ही सबस्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पार पडली असून 30 जुलैपर्यंत वर्क ऑर्डर दिली जाईल. पुढील दीड वर्षांत हे काम पूर्ण होईलअसेही मुख्यमंत्री  श्री.फडणवीस म्हणाले.

त्याचबरोबर आमगावमध्ये डिसेंबरपर्यंत एक नवीन कॅपेसिटर बँक उभारण्यात येणार आहे. या सर्व योजनांची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत होईल आणि वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याची समस्या सुटेलअसा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

पिंपळढव साठवण तलाव व रेणापूर सुधा प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर

 पिंपळढव साठवण तलाव व रेणापूर सुधा प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर

- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबईदि. १६ : भोकर तालुक्यातील पिंपळढव साठवण तलावाचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण होणार असूनरेणापूर सुधा बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पाची उंची वाढवण्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या दोन्ही पाटबंधारे प्रकल्पांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेतअसे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

यासंदर्भात सदस्य श्रीजया चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील म्हणालेसन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीपिंपळढव तलावासाठी २० कोटी आणि रेणापूर सुधा प्रकल्पासाठी ८.५ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळामार्फत निधी मागणी संदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला असूनत्याबाबतची पुढील कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


Wednesday, 16 July 2025

पिंपळढव साठवण तलाव व रेणापूर सुधा प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर

 पिंपळढव साठवण तलाव व रेणापूर सुधा प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर

- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबईदि. १६ : भोकर तालुक्यातील पिंपळढव साठवण तलावाचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण होणार असूनरेणापूर सुधा बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पाची उंची वाढवण्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या दोन्ही पाटबंधारे प्रकल्पांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेतअसे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

यासंदर्भात सदस्य श्रीजया चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील म्हणालेसन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीपिंपळढव तलावासाठी २० कोटी आणि रेणापूर सुधा प्रकल्पासाठी ८.५ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळामार्फत निधी मागणी संदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला असूनत्याबाबतची पुढील कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

Featured post

Lakshvedhi