Thursday, 17 July 2025

राज्यातील उद्वाहन तपासणीची प्रक्रिया अधिक गतिमान करणार

 राज्यातील उद्वाहन तपासणीची प्रक्रिया अधिक गतिमान करणार

                                                                        — ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबईदि. १६ : महाराष्ट्रातील उद्वाहन तपासणी अधिक कार्यक्षमसुरक्षित आणि वेळेवर व्हावी, यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर विधान परिषदेत सांगितले.

सदस्य भाई जगताप यांनी नियम ९३ अन्वये राज्यातील उर्जा विभागाच्या विद्युत आणि उद्वाहन निरीक्षक कार्यालयाकडून होणाऱ्या उद्वाहन तपासणीसंदर्भात सूचना मांडली होती.

ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले कीसध्या महाराष्ट्रात एकूण २,१७,६५२ लिफ्ट्स कार्यरत असूनउच्च न्यायालयाच्या २७ सप्टेंबर २०१२ रोजीच्या आदेशानुसार वर्षातून एकदा या लिफ्ट्सची तपासणी होणे बंधनकारक आहे. यापूर्वी ही जबाबदारी फक्त २ विद्युत निरीक्षकांच्या अधिपत्याखालील १२ सहाय्यक निरीक्षक आणि ३० अभियंत्यांवर होतीमात्र हे मनुष्यबळ अत्यल्प असल्यामुळे तपासणी प्रक्रिया मर्यादित प्रमाणातच होत होती.

२८ एप्रिल २०२५ पासून लिफ्ट तपासणीच्या सेवांचे विकेंद्रिकरण केले आहे. आता ४० विद्युत निरीक्षक७८ सहाय्यक विद्युत निरीक्षक आणि ३९७ सहाय्यक अभियंते या कामात सहभागी झाले असून एकूण २८८ अधिकाऱ्यांची यंत्रणा उभी करण्यात आली आहे. तसेच तपासणीची गती वाढवण्यासाठी यापूर्वी कार्यरत असलेल्या ७१ अधिकाऱ्यांचे इतर गरजेच्या ठिकाणी समायोजन करण्यात येणार असूनयासाठी आवश्यक निर्णय पुढील ८ ते १५ दिवसांत घेतले जातीलअसेही त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे उद्वाहन वापरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वर्षातून एकदा नव्हेतर दोनदा तपासणी करण्याचाही विचार करता येईलअसेही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi