Wednesday, 16 July 2025

जिवतीतील वनपट्टे भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी तातडीची कार्यवाही करा -

 वृत्त क्र. 2922

जिवतीतील वनपट्टे भागातील नागरिकांना

न्याय देण्यासाठी तातडीची कार्यवाही करा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबईदि. १५ : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नागरिकांना न्याय मिळावा या दृष्टीनेचुकीने वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या ८,६५९.८ हेक्टर जमिनीच्या सुधारणेसाठी तातडीने कार्यवाही करून आदेश निर्गमित करावेतअसे  निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिले.

विधानभवनात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी जिवती तालुक्यातील बहुप्रलंबित वनजमीनीच्या प्रश्नांचा आढावा घेतला. या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेवनमंत्री गणेश नाईकअपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरप्रधान सचिव शोमिता विश्वासचंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडाअपर प्रधान वनसंरक्षक नरेश झीरमुरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले कीहा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी वन विभागामार्फत महसूल विभागाला सादर करण्यात आलेला आहे त्याची गतीने कार्य वाही करावी. १९८० पूर्वीच्या ६२६० हेक्टर व १९८० ते १९९६ दरम्यानच्या २६५० हेक्टर जमिनीसाठी दोन टप्प्यांमध्ये प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाकडे पाठवावा. वनसंवर्धन कायद्याअंतर्गत केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर या जमिनीचे निर्वणीकरण तातडीने पूर्ण करण्यात यावेअसे निर्देश त्यांनी दिले. यामुळे जिवती तालुक्यातील हजारो शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.

तसेचघरकुलांसाठी योग्य न ठरणाऱ्या जमिनीऐवजी पर्यायी व उपजाऊ जागा देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअसेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जिवती तालुका हा आकांक्षित आणि दुर्गम भाग असल्याने अनेक विकासकामांवर मर्यादा येतात. वनक्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे येथे शेतकऱ्यांना जमिनीचे हक्क मिळत नाहीतआणि त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभही मिळत नाहीअशी माहिती आमदार देवराव भोंगळे यांनी यावेळी दिली.

0000

ऊसतोड कामगार कायद्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करा

 ऊसतोड कामगार कायद्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करा

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबईदि. १५ : ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र कायदा तयार करून तो लवकरात लवकर लागू करण्यासाठी सहकार विभागाने कार्यवाही करावी. जेणेकरून विधेयक डिसेंबर अधिवेशनापूर्वीच अंतिम करून जनतेच्या सूचनांसाठी प्रसिद्ध करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावीअसे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

विधानभवनात ऊसतोड कामगारांच्या व महिला कामगारांच्या आरोग्यसुरक्षाव्यवस्था आणि सामाजिक संरक्षणाच्या समस्या तातडीने मार्गी लागाव्यात यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलआमदार सदाभाऊ खोतआमदार प्रा.डॉ. मनीषा कायंदेसहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेसाखर आयुक्त सिद्धराम सालीमठ व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्याऊसतोड कायदा तयार करताना कामगारांचा विचार अधिक करण्यात यावा. ऊस तोड कामगारांसाठी प्रत्येक कारखान्यावर आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची ओपीडी सुरू ठेवावी आणि महिला कामगारांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञाची नेमणूक करण्यात यावी.  तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सर्व ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात यावी.  महिला ऊसतोड कामगारांचा लाडक्या बहिणी योजनेत शंभर टक्के  सहभाग करून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात यावेअशा सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

ऊसतोड महामंडळाच्या पोर्टलवर स्त्री पुरुष कामगारांची स्वतंत्र माहिती द्यावी. ऊसतोड कामगार महामंडळाने मॅटर्निटी बेनिफिट फंडाच्या माध्यमातून ऊसतोड महिला कामगारांना प्रसूती रजा कालावधीत किमान वेतन देण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच कामाच्या ठिकाणी स्वच्छता गृहसॅनिटरी पॅड उपलब्ध करून घ्यावेअसेही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी विविध कल्याणकारी व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी करावी. तसेच प्रत्येक कामगाराला ओळखपत्र देण्यात यावेजेणेकरून ऊसतोड कामगारांसाठी  भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ त्यांना देणे सुलभ होईल. तसेच ऊसतोडणीसाठी इलेक्ट्रॉनिक कोयत्याचा देखील विचार करण्यात यावाअसेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

जिवतीतील वनपट्टे भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी तातडीची कार्यवाही करा

 जिवतीतील वनपट्टे भागातील नागरिकांना

न्याय देण्यासाठी तातडीची कार्यवाही करा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबईदि. १५ : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नागरिकांना न्याय मिळावा या दृष्टीनेचुकीने वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या ८,६५९.८ हेक्टर जमिनीच्या सुधारणेसाठी तातडीने कार्यवाही करून आदेश निर्गमित करावेतअसे  निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिले.

विधानभवनात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी जिवती तालुक्यातील बहुप्रलंबित वनजमीनीच्या प्रश्नांचा आढावा घेतला. या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेवनमंत्री गणेश नाईकअपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरप्रधान सचिव शोमिता विश्वासचंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडाअपर प्रधान वनसंरक्षक नरेश झीरमुरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले कीहा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी वन विभागामार्फत महसूल विभागाला सादर करण्यात आलेला आहे त्याची गतीने कार्य वाही करावी. १९८० पूर्वीच्या ६२६० हेक्टर व १९८० ते १९९६ दरम्यानच्या २६५० हेक्टर जमिनीसाठी दोन टप्प्यांमध्ये प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाकडे पाठवावा. वनसंवर्धन कायद्याअंतर्गत केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर या जमिनीचे निर्वणीकरण तातडीने पूर्ण करण्यात यावेअसे निर्देश त्यांनी दिले. यामुळे जिवती तालुक्यातील हजारो शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.

तसेचघरकुलांसाठी योग्य न ठरणाऱ्या जमिनीऐवजी पर्यायी व उपजाऊ जागा देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअसेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जिवती तालुका हा आकांक्षित आणि दुर्गम भाग असल्याने अनेक विकासकामांवर मर्यादा येतात. वनक्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे येथे शेतकऱ्यांना जमिनीचे हक्क मिळत नाहीतआणि त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभही मिळत नाहीअशी माहिती आमदार देवराव भोंगळे यांनी यावेळी दिली

रुग्णसेवेसाठी नवीन पद्धतीच्या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणारpl shate

 रुग्णसेवेसाठी नवीन पद्धतीच्या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार

- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

  मुंबईदि. 15 : क्रमांक 108 आणि 102 या दोन्ही सेवा रुग्णांसाठी उपयुक्त असून108 सेवेबाबत अलीकडे काही तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी दूर करण्यासाठी नवीन पद्धतीच्या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सध्या कोणतेही वाहन इंधनाअभावी थांबलेले नाहीअशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली.

 महाराष्ट्र विधान परिषद नियम 260 अन्वये प्रस्तावादरम्यान सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना मंत्री श्री.आबिटकर म्हणाले कीकंत्राटी कर्मचाऱ्यांचे मे 2025 पर्यंतचे वेतन देण्यात आले असून जून आणि पुढील महिन्यांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

            राज्यातील रक्तसाठ्यावर बोलताना मंत्री श्री.आबिटकर म्हणाले कीपावसाळा व हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे आयोजित केली जातातमात्र उन्हाळ्यात यामध्ये दुर्लक्ष होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळातही रक्तदान वाढावे यासाठी सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी सभागृहामार्फत जनतेला केले. रक्ताच्या कमतरतेमुळे राज्यात कुठेही मृत्यू झाल्याची घटना नाहीअसेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

धर्मादाय रुग्णालयांमधील नियमभंगाबाबत मंत्री श्री.आबिटकर म्हणाले कीमागील अधिवेशनात एक विधेयक सादर करण्यात आले असूनत्याद्वारे आमदारांची समिती सर्व धर्मादाय रुग्णालयांचे निरीक्षण करणार आहे. तसेचनियमभंग झाल्यास कारवाईचे अधिकारही त्यात आहेत.

जळगावच्या चोपडा येथे गर्भवती महिलेची रस्त्यावर प्रसूती झाल्याच्या घटनेवरमंत्री श्री.आबिटकर म्हणाले कीसंबंधित कक्षाला कोणताही कॉल प्राप्त झाला नव्हता. तसेचजळगाव जिल्ह्यात 108 रुग्णवाहिकांच्या सेवा चांगल्या प्रकारे दिल्या गेल्या आहेत.

शीतसाखळी उपकरणांच्या खरेदीबाबतच्या आक्षेपावरत्यांनी सांगितले कीआयएलआर व डीप फ्रिजर उपकरणांची खरेदी प्रशासकीय मंजुरीनंतर पारदर्शक व स्पर्धात्मक प्रक्रियेतून करण्यात आली. जुलै 2024 मध्ये 62 कोटींची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली. निविदा प्रक्रियेमध्ये काही आक्षेप नोंदवले गेलेत्यावर सुधारणा करून नव्याने निविदा काढण्यात आल्या. हे दर जेईएम पोर्टलच्या दरांपेक्षाही 27 टक्के ते 42 टक्के कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीहीराज्य शासनाकडून संपूर्ण पारदर्शकतेसाठी सूचना देण्यात आल्या आहेत आणि कोणतीही शंका पूर्णतः दूर झाल्याशिवाय देयके अदा न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य विभाग अधिक गतिमान व पारदर्शक व्हावायासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेतअसेही श्री.आबिटकर यांनी शेवटी 

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यावर भर

 कृषी क्षेत्राच्या विकासासाठी डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यावर भर

- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबईदि. १५ : राज्य शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून शाश्वत कृषी विकासासाठी महाकृषी एआय धोरण 2025 ते 2029’ तयार केले आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना हवामानमातीपिकांची स्थिती व बाजारभावासंदर्भात विश्वासार्ह माहिती मिळण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेतअशी माहिती कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेच्या नियम 260 अन्वये प्रस्तावावर सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले कीराज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये एआय संशोधन केंद्रे स्थापन होणार असूनउपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी यासाठी प्रारंभी रुपये 500 कोटींची तरतूद केली आहे. आवश्यकता भासल्यास आणखी निधीची तरतूद होणार असल्याचेही त्यानी सांगितले.

कृषी विभागातील सरळ सेवा कोट्यातील 1,230 पदे आणि पदोन्नती कोट्यातील 277 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा आयबीपीएस यांच्यामार्फत ही पदे भरती केली जाणार आहेत. त्याचबरोबर जागतिक बँकेच्या सहकार्याने सुमारे रु. 6000 कोटींचा प्रकल्प २१ जिल्ह्यांमध्ये राबवला जाणार असून7,201 गावे यात समाविष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 राज्य शासनाने महसूल मंडळाऐवजी गावपातळीवर उत्पादनाची आकडेवारी संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान अंदाज केंद्रे गावात उभारण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्याचबरोबरसन 2015-16 साली 10 वी कृषी गणना करण्यात आली होती. 11 वी गणना सुरू असूनदोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे तर तिसऱ्या टप्प्यावर काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 आशियाई विकास बँकेच्या अर्थसाहाय्याने 'मॅग्नेटप्रकल्पांतर्गत 15 फळपिकांची मूल्यसाखळी विकसित होत आहे. द्राक्षेपपईहळदअंजीरटोमॅटोशेवगा आणि आले या नव्या पिकांचा समावेश प्रस्तावित आहे. याचा उद्देश निर्यात वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

             विविध योजनांद्वारे राज्यात शाश्वतशेतकरी-केंद्रित आणि तंत्रज्ञानाधारित कृषी परिसंस्था उभारणेहे राज्य शासनाचे उद्दिष्ट असल्याचे कृषी मंत्री ॲड.कोकाटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनियमितता प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही

 अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनियमितता प्रकरणी

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही

– पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 15 : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनियमिततेच्या प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असूनया पार्श्वभूमीवर सचिवाचा पदभारही काढण्यात येईलअशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत दिली.

या प्रकरणावर सदस्य संजय खोडके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री श्री.रावल म्हणाले कीजिल्हा उपनिबंधकसहकारी संस्थाअमरावती यांनी बाजार समितीच्या कामकाजाची चौकशी केली असून संबंधित चौकशी अहवालावर समितीकडून मागविण्यात आलेला खुलासा समाधानकारक नसल्यामुळे दोषींविरुद्ध आर्थिक वसुलीची कार्यवाही करण्यात येणार आहे.

या प्रकरणासंदर्भात उच्च न्यायालय खंडपीठनागपूर येथे रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक यांनी संचालक मंडळातील 17 सदस्यांना देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसीवर अंतरिम कार्यवाही करता येईलमात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे निर्णयानंतर अंतिम कार्यवाही करण्यात येईलअसे मंत्री श्री.रावल यांनी स्पष्ट केले 

रत्नदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेकडील बुरुजावर कोणतेही अतिक्रमण नाही

 रत्नदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेकडील बुरुजावर कोणतेही अतिक्रमण नाही

— मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. 15 : रत्नागिरी जिल्ह्यातील विविध नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाबाबत विधानसभेत माहिती देताना मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले कीरत्नागिरी नगरपरिषदेच्या हद्दीतील मौजे सांबवाडी परिसरातील रत्नदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेकडील बुरुजावर कोणतेही अतिक्रमण झालेले नाहीअशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

विधानपरिषदेत सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी मांडली होती. लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते. यावेळी सदस्य प्रसाद लाड यांनी चर्चेत सहभाग घेतला.

            मंत्री श्री. सामंत म्हणालेबुरुजाच्या पायवाटेलगत समुद्रालगतच्या भागात काही अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत त्याबाबत विकास आराखड्यानुसार कार्यवाही करून अतिक्रमणे काढण्यात येईल. राजापूर नगरपरिषद हद्दीत पुरातन सुर्यमंदिर अस्तित्वात असल्याचे आढळून आलेले नाही. तथापिपाहणी दरम्यान या परिसरात मजारीचे बांधकाम झाल्याचे निदर्शनास आले आहेते जुने आहे. तसेच खेड नगरपरिषद हद्दीतील गुलमोहर पार्क परिसरात कम्युनिटी सेंटर किंवा मशिदीचे कोणतेही अनधिकृत बांधकाम आढळून आलेले नाही. अशा बांधकामासाठी नगरपरिषदेकडे कोणताही अर्ज प्राप्त झालेला नाहीअसे मंत्री श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.

---

Featured post

Lakshvedhi