Thursday, 10 July 2025

छत्रपती संभाजीनगर - पैठण महामार्गाच्या कामाला गती; अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करणार

 छत्रपती संभाजीनगर - पैठण महामार्गाच्या कामाला गती;

अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करणार

- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

 

मुंबईदि. १० : छत्रपती संभाजीनगर ते पैठण हा ४२ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गातील ३५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामांना गती देण्यात येणार आहेअशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधान परिषदेत दिली.

 

याबाबतचा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होतात्यावेळी ते बोलत होते. यावेळी सदस्य विक्रम काळे यांनीही उपप्रश्न विचारले.

 

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले म्हणाले कीया रस्त्याचे काम सलग न झाल्यामुळे  अपघातांचे प्रमाण काही ठिकाणी वाढले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (एमजेपी) रस्त्याखालील पाईपलाईनचे काम हायकोर्टाच्या देखरेखीखाली सुरू असल्यामुळे काही अडथळे निर्माण झाले होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाईपलाईनचे काम पूर्ण होईल.

 

सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावर रंबल स्ट्रिप्सदिशादर्शक फलकरिफ्लेक्टर बोर्ड आदी लवकरच बसवण्याच्या सूचना ‘एनएचआय’ला देण्यात येतील. तसेच छत्रपती संभाजीनगर ते दौलताबाद टी पॉइंटचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

 

रस्त्यासाठी ७९७ झाडे वाचवण्यात यश आले आहेरस्त्याची अलाइनमेंट थोडी बदलून पर्यावरणाचा समतोल राखण्यात आला आहे. एकूण २०० कोटी रुपयांच्या खर्चाचे हे काम असूनभू-संपादनाची प्रक्रिया देखील युद्धपातळीवर सुरु असून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.

 

दौलताबाद टी पॉइंटच्या निविदांबाबत श्री. भोसले म्हणाले५ मार्च २०२४ रोजी निविदा सूचना काढण्यात आली होती. उच्च न्यायालयात यासंदर्भातील निकाल लागून निविदा स्वीकृतीची प्रक्रिया २३ जून २०२५ रोजी पूर्ण झाली आहे. येत्या सात दिवसांत कार्यारंभाचे आदेश देण्यात येतीलअसेही त्यांनी सांगितले.

उरण फाटा येथे पारसिक हिलवर झालेल्या वृक्षतोडीची चौकशी

 उरण फाटा येथे पारसिक हिलवर झालेल्या वृक्षतोडीची चौकशी

-         मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. १० : नवी मुंबई मधील सीबीडी बेलापूर येथील उरण फाटा येथे पारसिक हिलवर वृक्षतोडीबाबत पाहणी करण्यात आली आहे. पारसिक हिल ठिकाणी उच्च विद्युत वाहिनी पॉवर कॉरिडॉर असून वृक्षामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊ नयेयासाठी फक्त झुडुपाची छाटणी केली आहे. येथे वृक्षतोड झाली आहे कायाबाबत चौकशी केली जाईलअशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

 

विधान परिषद सदस्य भाई जगतापशशिकांत शिंदे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होतात्यावेळी मंत्री श्री.सामंत यांनी उत्तर दिले.

 

मंत्री श्री.सामंत म्हणाले कीआजबाजूच्या परिसरात बांधकाम चालू करण्यासाठी अनधिकृत जंगलतोड होत असेलतर याची चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यावर कठोर कार्यवाही केली जाईल.

विविध शासकीय गृहनिर्माण योजनेमध्ये एससी, एसटी, एनटी, व डीटी, माजी सैनिक, कलाकार, राज्य व केंद्र शासनाचे कर्मचारी, अंध व दिव्यांग यांच्यासाठी विशिष्ट टक्केवारीने आरक्षण आहे.

 नवीन इमारतीत मराठी भाषिक व्यक्तींना

 घरे खरेदी करण्यासंदर्भातील धोरण करणार

- मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबईदि. १० : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. मुंबईत घरे खरेदी करताना कोणत्याही मराठी माणसाचा हक्क कुणालाही डावलू दिला जाणार नाही. जर एखादा विकासक मराठी माणसाला घरे विक्रीसाठी नाकारत असेलअशा विकासक किंवा व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल. मराठी माणसाच्या हक्कांचे रक्षण व्हावे आणि मराठी माणसाला घरे खरेदीसाठी प्राधान्य मिळावेयासाठी लवकरच धोरण निश्चित केले जाईल. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील धोरण निश्चित केली जाईलअशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

 

नवीन इमारतीत मराठी माणसाला मुंबईत घरे खरेदीसाठी आरक्षण ठेवण्यासंदर्भात विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होतात्यावेळी मंत्री श्री.देसाई यांनी उत्तर दिले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेसदस्य ज्ञानेश्वर म्हात्रेराजेश राठोडप्रसाद लाडॲड.अनिल परबसचिन अहिरहेमंत पाटील यांनी उपप्रश्न विचारले.

 

मंत्री श्री.देसाई म्हणाले कीविविध शासकीय गृहनिर्माण योजनेमध्ये एससीएसटीएनटीव डीटीमाजी सैनिककलाकारराज्य व केंद्र शासनाचे कर्मचारीअंध व दिव्यांग यांच्यासाठी विशिष्ट टक्केवारीने आरक्षण आहे. 

 

शेवटीमराठी भाषिक नागरिकांना घर खरेदी करताना जर कुणी बांधकाम व्यावसायिक भेदभाव करत असेलतर राज्यशासन त्यांच्यावर कठोर कारवाई करेलअसे आश्वासन देसाई यांनी दिले.

इमारतींचा स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून क्लस्टर आधारित विकास करण्यासाठी म्हाडामार्फत प्रयत्न

 इमारतींचा स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून

क्लस्टर आधारित विकास करण्यासाठी म्हाडामार्फत प्रयत्न

-गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

 

मुंबईदि. १० : म्हाडामार्फत उभारल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये रहिवाशांना वीजपाणीरस्ते अशा विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून इमारतींचा विकास करताना क्लस्टर आधारित विकास व्हावाअसा म्हाडाचा प्रयत्न असून या माध्यमातून रहिवाशांना अधिक सुविधा देता येतीलअसे गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.

 

सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजित वंजारीप्रवीण दरेकरसचिन अहिरभाई जगताप आदींनी सहभाग घेतला.

 

राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणालेम्हाडामार्फत क्लस्टर आधारित विकास करताना काही सदनिका बाजारभावाने विकून निधी उभारला जातो. या माध्यमातून अतिरिक्त सुविधा दिल्या जातात. जुन्या रहिवाशांना देखील या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. म्हाडाच्या प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधांबरोबरच वाहनतळाची सुविधा दिली जात आहे. त्याचबरोबर काही प्रकल्पांमध्ये व्यायामशाळाबाजारपेठ आदी सुविधाही दिल्या जात आहेत. यामध्ये यापुढे हरित क्षेत्राचा समावेश करण्याबाबत देखील विचार करण्यात येईलअसेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. इमारतींचा विकास करताना विकासकास रेरा कायदा अनिवार्य असून याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास त्याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईलअसेही त्यांनी सांगितले.

कस्तुरबा सेवाग्राम रुग्णालयातील आरोग्य सुविधांसंदर्भात उच्चस्तरीय समिती गठीत करणार

 कस्तुरबा सेवाग्राम रुग्णालयातील आरोग्य सुविधांसंदर्भात

उच्चस्तरीय समिती गठीत करणार

-         वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

मुंबईदि. १० : वर्धा जिल्ह्यातील कस्तुरबा हेल्थ सोसायटीद्वारे संचालित कस्तुरबा सेवाग्राम रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य सुविधा आणि व्यवस्थापन संदर्भातील  तक्रारीबाबत उच्चस्तरीय समिती गठीत करून स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला जाईल असे  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत सांगितले.

 

विधानसभा सदस्य राजेश बकाने यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या विषयावर  प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना श्री. मुश्रीफ बोलत होते.

 

कस्तुरबा सेवाग्राम रुग्णालय  गोरगरीब रुग्णांसाठी माफक दरात सेवा पुरवते. हे रुग्णालय ५० टक्के  केंद्र सरकार आणि २५ टक्के राज्य सरकारच्या अनुदानावर चालवले जाते. मात्र वैद्यकीय उपकरणांची कमतरतातज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसणेअपुऱ्या आरोग्य सुविधा आणि

व्यवस्थापनाकडून होणारे दुर्लक्ष यासंदर्भातील प्राप्त तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करून. या समितीची आणि  स्थानिक लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घेऊन  याबाबतचा सविस्तर अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला जाईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी  सांगितले.

या चर्चेदरम्यान लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देखील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींशी बैठक घेऊन तत्काळ उपाययोजना केल्या जातील असेही

श्री. मुश्रीफ यांनी  सांगितले.

 विधानसभा सदस्य समीर कुणावारसुमित वानखेडेअभिमन्यू पवारअमित देशमुख  यांनी

 उपप्रश्न उपस्थित केले होते.

विधानसभा प्रश्नोत्तर : अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 181 कोटींच्या प्रशासकीय मान्यता

 विधानसभा प्रश्नोत्तर :

 

अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी

181 कोटींच्या प्रशासकीय मान्यता

                                                            -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

मुंबईदि. १० : बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने १८१ कोटींच्या प्रशासकीय मान्यता दिल्या आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य नमिता मुंदडाश्रीजया चव्हाण यांनी विधानससभेत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. 

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले कीअंबेजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये १५० एमबीबीएस व ८७ पीजी विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेनुसार शैक्षणिक व रुग्णसेवा सुविधा असून  क्षमतेच्या तुलनेत रुग्णसंख्या अधिक असल्याने तातडीने सुधारणा आवश्यक आहे. त्यासाठी  २८० खाटांची दुरुस्ती, २५० क्षमतेच्या वसतिगृहाचे बांधकाममुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहडांबरी रस्त्यांचे बांधकाम,जीएनएम नर्सिंग महाविद्यालयाचे बीएससी नर्सिंगमध्ये रुपांतर करणे यासाठी  सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन आर्थिक वर्षांसाठी १८१ कोटी रुपयांच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

याचबरोबर रिक्त प्राध्यापक पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालयात कॅन्सर उपचारासाठी एल-१,एल-२एल-३ सुविधांची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी नवीन धोरण लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. तसेचन्यूरोलॉजीन्यूरोसर्जरीकार्डिओलॉजी यांसारख्या सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाच्या एनपीएनजीसी योजनेंतर्गत प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या सर्व आरोग्य सुविधा या आर्थिक वर्षातच कार्यान्वित करण्यात येतीलअसे आश्वासनही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री  मुश्रीफ यांनी सभागृहात दिले.

0000

रायगड जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित

 विधानसभा प्रश्नोत्तरे :

 

रायगड जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू

मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित

                                        सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. 10 : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक आणि वस्तीगृह अधीक्षिकेला निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहेअशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य राजकुमार बडोलेधर्मरावबाबा आत्रामनाना पटोले यांनी प्रश्न उत्तरेच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते.

राज्यात कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) हे अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत नियमित आरोग्य तपासणी व सर्वेक्षण केले जाते. याच सर्वेक्षण दरम्यान वरवणे येथील आश्रमशाळेतील कुमारी खुशबू ठाकरे या विद्यार्थिनीच्या डाव्या डोळ्याखाली चट्टा आढळून आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तिच्यावर कुष्ठरोग विरोधी बहुविध औषधोपचार सुरू करण्यात आले होते.  दुर्दैवानेउपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी सुरू असून शवविच्छेदन अहवालानुसार टिशू अ‍ॅस्ट्रोपॅथोलॉजिकल तपासणी व रक्तनमुने केमिकल विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

दरम्यानआदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पपेण यांच्या स्तरावर देखील या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून संबंधित मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका यांना अप्पर आयुक्तआदिवासी विकास विभाग यांनी निलंबित केले असून त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे. तसेच  या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देखील देण्यात आले आहे.  आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनींसाठी आरोग्यविषयक आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आदिवासी विकास विभागाला सूचना देण्यात येतील, असेही सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सभागृहात सांगितले.

Featured post

Lakshvedhi