Thursday, 10 July 2025

उरण फाटा येथे पारसिक हिलवर झालेल्या वृक्षतोडीची चौकशी

 उरण फाटा येथे पारसिक हिलवर झालेल्या वृक्षतोडीची चौकशी

-         मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. १० : नवी मुंबई मधील सीबीडी बेलापूर येथील उरण फाटा येथे पारसिक हिलवर वृक्षतोडीबाबत पाहणी करण्यात आली आहे. पारसिक हिल ठिकाणी उच्च विद्युत वाहिनी पॉवर कॉरिडॉर असून वृक्षामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊ नयेयासाठी फक्त झुडुपाची छाटणी केली आहे. येथे वृक्षतोड झाली आहे कायाबाबत चौकशी केली जाईलअशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

 

विधान परिषद सदस्य भाई जगतापशशिकांत शिंदे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होतात्यावेळी मंत्री श्री.सामंत यांनी उत्तर दिले.

 

मंत्री श्री.सामंत म्हणाले कीआजबाजूच्या परिसरात बांधकाम चालू करण्यासाठी अनधिकृत जंगलतोड होत असेलतर याची चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यावर कठोर कार्यवाही केली जाईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi