Thursday, 10 July 2025

विधान परिषद लक्षवेधी सोलापूर जिल्ह्यातील शेलगाव येथे केळी संशोधन केंद्र उभारण्याबाबत शासन सकारात्मक

 विधान परिषद लक्षवेधी

सोलापूर जिल्ह्यातील शेलगाव येथे

केळी संशोधन केंद्र उभारण्याबाबत शासन सकारात्मक

- कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

 

मुंबईदि. ९ : राज्यात सध्या जळगाव आणि नांदेड जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र अस्तित्वात आहे. सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे केळी संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत मागणी आहे. नवीन केंद्र स्थापन न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चा करून या मागणीबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईलअसे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी या मागणीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकरएकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणालेशासनाने शेतीमध्ये पाच हजार कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीमधील विविध पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. राज्यात सध्या एकूण ८४ संशोधन केंद्र असून यातील जी उपयुक्त नाहीत ती बंद करण्यात येतील. त्याचप्रमाणे कोकणासह जेथे ज्या पिकांच्या संशोधन केंद्राची आवश्यकता असेल तेथे अशी केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

00000

पुरवणी मागण्यांचा निधी केंद्रपुरस्कृत विकास योजनांवर खर्च होणार असल्याने राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडेल

 पुरवणी मागण्यांचा निधी केंद्रपुरस्कृत विकास योजनांवर

खर्च होणार असल्याने राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडेल

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुरवणी मागण्यांवरील  चर्चेला उत्तर

आर्थिक शिस्तीचे पालन करीतच राज्याचा अर्थकारभार सुरु

राज्यावरील कर्जाचा आणि तिजोरीवरील वित्तीय भार मर्यादेतच

 

मुंबईदि. 9 :- पुरवणी मागण्यांचा निधी हा पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार अनुदानेकेंद्र सरकारच्या विकास योजनांपोटी राज्याचा हिस्सारस्तेरेल्वेपुलमेट्रोभुयारी मार्ग आदी कारणांसाठी खर्च करण्यात येणार असल्याने त्यातून राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडणार आहे. राज्याचा कारभार आर्थिक शिस्तीचे काटेकोर पालन करीत सुरु आहे. राज्याच्या तिजोरीवरील वित्तीय भारही मर्यादेत आहे. राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करण्यावर आपला भर असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना दिली.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीराज्याचा कारभार आर्थिक शिस्तीचे काटेकोर पालन करत सुरु आहे. वित्त आयोगाच्या निकषानुसार राज्यावरील एकूण संचित दायित्व स्थूल राज्य उत्पन्नाच्या सरासरी 25 टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 2025-26 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राज्यावरील संचित दायित्व 18.87 टक्के इतके म्हणजे कमाल मर्यादेपेक्षा कमी आहे. राज्याची राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3 टक्क्यांच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. आपल्या राज्याने ती 2.76 टक्के ठेवण्यात यश मिळविले आहे. आजमितीस महाराष्ट्रगुजरात व ओडिशा या तीनच राज्यांचं कर्जाचं प्रमाण 20 टक्यांपेक्षा कमी आहे. राज्याची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी सरकार उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करूनसंसाधनांचा प्रभावी वापर करत आहे. आर्थिक धोरणे नियमबद्ध पद्धतीने राबविण्यावर भर असून महाराष्ट्राची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

पावसाळी अधिवेशानात 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या असल्यातरी प्रत्यक्ष निव्वळ भार 40 हजार 645 कोटी इतकाच आहे. यामध्ये 19 हजार 184 कोटी अनिवार्य खर्चासाठी34 हजार 661 कोटी विविध योजनांतर्गत कार्यक्रमांसाठी आणि 3 हजार 665 कोटी केंद्र पुरस्कृत योजनांसाठी अर्थसहाय्य सुचवण्यात आले आहे. यामध्ये 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार 11 हजार 43 कोटी रुपयांची अनुदानेमुद्रांक शुल्क अधिभार परतावा 3 हजार 228 कोटीमुंबई मेट्र्रो प्रकल्पासह वाहतुकीच्या दळणवळणासाठी भुयारी बांधकामासाठी राज्य शासनाच्या हिश्श्याची दुय्यम कर्जाची रक्कम 2 हजार 241 कोटी रुपयेराष्ट्रीय सहकार विकास निगमकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भागभांडवलासाठी 2 हजार 183 कोटी रुपये मार्जिन मनी लोनकेंद्र सरकारकडून राज्यांना भांडवली खर्चासाठी 50 वर्षांसाठी बिनव्याजी विशेष सहाय्यासाठी 2 हजार 150 कोटीविविध महामंडळांना अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तसेच पूर्ण सिंचन प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी ‘नाबार्ड’कडून कर्जासाठी 2 हजार 97 कोटी रुपये तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी 1 हजार कोटी अशा बाबींसाठी या प्रमुख मागण्यांसह प्रत्यक्ष निव्वळ आर्थिक भार हा केवळ 40 हजार 645 कोटी रुपये आहेजो राज्याच्या सक्षम आर्थिक आराखड्याचे आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे स्पष्ट निदर्शक आहे. राज्य सरकारची आर्थिक शिस्तकाटेकोर नियोजनआणि उत्पन्नवाढीचा दृष्टिकोन यामुळेच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुदृढशाश्वत आणि भक्कम असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना केला.

----००००००-----


विजेच्या स्मार्ट पोस्टपेड मीटरच्या माध्यमातून सौर तासामध्ये वीज वापरावर बिलात १० टक्के सवलत

 विजेच्या स्मार्ट पोस्टपेड मीटरच्या माध्यमातून

सौर तासामध्ये वीज वापरावर बिलात १० टक्के सवलत

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. ९ : राज्यात विजेचे स्मार्ट पोस्टपेड मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत २७,८२६ फिडर मीटर आणि ३८ लाख ग्राहक मीटर लावण्यात आले आहेत. या ग्राहकांना सौर तासांमधील विजेच्या वापरावर बिलामध्ये १० टक्के सवलत देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यात पहिल्यांदाच विजेचे दर कमी होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य सर्वश्री ॲड.अनिल परबप्रवीण दरेकर यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेदेशातील जवळपास सर्वच राज्ये स्मार्ट पोस्टपेड मीटर लावत असून या योजनेसाठी केंद्र सरकारमार्फत महाराष्ट्राला २९ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. स्मार्ट मीटर लावण्यासाठी निविदा काढण्यात आली होतीत्यातून चार विविध कंपन्यांना काम देण्यात आले आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यातील विजेचे दर कमी आहेत. स्मार्ट पोस्टपेड मीटर बसविण्याची सक्ती करण्यात आली नसून या मीटरमध्ये प्रत्येक युनिटचे कॅलक्युलेशन ऑटोमॅटिक होत असल्याने वीज देयकामध्ये वाढ होण्याची शंका निर्माण होण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोळीवाडे आणि वन जमिनीवरील ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन योजना तयार करण्यात येईल आणि ती न्यायालयासमोर सादर करण्यात येईलअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

खाणकामानंतर निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या पुनर्वापरासाठी नियोजन

 खाणकामानंतर निर्माण झालेल्या 

खड्ड्यांच्या पुनर्वापरासाठी नियोजन

– महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबईदि. ९ : खाणकाम पूर्ण झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या मोठ्या खड्ड्यांचा पुनर्वापर करण्यासाठी १२ जानेवारी २०१८ रोजी जारी अधिसूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आहेअशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य कृपाल तुमाने यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महसूलमंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

तलावजलसाठामत्स्यव्यवसाय किंवा कचरा व्यवस्थापनासाठी या खड्ड्यांचा वापर केला जावाअसे निर्देश असल्याचे सांगून महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले कीजिल्हा प्रशासनाने याबाबत प्राधान्याने पावले उचलावीअसे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच वडार समाजाला ५०० ब्रासपर्यंत उत्खननाची परवानगी तत्काळ द्यावीयासाठी शासनाने नियम ठरवले आहेत. कोल्हापूरमधील खाण बुजवण्याच्या कामासाठी स्थानिक प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करुन तत्काळ अंमलबजावणी करावीअसेही महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले कीराज्यातील सर्व दगड व वाळू खाणींवर ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू असूनखाण क्षेत्ररॉयल्टी व उपलब्धता याची नियमित तपासणी केली जात आहे.

वर्धा जिल्ह्यातील जळगाव ग्रामपंचायतीच्या साहित्य खरेदीमध्ये भ्रष्टाचार नाही

 वर्धा जिल्ह्यातील जळगाव ग्रामपंचायतीच्या

 साहित्य खरेदीमध्ये भ्रष्टाचार नाही

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबईदि. ९ : वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायतीमधील साहित्य खरेदीमध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झालेला नसल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य दादाराव केचे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. गोरे बोलत होते.

कोणत्याही कारणाशिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी अचानक जळगाव ग्रामपंचायतीची चौकशी केल्याचे सांगून मंत्री श्री. गोरे म्हणाले कीही चौकशी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली होती. यावेळी ग्रामसेवकास निलंबित करण्यात आले. त्यानंतर गट विकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशीमध्ये कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकाचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या खरेदीची सखोल चौकशी करण्यात आली आहे. त्यामध्ये कोणतीही अनियमितता नसल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याची माहितीही मंत्री श्री. गोरे यांनी यावेळी दिली.

अकरावी प्रवेश प्रक्रियेत कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही

 अकरावी प्रवेश प्रक्रियेत कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही

शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबईदि. ९ :- राज्यातील ग्रामीण तसेच शहरी विद्यार्थ्यांना विविध शाखेमध्ये तसेच विविध भागात जास्तीत जास्त संधी मिळावीयासाठी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अवलंब केला आहे. राज्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाहीअशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिली.

ग्रामीण भागात लागू करण्यात आलेली अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन करावीयासंदर्भात विधान परिषद सदस्य जयंत आसगावकर यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे प्रश्न विचारला होता. या लक्षवेधी दरम्यान सदस्य राजेश राठोड, डॉ. परिणय फुकेएकनाथ खडसे यांनीही सहभाग नोंदविला.

राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले कीमहानगर भागात राबविण्यात येत असलेली ऑनलाईन प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविली जात आहे. आता ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत मागे राहू नयेहा उद्देश आहे. यामुळे खेड्यातील विद्यार्थ्याला शहरी भागात प्रवेश घेता येऊ शकेल. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अनेक फायदे असल्याचेही डॉ.भोयर यांनी सांगितले.

राज्यातील शाळेत २१ लाख विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. मात्र प्रत्यक्षात ११ लाख विद्यार्थी प्रवेश घेत असल्याचे दिसते. त्यामुळे पारदर्शकतेसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आवश्यक असल्याचे डॉ.भोयर यांनी सांगितले.

राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले कीपूर्वी अकरावीमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना प्रत्येक कॉलेजची 500 रुपयांपर्यंत माहितीपुस्तिका विकत घ्यावी लागायची. आता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्याने अतिशय कमी किमतीत प्रवेश मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

000

Wednesday, 9 July 2025

विधान परिषद लक्षवेधी : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीची प्रक्रिया सुलभ करणार

 विधान परिषद लक्षवेधी :

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 

वैद्यकीय प्रतिपूर्तीची प्रक्रिया सुलभ करणार

- स्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबईदि. ९ : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच लक्ष रुपये रकमेचे आरोग्य संरक्षण पुरविण्यात येत आहे. ही योजना कॅशलेस आहे. यापेक्षा अधिक खर्च झाल्यास प्रशासकीय विभागामार्फत वैद्यकीय प्रतिपूर्ती करण्यात येते. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येईलअसे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य सत्यजित तांबे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सहभाग घेतला.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार म्हणालेशासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना सुलभतेने परतावा मिळावा यासाठी ही प्रक्रिया ऑनलाइनपारदर्शक आणि अद्ययावत करण्यात येईल. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आणखी काही आजारांचा समावेश करण्यात येईल तसेच राज्यात सर्व रुग्णालयांमध्ये ही योजना लागू होण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागासोबत समिती तयार करून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi