Sunday, 6 July 2025

मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन

 मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरेआमदार समाधान आवताडेअभिजित पाटीलगोपीचंद पडळकरसचिन कलशेट्टीडॉ.बाबासाहेब देशमुखमाजी आमदार प्रशांत परिचारकनगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.


राज्य सहकारी बँकेच्यावतीने देवस्थान समितीला इलेक्ट्रिक वाहन प्रदान

 राज्य सहकारी बँकेच्यावतीने देवस्थान समितीला इलेक्ट्रिक वाहन प्रदान

 

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्यावतीने विठ्ठल रुख्मिणी देवस्थान समितीला भक्तांच्या सेवेसाठी इलेक्ट्रिक वाहन प्रदान करण्यात आले.

यावेळी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कारमुख्य सरव्यवस्थापक डॉ. अशोक मानेदेवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

 

हरित वारी' ॲपचे उद्घाटनpl share

 हरित वारीॲपचे उद्घाटन

 

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत 'हरित वारीहा उपक्रम राबविण्यात येत असून त्याच्या संनियंत्रणासाठी तयार करण्यात आलेल्या 'हरित वारीॲपचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

'हरित वारीउपक्रमांतर्गत दीड लाखावर वृक्षांची लागवड सोलापूर ग्रामीण हद्दीत विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रत्येक झाडाला स्वतंत्र क्यूआर कोड दिला जाणार आहे. ह्या माध्यमातून प्रत्येक झाडाची जातत्या झाडाचे जिओ लोकेशन आणि त्याच्या सद्यस्थितीबाबत माहिती उपलब्ध असणार आहे. ॲपचा वापर करण्याचे प्रशिक्षण ठाणे अंमलदारांना   देण्यात आले आहे. हे ॲप ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असल्याने वृक्षारोपण मोहिमेतील विश्वासार्हतापारदर्शकता आणि डिजिटल ट्रॅकिंग शक्य होणार आहेअसे यावेळी श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकात्मिक सनियंत्रण कक्ष व 'हरित वारी' ॲपचे उद्घाटन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकात्मिक सनियंत्रण कक्ष व 'हरित वारीॲपचे उद्घाटन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचेही भूमिपूजन

 

पंढरपूरदि.5: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक सनियंत्रण कक्षहरित वारीच्या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या 'हरित वारीॲपचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेगृह राज्यमंत्री      डॉ. पंकज भोयरखासदार धैर्यशील मोहिते पाटीलआमदार गोपीचंद पडळकरसमाधान आवताडेडॉ. बाबासाहेब देशमुखअभिजित पाटीलसचिन कल्याणशेट्टीपुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारीजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादसोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णीदेवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

आषाढी वारी मार्गनदीपात्रवाळवंटवाखरी पालखी तळ, 65 एकर परिसरपत्रा शेडप्रदक्षिणा मार्गमंदिर परिसर या ठिकाणी ड्रोन कॅमेरे तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अहोरात्र गर्दीचे संनियंत्रण केले जात आहे. कोठे काही घटना घडल्यास तत्काळ नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर दिसत असल्याने त्या ठिकाणी गतीने पोहोचून स्थिती नियंत्रणात आणता येत आहे असे,  पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

  या एकात्मिक सनियंत्रण कक्षाद्वारे प्राप्त चित्रीकरणाच्या विश्लेषणातून आषाढी वारीसाठी कालपर्यंत पंढरपूर शहरात सुमारे 14 लाख वारकरी दाखल झाल्याचा अंदाज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

 

वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्याचा

 वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न-ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणालेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वारी सर्वोत्तम व्हावीवारकऱ्यांना त्रास होता कामा नयेयाकरिता त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी प्रशासनासोबत विविध सेवाभावी संस्थाविश्वस्त आदी घटका अहोरात्र काम करुन मनोभावे सेवा करीत आहेत. वारकऱ्यांकरिता पालखीतळावर सुविधा देण्याच्यादृष्टीने जर्मन हँगरसहवैद्यकीय सुविधामहिलांकरिता शौचालयस्वच्छतागृहेमसाज मशीन आदी सर्वोत्तम सुविधा वारकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला. वारी दरम्यान प्रशासनाच्यावतीने केलेल्या व्यवस्थेबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचे श्री. गोरे म्हणाले. 

            राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्यादेहूआळंदीमुक्ताईनगरत्र्यंबकेश्वर यांसह विविध भागातून महिला वारकरी वारीत सहभागी होतात. या सहभागी महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छताविषयक बाबींचा विचार करुन महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ४ वर्षापासून 'आरोग्य वारीउपक्रम प्रशासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांकरिता हिरकणी कक्ष३७५ ठिकाणी सॅनिटरी नॅपकिननॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या,  असे श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक म्हणालेजगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चरण सेवेचे महत्त्व लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पालखी सोहळयात कक्षाच्यावतीने प्रथमच 'चरणसेवाउपक्रम राबविण्यात आला. २ कोटी ७५ हजार वारकऱ्यांची चरण सेवा करण्यात आली. एकूण लोकसहभातून २ कोटी रुपयाहून अधिक निधी उपलब्ध झाला. ९ हजारहून अधिक वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सेवा केली,  चरणसेवा सेवा उपक्रमाबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचे श्री. नाईक म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, 'निर्मल दिंडीउपक्रमाअंतर्गत ११ हजार शौचालय१५५ हिरकणी कक्षसॅनिटरी नॅपकिननॅपकिन बर्निंग इन्सिनरेशनलहान बालकांकरिता खेळणी वस्तू आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. स्वच्छतेच्या कामाकरिता सुमारे १ हजार २३६ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहेअसेही श्री. जगंम यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आलेतसेच निर्मल दिंडी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पुणेसातारा व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने पालखी सोहळ्यात राबविण्यात आलेल्या 'चरण सेवाउपक्रमाच्या यशस्वीतेकरिता काम केलेल्या अधिकारीसेवाभावी संस्थाकार्यकर्त्याचा तसेच आरोग्यवारी उपक्रमात उल्लेखनीय काम केलेल्या संस्थांचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी पंढरपूरचे उप विभागीय अधिकारी सचिन इथापेतहसीलदार सचिन लंगुटेविकास अधिकारी सुशील संसारे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात 'निर्मलदिंडी', 'चरणसेवाआणि  'आरोग्यवारीउपक्रमाबाबत माहितीपट दाखविण्यात आले.

संताचा संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून

 संताचा संदेश प्रत्य








क्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 'निर्मलदिंडी', 'चरणसेवाआणि 'आरोग्यवारीउपक्रमाचा समारोप

 

पंढरपूरदि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेमाचा आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहेआपल्या नद्यांवरनिसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येतांना त्यांचा संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून वारकरी करतातअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पंढरपूर पंचायत समिती आवारात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्यावतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 'निर्मलदिंडीतसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या 'चरणसेवाउपक्रम आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 'आरोग्यवारीउपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेपणन मंत्री जयकुमार रावलकृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेगृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरखासदार धैर्यशील मोहिते-पाटीलआमदार समाधान आवताडेअभिजित पाटीलगोपीचंद पडळकरसचिन कलशेट्टीडॉ.बाबासाहेब देशमुखदेवेंद्र कोठेविक्रम पाचपुतेविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगमराज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेलाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाची आस लावून पंढरपूर येथे पोहोचतात. वारी दरम्यान वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचा विचार करुन २०१८ वर्षीपासून निर्मलवारी सुरुवात केली. याअंतर्गत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली. सर्व दिंडीमधील वारकऱ्यांनी या संकल्पनेचा स्वीकार केलात्यामुळे पालखीतळावर स्वच्छता राखली जाते. आपली वारी निर्मलस्वच्छ झाली आहे.

 ग्रामविकास आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने  निर्मलवारी संकल्पना यशस्वीरित्या राबविलीत्याचबरोबर निर्मल दिंडीच्या माध्यमातून लोककलावंत स्वच्छतेचा लोकजागर करुन स्वच्छतेबाबतचा संदेश घरोघरी पोहचविण्याचे काम करीत असतात. जी पावले विठुरायाच्या दर्शनाच्या आशेने चालतातत्या पावलांची सेवा करून विठुरायांच्या चरणाची सेवा   केल्याचा प्रत्यंतर यावाया सेवाभावाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्यावतीने चरणसेवा उपक्रम राबवून वारकऱ्यांचे सेवा केली. त्यांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचे काम केले.

            वारीच्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 'आरोग्यवारीउपक्रमाच्यामाध्यातून महिला वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न केला. याकरिता आवश्यता त्या सुविधा उपलब्ध करुन अतिशय सुंदर नियोजन केले. पुणेसातारा आणि सोलापूर प्रशासनाने वारकऱ्यांसाठी अतिशय चांगल्या सुविधा उपलब्ध केल्याबद्दल तसेच निर्मल दिंडीचरणसेवाआरोग्यवारी यशस्वी केल्याबद्दल प्रशासनसेवाभावी संस्था आदींचे त्यांनी अभिनंदन केले. 

वारकऱ्यांची सेवा ही मोठी संधी असून वारीचे चांगल्या प्रकारचे नियोजन करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला सोबत घेवून वारीचे अतिशय उत्तम नियोजन केले. वारकऱ्यांना जर्मन हँगरच्या माध्यमातून राहण्याची व्यवस्थामहिलांकरिता स्वच्छतागृहासह, स्नानगृहअशा आवश्यक सर्व सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केलायावर्षी नवीन उंची गाठत एक बेंचमार्क निर्माण केला आहे.त्यामुळे यावर्षीच्या वारीचे वेगळेपण पाहयाला मिळत आहे. सेवा कधीच संपत नसतेसेवेचे नवीन उच्चांक गाठायचे असतात. याकरिता प्रयत्नपूर्वक वारकऱ्यांची सेवा केली पाहिजेअसेही श्री. फडणवीस म्हणाले.

 

वन क्षेत्रातील निर्धारित जागांवर मेंढ्यांना चराई करण्यास परवानगी

 वन क्षेत्रातील निर्धारित जागांवर मेंढ्यांना चराई करण्यास परवानगी

- वन मंत्री गणेश नाईक

 

            मुंबईदि. ४ : वनांमध्ये विशिष्ट वयापर्यंत वाढलेल्या झाडांच्या परिसरात मेढ्यांना चरण्यासाठी परवानगी देण्यात आली असून अशा ठिकाणी मेंढपाळांना अडवू नयेअसे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. तसेच अशा प्रकरणी कोणत्याही मेंढपाळांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मेंढपाळांना वनांमध्ये चराईसाठी परवानगी देण्यासंदर्भात विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी श्री. नाईक यांनी वरील सूचना केल्या. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलवन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरप्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आदी यावेळी उपस्थित होते.

वनमंत्री श्री. नाईक म्हणाले कीपावसाळ्याच्या चार महिन्यात वन क्षेत्रात लहान झाडे असलेल्या ठिकाणी मेंढ्यांना चारण्यास बंदी आहे. मात्रमेंढपाळांची मागणी लक्षात घेऊन नियमांनुसार विशिष्ट वयाची वाढलेली झाडे असलेल्या क्षेत्रात मेंढ्या चारण्यासाठी परवानगी देण्यात आली असून यासंबंधीच्या सूचना सर्व वन अधिकाऱ्यांना देण्यात येतील. तसेच वन क्षेत्रात मेंढ्या चराईप्रकरणी कोणाविरूद्धही चुकीच्या पद्धतीने कारवाई होऊ नयेयाची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात येतील. पावसाळ्याच्या कालावधीत शेळ्या मेंढ्यांना चराईसाठी फिरावे लागू नयेयासाठी शासकीय जागागायरान जमिनी तसेच जमिनी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल.

महसूलमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले कीवनक्षेत्राच्या बफर क्षेत्रात वन्यजीवांचा शेतीला होणारा त्रास कमी करण्यासाठी बफर क्षेत्रातील शेतजमिनी भाडेतत्वावर घेऊन तेथे सोलर प्रकल्प उभारण्याचा शासन विचार करत आहे. यामुळे सौर ऊर्जा निर्मितीबरोबरच शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळणार आहे. तसेच वन विभागाने वनक्षेत्रात गवत कुरण तयार करण्यावर भर द्यावा.

माजी आमदार बच्चू कडू यांनी वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिक नुकसानाची भरपाई दुप्पट करावी. तसेच ती वेळेत द्यावीअशी मागणी केली.

०००००००

Featured post

Lakshvedhi