Wednesday, 11 June 2025

चंद्रपूर शहरातील वन्यजीव बचाव केंद्र आणि व्याघ्र सफारीच्या कामास गती द्या

 चंद्रपूर शहरातील वन्यजीव बचाव केंद्र आणि

व्याघ्र सफारीच्या कामास गती द्या

- वन मंत्री गणेश नाईक

 

मुंबईदि. 11 : पर्यटन विकास होऊन शहराचे महत्त्व वाढावेत्याचबरोबर रोजगार निर्मिती व्हावी यासाठी चंद्रपूर शहरात वन्यजीव बचाव केंद्र आणि व्याघ्र सफारीच्या निर्मिती कामाला वेग द्यावा. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

चंद्रपूर येथे वन्यजीव बचाव केंद्र आणि व्याघ्र सफारीच्या निर्मिती संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवर यांच्या विनंतीनुसार आयोजित या बैठकीस वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरप्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वासप्रधान वन संरक्षक नरेश झिरमुरेवन विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखरन बालाउपसचिव विवेक होशिंगउदय ढगे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. नाईक म्हणाले कीचंद्रपूरमध्ये वन संपदा मोठ्या प्रमाणात असून वाघांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या शहरात पर्यटन वाढून शहराचे महत्त्व वाढण्यासाठी वन्यजीव बचाव केंद्र आणि व्याघ्र सफारी प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर या भागातील मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी या केंद्राचा उपयोग करण्यात यावा. त्यामुळे हा प्रकल्प येत्या तीन - साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. तसेच या सफारी मध्ये बांबू झाडाची लागवड करावी. या प्रकल्पासाठी वन विभागाच्या निधी बरोबरच जिल्हा गौण खनिज निधी व सामाजिक उत्तरदायित्व निधीचाही वापर करावा.

आमदार श्री. जोरगेवर यांनी वन्यजीव बचाव केंद्र आणि व्याघ्र सफारी प्रकल्पासाठी निधी देण्याची मागणी केली. तसेच या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली.

०००००

अकोला विकास कामे

 मूर्तिजापूर तालुक्यातील हिवरा कोरडेतसेच पारद येथे ३३/११ केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन व बार्शिटाकळी तालुक्यातील भेंडीमहाल येथे ४५ कोटींच्या १० मेगावॅट क्षमतेच्या व रेडवा गाव येथे ९ कोटींच्या २ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. अकोला जिल्ह्यातील अकोला व अकोट या दोन शहरांमध्ये ९ कोटी रू. निधीतून सीसीटिव्ही प्रकल्पाचे लोकार्पणही यावेळी झाले. 

प्रारंभी पालकमंत्री तथा कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मेळघाटातील प्रतिकृती भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या अकोला विमानतळ येथे आगमनप्रसंगी पालकमंत्री ॲड. फुंडकरखासदार अनुप धोत्रेआमदार प्रकाश भारसाकळेआमदार हरिष पिंपळेआमदार वसंत खंडेलवालआमदार किरण सरनाईकमाजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटीलजिल्हाधिकारी अजित कुंभार आदींनी स्वागत केले.

0000

मूर्तिजापूर अकोला विकासाची कामे

 हायब्रीड ॲन्युइटीअंतर्गत मुर्तिजापूर-दहिगाव-गुडधी-उमरी- अकोला राज्य महामार्ग २८४, तसेच अकोला-मलकापूर- कानशिवणी-मोरगांव काकड- बोरगांव खुर्द जिल्हा प्रमुख मार्गाची सुधारणा ४१०.१० कोटी रू. निधीतून होणार आहे. त्याचे भूमिपूजन यावेळी झाले. त्याचप्रमाणे, उकळी बाजार-नेर- नांदखेड- किनखेड राज्य महामार्ग २७८, किनखेड ते दहिहंडा महामार्गाची सुधारणा, अकोट मतदारसंघातील राज्यमार्ग क्र.४७ रावेर, पातूर्डा, पिंपळगाव, खांडवी, जळगाव जामोद- हिवरखेड- अकोट या मार्गावरील (रंभापूर ते हिवरखेड ते वारखेड भाग) सुधारणा ३११.४४ कोटी निधीतून होत आहे. बार्शिटाकळी शहरात ९.९९ कोटी रू. निधीतून मुख्य रस्ता होत आहे. या कामांचे भूमिपूजन झाले.

सर्वोपचार रुग्णालयात १५१.५६ कोटी रू. निधीतून नवीन वॉर्ड इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांसाठी सुविधा निर्माण होणार असून त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

अकोला येथे १२९.२३ कोटी निधीतून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दक्षतानगर येथे २४६ निवासस्थाने व परिसर विकासकामांमुळे कर्तव्याप्रती २४ तास बांधील असणा-या पोलीसांसाठी निवासाची सोय निर्माण होणार आहे. तसेच ५ कोटी खर्चाचे अकोला तालुका क्रीडा संकुल या कामांचे कोनशिला अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

प्रधानमंत्री ई-बस सेवा योजनेत ई-बस डेपो व चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन

 अकोला शहरात अमृत 2.0 योजनेत 629.06 कोटी रू. निधीतून मलनि:सारण (टप्पा-1) चे काम, तसेच शहरासाठी १८.९९ कोटी रू. निधीतून प्रधानमंत्री ई-बस सेवा योजनेत ई-बस डेपो व चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन झाले. त्याचप्रमाणे१५ कोटी रू.निधीतून अद्ययावत सांस्कृतिक भवनसुमारे ९.९६ कोटी रू. निधीतून ऑलिंपिक दर्जाचा तरणतलावाचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. 

अकोला भूमीत २४९.४१ कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचा कोनशिला

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी संशोधनाचा वारसा असलेल्या अकोला भूमीत २४९.४१ कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध २१ कामांचे भूमिपूजन व लोकार्पण अकोला जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान २ हजार ५८८ कोटी ५५ लाख रू. निधीतून विकासकामे

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध २१ कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

  • अकोला जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान
  • २ हजार ५८८ कोटी ५५ लाख रू. निधीतून विकासकामे

 

अकोला दि. ११ : अकोला जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कोटींहून अधिक म्हणजेच २ हजार ५८८ कोटी ५५ लाख रूपयांच्या निधीच्या विविध २१ विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. सिंचनरस्तेरूग्णालय सुधारणासांस्कृतिक भवनतरण तलावासह विविध प्रशासकीय इमारती अशा विकास कामांमुळे जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान होणार आहे.

विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेकामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकरखासदार अनुप धोत्रेआमदार सर्वश्री रवींद्र चव्हाणहरिष पिंपळेप्रकाश भारसाकळेवसंत खंडेलवालकिरण सरनाईकश्याम खोडेविभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघलपोलीस महानिरीक्षक रामराव पोकळेजिल्हाधिकारी अजित कुंभारपोलिस अधिक्षक अर्जित चांडक आदि मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीनअद्ययावत व सुसज्ज इमारतीचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वागत कक्षहिरकणी कक्षआनंदी कक्षआवश्यक दस्तऐवज मिळण्यासाठी किऑस्क सुविधा आदींचे निरीक्षण केले. त्यानंतर नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी ऑनलाईन पद्धतीने विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

            अकोला येथील तहसीलतसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अद्ययावत इमारतीचे तसेच महिला व बालविकास भवनाचे लोकार्पण झाले. पूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सुमारे ४५४.६२ कोटी रूपयांच्या निधीतून सिंचनाची व्यवस्था निर्माण होऊन शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. 

पैठणच्या पर्यटन विकासासाठी पायाभूत सुविधा तयार कराव्यात

 पैठणच्या पर्यटन विकासासाठी 

पायाभूत सुविधा तयार कराव्यात

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई, दि. ११ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या शहराला अध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक तसेच पर्यटक देखील येत असतात. पैठणच्या पर्यटन विकासासाठी पायाभूत सुविधा तयार कराव्यात तसेच या आराखड्यातील कामे स्वदेश दर्शन योजनेंतर्गत प्रस्तावित करण्यात यावीत, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

           मंत्रालयात पैठण विकास आराखड्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार संदीपान भुमरे, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी विधानसभा सदस्य विलास भुमरे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी, दूरदृश्यप्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामीसार्वजनिक बांधकाम विभाग राजेंद्र बोरकर उपस्थित होते.

            पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पैठण हे सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. पैठण हे उत्कृष्ट पैठणीसाठी देखील प्रसिद्ध आहे. तसेच संत एकनाथ, ज्ञानेश्वर आणि चांगदेव महाराज संताचे निवासस्थान म्हणूनही या शहराला अध्यात्मिक महत्त्व आहे. या शहरात भाविक आणि पर्यटकही मोठ्या प्रमाणात येत असतात हे लक्षात घेऊन या भागाचा पर्यटन दृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे. पर्यावरणपूरक विकास होण्यासाठी सर्वसमावेशक पर्यटन आराखडा बनवावा प्रथम टप्प्यात स्वदेश दर्शन योजनेंतर्गत कामे प्रस्तावित करण्यात यावीत, या भागाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

                पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पैठण येथील पायाभूत सुविधांचा विकास, घाटाचा विकास, भक्त निवास, स्थानिक संस्कृती, हस्तकलेचा प्रचार, संत एकनाथ मंदिर रोषणाईजांभुल वन, दक्षिण काशी मैदान, आपेगाव विकास ही सर्व कामे टप्प्याटप्प्याने करण्यासाठी पर्यटन विभागाने सुधारित प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

000000

Featured post

Lakshvedhi