Friday, 6 June 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड सीमेवरील दुर्गम कवंडे गावात 12 कुख्यात नक्षल्यांची शस्त्रांसह शरणागती

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड सीमेवरील दुर्गम कवंडे गावात

  • 12 कुख्यात नक्षल्यांची शस्त्रांसह शरणागती
  • आत्मसमर्पण केलेल्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यालाही उपस्थिती
  • सी-60 जवानांचा सत्कारअत्याधुनिक एके-103 आणि पिस्तुले दिली
  • बुलेटप्रुफ वाहनांसह 19 वाहने पोलिसांच्या सेवेत
  • कोरमा नाल्यावरील आंतरराज्यीय पुलाची ड्रोनने पाहणी

 

गडचिरोली, (जिमाका), दि.6 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज थेट महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात पोहोचले. या अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यांच्या उपस्थितीत कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या 12 नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करली. शस्त्रांसह शरणागती पत्करणारे अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे.

यापूर्वी शरणागती पत्करलेल्या पूर्वीच्या 13 नक्षल्यांचा सामूहिक विवाह सोहळाही गडचिरोलीत आयोजित करण्यात आला. त्याला हजेरी लावत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवदाम्पत्यांना नवजीवनाच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी त्यांनी सी-60 जवानांचा सत्कार केला आणि त्यांना अत्याधुनिक अशी एके-103 शस्त्रे आणि एएसएमआय पिस्तुलबुलेटप्रुफ जॅकेट्स प्रदान केली. त्यांच्या शौर्याची प्रशंसाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. जिल्हा नियोजन विकास निधीतून 19 चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्यातील काही बुलेटप्रुफ वाहने आहेत. त्यांच्या चाव्या त्यांनी पोलिस दलाकडे सुपूर्द केल्या. या दौऱ्यात वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वालआमदार धर्मरावबाबा आत्रामआमदार डॉ मिलिंद नरोटेपोलिस उपमहानिरीक्षक अंकीत गोयलजिल्हाधिकारी अविश्यांत पंडाजिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल आदी मान्यवर उपस्थित होते.

एम्स नागपूरमध्ये बोन म‌ॅरो ट्रान्सप्लांट केंद्रासाठी एनटीपीसीचे महत्त्वपूर्ण योगदान सामाजिक दायित्व निधीतून एम्समध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटसाठी अर्थसाहाय्य

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एनटीपीसीच्या सामाजिक दायित्व निधीतून एम्समध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटसाठी अर्थसाहाय्य

  • एम्स नागपूरमध्ये बोन म‌ॅरो ट्रान्सप्लांट केंद्रासाठी एनटीपीसीचे महत्त्वपूर्ण योगदान

 

मुंबईदि. २ : विदर्भातील सिकल सेल आणि थायलेमिया ग्रस्त रुग्णांना नजीकच उपचारांची सोय व्हावी आणि त्यांचे उपचारांसाठी मुंबईवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे यासाठी एम्स नागपूर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद देत एनटीपीसीने या युनिटसाठी अर्थसाहाय्य दिले आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या कराराअंतर्गत एनटीपीसी त्यांच्या सामाजिक दायित्व निधी (सीएसआरउपक्रमांतर्गत एम्स नागपूरला आर्थिक मदत करणार आहे. ही मदत बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटीयुनिट उभारणी आणि गरजू रुग्णांसाठी उपचार साहाय्यासाठी वापरण्यात येणार आहे. या केंद्राचा फायदा विदर्भातील लोकांसोबत विशेषतः लहान मुलांच्या उपचारासाठी होणार आहे.

एम्स नागपूरमध्ये पहिल्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्राच्या स्थापनेसाठी एनटीपीसी कडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीचे आभार व्यक्त केले. हे केंद्र मध्य भारतातील संपूर्ण जनतेसाठीविशेषतः लहान मुलेआदिवासी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठीएक महत्त्वाची वैद्यकीय सुविधा ठरेल. मध्य भारतात सिकल सेल आजार आणि इतर आनुवंशिक रोगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असूनया रोगांचे उच्चाटन करणे हे देशाचे राष्ट्रीय उद्दिष्ट असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. एनटीपीसी कडून या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याने एम्स नागपूरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्र उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होणार असूनया उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

साहाय्याचा तपशील :: बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटच्या पायाभूत सुविधांसाठीरुग्णांच्या उपचार व औषधोपचारासाठी साहाय्य देण्यात येणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये : हे युनिट एम्स नागपूरच्या एमआयएचएएन येथील परिसरात उभारले जाणार आहे. यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसहप्रत्यारोपणासाठी आवश्यक तपासण्याऔषधेबाह्य तज्ज्ञांच्या सेवा व रुग्णोपचाराचा संपूर्ण खर्च समाविष्ट आहे. एनटीपीसीच्या निधीच्या अटींनुसारयुनिटमध्ये एनटीपीसीचा लोगो आणि सीएसआर अंतर्गत साहाय्याचे स्पष्टपणे उल्लेख केले जाणार आहे.

एनटीपीसी गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्यशिक्षण व सामाजिक विकास क्षेत्रात सामाजिक दायित्व (सीएसआरअंतर्गत विविध प्रकल्प राबवत आहे. एम्स नागपूरसारख्या शासकीय वैद्यकीय संस्थेसोबत भागीदारी करून समाजातील गरजू घटकांपर्यंत अत्याधुनिक उपचार सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.

एम्स नागपूर हे प्रगत वैद्यकीय सेवा व संशोधनासाठी झपाट्याने नावारूपाला येत आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटच्या स्थापनेमुळे ब्लड कॅन्सर व इतर गंभीर आजारांवरील उपचार नागपूरसह संपूर्ण विदर्भातील रुग्णांना मिळणार असूनत्यांना दिल्ली किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.

0000

महाराष्ट्राच्या प्रगतीचा बहुआयामी आराखडा तयार; २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

  


महाराष्ट्राच्या प्रगतीचा बहुआयामी आराखडा तयार;


२०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


मुंबई, ४ : महाराष्ट्र २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठणार आहे आणि या दिशेने राज्याने ठोस पावले उचलली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


हॉटेल ताज लँड्स एन्ड येथे मॉर्गन स्टॅन्ले आयोजित "इंडिया इन्वेस्टमेंट फोरम 2025" मध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, सामाजिक आणि पर्यावरणीय प्रगतीच्या विविध पैलूंवर सविस्तर माहिती दिली.


सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अर्ध्या ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेली आहे. टाटा सन्स यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक सल्लागार परिषद स्थापन झाली असून, २० वरिष्ठ सीईओंच्या सहकार्याने एक विस्तृत रोडमॅप तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात पायाभूत सुविधा, उद्योग, सेवा, शेती व फिनटेक या क्षेत्रांचा समावेश आहे. याचबरोबर ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ आराखड्याचे सादरीकरण २ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यात अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन टप्प्यांचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्ग, प्रवासातील सुलभता,नागपूर ते मुंबई दरम्यानचे अतंर अवघ्या आठ तासांव

 प्रवासातील सुलभता

इगतपुरी ते आमणे (ता. भिवंडी) हा 76 किमीचा टप्पा वाहतुकीस सुरु झाल्यानंतर ठाणे (आमणे) व नागपूर पर्यंतचा प्रवास आठ तासात करणे सहजतेने शक्य  होणार आहे. तसेच ठाणेमुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांना ही या महामार्गामुळे आपला  प्रवास सुलभरित्या व जलदपणे करणे शक्य होणार आहे.  त्यासोबतच शिर्डीअहिल्यानगर व नाशिक जिल्हयातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील            शेतकऱ्यांना आपला  शेतमाल सुलभतेने  कमी कालावधीत  मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहचवता येणार आहे.  शेतक-यांनाउद्योजकांना,प्रवाश्यांना मुंबई महानगर प्रदेशात कामानिमित्त वरचवेर येणे जाणे हे अधिक सोयीस्कर होणार असून शैक्षणिक,सांस्कृतिक,आरोग्यविषयक संधीचे क्षेत्र विस्तारण्याच्या दृष्टीने ही हा महामार्ग निश्चितचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहाय्यक ठरणारा आहे.

 

राज्याच्या उप राजधानीला  राज्याच्या राजधानीपर्यंत जोडणार  नागपूर ते मुंबई दरम्यानचे अतंर अवघ्या आठ तासांवर आणणारा समृद्धी महामार्ग निश्तिचं महाराष्टाच्या औद्यागिकशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक विकासालाही गतीमान करणारा ठरेलयात शंका नाही.  

समृद्धी महामार्ग सर्वाधिक लांबीचा पूल*,इंटरचेंजस*,,पर्यावरण पूरक*

 सर्वाधिक लांबीचा पूल*

भौगालिक परिस्थितीतून   मार्ग काढत महामार्गाचे काम पुढे नेत असताना नाशिक व ठाणे या जिल्ह्यातील  76 किमीच्या डोंगर दऱ्यामुळे व्हायाडक्ट (मोठे पूल) व बोगदे बांधणे हे मोठे जिकरीचे होते. काही ठिकाणी कठीण खडकात 30 ते 40 मीटरपर्यंत खोदकाम करावे लागले. या टप्प्यात एकूण 17 व्हायाडक्ट (मोठे व्हॅली पूल) असून त्याची  एकूण लांबी 10.56 कि.मी (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 21.12 कि.मी) आहे.  या टप्प्यात सर्वाधिक लांबीचा पूल (व्हायाडक्ट) 2.28 कि.मी लांबीचा आहे. या टप्प्यात एका ठिकाणी (व्हायाडक्ट-2) पुलाच्या काही खाबांची उंची 84 मीटरपर्यत आहे.

*इंटरचेंजस*

या टप्प्यात इगतपुरीखुटघर व आमणे येथे इंटरचेंज येतात. या शेवटच्या टप्यात मोठ्या प्रमाणात विद्युत उच्च तसेच कमी  दाबाच्या विद्युत वाहिन्या स्थंलातरित कराव्या लागल्यात्यामध्ये  महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या कमी दाबाच्या 62 वाहिन्या स्थंलातरित करण्यात आलेल्या आहेततसेचटोरेंट पॉवरच्या विद्युत वाहिन्या व पॉवर ग्रीडची विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्यात आलेली आहे. तसेचया टप्प्यात रेल्वे ओलांडणी पुल बांधण्यात आलेला आहे.

*पर्यावरण पूरक*

प्रकल्पामध्ये वन्यजिव संरक्षणासाठी एकुण १०० बांधकामे पूर्ण झाली असूनत्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. वन्यजीवांच्या वावरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ठिकाणी 'ध्वनी रोधकची तरतूद करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा ११ लक्ष ३१ हजार झाडे लावण्याची प्रक्रिया सुरु आहे.  तसेच   या प्रकल्पामध्ये एकूण २०३  मेगा व्हॅट सौर उर्जा निर्मिती प्रस्तावित आहे.

वैशिष्ट्यांनी समृद्ध महामार्ग*,सर्वाधिक लांबी रुंदीचा बोगदा*,,प्रथमच बोगद्यात वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा*

 वैशिष्ट्यांनी समृद्ध महामार्ग*

राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असेलला समृद्धी महामार्ग हा अभियांत्रिकी कौशल्यासह अनेक वैशिष्ट्यानींही  समृद्ध असा महामार्ग आहे. दळणवळणाची गतीमान घौडदौड साध्य करत पर्यंटनउद्योगशेतमालाला कमी वेळेत बाजारपेठेत पोहचवण्यास सहाय्यक ठरत असलेल्या समृद्धी महामार्गावरुन  आता पर्यंत अंदाजे दोन कोटी वाहनांनी प्रवास करत सुखदरहदारीमुक्त सुलभगतीमान  प्रवासाचा  अनुभव घेतला आहे.

*सर्वाधिक लांबी रुंदीचा बोगदा*

समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्यातील 76 कि.मी ची लांबी  ही  नाशिक व ठाणे या दोन  जिल्ह्यात येते. सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अभियांत्रिकी आव्हान पेलले. या टप्प्यामध्ये एकूण दुहेरी बोगदे असून या बोगद्यांची लांबी 10.73 कि.मी (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 21.46 कि.मी) आहे. त्यातील पॅकेज 14 (इगतपुरी) येथील बोगदा 8.00 कि.मी लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा (17.61 मीटर) बोगदा आहे. या बोगद्याची उंची 9.12 मीटर आहे.

*प्रथमच बोगद्यात वापरण्यात येणारी  अग्निशमन यंत्रणा*

अग्निसुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा इगतपुरीमधील सर्वात लांबीच्या बोगद्यामध्ये बसविण्यात आलेली आहे. या बोगद्यामुळे अंदाजे आठ मिनिटात इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येणार आहे.   त्यातुन राष्ट्रीय महामार्ग क्र. नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वाहतुक अधिक जलद होणार आहेकसारा घाटातील वाहतूक अधिक गतीमान होण्यासही  त्यामुळे सहाय्य होणार आहे.

समृद्धी महामार्ग प्रकल्पाची व्याप्ती*

 प्रकल्पाची व्याप्ती*

राज्याच्या पाच महसुल विभागाच्या 10 जिल्ह्यातील 26 तालुक्यांमधील 392 गावांमधुन जाणारा हा सहा पदरी महामार्ग ग्रीन फिल्ड संरेखन आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूरवर्धाअमरावतीवाशीमबुलढाणाजालनाछत्रपती संभाजीनगरअहिल्यानगरनाशिक व ठाणे हे 10 जिल्हे प्रत्यक्षरीत्या जोडले जातात. तसेच समृद्धी महामार्गामुळे चंद्रपूरगोंदियाभंडारागडचिरोलीयवतमाळअकोलाहिंगोलीपरभणीनांदेडबीडधुळेजळगावपालघर व रायगड हे  14 जिल्हे अप्रत्यक्षरीत्या जोडले जातात. जुन्या नागपूर मुंबई मार्गावरुन नागपूरहून मुंबईकडे येण्यास 17-18 तास लागतात. नवीन "ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे" ने प्रवास तासात करणे शक्य होणार आहे. आता मुंबईतील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट ते नागपूरस्थित मिहान यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे बंदरावरुन जलद वाहतुक करुन आवश्यक माल भारतभर वेळेवर पोहचवणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागास महत्वाचा ठरलेला आहे.

 

हा महामार्ग दिल्ली- मुंबई द्रुतगती मार्गजवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि शिर्डीअजिंठा - वेरुळ लेणीलोणार सरोवर आणि इतर पर्यटन स्थळांना जोडणारा आहे. देशाचे ग्रोथ इंजिन असणाऱ्या महाराष्ट्रासाठी  हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ही खऱ्या अर्थाने समृद्धीची भाग्यरेषा ठरणार आहे.

Featured post

Lakshvedhi