Thursday, 8 May 2025

गणेश मंदीर ट्रस्टबाबत चर्चेनंतर निर्णय बोरीवली येथील टीपीएस ३ भूखंडाला

 गणेश मंदीर ट्रस्टबाबत चर्चेनंतर निर्णय

बोरीवली येथील टीपीएस ३ भूखंडाला श्री गणेश मंदीर ट्रस्टचे नाव लावून जागा नियमित करण्यात यावीअशी मागणी आमदार मनिषा चौधरी यांनी केली. तसेच १९७४ च्या टॅक्स नियमावलीप्रमाणे कर आकारणी करण्यात यावीअशी मागणी देखील केली. याबाबत महसूलमंत्री बावनकुळे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे दिसत असून नियमानुसार किती कर लागू होऊ शकतो याबाबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईलअसे स्पष्ट केले.

विरार – डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे,मिहान प्रकल्पातील पुनर्वसन धोरणानुसार नियोजन करुन सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

 विरार – डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे

  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मिहान प्रकल्पातील पुनर्वसन धोरणानुसार नियोजन करुन सविस्तर

 प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

 

मुंबई, दि. ७ : विरार – डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण व रेल्वे कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील सर्व्हे न. २१६ आसनगाव येथील कुटुंबे बाधित होत आहेत. यामधील  बाधितांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. याबाबत जिल्हा स्तरावर बैठक आयोजित करुन त्याचा अहवाल सादर करण्यात यावाअसे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

विरार – डहाणू येथील बाधित कुटुंबासोबतच इतर विषयांसंबंधात मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आदेश दिले. बैठकीला आमदार मनिषा चौधरीठाणे आणि पालघरचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेरेल्वेसाठी जमीन अधिग्रहीत केली जात असताना त्याठिकाणाच्या लोकांचे पुनर्वसन झाले पाहिजे. जर त्यांची घरे तिथे असतील तर त्याचा सर्व्हे करुन त्याचा योग्य मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. जवळपास त्यांचे पुनर्वसन करता येईल का याचाही विचार होणे आवश्यक आहे. यासाठी नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये ज्या पद्धतीने धोरण ठरविण्यात आलेत्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.

तूर खरेदीसाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळावी -पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्र सरकारकडे मागणी

 तूर खरेदीसाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळावी

       -पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्र सरकारकडे मागणी

 

मुंबई दि. 07 :- राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून मिळावीअशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे केली आहे. तसा प्रस्ताव पणन विभागाच्या माध्यमातून केंद्राला पाठविण्यात आला आहे.

 

राज्यात 1 लाख 37 हजार 458 शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी झालेली असून त्यापैकी 52 हजार 971 शेतकऱ्यांकडून 77 हजार 53 मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरेदी प्रक्रियेसाठी 90 दिवसांची मुदत 13 मे 2025 रोजी संपत आहे. उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी होण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आहे. ही मागणी लक्षात घेता 13 मे 2025 पासून पुढे पंधरा दिवसाची मुदतवाढ केंद्र सरकारने वाढवून द्यावीअशी विनंती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

 

केंद्र सरकारने राज्याला सन 2024 -25 हंगामात पीपीएस अंतर्गत 2 लाख 97हजार 430 मेट्रिक टन तूर खरेदीला मंजुरी दिलेली आहे. त्याकरिता नाफेड व एनसीसीएफ या केंद्रीय नोडल संस्थांच्या माध्यमातून राज्यातील आठ राज्यस्तरीय नोडल संस्था मार्फत 764 खरेदी केंद्र राज्यात कार्यान्वित आहेत. त्या खरेदी केंद्रात आत्तापर्यंत 52 हजार 971 शेतकऱ्यांकडून 77 हजार 53 मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात आली आहे.

 

राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून 7550 रुपये हमीभावाने तुरीची खरेदी चालू आहे. सध्या बाजारात तुरीचे बाजार भाव कमी असल्याने हमीभावाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी व्हावी त्यासाठी तूर खरेदीला मुदतवाढ मिळावीअशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.

प्रवाशांनी रिअल-टाईम बस माहिती पाहण्यासाठी ही पद्धत वापरावी: · pl share आपल्या Android किंवा iOS डिव्हाईसवर Google Maps अ‍ॅप उघडा.

 ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवासम्हणालेगुगल मॅपसोबतच्या सहकार्यामुळे मुंबईकरांना त्यांच्या प्रवासाची आखणी अधिक सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने करता येणार आहे. या सहकार्यामुळे प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवरच बस कुठे आहेकिती वेळात येईलविलंब झाला आहे कायाची माहिती मिळणार आहे. गुगल मॅपवर ही माहिती हिरव्या आणि लाल रंगात दाखवली जाईल.  हिरवा रंग वेळेत येणाऱ्या तर लाल रंग उशीर होणाऱ्या बसेस दर्शवेल.

गुगल मॅप्सच्या भारत प्रमुख रोलि अग्रवाल म्हणाल्या, बेस्टसोबतच्या या सहकार्यामुळे आम्ही मुंबईतील प्रवाशांना रिअल-टाईम सार्वजनिक वाहतूक माहिती देण्यास सक्षम झालो आहोत. सार्वजनिक वाहतुकीची अचूक आणि संपूर्ण माहिती देणे हे गुगल मॅप्सचे प्राधान्य आहे आणि हे सहकार्य त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

हा उपक्रम गुगलच्या भारतभरातील सार्वजनिक वाहतुकीची माहिती सुधारण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. सध्या गुगलने भारतातील १५ पेक्षा अधिक शहरांमध्ये मेट्रोट्रेनबस यांसारख्या वाहतूक सेवांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा मराठी व हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. गुगल मॅपच्या सेटिंग्जमध्ये किंवा फोनच्या भाषेच्या सेटिंग्जमध्ये जाऊन वापरकर्ता आपली भाषा निवडू शकतो.

महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सविस्तर सादरीकरण केले.

प्रवाशांनी रिअल-टाईम बस माहिती पाहण्यासाठी ही पद्धत वापरावी:

·         आपल्या Android किंवा iOS डिव्हाईसवर Google Maps अ‍ॅप उघडा.

·         आपल्या प्रवासाचे गंतव्यस्थान टाका आणि 'Go' आयकॉनवर क्लिक करा.

·         ट्रामच्या चिन्हावर टॅप करून 'Public Transport' मोड निवडा.

·         सुचवलेली सेवा निवडून बसचे थांबे आणि रिअल-टाईम माहिती तपासा.

·         एखाद्या बस स्टॉपसाठी सर्च करूनही रिअल-टाईम बस माहिती पाहता येईल.

००००

प्रवाशांना ‘बेस्ट’ बसेसची रिअल-टाईम माहिती देणारी सुविधा उपयुक्त

 प्रवाशांना ‘बेस्ट’ बसेसची रिअल-टाईम माहिती देणारी सुविधा उपयुक्त

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई दि. ७  : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळे आता बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार आहे. प्रवाश्यांच्या वेळेची बचत करुन त्यांच्या सुलभ प्रवाशांच्या दृष्टीने ही एक उपयुक्त सुविधा उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गुगल मॅपवर बसमार्गाची माहिती या प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीउपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीप्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या वेळी कोणती बस उपलब्ध होईलती बस मिळण्याची अचूक वेळ या गोष्टी सहजतेने आता उपलब्ध असणार आहेतज्यामुळे प्रवाश्यांच्या वेळेची बचत होईल आणि सोयीस्कर प्रवास करणे त्यांना शक्य होणार आहे. बेस्ट आणि गुगल मॅप यांच्यातील हे सहकार्य मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या गुणवत्तापूर्ण सुविधेच्या दिशेने  एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे ‘बेस्ट’च्या ग्राहकांच्या संख्येतही वाढ होईल. प्रवाश्यांना  या सुविधेचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी प्रत्येक बसस्थानकावर या सुविधेबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध करुन द्यावी,असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या डिजिटल उपक्रमाचे स्वागत केले आणि त्याचे कौतुक केले.

सामान्य प्रशासन विभागाचा सेवाकर्मी पुरस्कार

 सामान्य प्रशासन विभागाचा सेवाकर्मी पुरस्कार

         सामान्य प्रशासन विभागाकडून कार्यालयीन कामकाजासाठी  दिला जाणा-या सेवाकर्मी पुरस्कार प्रथम तीन क्रमांकाचे पुरस्कार वितरण पार पडले. यामध्ये ज्या विभागाच्या मंजूर पदसंख्या १० हजार पेक्षा जास्त असलेल्या विभागामध्ये मनिषा पाटणकर-म्हैसकर, अपर मुख्य सचिवसार्वजनिक बांधकाम विभागमनिषा वर्मा अपर मुख्य सचिवकौशल्य विकासरोजगार व उद्योजकता विभाग,श्रीमती शैला ए. सचिव (वित्तीय सुधारणा) वित्त (राज्यकर) विभाग यांचा सत्कार करण्यात आला. मंजूर पदसंख्या ३००० ते १०००० पद असलेले विभाग डॉ. रिचा बागला प्रधान सचिववित्त विभाग (लेखा व कोषागारे),श्रीमती विनीता वैद सिंगल प्रधान सचिव,अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागराजगोपाल देवरा अपर मुख्य सचिवगृह विभाग (राज्य उत्पादन शुल्क)मंजूर पदसंख्या ३००० पेक्षा कमी असलेल्या विभागाचे असीमकुमार गुप्ता ,अपर मुख्य सचिवनगरविकास विभाग (नवि-१), श्री. एकनाथ डवलेप्रधान सचिवग्रामविकास विभागराजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिवनियोजन विभाग यांचा सत्कार करण्यात आला.

100 दिवस बक्षीस वितरण प्रारंभीच भारतीय सैन्य दलाचे आणि पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन भारत सहन करणार नाहीहे भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले

ऑपरेशन सिंदुर हे नावच पुरेसे बोलके आहेअसेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शंभर दिवसाच्या कार्यक्रमात १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले मंत्रालयीन विभाग

 शंभर दिवसाच्या कार्यक्रमात  १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले मंत्रालयीन विभाग

   अपर मुख्य सचिवजलसंपदा विभाग - दिपक कपूर, अपर मुख्य सचिव खनिकर्म विभाग व  गृह विभाग- इक्बालसिंह चहल,अपर मुख्य सचिवसांस्कृतिक कार्य विभाग - विकास खारगे,अपर मुख्य सचिवअपर मुख्य सचिवबंदरे विभाग  - संजय सेठी, प्रधान सचिवग्राम विकास विभाग - एकनाथ डवले, अपर मुख्य सचिवउच्च व तंत्र शिक्षण विभाग - वेणुगोपाल रेड्डी, प्रधान सचिवकामगार विभाग -आय.ए. कुंदन, प्रधान सचिववस्त्रोद्योग विभाग  - श्रीमती अंशु सिन्हा,सचिवपशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग - एन. रामास्वामीसचिवरोजगार हमी योजना विभाग - गणेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Featured post

Lakshvedhi