Thursday, 8 May 2025

प्रवाशांनी रिअल-टाईम बस माहिती पाहण्यासाठी ही पद्धत वापरावी: · pl share आपल्या Android किंवा iOS डिव्हाईसवर Google Maps अ‍ॅप उघडा.

 ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवासम्हणालेगुगल मॅपसोबतच्या सहकार्यामुळे मुंबईकरांना त्यांच्या प्रवासाची आखणी अधिक सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने करता येणार आहे. या सहकार्यामुळे प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवरच बस कुठे आहेकिती वेळात येईलविलंब झाला आहे कायाची माहिती मिळणार आहे. गुगल मॅपवर ही माहिती हिरव्या आणि लाल रंगात दाखवली जाईल.  हिरवा रंग वेळेत येणाऱ्या तर लाल रंग उशीर होणाऱ्या बसेस दर्शवेल.

गुगल मॅप्सच्या भारत प्रमुख रोलि अग्रवाल म्हणाल्या, बेस्टसोबतच्या या सहकार्यामुळे आम्ही मुंबईतील प्रवाशांना रिअल-टाईम सार्वजनिक वाहतूक माहिती देण्यास सक्षम झालो आहोत. सार्वजनिक वाहतुकीची अचूक आणि संपूर्ण माहिती देणे हे गुगल मॅप्सचे प्राधान्य आहे आणि हे सहकार्य त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

हा उपक्रम गुगलच्या भारतभरातील सार्वजनिक वाहतुकीची माहिती सुधारण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. सध्या गुगलने भारतातील १५ पेक्षा अधिक शहरांमध्ये मेट्रोट्रेनबस यांसारख्या वाहतूक सेवांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा मराठी व हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. गुगल मॅपच्या सेटिंग्जमध्ये किंवा फोनच्या भाषेच्या सेटिंग्जमध्ये जाऊन वापरकर्ता आपली भाषा निवडू शकतो.

महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सविस्तर सादरीकरण केले.

प्रवाशांनी रिअल-टाईम बस माहिती पाहण्यासाठी ही पद्धत वापरावी:

·         आपल्या Android किंवा iOS डिव्हाईसवर Google Maps अ‍ॅप उघडा.

·         आपल्या प्रवासाचे गंतव्यस्थान टाका आणि 'Go' आयकॉनवर क्लिक करा.

·         ट्रामच्या चिन्हावर टॅप करून 'Public Transport' मोड निवडा.

·         सुचवलेली सेवा निवडून बसचे थांबे आणि रिअल-टाईम माहिती तपासा.

·         एखाद्या बस स्टॉपसाठी सर्च करूनही रिअल-टाईम बस माहिती पाहता येईल.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi