Tuesday, 29 April 2025

पर्यटनातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याची संधी

 पर्यटनातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याची संधी

- मत्स्यव्यवसायबंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि.28 : संवादव्यापारआणि संस्कृतीची देवाणघेवाण यासाठी किनारपट्टी भाग नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. भारतमध्यपूर्व आणि युरोप या देशांना एकमेकांशी अधिक जवळ आणण्याची ही परंपरा सुरू ठेवण्याची गरज आहे. मध्यपूर्व देशांनी अलीकडच्या काळात पर्यटन क्षेत्रात जे सकारात्मक बदल घडवले आहेतते अत्यंत उल्लेखनीय आहेत. मध्यपूर्व देशांनी पर्यटन विकास करताना जी दूरदृष्टी दाखवली आहे ती कौतुकास्पद असल्याचे मत मत्स्यव्यवसायबंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.

 

हॉटेल फोर सीजन येथे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडर समिट-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये मंत्री श्री. राणे यांची मुलाखत राजकीय व्यवहार आणि विशेष प्रकल्पाचे प्रमुख आणि मुंबई येथील इस्रायल वाणिज्य दूधवास अनय जोगळेकर यांनी घेतली.

 

मंत्री श्री. राणे म्हणाले,  पर्यटनातील संधी ओळखून योग्य दिशेने पावले उचलणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील लोक समुद्रकिनाऱ्यांवर वस्ती करत आले आहेत. राज्यात 720 किमी लांबीची एक मोठी किनारपट्टी आहे. महाराष्ट्रात पर्यटन वाढल्यास रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेलआणि जागतिक स्तरावर भारतमध्यपूर्व आणि युरोप यांच्यातील संबंध अधिक बळकट होतील.

 

 तंत्रज्ञानाच्या विविध दृष्टीकोनांचा वापर करूनकिनारपट्टीचा विकास कसा साधता येईल यावर विचार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात सुमारे 48 बंदरे आहेतत्यापैकी 15 बंदरे कार्यरत आहेत. या बंदरांशी संवाद साधूनत्यांच्या समस्या समजून घेणे आणि शासनाच्यावतीने त्यांना योग्य मदत करुन त्यांची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न आहेत. वाढवण बंदरामुळे कनेक्ट होण्याची संधी मिळणार आहे. या बंदरामुळे 15 लाख पेक्षा जास्त अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

किनारपट्टीचा विकास आणि किनारी सुरक्षामच्छीमारी क्षेत्राचा विकासवाहतूक आणि शहरांच्या पायाभूत सुविधा याबाबत मंत्री श्री.राणे यांनी यावेळी माहिती दिली.

0000

सात मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान

 सात  मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान

भारताच्या बॅंकिंग क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व अरुंधति भट्टाचार्य यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या सेल्सफोर्स इंडिया च्या चेअरपर्सन आणि सीईओ असलेल्या भट्टाचार्य यांनी भारतीय स्टेट बँकेत डिजिटल परिवर्तन घडवून आणले आणि संस्थेला भारतातील टॉप ३ कार्यस्थळांमध्ये स्थान मिळवून दिले. महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष धोरणे राबवली आणि विकलांग व्यक्तींच्या समाज समावेशासाठीही कार्य केले. 'फॉर्च्यूनआणि 'फोर्ब्स'ने त्यांना 'विश्वातील १०० सर्वात शक्तिशाली महिलाम्हणून गौरवले आहे. त्यांच्या व्यवसायातील आणि सामाजिक योगदानाची दखल घेत आज त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ज्येष्ठ उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन कुमार गोएंका यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या ते इनस्पेस (INSPACE) चे अध्यक्ष आणि आयआयटी (IIT) मद्रासच्या गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष आहेत. आयआयटी (IIT) कानपूर आणि कॉर्नेल विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या गोएंका यांनी जनरल मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली ऑटोमोटिव्ह आणि शेती उपकरणे व्यवसायात मोठी प्रगती झाली.

सोलापूरचे सुपूत्र आणि अरण्यऋषी म्हणून ओळखले जाणारे मारुती चित्तमपल्ली यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पक्षीप्राणी आणि वन संसाधनांवर विपुल लेखन केले आहे. चित्तमपल्ली यांनी वन विभागात दीर्घकाळ सेवा बजावली. चित्तमपल्ली अखिल मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांच्या कार्यामुळे कर्नाळा पक्षी अभयारण्यनवेगाव राष्ट्रीय उद्याननागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकास झाला.

कर्नाटकमधील करकल येथे जन्मलेले आणि मुंबईत वाढलेले प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामथ यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर जेजे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलेल्या कामथ यांनी तेलरंगपानी रंगऐक्रेलिक आणि सॉफ्ट पेस्टल माध्यमांतून उल्लेखनीय कलाकृती साकारल्या आहेत. त्यांनी पौराणिकऐतिहासिक विषयांवर आधारित अनेक व्यक्तिपरक चित्रे तयार केली आहेत. त्यांच्या माय वाइफ’ या चित्रासाठी त्यांना पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकेकडून ड्रेपर ग्रँड पुरस्कारही मिळाला आहे.

प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका जसपिंदर नरूला यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंदीपंजाबी सिनेमा तसेच सूफीगुरबानी आणि भक्ति संगीत क्षेत्रात त्यांच्या गायनाने अमीट ठसा उमटवला आहे. "प्यार तो होना ही था....." या गाण्यामुळे त्या प्रसिद्धी झोतात आल्या आणि त्यासाठी फिल्मफेअर पुरस्कारही पटकावला. त्यांनी "मिशन कश्मीर", "मोहब्बतें", "बंटी और बबली" यांसारख्या चित्रपटांमध्ये गायन केले असून सूफी संगीतावर आधारित "मौला अली अली...." गाणंही गायलं आहे.

भारतीय बांसुरी वादन क्षेत्रातील प्रतिष्ठित कलाकार पं. रानेद्र भानू मजुमदार यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी बांसुरी वादनाला भारतासह संपूर्ण जगभर नवी ओळख दिली आहे. रानेद्र भानू मजुमदार यांनी पं. रविशंकर यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतलेल्या रोनूजींची शैली 'द्रुपद गायकीआणि 'लयकारीयांच्या मिश्रणाने समृद्ध आहे. 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार', 'राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार', 'आदित्य विक्रम बिड़ला पुरस्कारआणि ग्रॅमी नामांकनासह अनेक सन्मान त्यांच्या नावावर आहेत. त्यांचा 'वेणु नादकार्यक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे. त्यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावाचे नंदनवन करणारे पर्यावरण संवर्धक चैत्राम पवार यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेली तीन दशके त्यांनी वनवासी समाजाच्या सहभागातून जंगल संरक्षणजलसंधारणवृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनाचे कार्य केले आहे. 'वनबंधूम्हणून प्रसिद्ध असलेल्या पवार यांना यापूर्वी 'महाराष्ट्र वनभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बारीपाडा गावाने सर्वांगीण प्रगती केली असून महिला सक्षमीकरणव्यसनमुक्ती आणि आरोग्य क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

यंदाच्या पद्म पुरस्कार वितरणाची प्रक्रिया दोन टप्प्यात केली जात आहे. आजच्या कार्यक्रमात 71 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेज्यामध्ये 4 पद्मविभूषण10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. उर्वरित 68 पद्म पुरस्कारांचे वितरण पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कार यादीत 139 जणांची निवड करण्यात आली आहेत्यात 7 पद्मविभूषण19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

००००

महाराष्ट्रातील 9 मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

 महाराष्ट्रातील 9 मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

 

नवी दिल्ली, दि.28 : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्कारांचे वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 9 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकडप्रधानमंत्री नरेंद्र मोदीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाहतसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते.

आज प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील 9 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर, गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर) यांना पद्मभूषण पुरस्कार’ तर  अरुंधती भट्टाचार्य,  पवनकुमार गोयंका  व्यापार व उद्योग क्षेत्रातील योगदानासाठीजस्पिंदर नरुलारानेद्र भानू मजुमदारवासुदेव कामत यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी व चैत्राम पवार यांना पर्यावरण आणि वनसंवर्धनसामाजिक क्षेत्रमारोती चीतमपल्ली यांना  वन्यजीव अभ्यासकसाहित्य आणि शिक्षण  क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दोन मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान

भारतीय चित्रपट दिग्दर्शकनिर्माता आणि अभिनेता शेखर कपूर यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित  केले. १९८३ मध्ये 'मासूमचित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या कपूर यांनी 'मिस्टर इंडिया', 'बँडिट क्वीनआणि 'एलिझाबेथयांसारख्या चित्रपटांद्वारे आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली. 'एलिझाबेथचित्रपटाला सात ऑस्कर नामांकने मिळाली होती. शेखर कपूर यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत भरीव योगदान दिले आहे.

प्रसिद्ध गजल गायक पंकज उधास यांना  आज मरणोत्तर "पद्मभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पंकज उधास यांनी आपल्या सुरेल आवाजाने पाच दशके संगीतप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. 'चिट्ठी आई है.....', 'चांदी जैसा रंग है तेरा......', आणि 'न कजरे की धार......' ' अशा गजलांनी त्यांना जगभर प्रसिद्धी मिळवली. २००६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. गजल गायकीतील योगदानासाठी त्यांना मरणोत्तर जाहीर झाला होता. हा पुरस्कार त्यांची पत्नी यांनी आज स्वीकारला.

जपानी कंपन्यांना भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठी संधी

  

जपानी कंपन्यांना भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात

 गुंतवणूक करण्याची मोठी संधी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. २८ : भारत लहान अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा विचार करत आहे. जपानी कंपन्यांना यात मोठ्या संधी आहेत. भारत सरकार अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणूक सुरू करण्यासाठी कायद्यात बदल करत आहे. थोरियम इंधनाच्या वापराबद्दलही संशोधन सुरू आहे. सौर पॅनेल आणि टर्बाइन ब्लेड रीसायकलिंग मध्येही जपानकडे उत्तम तंत्रज्ञान आहे. जपानी कंपन्यांना भारतात सौर क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

हॉटेल फोर सीजन येथे भारत-जपान पार्लियामेंट्री फ्रेंडशिप लीगचे अध्यक्ष आणि जपानचे अर्थउद्योगव्यापार मंत्री निशिमुरा यासुतोशी यांच्यासमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार मिलिंद देवराउद्योग विभागाचे सचिव डॉ.अन्बळगन पी. मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते. बैठकीत पहलगाम येथील हल्यात ज्यांना आपले प्राण गमावावे लागले त्यांच्याप्रती दुःख व्यक्त करण्यात आले.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेजपान सरकार आणि जायकाच्या सहकार्यामुळे मेट्रोअटल सेतू यांसारख्या सर्व मोठ्या प्रकल्पांची उभारणी झाली आहे. भारतीयांच्या मनात जपानी व्यवसाय, उत्पादनेकंपन्या आणि लोकांबद्दल मोठा विश्वास आहे.

 

पुणे येथे जपानी उद्योगांसाठी एक औद्योगिक पार्क सुरू केला आहे. तिथे जास्तीत जास्त जपानी कंपन्या याव्यातअशी इच्छा आहे. सुमितोमो आणि ताइसेई या दोन्ही कंपन्यानी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. जपानचे शिपिंग क्षेत्रात सुद्धा मोठं सहकार्य आहे. भारतात डेटा सेंटर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. महाराष्ट्र आज देशाचा डेटा सेंटर कॅपिटल झाला आहे. भारतातील ६५ टक्के डेटा सेंटर महाराष्ट्रात असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

 

स्टार्टअप्समध्येही आम्ही एकत्र काम करण्यास इच्छुक असल्याचे सागून मंत्री निशिमुरा यासुतोशी यांनी लवकरच जपानमध्ये एक सेमिनार आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. या सेमिनारसाठी उपस्थित राहण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्री श्री. यासुतोशी यांनी विनंती केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ‘वेव्हज २०२५’ बद्दल मंत्री श्री. यासुतोशी यांना माहिती दिली.

श्रीक्षेत्र भीमाशंकर आणि सिंहगड किल्ला परिसर विकास आढावा,जिवाजी महालेंच्या स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे

 श्रीक्षेत्र भीमाशंकर आणि सिंहगड किल्ला परिसर विकास आढावा

श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा आणि  सिंहगड किल्ला समर्ग संवर्धन विकास आराखड्याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. श्रीक्षेत्र भीमाशंकर आणि सिंहगड किल्ल्याचे आध्यात्मिकऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन नवीन विकासकामे करण्यात यावी. हे करताना मंदिर आणि किल्ला परिसराचे ऐतिहासिकप्राचीन सौंदर्य कायम राहीलयाची पूर्ण काळजी घ्यावीअशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवारा यांनी दिल्या.

जिवाजी महालेंच्या स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे

किल्ले प्रतापगडाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या ऐतिहासिक भेटीच्यावेळी अतुलनीय शौर्यसाहस आणि निष्ठेचे दर्शन घडविणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेजिवाजी महाले यांच्या प्रतापगड पायथा परिसरातील पुतळा आणि स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावेअशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पॅराग्लायडींग, ग्रॅन्डसायकलिंग, हॉटएअर बलून फेस्टीव्हलचा समावेश असलेल्या,ऐतिहासिक गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य घाट परिसरांचा विकास,

 पॅराग्लायडींगग्रॅन्डसायकलिंगहॉटएअर बलून फेस्टीव्हलचा समावेश असलेल्या

पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याचे अजित पवार यांच्या बैठकीत सादरीकरण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पुणे जिल्हा पर्यटन आराखडा सादर

ऐतिहासिक गडकिल्लेप्राचीन मंदिरेनिसर्गरम्य घाट परिसरांचा विकास,

पॅराग्लायडींगग्रॅन्डसायकलिंगहॉटएअर बलून आदी खेळांचा समावेश

 

पुणे जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या पाच वर्षात एक कोटींवर,

50 हजार थेट तरपाच लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे ध्येय

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्धार

 

श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास व सिंहगड किल्ला परिसर

विकास आराखड्याचाही अजित पवारांकडून आढावा

 

प्रतापगड पायथा परिसरातील जिवाजी महाले यांच्या

पुतळा आणि स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे

--उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 

 

मुंबईदि. 28 :- पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे जागतिक पॅराग्लायडींग स्पर्धेचे आयोजनजिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधून जाणारी ग्रॅन्डसायकलिंग चॅलेंज स्पर्धाबारामती व इंदापूरला हॉटएअर बलून फेस्टीव्हलपवना धरणक्षेत्रात जलक्रीडा पर्यटनाच्या सुविधाऐतिहासिक गडकिल्लेप्राचीन मंदिरेनिसर्गरम्य घाटांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकासजिल्ह्यातील कलावंताचा सहभागातून गायनवादननाटकसाहित्यकाव्यकथावाचनासारख्या सांस्कृतिक महोत्सवांचं आयोजनपर्यटकांना पर्यटनस्थळे पाहण्याचा आनंद देण्याबरोबरंच साहसी खेळांचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या मोटरबोटींग’, ‘झिपलाईनसारख्या साहसी खेळ सुविधांची निर्मिती अशा अनेक उपक्रमांचा समावेश असलेल्याशाश्वत अशा पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील गडकिल्लेप्राचीन मंदिरेलोककलालोकसंस्कृतीचा समृद्ध वारसापर्यटनवाढीची अमर्याद संधीचा उपयोग करुन पुणे जिल्ह्याचे देशाच्या पर्यटन नकाशावर स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला असून त्याअनुषंगाने जिल्ह्याचा सर्वसमावेशक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्याचा प्राथमिक मसूदा तयार करण्यात आला असून त्याचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील विशेष बैठकीत आज मंत्रालयात करण्यात आले. बैठकीला उपमुख्यमंत्र्याचे सचिव डॉ. राजेश देशमुखपुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदींसह मंत्रालय आणि पुणे जिल्ह्यातील संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीआपल्या  राज्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांपैकी 79 टक्के पर्यटक मुंबईला भेट देतात तर अवघे 14 टक्के पर्यटक पुण्याला येतात. पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याच्या यशस्वी आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीतून येत्या तीन वर्षात जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या चाळीस लाखांवर तर पुढील पाच वर्षात एक कोटींवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून जिल्ह्याच्या जीडीपीत दहा ते पंधरा हजार कोटींची वाढ होईल. पन्नास हजार थेट रोजगार तर पाच लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी हाती घेतलेले सर्व उपक्रम हे कायम सुरु राहतील. पॅराग्लायडींग स्पर्धाग्रॅन्डसायकलिंग चॅलेंज स्पर्धाहॉटएअर बलून फेस्टीव्हलसांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन दरवर्षी विशिष्ट कालावधीत नियमितपणे केले जाईल. त्यातून जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्राला नवी ओळख मिळेलअसा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यटनवाढीला महत्व आणि भरीव निधी दिला असून हा मुद्दा त्यांच्या सर्वोच्च प्राधान्ययादीत आहे. पर्यटनविकासासाठी राज्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्विकारले आहे. याचा फायदा महाराष्ट्राला करुन घेत असताना पुणे जिल्ह्यानंही पर्यटनविकासात आघाडीवर असलं पाहिजे. त्यासाठी जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा महत्वाचा आहे. यातून जागतिक पर्यटनाच्या नकाशावर पुणे जिल्ह्याचं स्वतंत्र स्थान निर्माण होईल. त्यसाठी जिल्ह्याच्या स्वतंत्र पर्यटन लोगोस्वतंत्र घोषवाक्य असेल. यातून स्वतंत्र ब्रँन्ड निर्माण होईल शिवाय जागतिक ओळख आणि लोकप्रिय व्यक्तिमत्वं असलेला ब्रॅन्डअॅम्बॅसॅ़डर’ नियुक्त करण्याचा प्रयत्न करुअसेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्हाचा पर्यटन विकास  आराखडा तयार करताना अन्य राज्यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. गुजरात राज्याने कच्छच्या वाळवंटात रणउत्सव’, अरुणाचल प्रदेशने झिरो व्हॅलिमध्ये झिरो फेस्टीव्हल’, राजस्थानमध्ये जयपूरला साहित्य महोत्सव’, नागालॅन्डमध्ये हॉर्नबिल महोत्सवसारखे सुरु केलेले उपक्रम अपेक्षेपेक्षा यशस्वी ठरले. त्यातून त्या राज्यांच्या पर्यटनाला स्वतंत्र ओळख मिळाली. आर्थिक उलाढाल वाढली. महसूल वाढला. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती झाली. पर्यटनस्थळांच्या मार्गावरील गावांचाशहरांचा विकास होण्यासही मदत झाली. पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्यातूनही आपलीही उद्दीष्टे पूर्ण होतील. त्यासाठी जिल्ह्यातील पर्यटनाशी संबंधित नामांकिततज्ञ व्यक्तीसंस्थासंघटनांचे सहकार्य घ्यावे. पुणे जिल्ह्याचा पर्यटनविकास आराखडा राबवताना तो सर्वांच्या सहकार्यानेमदतीने राबवावा. शक्य तिथे खासगी संस्थासंघटनांची मदत घ्यावी. राज्य शासनाकडून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल. निधीची कमी भासू दिली जाणार नाहीअसा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत

बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामाचा वेग वाढवा

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पीएमयूच्या

बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी

पायाभूत सुविधांच्या कामाचा वेग वाढवा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 

मुंबईदि. 28 :- पुणे शहरासह उपनगरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात द्यावे. पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडसह मेट्रोउड्डाणपूलरिंग रोड तसेच सुरु असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा. यासाठी या प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागाने योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातउपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरासार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरपरिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीकृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीवैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारपुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विभागाचे मुख्य अभियंते अतुल चव्हाण उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीवर पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारपुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, ‘महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकरसातारा जिल्हाधिकारी संतोष पाटीलपिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंगमहानगर आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसेयांच्यासह पुणे मेट्रोपीएमआरडीएसंबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे संचालन उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव विकास ढाकणे यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीराज्यात सुरु असणाऱ्या विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होतेते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी लोणावळा येथील नियोजित स्काय वॉकटायगर पॉईंटपुणे नाशिक ग्रीन फिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे, ‘सारथीसंस्थेच्या नाशिककोल्हापूरनागपूरखारघरसंभाजीनगरअमरावतीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकामसातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयसातारा सैनिक स्कूलरेवस ते रेड्डी सागरी महामार्गवडाळा येथील जीएसटी भवनरेडिओ क्लब मुंबईरत्नागिरीचे मिरकरवाडा बंदरवढू व तळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकपुणे येथील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारककृषीभवनकामगार कल्याण भवनसहकार भवनपुरंदर विमानतळ आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला. 

0000

 

Featured post

Lakshvedhi