Wednesday, 23 April 2025

सागरी महामंडळाने होर्डिंग उभारणी व जाहिरातीबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करावे

 सागरी महामंडळाने होर्डिंग उभारणी व जाहिरातीबाबत

सर्वसमावेशक धोरण तयार करावे

-  मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. 23 : सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच सागरी महामंडळाच्या जागांवर होर्डिंगची उभारणीत्यावरील जाहिरातबाबत आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करावे अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

            मंत्रालयात सागरी महामंडळाच्या जागांच्या व्यावसायिक वापराविषयी धोरण ठरवण्यासाठी बैठक  आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. यावेळी सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपप्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

            सागरी महामंडळांच्या मुंबई महानगर  क्षेत्रातील जागांवर होर्डिंग उभारण्यासाठी धोरण राबवताना त्यातून जास्तीत जास्त महसूल निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत असे सांगून मंत्री राणे म्हणाले कीहोर्डिंगच्या माध्यमातून किमान 100 कोटी महसूल निर्मितीचे उद्दीष्ट ठेवावे. तसेच यासाठी स्पर्धात्मकता निर्माण करावी. खुल्या निविदा मागवाव्यात. महामंडळाने स्वतः होर्डिंग उभारावीत व त्यावरील जाहिरातीचे हक्क विक्री करावे. महसूल वाढीसाठी मदत होईल. याशिवाय महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक वापर होतो त्याचेही नियमन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व जागा भाडेपट्ट्याने देताना स्पर्धात्मकता आणण्याच्या दृष्टीने निविदा मागवण्याची कार्यवाही करावी. अनेक वर्ष एकाच जागी व्यवसाय केला जातो.  पणनियमानुसार भाडे अदा केले जात नाही अशा प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावंर कारवाई करावीअशा सूचनाही मंत्री राणे यांनी बैठकीत दिल्या.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ


पहलगाम दुर्घटनेतील महाराष्ट्रातील चार पार्थिव मुंबईकडे रवाना तर दोन पार्थिव दिल्ली मार्गे पुण्यास रवाना राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाची माहिती

 पहलगाम दुर्घटनेतील महाराष्ट्रातील चार पार्थिव मुंबईकडे रवाना

तर दोन पार्थिव दिल्ली मार्गे पुण्यास रवाना

राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाची माहिती

 

मुंबईदि. 23 : जम्मू व काश्मीर येथील पहलगाम येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यातील चार जणांचे मृतदेह हवाई मार्गे मुंबईला पाठविण्यात येत असून दोन पार्थिव दिल्ली मार्गे पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जम्मू व काश्मीर प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. दिल्ली येथे येणाऱ्या पार्थिवांसोबत असलेल्या नातेवाईकांशी दिल्लीतील राजशिष्टाचार कार्यालयातील अधिकारी सतत संपर्कात असल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार पर्यटकांशी संपर्क करण्यात आला असून ते सुखरूप असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. जम्मू व काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इतर पर्यटकांची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत 275 पर्यटकांशी संपर्क साधण्यात आलेला आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांची निवासव्यवस्था आणि पुढील प्रवासासाठी आवश्यक ते समन्वय केले जात असल्याचेही राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे.


महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच

 महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच

- भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

 

मुंबईदि. 23 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकानंतर मतदार यादी व मतदानप्रक्रियेवर करण्यात येत असलेल्या आरोपांना भारत निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाच्या स्पष्टीकरणानुसारनिवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी नसूनसर्व कायदेशीर तरतुदींनुसारच निवडणुका पार पडल्या आहेत.

आयोगाच्या माहितीनुसारमहाराष्ट्रात 6 कोटी 40 लाख 87 हजार 588 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत दर तासाला सरासरी 58 लाख मतदारांनी मतदान केले. तथापिशेवटच्या दोन तासांत अपेक्षित 116 लाखांच्या तुलनेत केवळ 65 लाख मतदारांनी मतदान केलेहे लक्षवेधी असले तरी त्यावरून कोणत्याही गैरप्रकाराचा निष्कर्ष काढता येत नाहीअसे आयोगाने स्पष्ट केले.

प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांकडून मतदानानंतर कोणतीही तक्रार अधिकृतपणे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निरीक्षकांकडे नोंदवण्यात आलेली नाही.

मतदार यादी संदर्भात आयोगाने सांगितले की 1950 च्या लोकप्रतिनिधी अधिनियम व 1960 च्या मतदार नोंदणी नियमांनुसार तयार केली जाते. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो आणि अंतिम यादी सर्व पक्षांना उपलब्ध यादी करून दिली जाते.

याशिवायअंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ 90 अपीले करण्यात आलीजी एकूण मतदार संख्येच्या तुलनेत अत्यल्प आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसकडूनही कोणतीही मोठी तक्रार नोंदवलेली नाही.

मतदान प्रक्रियेत 1 लाखांहून अधिक मतदान केंद्रांवर 97,325 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व सर्व पक्षांकडून 1,03,727 मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमले गेले होते. यामध्ये काँग्रेसच्या 27,099 बीएलएचा समावेश होता. त्यामुळे मतदार यादी संदर्भातील आरोप पूर्णपणे निराधार असून कायद्याचा अवमान करणारे असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

24 डिसेंबर,2024 रोजी निवडणूक आयोगाने काँग्रेसला लेखी उत्तर दिले असूनही माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. तरीही पुन्हा पुन्हा असे आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे अयोग्य असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

 

काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष

 काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर

मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष

 

         मुंबईदि. 23 :- पहलगामजम्मू काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक असण्याची शक्यता आहे. जर या ठिकाणी मुंबई शहर व जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास कृपया तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

जिल्हा नियंत्रण कक्ष - मुंबई शहर

दुरध्वनी क्रमांक : 022-22664232 (फक्त मुंबई शहर जिल्ह्याकरिता)

संपर्क क्रमांक : 8657106273

संपर्क क्रमांक : 7276446432

 

पर्यटकांसाठी आपल्कालीन  मदत कक्ष

24x7 Help Desk/ Emergency Control Room for Tourists has been established at District Headquarter, DC office, Srinagar for assistance of Tourists.

Contact details :

A) 0194-2483651

     0194-2457543

B) WhatsApp Nos.     

    7780805144

    7780938397    

Courtesy : District Administration Srinagar

0000

कश्मीर (श्रीनगर) के आपातकालीन संपर्क नंबर: पर्यटकों की सहायता हेतु श्रीनगर जिला प्रशासन द्वारा जिलाधिकारी कार्यालय में 24x7 हेल्प डेस्क / आपातकालीन नियंत्रण कक्ष स्थापित किया गया है: दूरभाष: 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543 व्हाट्सएप नंबर: 7006058623, 7780805144, 7780938397

 कश्मीर में फंसे पर्यटकों के लिए 'राज्य आपदा प्रबंधनकी हेल्पलाइन पर

संपर्क करने की अपील

संपर्क नंबर: 022-22027990

 

मुंबई, 23 : पहलगाम में हुए कायरतापूर्ण आतंकवादी हमले के कारण कश्मीर के विभिन्न हिस्सों में फंसे महाराष्ट्र के पर्यटक और उनके परिजन सहायता के लिए महाराष्ट्र राज्य आपदा प्रबंधन कक्ष के 022-22027990 दूरभाष नंबर पर संपर्क करेंऐसी अपील की गई है।

इस दुर्घटना की पृष्ठभूमि में मंत्रालय स्थित आपदा प्रबंधन कक्ष 24x7 कार्यरत है। इस हमले में मारे गए पर्यटकों के शव आज श्रीनगर से मुंबई लाए जा रहे हैं। महाराष्ट्र और गुजरात के इन मृतकों के शव आज दोपहर विमान द्वारा मुंबई हवाई अड्डे पर पहुंचाए जाएंगे। वहां से उन्हें एम्बुलेंस द्वारा उनके संबंधित स्थानों तक भेजा जाएगा। इस प्रक्रिया में सभी आवश्यक सहायता राज्य सरकार द्वारा प्रदान की जा रही है।

 

कश्मीर में फंसे पर्यटक और महाराष्ट्र में मौजूद उनके परिजन किसी भी प्रकार की सहायता के लिए 022-22027990 नंबर पर तुरंत संपर्क करेंऐसा आग्रह राज्य आपदा प्रबंधन कक्ष द्वारा किया गया है।

कश्मीर (श्रीनगर) के आपातकालीन संपर्क नंबर:

पर्यटकों की सहायता हेतु श्रीनगर जिला प्रशासन द्वारा जिलाधिकारी कार्यालय में 24x7 हेल्प डेस्क / आपातकालीन नियंत्रण कक्ष स्थापित किया गया है:

दूरभाष: 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543

व्हाट्सएप नंबर: 7006058623, 7780805144, 7780938397


Pl share ,Appeal to Contact 'State Disaster Management' Helpline for Tourists Stranded in Kashmir Contact Number: 022-22027990

 

Appeal to Contact 'State Disaster Management' Helpline for Tourists Stranded in Kashmir

 

Contact Number: 022-22027990

 

Mumbai, 23: In the wake of the cowardly terrorist attack in Pahalgam, tourists from Maharashtra who are stranded in various parts of Kashmir and their relatives are urged to contact the Maharashtra State Disaster Management Cell at 022-22027990 for assistance.

In response to this incident, the Disaster Management Cell at Mantralaya is operating round the clock (24x7). The mortal remains of tourists who lost their lives in the attack are being brought from Srinagar to Mumbai today. These bodies, from Maharashtra and Gujarat, will arrive at Mumbai Airport this afternoon, and from there, they will be transported by ambulance to their respective hometowns. All necessary support for this is being provided by the State Government.

Stranded tourists in Kashmir and their relatives in Maharashtra are strongly encouraged to call the helpline 022-22027990 for any assistance, as per the appeal from the State Disaster Management Cell.

 

Contact Numbers for Kashmir (Srinagar):

 

The District Administration in Srinagar has set up a 24x7 Help Desk/Emergency Control Room at the Deputy Commissioner’s Office for tourists in distress.

 

  1. Landline: 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543
  2. WhatsApp Numbers: 7006058623, 7780805144, 7780938397

000

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी 'राज्य आपत्ती व्यवस्थापन'च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन दूरध्वनी : 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543 2) व्हॉट्सअॅप : 7006058623, 7780805144, 7780938397 संपर्क क्रमांक :- 022-22027990

 काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी 'राज्य आपत्ती व्यवस्थापन'च्या

हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन

 

संपर्क क्रमांक :- 022-22027990

 

मुंबईदि. 23 : पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि  त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.

 

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24x7कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज आणण्यात येणार आहेत. आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.

 

काश्मीरमधील संपर्क क्रमांक :

 

श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना आपत्कालिन परिस्थिती संपर्क साधता यावा यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात २४x७ मदत कक्ष / आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

१) दूरध्वनी : 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543

2) व्हॉट्सअॅप : 7006058623, 7780805144, 7780938397

 

Featured post

Lakshvedhi