Wednesday, 23 April 2025

जलमित्र प्रशिक्षण

 जलमित्र प्रशिक्षण

ग्रामस्तरावर जलसाक्षरता वाढविण्यासाठी 'जलमित्रप्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून गावातील नागरिकांमध्ये जलसंवर्धनाबाबत जागृती निर्माण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीत विभागाच्या विविध योजनांची प्रगती तपासण्यात आली.

स्वच्छ भारत मिशनच्या ग्रामीण भागातील अंमलबजावणीचा आढावा घेताना घनकचरा व्यवस्थापनहागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव निर्माण करणेसांडपाणी व्यवस्थापन,प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

कंपोस्ट खड्‌डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे

 कंपोस्ट खड्‌डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू


अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे


- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील


१ मे पासून राज्यस्तरीय अभियान

 


मुंबई, दि.२२ : संपूर्ण स्वच्छता करण्याबरोबरच ग्रामीण भागातील सर्व गावांना दृष्यमान स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा मिळवून ग्रामीण जनतेत स्वच्छतेविषयक वर्तणुकीत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने राज्यात १ मे पासून "कंपोस्ट खड्‌डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू" अभियान राबविण्यात येणार असून या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.


मंत्रालयातील दालनात पाणीपुरवठा, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान या विषयी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनचे संचालक ई. रविंद्रन यांच्यासह मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. गुलाबराव पाटील म्हणाले, सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व समजावून देण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी, कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे आदी उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.दि.०१ मे ते दि.३० सप्टेंबर २०२५ पर्यंत एकूण १३८ दिवस अभियान अंमलबजवणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


ग्रामीण भागात मे महिन्यातील पाणीटंचाईसंदर्भात नियोजन करण्याचे आदेश देताना ते म्हणाले टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी सक्षम नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.


जल जीवन मिशनमध्ये समाधानकारक काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालयांच्या कामांबाबत अधिक गंभीरतेने प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला आहे. या कामांसाठी आवश्यक जागा मिळविण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’

 पर्यावरण वाचवावसुंधरा सजवा’ अभियानाचा शुभारंभ

आज 22 एप्रिल पासून ते 1 मे पर्यंतच्या नऊ दिवसाच्या राज्यस्तरीय पर्यावरण वाचवावसुंधरा सजवा’ या अभियानाचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला. त्यानिमित्त पवई तलाव स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी राज्याचे फूलझाड ताम्हण रोपाचे श्रीमती मुंडे यांच्या हस्ते रोपण करण्यात आले.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून या अभियानाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिकानगरपंचायतमहानगरपालिका क्षेत्रात हे पर्यावरण संवर्धन अभियान राबवण्यात येणार आहे.

नऊ दिवस चालणाऱ्या या अभियानात नागरिकांना आपल्या पृथ्वीचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे व राज्यातील नागरिकांना पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत सहभागी करून घेणेअसा या अभियानाचा उद्देश असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. या अभियानात पंचमहाभुतांच्या भूमीजलवायूअग्नीआकाश या पाच घटकांपैकी किमान एका घटकावर जागरूक नागरिक म्हणून संकल्प करून काम करावे. स्थानिक स्वराज संस्थांनी पुढाकार घेऊन नैसर्गिक जलस्त्रोतांची स्वच्छता, रिड्यूसरियूजरिसायकल यावर आधारित शाळा महाविद्यालयात नवीन प्रयोगांची स्पर्धा, ‘पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ’ याप्रमाणेच घोषवाक्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून त्याचा पारितोषिक वितरण समारंभ प्रत्येक जिल्ह्यांच्या पालकमंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी करावाअसे आवाहन या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने केले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्यस्तरावर युवकांशी संवाद साधून निसर्ग संवर्धनाच्या चळवळीत तरूणांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेअसे सांगितले.

आमदार दिलीप लांडे यांनी पवई तलाव स्वच्छता अभियानाची सुरूवात निश्चितच कौतुकास्पद असून या तलावाचे संवर्धन ही येथील नागरिकांची गरज असल्याची भावना व्यक्त केली.

महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रास्ताविकात पर्यावरणप्रेमी सामाजिक संस्थांच्या आग्रही पुढाकाराने हा कार्यक्रम घेतला असल्याचे स्पष्ट करून पर्यावरणवादी संघटनांमुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळत असल्याची भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमात वनशक्तीनिसर्ग संस्थानहेल्पिंग हॅन्डस्पर्यावरण दक्षता मंचबुऱ्हानी फाऊंडेशनराष्ट्रीय सेवा योजना या संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

जागतिक वसुंधरा दिनी ‘पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ अभियानाचा मुंबईत थाटात शुभारंभ प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण संवर्धनाचा ध्यास

 पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे सरसावल्या;

पवई तलावाच्या स्वच्छता उपक्रमाने सुरू केली लोकचळवळ

जागतिक वसुंधरा दिनी पर्यावरण वाचवावसुंधरा सजवा’ अभियानाचा मुंबईत थाटात शुभारंभ

प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेण्याचे केले आवाहन

राज्यभरात राबवली जातेयं अभिनव संकल्पना

 

मुंबईदि. 22 : पर्यावरण संवर्धनाचा ध्यास सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वानी एकत्रितपणे पुढाकार घ्यावाअसे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळबृहन्मुंबई महानगरपालिका आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध सामाजिक संस्थांच्या सहयोगाने 22 एप्रिल2025 जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मुंबई येथील पवई तलाव स्वच्छता व संवर्धन अभियानाच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन गणेश घाट पवई येथे करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदमआमदार दिलीप लांडेपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोजमहाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणेमहानगरपालिका उपायुक्त श्री.संतोष दौड आदी उपस्थित होते.

यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पर्यावरण रक्षणात कर्तव्य आणि हक्क या दोन्ही गोष्टींची जोड देण्याची गरज व्यक्त केली. निसर्गाने मानवाला भरभरून सर्व काही दिलेपण माणसाने मात्र अतिहव्यासाने सभोवतालच्या निसर्गाचे नुकसान केले. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी शासनाबरोबरच लोकसहभाग आवश्यक आहे. यासाठी आपण वेळीच जागृत होऊन पर्यावरण संवर्धनाचे कर्तव्य बजावण्याची नितांत गरज असून सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर महाराष्ट्र नक्कीच प्रदुषणुक्त होईल.

नवरात्रीत ज्याप्रमाणे देवीची आराधना केली जाते. त्याप्रमाणे या सृष्टीचीवसुंधरेची आराधना केली पाहिजे. वसुंधरेला वाचविण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

निसर्ग रक्षणासाठी लोकाभिमुख चळवळ निर्माण करणार

            जलयुक्त शिवार योजनालेक माझी भाग्यश्री अशा योजनांना लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जलयुक्त शिवार योजनेतून ग्रामीण विभागात पाणी टंचाईवर मात करण्यात यश मिळालेहा पूर्वानुभव लक्षात घेऊन पर्यावरण विभाग देखील निसर्ग रक्षणासाठी लोकाभिमुख चळवळ निर्माण करेल. पवई तलावाची स्वच्छता ही या चळवळीची सुरुवात असून नागरिकांचा वाढता सहभाग हे खूप मोठे योगदान ठरेलअसा विश्वास श्रीमती मुंडे यांनी व्यक्त केला

पोप फ्रान्सिस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांकडून श्रद्धांजली

 पोप फ्रान्सिस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांकडून श्रद्धांजली

 

मुंबईदि. 22 :-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरकौशल्य विकासरोजगारउद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढामृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडआदिवासी विकास मंत्री अशोक ऊईकेखासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्य मान्यवरांनी पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजसमोर उभारण्यात आलेल्या स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरण कार्यक्रम पोप फ्रान्सिस यांच्या दुःखद निधनामुळे रद्द करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांकडून पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

००००


विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 जाहीर

 विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 जाहीर

 

मुंबई, दि. 22 : राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिले जाणारे कामगार भूषण व विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी जाहीर केले.

कामगार भूषण पुरस्कारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील बजाज ऑटो लिमिटेडचे कामगार श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांची निवड करण्यात आली आहे. कामगारांसाठी असलेल्या या सर्वोच्च पुरस्कारासाठी राज्यातून केवळ एका कामगाराची निवड केली जाते. विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी राज्यभरातून ५१ कामगारांची निवड करण्यात आली आहे. नोकरी करत असतानाच विविध सामाजिकसांस्कृतिकशैक्षणिकक्रीडासंघटन आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दरवर्षी एका कामगाराची कामगार भूषण पुरस्कारासाठी तर ५१ कामगारांची विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

कामगार मंत्री अॅड.आकाश फुंडकरकामगार राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वालकामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदनकामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी सर्व पुरस्कार्थींचे अभिनंदन केले आहे. हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवनप्रभादेवीमुंबई येथे येत्या १३ मे रोजी या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

2024 च्या पुरस्कारासाठी अर्ज

सन २०२४ मधील विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कारासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया २८ एप्रिल २०२५ पासून सुरु करण्यात येत आहे. या पुरस्कारांचे अर्ज मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळावर तसेच राज्यातील विविध कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध करून देण्यात येतील. हे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २३ मे २०२५ आहे.

पुरस्काराचे स्वरुप -

कामगार भूषण पुरस्कारासाठी रु.५० हजारस्मृतीचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात येतेतर गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी रु.२५ हजारस्मृतीचिन्ह आणि मानपत्र प्रदान करण्यात येते.

कामगार भूषण पुरस्कार :पुरस्कार्थींची नावे -

 पुरस्कार्थींची नावे - 

कामगार भूषण पुरस्कार :

श्रीनिवास कोंडिबा कळमकरमल्टिस्कील ऑपरेटरबजाज ॲटो लिमिटेडबजाजनगरछत्रपती संभाजीनगर.

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार :

१) नेहा विलास भांडारकरभारतीय आर्युविमा महामंडळनागपूर,

२) महेश मधुकर सावंत-पटेलसीमेन्स लिमिटेड,ठाणे-बेलापूर रोडठाणे

३) चंद्रकांत महादेव कांबळेबजाज ॲटो लिमिटेड,वाळूजछत्रपती संभाजीनगर

४) दादासाहेब सुरेंद्र भंडेस्कोडा ॲटो फोक्सवॅगन इंडिया प्रा.लि.,छत्रपती संभाजीनगर

५) नरेंद्र शंकर गोखलेराष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेडथळता.अलिबागजि.रायगड.

६) विजय रामेश्वर बोराडेहिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड खामगांवजि.बुलडाणा

७) सचिन लक्ष्मण पिंगळेमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळविभागीय कार्यालयबुलडाणा

८) संदीप सतीश रांगोळेटाटा मोटर्स कंपनी लिमिटेडपिंपरीपुणे

९) उमेश रामचंद्र फाळकेटाटा मोटर्स कंपनी लिमिटेडपिंपरीपुणे

10) राजकुमार गुलाबराव किर्दतअल्फा लावल इंडिया लिमिटेड,सातारा

11) नामदेव रामसा उईकेसी.आय.ई. ॲटोमोटिव्ह इंडिया कास्टींग लि.उर्सेगांवता.मावळजि.पुणे

12) निमीषा नितीन मोहरीरभारतीय जीवन बिमा निगमनागपूर

13) दिगंबर शंकरराव पोकळेकमिन्स इंडिया लिमिटेडकोथरुडपुणे

14) दत्तात्रय सुखदेव दगडेस्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रा.लि.निघोजे म्हाळुंगे खराबवाडीता.खेडचाकणपुणे

15) संजय जयसिंग देशमुखथरमॅक्स लिमिटेडचिंचवडपुणे

16) विकास चंद्रकांत धुमाळमहाराष्ट्र स्कुटर्स लि.सातारा लि.आकुर्डीपुणे

17) बद्रिनाथ शिवनाथ भालगडेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसिल्लोडता.सिल्लोडजि. छत्रपती संभाजीनगर

18) प्रविण बबन जाधवगोदरेज ॲण्ड बॉईजमॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि.,शिंदेवाडीशिरवळता.खंडाळाजि.सातारा

19) मनोज अनंत पाटीलटाटा स्टील लिमिटेडएम.आय.डी.सी.तारापूरजि.पालघर

20) सुनिता रविंद्र परमणेमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादितपोफळीता.चिपळूणजि. रत्नगिरी

21) प्रकाश बाबुराव चव्हाणटाटा मोटर्स पॅसेंजर्स व्हेईकल्स लिमिटेड चिखलीपुणे

22) शिवराज दादासो शिंदेप्रिमियम ट्रांन्समिशन प्रा.लिमिटेड,चिंचवडपुणे

23) कविता नरेश भोसलेमुंबई पोर्ट ट्रस्टमुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयवडाळा (पूर्व)मुंबई

24) मनोज देविदास गवळीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळधुळे

25) रविंद्र बाबाजी जाधवविचारे एक्सप्रेस ॲण्ड लॉजिस्टीक प्रा.लि.कांदिवली (प)मुंबई

26) मारोती सदाशिव पिंपळशेंडेचंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित,ऊर्जानगर

27) साखरचंद मारुती लोखंडेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्यवर्ती कार्यशाळादापोडीपुणे

28) देविदास पंडीत पवारमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळधुळे

29) किसन दामोधर नागरकर,महाराष्ट्र राज्य विद्दुत पारेषण कंपनी मर्यादित बल्लारशाह

३०) रविंद्र किसनराव रायकरकमिन्स इंडिया लिमिटेडकोथरुडपुणे

31) वंदना अशोक मनपेचंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादितऊर्जानगरचंद्रपुर

32) विवेक सर्जेराव रावतेमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितइस्लामपुर,ता.वाळवाजि.सांगली

33) देवकी ओमप्रकाश कोकासबिल्ट पेपर ग्राफिक्स प्रॉडक्ट लिमिटेडबल्लारपूरपेपर मिल्सचंद्रपूर

34) एकनाथ रमेश उगलेथरमॅक्स लिमिटेडचिंचवडपुणे

35) राजेंद्र ज्ञानदेव कांबळेदि कराड को-ऑप.बँक लिमिटेडकराड

36) संजय दगु गोराडेकिमप्लास पाईपिंग सिस्टीम प्रा.लिमिटेड,अंबडनाशिक

37) नितीन आनंदराव देडगेवनाझ इंजिनिअर्स लिमिटेडकोथरुडपुणे

38) सुनिल गुंडू दळवीविभाग नियंत्रक यांचे कार्यालय मध्यवर्ती बसस्थानककोल्हापूर

39) पोपट चंदु रसाळस्टरलाईट टेक्नॉलॉजीछत्रपती संभाजीनगर

40) अजित अनंत कामतेकरराष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेडथळता.अलिबागजि.रायगड

41) गुणवंत वसंतराव भारस्करमहाराष्ट्र राज्यल विद्युत वितरण कंपनी लि.वाशिम

42) नंदकुमार साहेबराव पाटीलगोदरेज ॲण्ड बॉईज मॅ.कंपनी लिमिटेडफिरोजशहा नगरविक्रोळीठाणे

43) संजय दिनकर चव्हाणकिर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेडखडकीपुणे

44) सचिन मारुती पवारमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळठाणे आगारजि.ठाणे

45) विजय काशीराम नंदागवळीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळनागपूर रोडभंडारा

46) भारत गोरख मांडेकेबल कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमाळेगावता.सिन्नरजि.नाशिक

47) शिवाजी नागनाथराव राऊतमेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड,वाळुजछत्रपती संभाजीनगर

48) अमोल अशोक आळवेकरमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकोल्हापूर आगारजि. कोल्हापूर

49) दिपक वसंतराव पाटीलहिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड,ओझर (मिग)ता.निफाडजि. नाशिक

50) विलास मोरेश्वर पंचभाईमहिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा लिमिटेडसातपूर नाशिक

51) अनंत अशोक शिंदेमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळजळगाव

0000

Featured post

Lakshvedhi