Sunday, 13 April 2025

Tribute to Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar on His Birth Anniversary

 

Tribute to Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar on His Birth Anniversary

Mumbai, April 12: On the occasion of the birth anniversary of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, the Directorate of Information and Public Relations will broadcast a documentary titled "Mahapurush Dr. Ambedkar" along with the film "Dr. Babasaheb Ambedkar: The Untold Truth" on April 14, 2025. This celebration will include a tribute to Dr. Ambedkar.

            This year marks the 134th birth anniversary of Dr. Babasaheb Ambedkar. As part of the celebrations, the Directorate will air the documentary "Mahapurush Dr. Ambedkar" at 11 AM and the film "Dr. Babasaheb Ambedkar: The Untold Truth" at 1 PM. Additionally, the film will be broadcast on Doordarshan's Sahyadri channel at 1:30 PM.

The documentary "Mahapurush Dr. Ambedkar" will be available on social media platforms such as X, Facebook, and YouTube, while "Dr. Babasaheb Ambedkar: The Untold Truth" will also be shared on X. Links to access these programs are provided below:

About the Documentary "Mahapurush Dr. Ambedkar"

The rare documentary "Mahapurush Dr. Ambedkar" includes dramatizations of significant events in Dr. Ambedkar's life and live footage. This 17-minute documentary was created in July 1968 by the Directorate of Information and Public Relations through Films Division. It features scenes of Dr. Ambedkar embracing Buddhism, his visit to Nepal, and close-up shots from his funeral procession at Dadar Chowpatty in Mumbai. The cinematography was done by Madhukar Khambekar, and the editing was by G.G. Patil. Directed by renowned actor and director Namdev Watkar under the Watkar Productions banner, the music was composed by Datta Dajekar. Veteran actor David Abraham narrated the documentary.

About the Film "Dr. Babasaheb Ambedkar: The Untold Truth"

The film "Dr. Babasaheb Ambedkar: The Untold Truth" is a joint production of the Ministry of Social Justice and Empowerment, Government of India, and the Directorate of Information and Public Relations, Government of Maharashtra.

As the first law minister of independent India and the architect of the Indian Constitution, Dr. Babasaheb Ambedkar's contributions in various fields are unparalleled. A man of immense intellect, Dr. Ambedkar dedicated his entire life to the welfare of society, focusing on the marginalized. He fought for education and social justice throughout his life, advocating the mantra "Educate, Organize, and Agitate." This film highlights the extraordinary achievements of Dr. Babasaheb Ambedkar.

The film is directed by Dr. Jabbar Patel, featuring actor Mammootty in the lead role of Dr. Ambedkar and Sonali Kulkarni as Ramabai Ambedkar. Other notable actors include Mohan Gokhale and Mrinal Kulkarni. The National Film Development Corporation (NFDC) assisted in production, while the screenplay was written by Sony Taraporewala, Arun Sadh, and Daya Pawar. Research for the film was conducted by Dr. Y.D. Phadke, and the advisory role was filled by Shyam Benegal. Costumes were designed by Bhanu Athaiya, music was composed by Amar Haldi, and photography direction was handled by Ashok Mehta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी टूर सर्कीटचे आयोजन

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

दि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी टूर सर्कीटचे आयोजन

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

महाराष्ट्रातील चैत्यभूमीदीक्षाभूमीमुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश

 

मुंबईदि.१२: राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधूनत्यांच्या महान कार्याचे आणि जीवनाचे महत्त्व समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुंबईनाशिक आणि नागपूर येथे दि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. टूर सर्कीट अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या स्थळांचा समावेश असूनया सहली नागरिक,पर्यटकांसाठी विनाशुल्क आयोजित करण्यात येत आहेत अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

            डॉ. बाबासाहेब आंबडेकर टूर सर्कीटमध्ये मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीराजगृहप्रिटींग प्रेसपरळ येथील बि.आय.टी चाळवडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयफोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे. तर नाशिकमधील येवले मुक्तीभूमीत्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा समावेश आहे. तर नागपूर येथील दिक्षाभूमीडॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयकामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार या स्थळांचा समावेश आहे. सदर टूर सर्कीटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आणि त्यांच्या सामाजिक समताशिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचे महत्त्व सर्व सामान्य नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे. सर्व नागरिक/ पर्यटकांना या सहलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पर्यटन संचालनालयाने आयोजित केलेले टूर सर्किट हे सामाजिक समता आणि ज्ञानप्रसाराचे प्रतीक आहे. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. या टूर सर्किटद्वारे त्यांच्या जीवनाशी  निगडीत स्थळांना भेट देऊन पर्यटकांना त्यांचा समृद्ध वारसा समजण्याची संधी मिळेल. महाराष्ट्रातील चैत्यभूमीदीक्षाभूमीमुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश या उपक्रमात आहेज्यामुळे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळेल. हा उपक्रम बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीच्या संदेशाला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा आहे. पर्यटन विभागाचा हा प्रयत्न स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देईल आणि बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवेल. या टूर सर्किटला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेलअसा विश्वास आहे. पर्यटन क्षेत्रातून सामाजिक जागरूकता वाढवण्याचा हा अनोखा प्रयत्न यशस्वी होईल.

 

उन्हाळ्यात घ्याव्या ची काळजी,pl share


 

साप्ताहिक चित्रलेखाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,

 साप्ताहिक चित्रलेखाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

चित्रलेखाचे सामाजिक आणि साहित्यिक योगदान महत्त्वपूर्ण

-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

वाचकांच्या हृदयावर राज्य करणारे चित्रलेखा मासिक

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि.12 : चित्रलेखाचे  सामाजिक आणि साहित्यिक योगदान महत्त्वपूर्ण आहे. चित्रलेखा हे केवळ एक साप्ताहिक नसूनसाहित्यसमाजजीवन आणि प्रश्नांचे आरसा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. तर वाचकांच्या  मनात चित्रलेखाने आपले स्थान निर्माण केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विलेपार्ले येथील मुकेश पटेल सभागृहात साप्ताहिक चित्रलेखाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयलराज्याचे कौशल्यरोजगार उद्योजकता व नाविन्यता विकास मंत्री मंगल प्रभात लोढामाहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारपणन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यासह चित्रलेखाचे अध्यक्ष मौलिक कोटकमेनन कोटकअभिषेककुमार चौहानअभिनेत्री सरिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

हरकिशन मेहतातारक मेहता यांच्यापासून ते मनन कोटकपर्यंतच्या परंपरेचा उल्लेख करतहे साप्ताहिक नफ्यापेक्षा मूल्याधारित हेतूनं चालवले जातेअसे स्पष्ट करुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणालेआरक्षण आंदोलननर्मदा प्रकल्प26/11 दहशतवादी हल्ला यांसारख्या संवेदनशील विषयांवर चित्रलेखाने निर्भीडपणे लेखन केले आहे. 'लिख दो मेरे रोम रोम में रामया विशेषांकाचा उल्लेख करत राम मंदिर विषयावरही साप्ताहिकाचे योगदान अधोरेखित केले. पद्मपुरस्कार विजेते लेखकसामाजिक मदतीसाठी उभे राहणे आणि साहित्यिक मूल्य जपणे - हाच चित्रलेखाचा खरा वारसा असल्याचे त्यांनी नमूद केले. शेवटी त्यांनी चित्रलेखाच्या कार्याची प्रशंसा करत यशस्वी 100 वर्षांचा टप्पा गाठण्याच्या शुभेच्छा दिल्या.

 

वाचकांच्या हृदयावर राज्य करणारे चित्रलेखा मासिक

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

साप्ताहिक चित्रलेखाने 75 वर्षे वाचकांच्या हृदयावर राज्य केले आहे. मराठीगुजराती वाचकांच्या  मनात चित्रलेखाने आपले स्थान निर्माण केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीकोरोना कालावधीनंतर आज मासिक चालवणे कठीण असतानाही चित्रलेखा हे मासिक वाचकांच्या प्रेमामुळेच सुरू आहे. चांगल्या साहित्याची गरज असलेल्या संवेदनशील समाजाला चित्रलेखाने योग्य दिशा दिली. चित्रलेखा मराठी प्रकाशन काही काळासाठी बंद झाले असले तरी किमान त्याचे इंटरनेट आवृत्ती पुन्हा सुरू करण्याचे आवाहनही त्यांनी कोटक कुटुंबीयांना केले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा उल्लेख करत चित्रलेखाने त्याचे मूळ रूप वाचकांपर्यंत पोहोचवले याचेही  कौतुक केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  75 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच चित्रलेखाच्या 75 वर्षाचा प्रवासाची शॉर्टफिल्म दाखवण्यात आली.

 .

थोरियम अणुभट्टी विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

 थोरियम अणुभट्टी विकासासाठी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

 

मुंबईदि. ११ : थोरियम अणुभट्टी विकासासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजेनकोरशियाची रोसातोम (ROSATOM) शासकीय कंपनी स्मॉल मॉड्युलर  रिॲक्टर विथ थोरियम फ्युएल यांच्यामध्ये सहकार्य पत्रावर स्वाक्षरी करण्यात आली.

महाराष्ट्रात थोरियम रिॲक्टरचे संयुक्त विकास करणे, अणुऊर्जा नियामक मंडळ (एईआरबीच्या सुरक्षा निकषांनुसार थोरियम रिॲक्टरचे व्यावसायिकीकरण करणे, मेक इन महाराष्ट्र उपक्रमांतर्गत थोरियम रिॲक्टरसाठी असेंब्ली लाईनची स्थापना करणे हा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा), स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर विथ थोरियम फ्युएलच्या संयुक्त विकासाला धोरणात्मक पाठबळ मिळणार आहे. भारत सरकार व अणुऊर्जा नियामक मंडळ (एईआरबीयांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे सर्व काम होणार आहे.

 

             या प्रकल्पासाठी परस्पर समन्वयातून व अभ्यासातून संयुक्त कार्यगट काम करणार आहे. या कामासाठी  सहकार्य पत्रावर स्वाक्षरी झालेल्या संस्थांचे प्रतिनिधीमहाजेनकोरोसातोम एनर्जी प्रोजेक्टमहाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्राआणि ग्लोबल टेक्नॉलॉजी अलायन्स या संस्थांच्या अधिकृत प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. या कराराची अंमलबजावणी करताना अणुऊर्जेचा वापर, विकास याबाबतीत सर्व कायदेशीर तरतुदी व भारत सरकारने ठरवलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन  करणे बंधनकारक आहे.

 

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ.श्रीकर परदेशी, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, प्रभारी अपर मुख्य सचिव ऊर्जा संजय खंदारेरशियाचे प्रतिनिधी मुंबईचे रशियन फेडरेशनचे महावाणिज्यदूत इव्हान वाय. फेटिसोव्ह, भारत व रोसातोमचे भारतातील प्रतिनिधी काउन्सेलर रशियन दूतावासचे युरी ए. लायसेन्कोसंचालकप्रकल्प विभाग (दक्षिण आणि दक्षिण-आशिया क्षेत्र) अलेक्झांद्रे वोल्गिन, आरईपीचे प्रकल्प व्यवस्थापक दिमित्री गुमेन्निकोव्हसंचालक(प्रकल्प) अभय हरणेमुख्य अभियंता अतुल सोनजेसह मुख्य कार्यकारी अधिकारीअमन मित्तलमित्राचे सहसचिव प्रमोद शिंदे, अणुऊर्जा विभागाचे सहसचिव नितीन जावळे, ग्लोबल टेक्नॉलॉजी अ‍ॅक्शनचे किशोर मुंदर्गी यावेळी उपस्थित होते.

*****

-ट्रान्सीट हा शहर वाहतुकीसाठी चांगला पर्याय

 ई-ट्रान्सीट हा शहर वाहतुकीसाठी चांगला पर्याय

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आर्थिक बाजू तपासून घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

 

मुंबईदि. ११ : शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई-ट्रान्सीट हा एक चांगला पर्याय असून यासाठी अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू तपासून याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

             पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर ई-ट्रान्सीट सुरू करण्याविषयी हेस-एजी (HESS-AG) कंपनीच्या प्रतिनिधींसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे गरजेचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीकंपनीने त्यांची उत्पादने भारतात तयार करावीत, जेणेकरुन उत्पादन खर्च कमी होऊन प्रकल्प खर्चातही बचत होईल. कमी किंमतीमध्ये एक चांगली शहर वाहतूक व्यवस्था कंपनीने उपलब्ध करून दिल्यास राज्यातील किमान १० शहरांसाठी असे प्रकल्प उभारता येतील. त्यासाठी कंपनीने त्यांच्या ई-ट्रान्सीट बसेसचे उत्पादन देशातच सुरू करावे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात हा प्रकल्प सुरू करण्याविषयी सविस्तर अहवाल सादर करावाअशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या .

             मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीसध्या वापरत असलेल्या ई-बसमेट्रो आणि ई-ट्रान्सीट यांच्या आर्थिक आणि इतर सर्व बाजू एकत्र विचारात घेऊन त्यानुसार प्रस्ताव तयार करावा. एक चांगला आणि व्यवहार्य प्रस्ताव कंपनीने द्यावा. मेट्रो सोबत आणखी एक पर्याय सध्या शहरांसाठी गरजेचा आहे. तो या ई-ट्रान्सीट सुविधेतून उपलब्ध होत असेल तर त्याचे स्वागतच आहे.

यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेप्रधान सचिव अश्विनी भिडेपिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांच्यासह हेस-एजी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेल्या मेट्रो, बस रॅपीड ट्रान्सीट (बीआरटी) यांना एकत्र करून एक हाय कपॅसिटी मास ट्रान्सीट रुट (एचसीएमटीआर) अशा वेगवान नागरी वाहतूक सुविधा उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्याअंतर्गत आज ई-ट्रान्सीट सुविधा या पर्यायावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

ऑरेंज गेट - मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाला गती द्यावी

 ऑरेंज गेट - मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाला गती द्यावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कालबद्ध नियोजन करावे

 

            मुंबईदि. ११ : मुंबईतील वाढत्या वाहतूक समस्यांवर ठोस उपाययोजना म्हणून पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्यक्रम देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान नागरी रस्ता बोगदा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि पूरक उपाययोजना करण्यात येत आहे. सध्या प्रारंभिक कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पास अधिक गती देण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावाअसेही त्यांनी यावेळी निर्देश दिले.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिकबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जीविशेष पोलीस आयुक्त देवेन भारतीअतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेपी. डीमेलो रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पूर्व मुक्तमार्ग व अटल सेतूसोबत अखंड जोडणी निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. सध्या प्रारंभिक कामे प्रगतीपथावर असून टनेल बोरिंग मशीनचे कार्यजमीन हस्तांतरण व पाइल फाउंडेशनची कामे वेगाने सुरू आहेत. वाहतूक विभागासोबत सातत्याने समन्वय ठेवून सुधारित तांत्रिक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एस. व्ही. पटेल रस्ता व मरीन ड्राइव्ह येथे आवश्यक त्या सुधारणा आणि विस्तारिकरणाची कामे नियोजनानुसार करण्यात यावीत.

              हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. याशिवाय प्रदूषणाच्या पातळीत घट होऊन वाहतूक व्यवस्थेला शिस्तबद्ध दिशा मिळेल. दक्षिण मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत नवा आयाम देणारा आणि आर्थिक तसेच भौगोलिक दृष्टीने शहराच्या विकासाला वेग देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.  हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होण्याबरोबर प्रवाशांच्या वेळ आणि खर्चात बचत होईल. हा प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण  करण्याचे नियोजन करावे असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Featured post

Lakshvedhi