Sunday, 13 April 2025

साप्ताहिक चित्रलेखाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,

 साप्ताहिक चित्रलेखाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

चित्रलेखाचे सामाजिक आणि साहित्यिक योगदान महत्त्वपूर्ण

-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

वाचकांच्या हृदयावर राज्य करणारे चित्रलेखा मासिक

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि.12 : चित्रलेखाचे  सामाजिक आणि साहित्यिक योगदान महत्त्वपूर्ण आहे. चित्रलेखा हे केवळ एक साप्ताहिक नसूनसाहित्यसमाजजीवन आणि प्रश्नांचे आरसा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. तर वाचकांच्या  मनात चित्रलेखाने आपले स्थान निर्माण केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विलेपार्ले येथील मुकेश पटेल सभागृहात साप्ताहिक चित्रलेखाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयलराज्याचे कौशल्यरोजगार उद्योजकता व नाविन्यता विकास मंत्री मंगल प्रभात लोढामाहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारपणन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यासह चित्रलेखाचे अध्यक्ष मौलिक कोटकमेनन कोटकअभिषेककुमार चौहानअभिनेत्री सरिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

हरकिशन मेहतातारक मेहता यांच्यापासून ते मनन कोटकपर्यंतच्या परंपरेचा उल्लेख करतहे साप्ताहिक नफ्यापेक्षा मूल्याधारित हेतूनं चालवले जातेअसे स्पष्ट करुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणालेआरक्षण आंदोलननर्मदा प्रकल्प26/11 दहशतवादी हल्ला यांसारख्या संवेदनशील विषयांवर चित्रलेखाने निर्भीडपणे लेखन केले आहे. 'लिख दो मेरे रोम रोम में रामया विशेषांकाचा उल्लेख करत राम मंदिर विषयावरही साप्ताहिकाचे योगदान अधोरेखित केले. पद्मपुरस्कार विजेते लेखकसामाजिक मदतीसाठी उभे राहणे आणि साहित्यिक मूल्य जपणे - हाच चित्रलेखाचा खरा वारसा असल्याचे त्यांनी नमूद केले. शेवटी त्यांनी चित्रलेखाच्या कार्याची प्रशंसा करत यशस्वी 100 वर्षांचा टप्पा गाठण्याच्या शुभेच्छा दिल्या.

 

वाचकांच्या हृदयावर राज्य करणारे चित्रलेखा मासिक

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

साप्ताहिक चित्रलेखाने 75 वर्षे वाचकांच्या हृदयावर राज्य केले आहे. मराठीगुजराती वाचकांच्या  मनात चित्रलेखाने आपले स्थान निर्माण केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीकोरोना कालावधीनंतर आज मासिक चालवणे कठीण असतानाही चित्रलेखा हे मासिक वाचकांच्या प्रेमामुळेच सुरू आहे. चांगल्या साहित्याची गरज असलेल्या संवेदनशील समाजाला चित्रलेखाने योग्य दिशा दिली. चित्रलेखा मराठी प्रकाशन काही काळासाठी बंद झाले असले तरी किमान त्याचे इंटरनेट आवृत्ती पुन्हा सुरू करण्याचे आवाहनही त्यांनी कोटक कुटुंबीयांना केले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा उल्लेख करत चित्रलेखाने त्याचे मूळ रूप वाचकांपर्यंत पोहोचवले याचेही  कौतुक केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  75 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच चित्रलेखाच्या 75 वर्षाचा प्रवासाची शॉर्टफिल्म दाखवण्यात आली.

 .

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi