Sunday, 6 April 2025

पुणे शहर में कौशल विकास केंद्र स्थापित किया जाएगा - मंत्री उदय सामंत

 पुणे शहर में कौशल विकास केंद्र स्थापित किया जाएगा - मंत्री उदय सामंत

मुंबई, 19 मार्च – पुणे शहर में शिक्षा के लिए बड़ी संख्या में विद्यार्थी आते हैंसाथ ही रोजगार की तलाश में भी कई युवा यहां आते हैं। पुणे में विद्यार्थियों और युवाओं के कौशल विकास को बढ़ावा देने के लिए कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) के तहत एक कौशल विकास केंद्र स्थापित किया जाएगाऐसी घोषणा मंत्री उदय सामंत ने आज विधानसभा में ध्यानाकर्षण सूचना के उत्तर में की।

सदस्य विजय शिवतारे ने पुणे महानगरपालिका (PMC) में नव शामिल गांवों की समस्याओं को लेकर ध्यानाकर्षण सूचना प्रस्तुत की। इस चर्चा में सदस्य भीमराव तापकीर भी शामिल हुए।

इस पर प्रतिक्रिया देते हुए मंत्री उदय सामंत ने कहा कि फुरसुंगी और उरुली देवाची गांवों को पुणे महानगरपालिका से अलग कर दिया गया है और इन्हें एक स्वतंत्र नगर परिषद के रूप में स्थापित किया गया है। जनसंख्या को ध्यान में रखते हुएकोंकण विभागीय आयुक्त की रिपोर्ट को स्वीकार कर इस नगर परिषद को ‘A’ श्रेणी का दर्जा दिया जाएगा। जब तक पुणे महानगरपालिका से सेवाओं का हस्तांतरण पूरा नहीं हो जातातब तक इन क्षेत्रों में आधारभूत सुविधाओं का विकास कार्य जारी रहेगा।

इसके अलावाउन्होंने यह भी आश्वासन दिया कि नवीन रूप से शामिल गांवों में संपत्ति कर दोगुना नहीं किया जाएगा। इन गांवों का संपत्ति कर पहले के ग्राम पंचायत कर की दोगुनी सीमा से अधिक नहीं होगाऔर जब तक इस कर की पुनः समीक्षा नहीं हो जातीइसकी वसूली स्थगित कर दी गई है।

मंत्री सामंत ने यह भी आश्वासन दिया कि फुरसुंगी कचरा डिपो के कारण नागरिकों को किसी भी प्रकार की असुविधा नहीं होगी। जांभुलवाड़ी तालाब से जल आपूर्ति योजनाओं के लिए एक विस्तृत परियोजना रिपोर्ट (DPR) तैयार की जाएगी और तालाब का भी सौंदर्यीकरण किया जाएगा।

इसके अलावापुणे महानगरपालिका में हाल ही में शामिल किए गए 32 गांवों की समस्याओं को हल करने के लिए जल्द ही एक बैठक आयोजित की जाएगी। मंत्री ने यह भी कहा कि फुरसुंगी और उरुली देवाची में नागरिकों की सुविधा के अनुसार जल आपूर्ति का समय निर्धारित किया जाएगा।

पुणे शहरात कौशल्य विकास केंद्र उभारणार

 पुणे शहरात कौशल्य विकास केंद्र उभारणार

- मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. १९ : पुणे शहरात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येत असतात. तसेच रोजगारासाठी येणाऱ्या तरुण - तरुणींची संख्याही मोठी आहे. पुणे शहरात विद्यार्थीतरुणांच्या कौशल्य विकासात वाढ करण्यासाठी सी.एस.आर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्स बिलीटी) अंतर्गत कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात केली.

 

 पुणे महापालिकेत समाविष्ट गावांतील समस्यांबाबत सदस्य विजय शिवतारे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. या लक्षेवधी सूचनेच्या चर्चेत सदस्य भीमराव तापकीर सहभागी झाले होते.

 

याबाबत उत्तरात मंत्री सामंत म्हणालेपुणे महापालिकेतील फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावे वगळून या दोन्ही गावांसाठी नगरपरिषद स्थापन करण्यात आली आहे. लोकसंख्येचा विचार करून ही नगरपरिषद अ वर्ग दर्जाची करण्याबाबत कोकण विभागीय आयुक्त यांचा अहवाल स्वीकारून दर्जा देण्यात येईल. या नगरपरिषदेला सेवांचे हस्तांतरण पुणे महापालिकेकडून होईपर्यंत पायाभूत सोयीसुविधांची कामे सुरू राहतील.

 

महापालिकेत नव्याने सहभागी गावांमध्ये मालमता कर दुपटीने वसूल न करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. या गावांचा मालमत्ता कर आधीच्या ग्रामपंचायत कराच्या दुपटीपेक्षा जास्त होणार नाहीअशा पद्धतीने पुनर्विलोकन करेपर्यंत हा कर वसूल करण्यास स्थगिती देण्यात आलेली आहे. फुरसुंगी कचरा डेपोमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाहीयाची काळजी घेण्यात येईल. जांभुळवाडी तलावातून पाणीपुरवठा योजनांबाबत विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करुन तलावाचे सुशोभीकरणही करण्यात येईल.  पुणे महानगरपालिकेतील नव्याने समाविष्ट ३२ गावांच्या समस्या निकाली काढण्याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल. फुरसुंगी व उरळी देवाची येथे नागरिकांच्या सोयीप्रमाणे पाणीपुरवठा वेळापत्रक बनविण्यात येईलअसेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.


अकोला शहरातील मलनि:स्सारण प्रकल्पामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार

 अकोला शहरातील मलनि:स्सारण प्रकल्पामुळे

बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार

- मंत्री उदय सामंत

 

मुंबई : अकोला शहरात केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानांतर्गत मलनिःसारण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. शहरात भुयारी मल वाहिन्या टाकण्याचे काम मंजुरी प्राप्त व स्थगित ९६ रस्त्यावर प्रथमतः सुरू करण्याचे नियोजन आहे. या मलनिःसारण कामामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतीलअसे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

 

अकोला शहरातील मलनिःसारण प्रकल्पाबाबत सदस्य साजिद पठाण यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य अर्जुन खोतकर यांनीही सहभाग घेतला.

 

याबाबत उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री सामंत म्हणालेमलनिःसारण कामामुळे बाधित होणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ८३ कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. रस्त्यांची कामे करण्याबाबत महानगरपालिकेला निर्देशही देण्यात येतील. या कामाबाबत निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेल्या कामांना निधी कमी पडू दिल्या जाणार नाही. शहरात मलनिःसारण कामाव्यतिरिक्त निधी मंजूर असलेल्या अन्य रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील.

 

जालना महानगरपालिका अमृत २.० योजनेत समावेश करण्याबाबत प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना सबंधित महापालिकेला देण्यात येतीलअसेही मंत्री सामंत यांनी सांगितले.


Saturday, 5 April 2025

स्वतंत्रता के दुरुपयोग का अधिकार किसी को नहीं अपमान करने वालों पर होगी कड़ी कार्रवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 स्वतंत्रता के दुरुपयोग का अधिकार किसी को नहीं

अपमान करने वालों पर होगी कड़ी कार्रवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, 24 : कॉमेडियन कुणाल कामरा ने राज्य के पूर्व मुख्यमंत्री और वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के खिलाफ निम्न स्तर की कॉमेडी करके उन्हें टारगेट करने की कोशिश की है। इस प्रकार किसी का अपमान करना गलत है। जिनके प्रति राज्य की जनता को सम्मान हैउनका अनादर करने का अधिकार किसी को नहीं है। हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे के विचारों का असली उत्तराधिकारी कौन हैयह महाराष्ट्र की जनता पहले ही तय कर चुकी है। स्वतंत्रता के दुरुपयोग का अधिकार किसी को नहीं है। अपमान करने वालों पर कड़ी कार्रवाई की जाएगीऐसा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विधानसभा में दिया।

मुख्यमंत्री ने कहा कि अभिव्यक्ति की स्वतंत्रता का सम्मान किया जाएगालेकिन इस स्वतंत्रता का दुरुपयोग या दूसरों की स्वतंत्रता का अतिक्रमण नहीं किया जा सकता। राजनीतिक व्यंग्य करेंहास्य प्रस्तुत करेंलेकिन यदि कोई सिर्फ प्रसिद्धि के लिए अपमान करता हैतो उस पर कड़ी कार्रवाई की जाएगी, ऐसा मुख्यमंत्री फडणवीस ने सदन में स्पष्ट किया।

0000

साकोली विधानसभा क्षेत्र में जलापूर्ति योजनाओं को शीघ्र पूरा करने के निर्देश

 साकोली विधानसभा क्षेत्र में जलापूर्ति योजनाओं को

शीघ्र पूरा करने के निर्देश

- मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई२४ मार्च : भंडारा जिले के साकोली विधानसभा क्षेत्र में ७५ से ९९ प्रतिशत प्रगति पर चल रही जलापूर्ति योजनाओं को शीघ्र पूर्ण कर कार्यान्वित किया जाए। साथ हीइन योजनाओं के पूर्ण न होने के लिए जिम्मेदार ठेकेदारों पर दंडात्मक कार्रवाई की जाएऐसे निर्देश जलापूर्ति एवं स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील ने दिए हैं।

मंत्रालय में आयोजित साकोली विधानसभा क्षेत्र की जलापूर्ति योजनाओं की समीक्षा बैठक में मंत्री पाटील ने यह निर्देश दिए। इस अवसर पर विधायक नाना पटोलेजलापूर्ति एवं स्वच्छता विभाग के प्रधान सचिव संजय खंदारेजल जीवन मिशन के निदेशक ई. रविंद्रनसहसचिव बी. जी. पवारमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण के मुख्य अभियंता सुभाष भुजबळभंडारा जिला परिषद के कार्यकारी अभियंता विजय देशमुख एवं संबंधित विभागों के अधिकारी उपस्थित थे।

मंत्री पाटील ने कहा कि भंडारा जिले में जल जीवन मिशन के तहत चल रही जलापूर्ति योजनाओं की वर्तमान स्थिति और प्रगति को देखते हुएइन योजनाओं को शीघ्र पूर्ण कर कार्यान्वित किया जाए। साथ हीजल जीवन मिशन के तहत जिला परिषद की योजनाओं की स्थितिस्वीकृत जलापूर्ति योजनाओं की स्थिति100 प्रतिशत घरेलू नल कनेक्शन की प्रगतिजिलेवार हर घर जल की वर्तमान स्थितिजल जीवन मिशन की संशोधित योजनाओं और व्यय की वर्तमान स्थिति की समीक्षा भी की गई।


साकोली मतदारसंघातील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करावी

 साकोली मतदारसंघातील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करावी

- मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबई दि: २४ भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघातील ७५ ते ९९ टके प्रगती पथावरील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करून कार्यान्वित कराव्या,तसेच या क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना  पूर्ण न होण्यास जबाबदार  असणाऱ्या  कंत्राटदारावर दंडात्मक करावी कारवाई करावीअसे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

साकोली विधानसभा मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक मंत्रालयात  आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार नाना पटोलेपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेजल जीवन मिशनचे संचालक ई.रवींद्रनसहसचिव बी जी पवारमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे मुख्य अभियंता सुभाष भुजबळभंडारा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता विजय देशमुख व संबंधित विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले कीभंडारा जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत चालू असणाऱ्या पाणीपुरवठा योजना सद्यस्थिती आणि प्रगती पथावरील योजनांची भौतिक प्रगती पाहता या योजना तातडीने पूर्ण करून कार्यान्वित करावी असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.तसेच जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेतील योजनांची स्थिती ,जिल्हा परिषदेच्या मंजूर पाणीपुरवठा योजनेची स्थितीशंभर टक्के कार्यवाहीत घरगुती नळ जोडणीजिल्हा निहाय हर घर जल सद्यस्थितीजलजीवन मिशन सुधारित योजनाखर्चाची सद्यस्थितीचा आढावा मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी घेतला.


स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही अपमानित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

 स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही

अपमानित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. २४ : कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल खालच्या दर्जाची कॉमेडी करून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. असे  अपमानित करणे चुकीचे आहे. ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेला आदर आहे. त्यांचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसदार कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. अपमानित करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईलअसे स्पष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

मुख्यमंत्री म्हणालेअभिव्यक्ती स्वतंत्रचा स्वीकार केला जाईल पण या स्वातंत्र्याचा स्वैराचार आणि  दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही. राजकीय कॉमेडी कराव्यंग करा पण प्रसिद्धीसाठी जर कोणी अपमानित करत असेल तर त्याच्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi