Saturday, 5 April 2025

अर्थसंकल्पात प्रकल्पांसाठी निधीची तरतूद :

 अर्थसंकल्पात प्रकल्पांसाठी निधीची तरतूद :

1. मेट्रो प्रकल्प  मार्ग 2 ब : डी. एन. नगर – मंडाळे-  रू.  2,155.80 कोटी

2. मेट्रो प्रकल्प मार्ग 4 : वडाळा - घाटकोपर - मुलुंड - ठाणे - कासारवडवली- रू. 3,247.51 कोटी

3. मेट्रो प्रकल्प मार्ग 5 : ठाणे - भिवंडी – कल्याण-रू. 1,579.99 कोटी

4. मेट्रो प्रकल्प मार्ग 6 : स्वामी समर्थ नगर कांजुरमार्ग-रू. 1,303.40 कोटी

5. मेट्रो प्रकल्पमार्ग 9 : दहिसर ते मिरा-भाईंदर व 7 अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराजआंतरराष्ट्रीय विमानतळ) - रू. 1,182.93 कोटी

6. मेट्रो प्रकल्प मार्ग 12 : कल्याण – तळोजा- रू. 1,500.00 कोटी

7. विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प राबविणे- रू. 521.47 कोटी

8. ठाणे ते बोरीवली (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) 4 पदरी भुयारी मार्ग- रू. 2,684.00 कोटी

9. मुंबई शहरातील ऑरेंज गेटपूर्व मुक्त मार्ग ते मरीन ड्राईव्ह येथून सागरी किनारा मागापर्यंत वाहतुकीच्या दळणवळणासाठी भुयारी मार्गाचे बांधकाम- रू. 1,813.40 कोटी

10. उत्तन ते विरार सागरी किनारा प्रकल्प-रू. 2,000.00 कोटी

11. प्रादेशिक स्तरावर जलस्त्रोताचा विकास करणे (सुर्या प्रकल्पकाळु प्रकल्पदेहरजी प्रकल्प)- रू. 1,645.00 कोटी

12. ठाणे घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन पर्यंताच्या भुयारी मार्ग बांधणे- रू.  1,200.00 कोटी

13. फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदर पर्यंत उन्नत मार्ग बांधणे- रू. 1,000.00  कोटी

14. के.एस.सी.नवनगर प्रकल्प (कर्णाळा-साई-चिरनेर-NTDA) - रू. 1,000.00 कोटी

मुंबई महानगराच्या कायापालटास गती येणार एमएमआरडीएचा 40 हजार 187 कोटींचा अर्थसंकल्प एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

 मुंबई महानगराच्या कायापालटास गती येणार

एमएमआरडीएचा 40 हजार 187 कोटींचा अर्थसंकल्प

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमएमआरडीएच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे मुंबईचे महत्व आणखी वाढणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई दि. 28 : येणाऱ्या काळात मुंबईचा कायापालट करणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे या महानगराचे महत्व आणखी वाढणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा 2025-26 साठीचा रू. 40,187.41 कोटींचा अर्थसंकल्प महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी एमएमआरडीए सभागृहातील बैठकीत सादर केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ताएमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री. मुखर्जी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

 मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना अधिकाधिक आणि जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा उभारण्यासाठी सदर अर्थसंकल्पात  रु. 35,151.14 कोटी म्हणजेच एकूण खर्चाच्या सुमारे 87 टक्के निधी पायाभूत प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ही तरतूद मेट्रो मार्गांचे विस्तारीकरणनवीन बोगदे मार्गसागरी मार्गजलस्रोत विकास आणि नागरी पायाभूत सुविधा यांसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये करण्यात आली आहे.

या अर्थसंकल्पीय अंदाजात 2025-26 साठी रू. 36,938.69 कोटी महसूल अपेक्षित आहे. 


खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली

 खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली

            मुंबईदि. २९ - पावसाळ्यानंतर रस्त्यांमध्ये खड्डे पडतात. असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्डयांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे. 

   सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचे संगणकीकारण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच खड्ड्यासाठी तक्रार प्रणाली विकसीत केली आहे. 

            नागरिक या प्रणालीच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. प्रथम PCRS अँप गुगल प्ले स्टोअरकेंद्र शासनाच्या m- Seva portal, किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे संकेतस्थळ  www.mahapwd.gov.in या संकेतस्थळावरून मोबाईलवर डाउनलोड करावे. नागरिकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTP चा वापर करावा आणि ॲप नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी रजिस्टर फीडबॅक येथे क्लिक करावे. मोबाईल स्क्रीनवर नकाशा दिसेल. त्यामध्ये आपले लोकेशन निश्चित करून खड्ड्यांचा फोटो अपलोड करण्यासाठी 'Take Pothol Photo' या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर खड्ड्यांचा फोटो घेऊन सदर तक्रारीबाबत अभिप्राय नोंदवावा आणि शेवटी तक्रार दाखल करावी. 

            या प्रणालीमध्ये तक्रारीची सद्यस्थिती दाखवण्याची व्यवस्था आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी तातडीने संबंधित शाखा अभियंता आणि उपअभियंता यांच्याकडे पाठवण्यात येतील. या माध्यमातून खड्डेमुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने सार्वजनिक बांधकाम विभागाने उचललेले महत्वाचे पाऊल आहे. 

00000

रेडीओ क्लब जेट्टीबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय

 रेडीओ क्लब जेट्टीबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेनच निर्णय

  -       विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर  

 

        मुंबईदि.२९: गेट वे ऑफ इंडिया जवळील समुद्रात रेडीओ क्लब येथे जेट्टीचे बांधकाम करण्यात येत आहे. या जेट्टीबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेनच पुढील निर्णय घेण्यात येईलअशा शब्दात विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी स्थानिक नागरिकांना आश्वस्त केले.

            जेट्टी निर्माणामुळे येणाऱ्या अडचणीशंका व होणारी गैरसोयसूचना आदींबाबत विधान भवनातील कॅबिनेट कक्षात स्थानिकांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांशी चर्चेदरम्यान अध्यक्ष ॲड. नार्वेकर बोलत होते. बैठकीस बंदरे मंत्री नितेश राणे, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपमुख्य अभियंता सुरेंद्र टोपलेरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीयेधीक्षक अभियंता सुधीर देवरेबंदरे विभागाचे उपसचिव हेमंत महाजन आदी उपस्थित होते.  

अध्यक्ष ॲड.नार्वेकर म्हणालेजेट्टीचे काम पुढील १० दिवस थांबविण्यात यावे. याबाबत स्थानिकांच्या आणखी एका बैठकीचे आयोजनही करण्यात येऊन यामधून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. जेट्टीसाठी पर्यायी जागेचा शोध घेन प्रकल्पाबाबत पडताळणी करावी. जेट्टीबाबत करण्यात आलेल्या विविध अभ्यासांचे अहवाल स्थानिक नागरिकांना देण्यात यावे. या अहवालांवरती त्यांच्या सूचना किंवा आक्षेप असल्यास त्याचीही पडताळणी करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

            चर्चेवेळी मंत्री नितेश राणे म्हणालेया प्रकल्पामुळे मुंबईहून अलिबागमांडवाजेएनपीटी व एलिफंटा येथे जाण्यासाठी जलवाहतुकीची मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. गेटवे येथील अस्तित्वातील जेट्टीवरील सुविधांवर मर्यादा येत असल्यामुळे प्रवाशांसाठी  अडचणी निर्माण होतात. या प्रस्तावित जेट्टीमुळे गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

एवढा मोठा प्रकल्प होत असल्यास स्थानिकांच्या प्रतिक्रिया येणे स्वाभाविक असते. शासन जेट्टीचा प्रकल्प हा स्थानिकांवर लादणार नाही. प्रकल्पामुळे स्थानिकांची गैरसोय होत असल्यास किंवा मुंबईच्या हेरीटेजला धक्का बसेलअसे कुठलेही कार्य शासन करणार नाही. या जेट्टीबाबत सकारात्मक तोडगा काढला जाईल. मच्छीमारांच्या समस्यांचाही शासन गांभीर्याने विचार करेल. या प्रकल्पाबाबत करण्यात आलेले विविध अभ्यास अहवाल स्थानिकांना त्यांच्या परीक्षणासाठी देण्यात येतील.  जबरदस्तीने हा प्रकल्प पुढे रेटला जाणार नाही, याबाबत मंत्री श्री.राणे यांनी स्थानिकांना आश्वासित केले.

याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी वाहतूकगर्दीचे व्यवस्थापनयेणाऱ्या अडचणी याबाबत, मच्छीमार बांधवांनी मासेमारीबाबत  आपले विचार मांडले.

 

00000000000

तुळजापूर हेरिटेज टूर

 तुळजापूर हेरिटेज टूर

            आराखड्यात तुळजापूर हेरिटेज टूर विकसित करण्याचे प्रस्तावित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यामध्ये अष्टतीर्थ भेट व दर्शन, मुख्य मंदिर भेट व दर्शनरामदरा तलावाच्या डोंगरावर श्री तुळजाभवानी देवी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद रूपात भवानी तलवार देतानाचे 108 फूट उंचीचे भव्य शिल्प व शिव उद्यान, उद्यानात लाइट अँड साऊंड शो,रामदरा तलावात बोटिंगची सुविधा आदी बाबींचा समावेश आहे.

 

            मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या अपेक्षेनुसार आराखड्यातील कामे दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगतांना त्यांनी मुख्यमंत्री यांचे आभारही मानले.

****

येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट; आराखड्यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी

 येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट;

आराखड्यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

 

            धाराशिव,दि.29 मार्च (जिमाका) : तुळजापूर विकास आराखड्याला शासनाने तत्वत: मान्यता दिली असून यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी वितरीत करण्यात येईलअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आराखड्यातील कामांमुळे येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट झालेला दिसेलअसेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मुख्यमंत्र्यांसमोर तुळजापूर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मित्राचे उपाध्यक्ष तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटीलआमदार अभिमन्यू पवारमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशीविभागीय आयुक्त दिलीप गावडेछत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रजिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारीमंदिर संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

            सादरीकरणादरम्यान जिल्हाधिकारी श्री. पूजार यांनी विकास आराखडा राबवताना एकूण 73 एकर भूसंपादनाची गरज असल्याचे तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या बैठकीत तुळजापूर विकास आराखड्यासाठी 1866 कोटी रूपयांचा आराखडा मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी भूसंपादनाच्या कामाला वेग द्यावा अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली. यामुळे आराखड्यातील कामांनाही गती मिळणार असल्याचे ते म्हणाले.

आराखड्यातील महत्त्वाच्या बाबी

            तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग घेत शाश्वत विकास करण्यासाठी तुळजापूर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भाविकांचा त्रास कमी करून त्यांना श्री तुळजाभवानी देवीचे सुलभ व जलद दर्शन मिळावेसध्याच्या पायाभूत सुविधांचा दर्जात्मक विकास करून नवीन पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करण्याचे काम या आराखड्याच्या अंमलबजावणीतून होणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.

 

            मंदिराचा इतिहास, संस्कृती, वारसा आणि आध्यात्मिक मांगल्याची जपणूक यात होणार आहे.गर्दीचे नियोजन करताना स्मार्ट क्यू सिस्टीमऑनलाईन दर्शन व्यवस्थाभाविकांच्या संख्येचे नियमन, रस्त्यांचे रुंदीकरण, वैकल्पिक मार्ग तयार करणे, नवीन पार्किंग व्यवस्था, वाहन पार्किंगपासून मंदिरापर्यंतची वाहतूक सेवा, शौचालयांची संख्या वाढवणेकचरा वर्गीकरण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य सुविधांचा विस्तार, विश्रांती स्थळे, भाविक सुविधा केंद्राची उभारणी, वॉटर कुलर व आरामदायक शौचालयाची सुविधा, सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी डिजिटल पद्धती (ॲप) चा वापर अशा काही सुधारणा या आराखड्यात समाविष्ट आहेत.मंदिर परिसरात मंदिर परिसीमा वाढवणे,मंदिर शिखर संवर्धन, कुंड, तीर्थ सुधारणा व संवर्धनइतर मंदिर संवर्धन,विद्युतीकरणपावसाच्या पाण्याचे व्यवस्थापनसुरक्षा व टेहळणी व्यवस्थावातानुकूलन यंत्रणा इत्यादीचा समावेश आराखड्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री यांना दिली.

वढू व तुळापूर बलीदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल

 वढू व तुळापूर बलीदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल

                                                                   - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वढू येथे संभाजी महाराजांच्या समाधीचे पूजन

 

पुणेदि. 29 : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. पुढील अनेक पिढ्यांना स्फूर्ती आणि ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या वढू येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलीदान स्थळाला पर्यटन क्षेत्र नव्हे तर तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईलअशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

            स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या 336 व्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रुक येथे समाधीस्थळी आयोजित संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटकेमाजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलमहंत रामगिरी महाराज तसेच वढू ग्रामपंचातीचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेमहाराष्ट्र ही साधू-संतांचीवीरांची भूमी आहे. छत्रपती संभाजी महाराज हे देवदेश आणि धर्मासाठी लढणारे राजे होते. त्यांच्या स्मृती स्थळाच्या विकासासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विकास कामे करताना पावित्र्य कमी होणार नाहीयाची काळजी घ्यावी. दोन्ही स्थळांचा राज्याच्या लौकिकाला साजेसा  विकास करण्यात येईल. या कामाला गती देऊन दर्जेदार कामे करावी, अशा सूचना देत वढू व तुळापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीही श्री. शिंदे यांनी दिली.

ते म्हणाले, छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शावर चालणारे हे सरकार असून जनकल्याणाचा संकल्प शासनाने केला आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात अनेक विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. तीर्थक्षेत्रगडकोट किल्ले यांच्या विकासाला प्राधान्य दिले. गडकोट किल्ले हे आपले धरोहर आहेत. गडकोट किल्ल्यांवरील अतिक्रमण प्राधान्याने काढण्यात येईल. गड-किल्ल्यांचे पावित्र्य जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मुंबईतील सागरी मार्गाला धर्मरक्षक संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे, ही अभिमानाची बाब आहे.

वढू गाव हे महाराष्ट्राचे उर्जास्थान आहे. वढू हे स्वराज्य तीर्थ असून या स्वराज्य तीर्थाकडून मिळणारी शक्ती एकवटून महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन जायचे आहेअसे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. गोशाळेला अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आवश्यकता असल्यास गोहत्या रोखण्यासाठी आणखी कडक कायदा करण्यात येईल. गोरक्षकांचे काम करणाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. ग्रामस्थांच्या मागणीनुसार दरवर्षी आजच्या बलिदान दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी महंत रामगिरी महाराज व आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी आपले विचार मांडले. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते महंत  रामगिरी महाराज यांना धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात धर्म रक्षणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना शंभूसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            प्रारंभी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते समाधीचे पूजन करण्यात आले. तसेच शासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेआमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला ग्रामस्थ तसेच शंभुप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Featured post

Lakshvedhi