Monday, 31 March 2025

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आली ' आनंदाची ' बस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्यमुख

 गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आली आनंदाची बस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न

अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

 

मुंबई राज्याचा शेवटचा जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्हा हा अविकसितअतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याची ही ओळख पुसण्यासाठी जोमाने विकास कामे सुरू केली आहेत. येथील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणून विकासाची फळे चाखण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने विकास कामे करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नाने धानोरा तालुक्यातील मुरूमगावपेंढरी आणि रांगी गावासाठी गावकऱ्यांच्या मागणीनुसार राज्य परिवहन महामंडळाने बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. या बस फेऱ्यांमुळे संबंधित गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून ही बस त्यांच्यासाठी निश्चितच आनंदाची बस ठरली आहे.

या गावातील नागरिकांनी रुग्णविद्यार्थी आणि आदिवासी नागरिकांच्या सोयीसाठी बस सुरू करण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची संवेदनशील व्यक्तिमत्व असलेल्या तत्कालीन उपमुख्यमंत्री यांनी तातडीने दखल घेत राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागीय नियंत्रक यांना बस सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार धानोरा तालुक्यातील मौजा मुरूमगावपेंढरी व रांगी गावात तसेच या गावाच्या मार्गावर बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. बस फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत.

            राज्य परिवहन गडचिरोली विभागातील धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे ०३ नियतांमार्फत १० फे-यापेंढरीकरीता ०३ नियतांमार्फत ०८ फे-या व रांगीकरीता ०२ नियतांमार्फत ०६ फे-या सुरू आहेत. मुरूमगाव येथुन दैनंदिन २८५पेंढरी येथुन दैनंदिन ३३५ व रांगी येथून दैनंदिन २४२ प्रवासी प्रवास करतात. बस फेऱ्या सुरू झाल्यामुळे संपूर्ण आदिवासी असलेल्या या गावातील आदिवासी बांधवांची मोठी सोय झाली आहे. त्यांना तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयीन कामासाठीदवाखान्यासाठी जाणे सोयीचे झाले आहे. ही गावे गडचिरोली सारख्या शेवटच्या जिल्ह्यातील शेवटच्या टोकाची गावे आहे. या गावातून ९ किलोमीटर अंतरावर छत्तीसगड राज्य आहे. अशा अतिदुर्गम भागातील गावकऱ्यांची सोय या बस फेऱ्यांमुळे झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवून मोठ्या प्रमाणावर उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मागील काही दिवसात अती दुर्गम भागात मुख्यमंत्री यांनी स्वतः बसमध्ये प्रवास करून गडचिरोली आता नक्षलग्रस्त नाहीतर विकासाच्या मार्गावर गतीने धावणार असल्याचे दाखवून दिले आहे.

 

Sunday, 30 March 2025

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी मागील वर्षाच्या तुलनेत ३० टक्के अधिक नोंदणी

 गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी

मागील वर्षाच्या तुलनेत ३० टक्के अधिक नोंदणी

 

मुंबई, दि. ३१ : राज्यामध्ये दुचाकी चार चाकी व अन्य वाहनांच्या नवीन खरेदीची नोंदणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील सात दिवसात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. नवीन वाहन खरेदीची नोंदणी २०२४ च्या तुलनेत यावर्षी तब्बल ३० टक्के जास्त वाहनांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

 

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक नागरिक नवीन वाहनांची खरेदी करीत असतात या वाहनांची नोंदणी संबंधित प्रादेशिक परिवहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत करण्यात येते. नागरिकांमध्ये वाहन खरेदीचा उत्साह दिसून येत असल्यामुळे यावर्षी वाहन नोंदणी मध्ये ३० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तब्बल २० हजार ०५७ वाहने मागील वर्षाच्या तुलनेत अधिक खरेदी करण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

 

चार चाकी कार प्रकारात २०२५ मध्ये २२ हजार ०८१ वाहनांची नोंदणी करण्यात आली असून ही मागील वर्षीच्या तुलनेत ४ हजार ९४२ ने जास्त आहे. याची टक्केवारी २८.८४ टक्के आहे. तसेच मोटरसायकल, स्कूटर या दुचाकी वाहन प्रकारात २०२५ मध्ये ५१ हजार ७५६ नवीन वाहनांची खरेदी नागरिकांकडून करण्यात आली आहे. मागील वर्षी हीच खरेदी ४० हजार ६७५ एवढी होती. यामध्येही ११ हजार ०८१ ने वाढ नोंदविण्यात आली असून २७.१४ टक्के अधिकची नोंदणी झाल्याचे निदर्शनास येत आहे.

 

राज्यात सर्वात जास्त पहिल्या पाच परिवहन कार्यालय अंतर्गत वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे परिवहन कार्यालय अंतर्गत ११ हजार ५६, पिंपरी चिंचवड परिवहन कार्यालय अंतर्गत ६ हजार ६४८, नाशिक अंतर्गत ३ हजार ६२६, मुंबई (मध्य) परिवहन कार्यालय अंतर्गत ३ हजार १५४ आणि ठाणे परिवहन कार्यालय अंतर्गत ३ हजार १०७ वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे, असे परिवहन विभागाकडून कळविण्यात आले

प्रधानमंत्री यांच्या हस्ते सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्टे रेंज व रनवेचे उद्घाटन

 प्रधानमंत्री यांच्या हस्ते सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्टे रेंज व रनवेचे उद्घाटन


 


नागपूर, दि. 30 : नागपूर – अमरावती रोडवरील बाजारगाव स्थित सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्ट रेंज आणि रनवे सुविधेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलर कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, कंपनीचे व्यवस्थापकीस संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष नुवाल, सोलर डिफेंस ॲन्ड एरोस्पेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक वासुदेव आर्या उपस्थित होते.


 


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोटेरिंग म्युनिशन टेस्ट सुविधेचे तसेच भारतातील पहिली अनमॅन एरियल सिस्टीम (युएसए), 1.27 कि.मी. चे रनवे, हँगर्स आणि रिपेअर लेनचे रिमोटद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सोलर ग्रुपद्वारा निर्मित अत्याधुनिक सुरक्षा यंत्राचे अवलोकन केले. कार्यक्रमाला कंपनीचे उपमहाव्यवस्थापक श्याम मुंदडा व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


0000

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन

 नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी

जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन

-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हा सहकारी बँकेला आता शक्तीशाली जोड

-  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 

नागपूर,दि. 30 : ज्या जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकांचे जाळे सक्षमपणे कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी अधिक सुखी असल्याचे आपण पाहतो. याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये शेतीपुरक उद्योगाने चांगला आकार घेतल्याचे आपल्या निर्दशनास येते.  या दृष्टीने विचार करुन नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या संस्थापक प्रशासकत्वाची जबाबदारी आजपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे सुपूर्द केल्याने शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग अधिक व्यापक होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संस्थापक प्रशासक नियुक्ती सोहळ्यात ते बोलत होते. गुढीपाडव्याचे औचित्य साधून नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित या विशेष समारंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरीमहसूल मंत्री तथा पालकमंत्री चंदशेखर बावनकुळेसहकार राज्यमंत्री पंकज भोयरवित्त व नियोजनकृषी व मदत पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जैस्वालआमदार आशिष देशमुखआमदार चरणसिंग ठाकूरसहकार आयुक्त दिपक तावरेप्रशासक विद्याधर अनास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार आशिष देखमुख यांनी प्रशासक पदाबाबत केलेल्या विनंतीचा विचार करुन आपण हा पहिला प्रयोग करत आहोत. सहकार आयुक्तालयाने यात यथायोग्य भूमिका निभावून येत्या दीड वर्षात नागपुरची जिल्हा सहकारी बँक आर्थिक फायद्यात येईल याची खात्री असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री यांनी गुढीपाडव्याच्या औचित्याने नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेली ही अपूर्व भेट आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या रुपाने नागपूर जिल्हा सहकारी बँकेला आता एक शक्तीशाली जोड मिळाली आहे. येत्या दोन वर्षात ही बँक फायद्यात येण्यासह जिल्ह्यात सहकाराचे जाळे अधिक भक्कम होईलअसे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आमदार आशिष देशमुख यांनी जिल्हा सहकारी बँकेत सर्वांनी मुदत ठेवी दाखल करुन आकर्षक योजनांचा लाभ घ्यावाअसे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केले. शिखर बँकाजिल्हा बँका व विविध कार्यकारी संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. यावर्षी राज्य बँकेने 52 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा पार केला असून 650 कोटींपेक्षा अधिक नफा बँकेने प्राप्त केल्याचे अनास्कर यांनी 

नादुरुस्त रोहित्र ४८ तासात बसवण्याची व्यवस्था

 नादुरुस्त रोहित्र ४८ तासात बसवण्याची व्यवस्था

- ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबईदि. २६ : नादुरुस्त रोहित बसविण्यासाठी ३० ते ४० दिवसांचा कालावधी लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र नादुरुस्त रोहित्र ४८ तासात बसविण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत नियम २९३ अन्वये ठरावाला उत्तर देताना सांगितले.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्याराज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून राज्यात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जेचा उपयोग करण्यात येत आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून १० टक्के अनुदानावर कृषी पंप देण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या कुसुम आणि राज्याच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून २०१५ ते २०२३ पर्यंत १ लाख ८९ हजार ८२० सौर कृषी पंप लावण्यात आले आहे.

  राज्यात मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या लाभासाठी १२ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज  केले करण्यात आले आहे. आतापर्यंत सौर कृषी पंप योजनेतून ४ लाख ६९ हजार ४४२ कृषी पंप लावण्यात आले आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून ४५ लाख कृषी पंपधारक शेतकऱ्यांचे वीज देयक झिरो करण्यात येत आहे. राज्यातील वीज दर कमी करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगात वीज दर याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यात पुढील एक वर्षात १० हजार मेगावॉट सौर विजेचे उत्पादन करण्यात येणार आहे. या सर्व प्रयत्नामुळे पहिल्यांदा औद्योगिक विजेचे दर कमी होणार आहेअसेही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

तुमच्या वृत्तांकनातून होऊ देत वेव्हज अर्थात आशयघन लहरींची निर्मिती ! जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) 2025 साठी माध्यम प्रतिनिधींची नोंदणी सुरू

 तुमच्या वृत्तांकनातून होऊ देत वेव्हज अर्थात आशयघन लहरींची निर्मिती !

जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) 2025 साठी

माध्यम प्रतिनिधींची नोंदणी सुरू

मुंबईत 1 ते 4 मे 2025 या कालावधीत होणाऱ्या

वेव्हज पदार्पण शिखर परिषदेत मनोरंजन क्षेत्रातील भविष्याचा अनुभुती घ्या!

 

मुंबई26 मार्च 2025 : मुंबईत 1 ते 4 मे 2025 दरम्यान होणारी पहिली वाहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) ही जागतिक माध्यमे आणि मनोरंजन (एम आणि ई) उद्योगात लाटा निर्माण करण्यासाठी सज्ज आहे. परिषदेच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात असताना आता परिषदेच्या वृत्तांकनासाठी येवू इच्छिणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या नोंदणीला 25 मार्च 2025 पासून प्रारंभ झाला आहे. या नोंदणीच्या माध्यमातून  कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारछायाचित्रकारआशय निर्माते आणि माध्यम विश्वातील तज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. नोंदणी करा  आणि प्रतिभेचा उत्तुंग अविष्कार दर्शवणारे वृत्तांकन करून जगातील आशयनिर्मात्यांना जोडण्यासाठी  आणि भारतातील माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्राला अधिक समृद्ध करण्यासाठी सज्ज  व्हा.  तुमचे वार्तांकन खरोखर वेव्हज अर्थात माहितीविषयक तरंग निर्मिती करेल.

जर तुम्हाला पत्रकारितामाध्यम उद्योग  किंवा  आशय कथनाची  आवड असेलतुम्ही  पत्रकार असाल कॅमेरापर्सनआशय निर्माते  किंवा समाज माध्यमातील व्यावसायिक असाल,  तर तुम्ही वेव्हज  2025 चुकवू शकत नाही! येथे होणाऱ्या चर्चासत्रात सहभागी व्हाउद्योगधुरीणांकडून शिका     आणि उदयोन्मुख क्रिएटर्सना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सहाय्य करा. वेव्हज शिखर परिषद 2025 हे  तुमच्यासाठी उद्योगांची अंतर्दृष्टी प्रदान करणारेजागतिक नेटवर्किंग तसेच  माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील अभूतपूर्व नाविन्यपूर्ण कल्पनांचा वेध घेण्यासाठी एक खुले प्रवेशद्वार ठरेल.

माध्यम प्रतिनिधींची नोंदणी प्रक्रिया

वेव्हज माध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करण्यासाठीअर्जदारांनी हे करणे आवश्यक आहे:

✅ 1 जानेवारी 2025 पर्यंत 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असावे.

✅ मान्यताप्राप्त प्रसार माध्यमांवर  वार्ताहरछायाचित्रकारकॅमेरा पर्सन किंवा डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून काम केलेले असावे.

✅ वरील निकष पूर्ण करणारे फ्रीलांस पत्रकार देखील पात्र आहेत.

✅ ऑनलाइन नोंदणी करा: https://app.wavesindia.org/register/media

✅ नोंदणी कधी सुरु होणार : 26 मार्च 2025

✅ नोंदणी अंतिम तारीख: 10 एप्रिल 2025 रोजी रात्री 11:59 (IST)

✅ माध्यम प्रतिनिधी पास संकलन: मान्यता मिळालेल्या माध्यम प्रतिनिधींना माध्यम प्रतिनिधी पास संकलन करण्यासंदर्भातील तपशीलांची माहिती योग्य वेळी दिली जाईल.

✅ माध्यम प्रतिनिधी नोंदणी धोरणाविषयीच्या माहितीसाठी येथे पहा.

✅ परिशिष्ट ब नुसार माध्यम प्रतिनिधी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी येथे शोधा.

✅ काही प्रश्न किंवा शंका असल्यास ‘WAVES Media Accreditation Query’. या शीर्षकासह pibwaves.media[at]gmail[dot]com वर ईमेलद्वारा संपर्क करा.

नोंदणी प्रक्रियेच्या वेळी सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड केले आहेत याची कृपया खात्री करून घ्या. सर्व अर्जांची पडताळणी केल्यानंतर मीडिया अ‍ॅक्रिडिटेशनची मंजुरी ईमेलद्वारे कळवली जाईल.  फक्त पीआयबी-मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधीचमाध्यम प्रतिनिधी  पाससाठी पात्र असतील. याविषयीची मान्यतामाध्यम संस्थेचा आवाकापुनरावृत्तीमनोरंजन क्षेत्राला दिलेले प्राधान्य आणि वेव्हज च्या अपेक्षित वृत्तांकनावर आधारित असेल.

 

 

मंत्रालय में ‘डिजीप्रवेश’ ऑनलाइन ऐप द्वारा एंट्री मिलेगी,वरिष्ठ नागरिकों और दिव्यांग व्यक्तियों के लिए विशेष

 मंत्रालय में डिजीप्रवेश’ ऑनलाइन ऐप द्वारा एंट्री मिलेगी

मुंबई27 मार्च: मंत्रालय सुरक्षा परियोजना के तहत पहले चरण में चेहरे की पहचान (फेस रिकॉग्निशन) आधारित प्रवेश प्रणाली लागू की गई थी। अब दूसरे चरण में 'विजिटर मैनेजमेंट सिस्टम' (VMS) विकसित किया गया है। मंत्रालय में अधिकारियोंकर्मचारियों और आगंतुकों को प्रवेश के लिए डिजीप्रवेश’ ऑनलाइन ऐप आधारित प्रणाली का उपयोग करना अनिवार्य होगा।

आगंतुकों को केवल मंजूर किए गए समय और निर्धारित मंजिल (फ्लोर) पर ही प्रवेश मिलेगा। अनधिकृत मंजिलों पर प्रवेश करने पर कार्रवाई की जाएगी। आगंतुकों को अपने काम के बाद निर्धारित समय के भीतर मंत्रालय से बाहर निकलना अनिवार्य होगा।

वरिष्ठ नागरिकों और दिव्यांग व्यक्तियों के लिए विशेष सुविधा

वरिष्ठ नागरिकों और दिव्यांग व्यक्तियों को मंत्रालय में प्रवेश के दौरान कठिनाइयों का सामना न करना पड़ेइसके लिए उन्हें दोपहर 12 बजे प्रवेश दिया जाएगा। दोपहर 12 बजे के बाद उनके लिए अलग कतार (लाइन) की व्यवस्था की जाएगी। इसके लिए उन्हें वैध प्रमाण पत्र साथ रखना आवश्यक होगा।

सामान्य आगंतुकों के लिए प्रवेश प्रक्रिया

सभी सामान्य आगंतुकों को दोपहर 2 बजे के बाद ही प्रवेश दिया जाएगा। इसके लिए डिजीप्रवेश ऐप का उपयोग करके प्रवेश पास प्राप्त करना आवश्यक होगा। प्रवेश के लिए आगंतुकों को आधार कार्डड्राइविंग लाइसेंसपैन कार्ड या अन्य सरकार द्वारा मान्य पहचान पत्र प्रस्तुत करना होगा।

जो लोग स्मार्टफोन का उपयोग नहीं कर सकते या अनपढ़ हैंउनके लिए गार्डन गेट पर एक सहायता केंद्र और ऑनलाइन पंजीकरण काउंटर उपलब्ध रहेगाजहां वे अपनी एंट्री रजिस्टर करवा सकते हैं।

डिजीप्रवेश ऐप के माध्यम से प्रवेश प्रक्रिया

डिजीप्रवेश ऐप को Google Play Store (Android) या Apple Store (iOS) से मुफ्त डाउनलोड करें।

ऐप इंस्टॉल करने के बादपहली बार केवल एक बार पंजीकरण करना होगा।

आधार कार्ड आधारित चेहरे की पहचान प्रणाली (फेस रिकॉग्निशन) के माध्यम से पंजीकरण पूरा होगा।

पंजीकरण पूरा होने के बादजिस विभाग में कार्य हैउसके लिए स्लॉट बुक करें।

पंजीकरण के बाद QR कोड मिलेगाजिसे मंत्रालय के प्रवेश काउंटर पर स्कैन करना होगा।

इसके बाद RFID कार्ड जारी किया जाएगाजो प्रवेश के लिए आवश्यक होगा।

सुरक्षा जांच के बाद ही मंत्रालय में प्रवेश दिया जाएगा।

मंत्रालय से बाहर निकलते समय RFID कार्ड सुरक्षा कर्मियों को लौटाना अनिवार्य होगा।

यह पूरी प्रक्रिया तीन मिनट से भी कम समय में पूरी हो जाएगी और लंबी कतार में खड़े हुए बिना प्रवेश प्राप्त किया जा सकेगा।

0000

Featured post

Lakshvedhi