Sunday, 30 March 2025

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दीक्षाभूमीला भेट

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दीक्षाभूमीला भेट

 

नागपूरदि. 30:   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाला  अभिवादन केलेतथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून बुद्धवंदना घेतली.

 

दीक्षाभुमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत केलेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीस्मारक समितीचे सचिव राजेंद्र गवई उपस्थित होते.

 

विकसितसर्वसमावेशक भारत घडवणे हीच

बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली

अभिप्राय नोंदवहीत डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपूर स्थित दीक्षाभूमीला भेट देण्याचे सौभाग्य लाभल्याने  मी भारावून गेलो आहेया पवित्र स्थळाच्या वातावरणात बाबासाहेबांच्या सामाजिक समतासमानता आणि न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव येतोदीक्षाभूमी आपल्याला वंचित आणि गरजूंसाठी समान हक्क आणि न्यायाच्या व्यवस्थेसह पुढे जाण्याची ऊर्जा प्रदान करतेमला पूर्ण विश्वास आहे की या अमृत काळात आपण डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणी आणि मूल्यांचा मार्ग अनुसरून देशाला प्रगतीच्या नव शिखरावर नेऊएक विकसित आणि सर्वसमावेशक भारत घडवणे हीच बाबासाहेबांना आपली खरी श्रद्धांजली ठरेल’, असा संदेश यावेळी प्रधानमंत्री श्रीमोदी यांनी यावेळी नोंदविला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्मृती मंदिराला भेट स्मृती मंदिर राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देणारे

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्मृती मंदिराला भेट

 

स्मृती मंदिर राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देणारे


-         प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

  

नागपूरदि. 30:  स्मृती मंदिर भारतीय संस्कृतीराष्ट्रवाद आणि संघटनशक्ती या मूल्यांना समर्पित आहेते आपल्याला सतत राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्याची प्रेरणा देतेअसा संदेश  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूररेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसराला भेट देऊन आद्य सरसंघचालक पूकेशव बळीराम हेडगेवार यांचे समाधी स्थळतसेच द्वितीय सरसंघचालक पूमाधव सदाशिव गोळवलकर यांच्या यज्ञवेदीस्वरूप स्मृतिचिन्हाचे दर्शन घेतलेया दोन महापुरूषांची स्मृती जागविणारे हे स्थळ देशसेवेला समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जा केंद्र आहे असाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.

 

   यावेळी प्रधानमंत्री यांनी महर्षी व्यास सभागृहदत्तोपंत ठेंगडी सभागृह व परिसराची पाहणी केलीतसेच उपस्थितांशी संवाद साधलामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीसरसंघचालक मोहन भागवतमाजी सरकार्यवाह भय्याजी जोशी उपस्थित होते.

0000

 


राज्यातील महामार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह

 राज्यातील महामार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह

- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई दि. २९ :- चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गावर प्रत्येक २५ किलो मीटर अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. या स्वच्छतागृहांचे देखभाल व व्यवस्थापन स्थानिक महिला बचतगटामार्फत करण्यात येईल. याशिवाय महामार्गावर बचतगटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

 

महिला धोरणात महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देताना राज्यातील महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुरावस्था दूर करण्याबाबतही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यातील राज्य महामार्गराष्ट्रीय महामार्गसमृद्धी महामार्गासह द्रुतगती महामार्गांवर प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. महिला व बाल विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून हा प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती मंत्री तटकरे यांनी दिली.

 

 स्वच्छतागृहांचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असूनजन सुविधा केंद्राचे व्यवस्थापन माविम स्थापित बचत गटांमार्फत करण्यात येणार आहे.


लघु उद्योगामुळे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत

 लघु उद्योगामुळे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत

देशात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महिलांनी छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरू करून आर्थिक सक्षम होण्याचा निर्धार. यामुळे कुंटुबाला आर्थिक हातभार तर लागेलच परंतू निर्णय घेण्याचे स्वातंत्र देखील मिळणार आहे. महिलांनी सूरू केलेल्या उद्योग व्यसायामुळे देशाचे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासन सदैव महिलांच्या पाठीशी उभे असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.

व्यवस्थापकीय संचालक वर्षा लड्डा म्हणाल्या की, माविम आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशन (LLF) सारख्या स्वयंसेवी संस्थांमधील सहकार्यामुळे स्वयं-मदत गट (SHG) सक्षम होण्यासाठी मदत होत आहे.  2000 महिलांना एल एल एफ ने प्रशिक्षण देऊन,  200 महिलांना एलएलएफ-मास्टरकार्ड भागीदारी अंतर्गत अनुदान प्रदान केले.  यामुळे यशस्वीरित्या त्यांचे व्यवसाय सुरू  आहेत. हे खरोखरच प्रशंसनीय आहे.


खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली,संकेतस्थळ www.mahapwd.gov.in ,pl share

 खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली

            मुंबईदि. २९ - पावसाळ्यानंतर रस्त्यांमध्ये खड्डे पडतात. असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्डयांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे. 

   सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचे संगणकीकारण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच खड्ड्यासाठी तक्रार प्रणाली विकसीत केली आहे. 

            नागरिक या प्रणालीच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. प्रथम PCRS अँप गुगल प्ले स्टोअरकेंद्र शासनाच्या m- Seva portal, किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे संकेतस्थळ  www.mahapwd.gov.in या संकेतस्थळावरून मोबाईलवर डाउनलोड करावे. नागरिकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTP चा वापर करावा आणि ॲप नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी रजिस्टर फीडबॅक येथे क्लिक करावे. मोबाईल स्क्रीनवर नकाशा दिसेल. त्यामध्ये आपले लोकेशन निश्चित करून खड्ड्यांचा फोटो अपलोड करण्यासाठी 'Take Pothol Photo' या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर खड्ड्यांचा फोटो घेऊन सदर तक्रारीबाबत अभिप्राय नोंदवावा आणि शेवटी तक्रार दाखल करावी. 

            या प्रणालीमध्ये तक्रारीची सद्यस्थिती दाखवण्याची व्यवस्था आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी तातडीने संबंधित शाखा अभियंता आणि उपअभियंता यांच्याकडे पाठवण्यात येतील. या माध्यमातून खड्डेमुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने सार्वजनिक बांधकाम विभागाने उचललेले महत्वाचे पाऊल आहे. 

00000

गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?" आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध*

 *"गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?" आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध*


मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते.हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशमी वस्त्र,तांब्या, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोवळी पाने, बत्ताशाची माळ यासारख्या शंभर टक्के नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पुजा केली  जाते.  बत्ताशाचा प्रसाद वाटला जातो आणि कडुनिंबाची चटणी खाल्ली जाते... असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल, ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी..  म्हणूनच काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडा पासून ते कडू पर्यंत सर्व चवीचा समावेश केलेला असतो...


या दिवशी गुढीला श्रीखंड पुरी चा  नेवेद्य आवर्जून दाखवला जातो.. आज आपण या श्रीखंड बद्दल थोडंसं जाणून घेऊया. आयुर्वेदात श्रीखंडला "रसाला" किंवा "शिखरिणी" म्हणतात. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध सुद्धा आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव, या नावाने स्वयंपाक करीत होता. तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला. या पदार्थांच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. श्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला, म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो.


"आता गुढी पाडव्याला श्रीखंडच का खायचे?"

उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये, शरीरशक्‍ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे रसायना प्रमाणे काम करते. म्हणजेच काय तर उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ज्याचे शरीर अगदी शुष्क बनले आहे, ज्यांना उत्साह नाही,ज्यांना शरीराची पुष्टी हवी असेल त्यांना श्रीखंड हे अगदी उत्तम होय.  श्रीखंड हे पचायला थोडे जड असते, शिवाय हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे, या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनविण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे. पण आजकाल बरेच जण आयुर्वेदिक विधी न वापरता श्रीखंड बनवतात   यामुळे श्रीखंड बाधते..


"आता आयुर्वेदानुसार श्रीखंड कसे बनवावे हे आपण पाहू या"


प्रथम छान दही लावावे ते कधीही आंबट असू नये. चांगले दही लागल्यानंतर सूती अथवा तलम वस्त्रात बांधून पुरचुंडी तयार करून ते 7-8 तासा साठी टांगून ठेवावे. जे काही जल रहीत दही तयार झाले आहे त्याला आपण चक्का म्हणतो. 

 

आयुर्वेदिक श्रीखंड मध्ये चक्का हा खडीसाखर (मिक्सर ला बारीक करून घेणे)बरोबर फेटायचा आणि फेटायच्या भांड्याला कापराने धुपवलेले जाते आणि श्रीखंड पचविण्यासाठी लागणारा अग्नी मधरूपाने समाविष्ट असतो, श्रीखंडाच्या अन्नशुद्धीसाठी त्यात तूप हि टाकलेले असते. नंतर त्यात दालचिनी, नागकेशर, वेलची, मिरीपावडर, तमालपत्र, सुंठ याची पावडर करून मिसळले जाते. वरून थोडं केसर दूध घाला म्हणजे तुमचे आयुर्वेदिक श्रीखंड तयार होते. वरील विधी वरून हे लक्षात येते कि श्रीखंड जरी कफ वाढविणारे असले तरी त्याबरोबरीने अशा पदार्थांची योजना केलेली आहे त्यामुळे श्रीखंड कफवर्धक ठरत नाही.

 

थोडक्यात काय तर गुढीपाडव्याच्या परंपरेचा आरोग्य अर्थ जाणून घेवून हा सण साजरा केला पाहिजे म्हणजे येणारे नवीन वर्ष सुख,समृद्धीने युक्त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल.


 !!अवधूत चिंतन  श्रीगुरुदेव दत्त  !!

Saturday, 29 March 2025

तुळजापूर हेरिटेज टूर

 तुळजापूर हेरिटेज टूर

            आराखड्यात तुळजापूर हेरिटेज टूर विकसित करण्याचे प्रस्तावित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यामध्ये अष्टतीर्थ भेट व दर्शन, मुख्य मंदिर भेट व दर्शनरामदरा तलावाच्या डोंगरावर श्री तुळजाभवानी देवी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद रूपात भवानी तलवार देतानाचे 108 फूट उंचीचे भव्य शिल्प व शिव उद्यान, उद्यानात लाइट अँड साऊंड शो,रामदरा तलावात बोटिंगची सुविधा आदी बाबींचा समावेश आहे.

 

            मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या अपेक्षेनुसार आराखड्यातील कामे दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगतांना त्यांनी मुख्यमंत्री यांचे आभारही मानले.

****

 वृत्त क्र. १३८५

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री तुळजाभवानी देवीचे घेतले दर्शन

Featured post

Lakshvedhi