Friday, 28 March 2025

गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?" आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध*

 *"गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?" आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध*


मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते.हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशमी वस्त्र,तांब्या, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोवळी पाने, बत्ताशाची माळ यासारख्या शंभर टक्के नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पुजा केली  जाते.  बत्ताशाचा प्रसाद वाटला जातो आणि कडुनिंबाची चटणी खाल्ली जाते... असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल, ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी..  म्हणूनच काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडा पासून ते कडू पर्यंत सर्व चवीचा समावेश केलेला असतो...


या दिवशी गुढीला श्रीखंड पुरी चा  नेवेद्य आवर्जून दाखवला जातो.. आज आपण या श्रीखंड बद्दल थोडंसं जाणून घेऊया. आयुर्वेदात श्रीखंडला "रसाला" किंवा "शिखरिणी" म्हणतात. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध सुद्धा आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव, या नावाने स्वयंपाक करीत होता. तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला. या पदार्थांच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. श्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला, म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो.


"आता गुढी पाडव्याला श्रीखंडच का खायचे?"

उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये, शरीरशक्‍ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे रसायना प्रमाणे काम करते. म्हणजेच काय तर उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ज्याचे शरीर अगदी शुष्क बनले आहे, ज्यांना उत्साह नाही,ज्यांना शरीराची पुष्टी हवी असेल त्यांना श्रीखंड हे अगदी उत्तम होय.  श्रीखंड हे पचायला थोडे जड असते, शिवाय हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे, या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनविण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे. पण आजकाल बरेच जण आयुर्वेदिक विधी न वापरता श्रीखंड बनवतात   यामुळे श्रीखंड बाधते..


"आता आयुर्वेदानुसार श्रीखंड कसे बनवावे हे आपण पाहू या"


प्रथम छान दही लावावे ते कधीही आंबट असू नये. चांगले दही लागल्यानंतर सूती अथवा तलम वस्त्रात बांधून पुरचुंडी तयार करून ते 7-8 तासा साठी टांगून ठेवावे. जे काही जल रहीत दही तयार झाले आहे त्याला आपण चक्का म्हणतो. 

 

आयुर्वेदिक श्रीखंड मध्ये चक्का हा खडीसाखर (मिक्सर ला बारीक करून घेणे)बरोबर फेटायचा आणि फेटायच्या भांड्याला कापराने धुपवलेले जाते आणि श्रीखंड पचविण्यासाठी लागणारा अग्नी मधरूपाने समाविष्ट असतो, श्रीखंडाच्या अन्नशुद्धीसाठी त्यात तूप हि टाकलेले असते. नंतर त्यात दालचिनी, नागकेशर, वेलची, मिरीपावडर, तमालपत्र, सुंठ याची पावडर करून मिसळले जाते. वरून थोडं केसर दूध घाला म्हणजे तुमचे आयुर्वेदिक श्रीखंड तयार होते. वरील विधी वरून हे लक्षात येते कि श्रीखंड जरी कफ वाढविणारे असले तरी त्याबरोबरीने अशा पदार्थांची योजना केलेली आहे त्यामुळे श्रीखंड कफवर्धक ठरत नाही.

 

थोडक्यात काय तर गुढीपाडव्याच्या परंपरेचा आरोग्य अर्थ जाणून घेवून हा सण साजरा केला पाहिजे म्हणजे येणारे नवीन वर्ष सुख,समृद्धीने युक्त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल.


 !!अवधूत चिंतन  श्रीगुरुदेव दत्त  !!

गुढीपाडवा* 🌸साडेतीन मुहूर्तांपैकी एक

 🌸 *गुढीपाडवा* 🌸



हिंदु वर्षातील पहिला सण अर्थात *‘गुढीपाडवा’*. हिंदु वर्षारंभाचा प्रारंभदिवस *‘चैत्र शुद्ध प्रतिपदा*’ हा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.


गुढीपाडवा :-  साडेतीन मुहूर्तांपैकी एक

गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.


*गुढीपाडव्याचे महत्त्व*


*अ. नैसर्गिक महत्त्व – वसंत ऋतूच्या प्रारंभाचा दिवस*


ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो *(संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.)* आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.


*आ. गुढीपाडवा : ऐतिहासिक महत्त्व*


१. रामाने वालीचा वध केल्याचा दिवस


रामाने वालीचा वध या दिवशी केला.


२. शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस !


*शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला.*


ही गुढीपाडवा हा वर्षारंभ साजरा करण्यामागील ऐतिहासिक कारणे आहेत.


*इ. गुढीपाडवा : आध्यात्मिक महत्त्व*


१. सृष्टीची निर्मिती म्हणजेच सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस


*ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.*


२. गुढीपाडवा हा पृथ्वीचा वर्षारंभदिन


*‘गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित झालेली असते.*


३. प्रजापति-संयुक्तलहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येतात.


*गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती*


१. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करावे. अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करतात.


२. स्नानानंतर आम्रपल्लवांची तोरणे सिद्ध करून प्रत्येक द्वाराशी लाल फुलांसहित बांधावी; कारण लाल रंग शुभदर्शक आहे.


३. प्रथम नित्यकर्म देवपूजा करतात. ‘वर्षप्रतिपदेला महाशांती करायची असते. शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करतात; कारण या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली.


४. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून सूर्योेदयाच्या वेळी शास्त्रशुद्ध गुढी उभारली जाते.


५. याचकांना अनेक प्रकारची दाने द्यावीत, उदा. पाणपोईद्वारा उदकदान. याने पितर संतुष्ट होतात. ‘धर्मदान’ हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे शास्त्र सांगते. सध्याच्या काळात धर्मशिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे.


६. ज्योतिषाचे पूजन करून त्याच्याकडून किंवा ‘उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात् वर्षफल श्रवण करतात.


७. पंचागश्रवणानंतर कडुनिंबाचे मिश्रण वाटायचे असते. या चूर्णामध्ये कडुलिंबाची पाने, फुले, मिरी, हिंग, मीठ, ओवा, साखर इत्यादी पदार्थ चूर्ण करून ते चिंचेत कालवून भक्षण करावे.


८. या दिवशी भूमीत नांगर धरावा.


९. नाना प्रकारची मंगल गीते, वाद्ये आणि पुण्यपुरुषांच्या कथा ऐकत हा दिवस आनंदाने घालवावा.


*▫️माहिती आणि संकलन :- महेश मयेकर*

👑 *•|| हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूर ||•* 🚩

राज्य की 560 गौशालाओं के बैंक खातों में ₹25.44 करोड़ का अनुदान जमा

 राज्य की 560 गौशालाओं के बैंक खातों में ₹25.44 करोड़ का अनुदान जमा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ऑनलाइन किया वितरण

 

मुंबई28 मार्च : महाराष्ट्र की 560 गौशालाओं के बैंक खातों में देशी गोवंश पोषण योजना के तहत ₹25.44 करोड़ का अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा ऑनलाइन जमा किया गया।

यह अनुदान जनवरीफरवरी और मार्च के तीन महीनों के लिए दिया गया है। इस योजना के तहतप्रति गाय प्रति दिन ₹50/- दिए जाते हैं। पहले चरण मेंमहाराष्ट्र गोसेवा आयोग के माध्यम से राज्य की 560 गौशालाओं में 56,569 गायों के पालन-पोषण के लिए ₹25.45 करोड़ की राशि वितरित की गई।

मुख्यमंत्री फडणवीस ने महाराष्ट्र गोसेवा आयोग के इस कार्य की सराहना की और कहा कि देशी गोवंश का संरक्षण समय की जरूरत है। इससे ग्रामीण क्षेत्र के विकास को गति मिलेगी। उन्होंने इस योजना का लाभ अधिक से अधिक गौशालाओं को देने के लिए आयोग के अध्यक्षसदस्योंअधिकारियों और कर्मचारियों के प्रयासों की भी सराहना की।

पशुपालन मंत्री पंकजा मुंडे ने भी आयोग के इस कार्य की प्रशंसा करते हुए कहा कि यह योजना देशी गायों के संरक्षण और संवर्धन के लिए महत्वपूर्ण साबित हो रही है।

योजना की आवश्यकता और उद्देश्य:

देशी गायों की उत्पादन क्षमता कम होने के कारण उनका पालन-पोषण आर्थिक रूप से लाभदायक नहीं माना जाता। भाकड़ (गैर-उत्पादक) गायों का रखरखाव भी पशुपालकों के लिए मुश्किल होता हैजिसके चलते वे इन्हें गौशालाओं में रखते हैं। ऐसे गौशालाओं को आर्थिक रूप से सक्षम बनाने के लिए महाराष्ट्र गोसेवा आयोग ने गोवंश पोषण योजना शुरू की हैजिसके तहत प्रति गाय प्रति दिन ₹50/- का अनुदान दिया जाता है।

अब तक इस योजना से 560 गौशालाओं को सीधा लाभ मिला हैऐसा महाराष्ट्र गोसेवा आयोग के अध्यक्ष शेखर मुंदडा ने बताया।

ऑनलाइन अनुदान वितरण के दौरान उपस्थित गणमान्य:

इस मौके पर आयोग के अध्यक्ष शेखर मुंदडाराज्य की मुख्य सचिव सुजाता सौनिक और महाराष्ट्र गोसेवा आयोग के अन्य सदस्य उपस्थित थे।

योजना का स्वरूप:

महाराष्ट्र गोसेवा आयोग में पंजीकृत गौशालाओं के लिए अनुदान उपलब्ध होगा।

भारत पशुधन प्रणाली में पंजीकृत देशी गायों के पालन-पोषण के लिए ₹50 प्रति दिन प्रति गाय दिया जाएगा।

अनुदान प्राप्त करने के लिए पात्रता शर्तें:

गौशालागोसदनपांजरपोळ या गोरक्षण संस्था महाराष्ट्र गोसेवा आयोग में पंजीकृत होनी चाहिए।

संस्था को कम से कम तीन वर्षों का गो-संगोपन का अनुभव होना चाहिए।

गौशाला में कम से कम 50 गोवंशीय पशु होने चाहिए।

ईयर टैगिंग (कानों पर पहचान टैग) अनिवार्य है।

संस्था का राष्ट्रीयकृत बैंक में खाता होना चाहिए

राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रित अर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (https://awards.gov.in) ऑनलाईन अर्ज करू शकतात.

 महिला व बालविकास मंत्रालयाकडून

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रित

अर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवातअंतिम मुदत 31 जुलै 2025

 

नवी दिल्ली, 28 :  केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’ साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार 1 एप्रिल 2025 पासून राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (https://awards.gov.inऑनलाईन अर्ज करू शकतात. हा पुरस्कार दरवर्षी देशभरातील असामान्य गुणवत्ताधारक मुलांना (वय वर्षे 5 ते 18) सन्मानित करण्यासाठी प्रदान केला जातो.

 

शौर्यक्रीडासमाजसेवाविज्ञान व तंत्रज्ञानपर्यावरण आणि कला व संस्कृती या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.

 

या पुरस्कारासाठी कोणतेही भारतीय नागरिकत्व असलेले व भारतात वास्तव्यास असलेले 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुले पात्र आहेत. अर्जदार स्वतः अर्ज करू शकतात तसेच इतर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेद्वारे त्यांचे नाव नामांकनासाठी सुचवले जाऊ शकते. केंद्रीय मंत्रालयानी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 ठेवली आहे. अधिक माहितीसाठी (https://awards.gov.inया वेबसाइटला भेट द्यावी.

 

दरवर्षी महिला व बालविकास मंत्रालयातर्फे या पुरस्कारांचे आयोजन केले जातेज्यामध्ये विविध क्षेत्रांत अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या मुलांना गौरविण्यात येते.

000

creates Miyawaki Forest at

 IMC Chamber of Commerce & Industry creates Miyawaki Forest at Maha Raj Bhavan; Governor pats IMC for the initiative

 

Mumbai, 28th March : Maharashtra Governor C P Radhakrishnan today commended the IMC Chamber of Commerce for creating the Miyawaki styled forest at Maharashtra Raj Bhavan Mumbai. The Governor appealed to the Chamber to create similar forests in State Universities and involve the students in the environment protection activities.

 

The Governor was speaking to the office bearers and past Presidents of the IMC Chamber of Commerce and Industry after inaugurating the IMC Miyawaki Forest at Raj Bhavan, Mumbai on Fri (28 Mar).

 

The Governor released an information book on the Miyawaki Forest project at Raj Bhavan and unveiled a plaque on the occasion.

 

The Governor spoke to the captains of industry and also patted the gardners associated with the plantation and conservation work of the Miyawaki Forest. 

 

The Miyawaki Forest at Raj Bhavan was undertaken under the IMC Centenary Trust and implemented by Keshav Srushti. 

 

Under the project, 2000 saplings of 48 varieties have been planted on the western sea front of Raj Bhavan on a plot measuring 6000 sq ft.

 

Adulsa, Ananta, Anjeer, Awala, Ber, Chandan, Dalchini, Kadhipatta, Kaju, Kharvand etc have been planted at the Miyawaki forest at Raj Bhavan.

 

Vice President of the IMC Chamber of Commerce and Industry Sunita Ramnathkar, Secretary to the Governor Dr Prashant Narnaware, Trustee and Past President, IMC and Chairman, IMC Centenary Trust Ram Gandhi, Trustee and Past President, IMC and Trustee, IMC Centenary Trust Niraj Bajaj, Past President, IMC and Trustee, IMC Centenary Trust Ashish Vaid, Past Presidents of IMC Shailesh Vaidya, and Anant Singhania, Vice President IMC Ladies’ Wing Rajyalakshmi Rao, MD, Canco Advertising Pvt. Ltd Ramesh Narayan, Co Chairman IMC Young Leaders' Forum Ateet Sanghavi, Co-Chairperson IMC Young Leaders' Forum Jyotsana Sanghi, CA Rajesh Choudhary, Director General Ajit Mangrulkar, Deputy Director Generals Sanjay Mehta and Sheetal Kalro were present.

विद्यापीठांना व विद्यार्थ्यांना मियावाकी जंगल निर्माण कार्यात सहभागी करण्याची राज्यपालांची सूचना

 आयएमसी चेंबरच्या पुढाकाराने राजभवन येथे मियावाकी जंगल निर्मिती

राज्यपालांकडून आयएमसीच्या पर्यावरण रक्षण उपक्रमाचे कौतुक

विद्यापीठांना व विद्यार्थ्यांना मियावाकी जंगल निर्माण कार्यात

सहभागी करण्याची राज्यपालांची सूचना

 

मुंबई, दि. २८ : शहरीकरण व वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने हाती घेतलेला कमी जागेत जंगल निर्माण करण्याचा मियावाकी जंगल प्रकल्प स्तुत्य आहे. चेंबरने वृक्ष लागवडीचा हा उपक्रम राज्यातील विद्यापीठांमध्ये देखील राबवावा व विद्यार्थ्यांना वृक्षारोपण कार्यात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. 

आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (पूर्वीची इंडियन मर्चंट चेंबर)च्या वतीने राजभवन येथे तयार करण्यात आलेल्या मियावाकी जंगलाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते तसेच प्रमुख उद्योगपतींच्या उपस्थितीत कोनशिलेचे अनावरण करण्यात आलेतसेच ‘राजभवन मियावाकी जंगल प्रकल्प’ या विषयावरील माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्याच्या मियावाकी जंगल प्रकल्पांतर्गत राजभवनातील हिरवळीनजीक पश्चिम समुद्र किनाऱ्यावर सहा हजार चौरस फूट जागेवर ४८ प्रकारांच्या दोन हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे.

मियावाकी जंगल प्रकल्प आयएमसी शताब्दी ट्रस्ट अंतर्गत हाती घेण्यात आला असून 'केशव सृष्टीद्वारे त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

यावेळी राज्यपालांनी आयएमसीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच झाडांची लागवड व बागकाम करणाऱ्या माळी कर्मचाऱ्यांची विचारपूस केली.

राजभवन येथे लावण्यात आलेल्या रोपांमध्ये अडुळसाअनंतअंजीरआवळाबेलबोरचंदन दालचिनीकढीपत्ताकाजूकन्हेरकरवंदखजूरमोगरा आदींचा समावेश करण्यात आला आहे.

या समारंभाला आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या उपाध्यक्ष सुनिता रामनाथकरइंडियन मर्चंट्स चेंबरच्या शताब्दी समितीचे अध्यक्ष राम गांधीराज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेउपसचिव एस राममूर्तिआयएमसीचे माजी अध्यक्ष आशिष वैदनीरज बजाजशैलेश वैद्य आणि अनंत सिंघानियाआयएमसी महिला शाखेच्या उपाध्यक्षा राजलक्ष्मी रावकॅन्को ॲडव्हर्टायझिंगचे व्यवस्थापकीय संचालक रमेश नारायणआयएमसी यंग लीडर्स फोरमचे सह-अध्यक्ष अतीत संघवीज्योत्सना संघवीराजेश चौधरीमहासंचालक अजित मंगरूळकरउपमहासंचालक संजय मेहता आणि शीतल कालरो आदी उपस्थित होते.

असे आहे गोशाळा योजनेचे स्वरुप

 असे आहे गोशाळा योजनेचे स्वरुप

महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळांतील भारत पशुधन प्रणालीवर नोंद असलेल्या देशी गायींच्या परिपोषणासाठी प्रती दिन अनुदान देय राहिल. अनुदानाची रक्कमः रुपये ५० /- प्रती दिन प्रती देशी गाय असे आहे.

अनुदान पात्रतेच्या अटी

महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळागोसदनपांजरपोळ व गोरक्षण संस्था अनुदानासाठी पात्र आहेत. संस्थेस गोसंगोपनाचा कमीतकमी तीन वर्षाचा अनुभव असावा. गोशाळेत किमान ५० गोवंशीय पशुधन असणे आवश्यक आहे. संस्थेतील गोवंशीय पशुधनास ईअर टॅगिंग करणे अनिवार्य आहे.

ईअर टॅगिंग झालेले गोवंशीय पशुधन अनुदानास पात्र आहे. संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

Featured post

Lakshvedhi