Wednesday, 26 March 2025

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यश क्रीडा क्षेत्रासाठी सुवर्णक्षण

 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील 

यश क्रीडा क्षेत्रासाठी सुवर्णक्षण

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई दि. २६ : उत्तराखंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. खेळाडूंची ही उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद व सुवर्णक्षण असल्याचे गौरवउद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या पथकातील खेळाडूनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलनवी दिल्ली येथे पार पडलेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष तसेच महिला संघाने  अजिंक्य पद पटकावल्याबद्दल आणि तेहरान येथे झालेल्या सहाव्या महिला आशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने जेतेपद पटकावल्याबद्दल  अभिनंदनचा प्रस्ताव मांडला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या विजयी खेळाडूंचेतसेच भारतीय खो-खो संघ आणि भारतीय महिला कबड्डी संघाचे  अभिनंदन केले. तसेचरणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या विदर्भ संघालाही शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकतालिकेत प्रथम क्रमांक

मुख्यमंत्री फडणवीस अभिनंदनपर भाषणात म्हणालेया स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण २०१ पदके मिळवलीत्यात ५४ सुवर्ण७१ रौप्य आणि ७६ कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या ५८० खेळाडूंनी ३२ क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतलात्यापैकी २६ क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राने पदकांची कमाई केली. ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक १२ सुवर्ण पदके पटकावली. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा पदक तालिकेत प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे राज्यभरातून कौतुक होत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पुरुषमहिला खो-खो संघाची देदिप्यमान कामगिरी

भारतीय पुरुष आणि महिला खो-खो संघाने पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या स्पर्धेत दोन्ही भारतीय संघ अपराजित राहिले. या स्पर्धेत दोन्ही संघाने देदिप्यमान कामगिरी करत दमदार विजयासह इतिहास रचला.

महिला कबड्डी संघाचा अभिमान

भारतीय महिला कबड्डी संघाने सहाव्या महिला आशियाई कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. क्रिकेटव्यतिरिक्तही भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेतयाचा अभिमान संपूर्ण देशाला वाटते असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आपल्या अभिनंदनपर भाषणात म्हणाले.

विदर्भ क्रिकेट संघाचे अभिनंदन

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सर्वात प्रतिष्ठेची रणजी ट्रॉफी यंदा विदर्भ संघाने जिंकली आहे. देशभरातील विविध राज्यांच्या संघांमध्ये चुरशीच्या सामन्यांनंतर विदर्भाने अंतिम विजय मिळवला याबद्दल   मुखमंत्री श्री. फडणवीस यांनी विदर्भ क्रिकेट संघातील खेळाडू प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

अण्णा बनसोडे महाराष्ट्र विधानसभा के उपाध्यक्ष निर्वाचित

 अण्णा बनसोडे महाराष्ट्र विधानसभा के उपाध्यक्ष निर्वाचित


महाराष्ट्र विधानमंडल की गौरवशाली संवैधानिक परंपरा


संविधान ने आम आदमी को दिया समान अवसर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई, 26 मार्च : महाराष्ट्र विधानसभा के उपाध्यक्ष पद पर एक सामान्य कार्यकर्ता का चयन होना भारतीय संविधान द्वारा प्रदान किए गए समान अवसरों का एक उत्कृष्ट उदाहरण है। राज्य के विधानमंडल की एक गौरवशाली परंपरा रही है, और इसे आगे ले जाने की ज़िम्मेदारी हम सभी की है। अण्णा बनसोडे का उपाध्यक्ष पद पर चयन केवल उनका सम्मान नहीं बल्कि महाराष्ट्र के 13 करोड़ लोगों के लिए गर्व की बात है। संविधान द्वारा दिए गए समानता के अधिकार के कारण ही एक सामान्य व्यक्ति भी उच्च पदों तक पहुँच सकता है, ऐसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा।


अण्णा बनसोडे को महाराष्ट्र विधानसभा के उपाध्यक्ष पद पर सर्वसम्मति से चुना गया। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उनके चुनाव पर बधाई प्रस्ताव प्रस्तुत किया और उनके राजनीतिक सफर व अनुभव की सराहना की।


मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि महाराष्ट्र विधानमंडल देश के सबसे लंबे समय तक चलने वाले सदनों में से एक है। इस परंपरा को आगे बढ़ाने के लिए अध्यक्ष, उपाध्यक्ष और सभी सदस्यों को समन्वय से कार्य करना चाहिए, जिससे इस सदन की प्रतिष्ठा और बढ़े। उपाध्यक्ष पद महाराष्ट्र विधानसभा का एक सम्मानजनक पद है, जिसे कई दिग्गज नेताओं ने गौरवान्वित किया है। अण्णा बनसोडे का इस पद के लिए चयन उनके कर्तृत्व का सम्मान है।


पिंपरी से वे तीसरी बार विधायक चुने गए हैं। इससे पहले, उन्होंने नगर निगम में पार्षद पद पर लगातार तीन बार जीत हासिल की थी और स्थायी समिति के अध्यक्ष के रूप में भी उन्होंने उल्लेखनीय कार्य किया है।


अण्णा बनसोडे का राजनीतिक सफर पार्षद, स्थायी समिति अध्यक्ष, विधायक और अब उपाध्यक्ष तक लगातार आगे बढ़ता रहा है। उनकी इस चुनावी जीत से महाराष्ट्र विधानसभा को एक सक्षम उपाध्यक्ष मिला है, और उनसे उम्मीद है कि वे अपनी जिम्मेदारी के तहत संवैधानिक परंपराओं को बनाए रखेंगे, ऐसा मुख्यमंत्री फडणवीस ने कहा।


विधानसभा अध्यक्ष के रूप में विधि विशेषज्ञ एडवोकेट राहुल नार्वेकर और उनके साथ एक अनुभवी नेता उपाध्यक्ष के रूप में कार्य करेंगे, जिससे विधानमंडल की प्रतिष्ठा और बढ़ेगी। अध्यक्ष और उपाध्यक्ष के समन्वय से इस सदन को निश्चित रूप से न्याय मिलेगा, ऐसा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस ने व्यक्त किया

वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

 वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार - पालकमंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबईदि. २६  : वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री  दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीमुळे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेअजित पवार यांचे आभार मानले आहेत.

 

पालकमंत्री पदाची धुरा सांभाळताना वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीणसमतोल विकास साधणार अशी प्रतिक्रिया मंत्री भरणे यांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काटेकोर नियोजन करणार. पायाभूत सुविधा भक्कम करण्याबरोबर लोकप्रतिनिधीशेतकरीकष्टकरीउपेक्षितमहिलावृद्धयुवक आदी घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार. विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले आहे.

महसूल मंडळ स्तरावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान

 महसूल मंडळ स्तरावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज

महाराजस्व समाधान शिबिर अभियान

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन

 

 मुंबईदि. २६ : महसूल विभाग अंतर्गत राज्यातील जनतेची दैनंदिन कामे पूर्ण करणेमहसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुखकार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यात यापुढे महसूल मंडळ स्तरावर महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येणार आहेअशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणालेया अभियानाचे नामकरण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान करण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत महसूल मंडळ स्तरावर हे अभियान राबविण्यात येणार आहे. वर्षातील किमान चार वेळा मंडळस्तरावर अभियानाअंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात येईल.

 समाधान शिबिरांमध्ये जातीचेउत्पन्न व रहिवासी दाखलेसातबाराफेरफारशिधापत्रिका वाटपसंजय गांधी निराधार योजनामहसूल विभागाच्या विविध सेवाविविध शासकीय योजनांच्या लाभासाठी लागणारे कागदपत्रे तसेच पीएम किसान आणि अन्य सामाजिक योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात येणार आहे. महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत पहिल्यांदाच प्रत्येक महसूल मंडळावर अंतर्गत आयोजित शिबिराला २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहेअसेही महसूलमंत्री बावनकुळे यांनी निवेदनातद्वारे सांगितले

एमपीएससी परीक्षेतील डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार

 एमपीएससी परीक्षेतील डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप लागू करण्याचा निर्णय कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. २०२२ मध्ये हा निर्णय घेण्यात आला होतापरंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर २०२५ पासून तो लागू करण्याचे ठरवण्यात आले. आता तो मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनीही प्रश्नाला उत्तर दिले. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेसदस्य शशिकांत शिदेसदाभाऊ खोतएकनाथ खडसेप्रसाद लाड यांनीही चर्चेमध्ये सहभाग घेतला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, "एमपीएससी परीक्षा यूपीएससीप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेतली जाणार आहे. काही कोचिंग क्लासेसच्या लोकांनी विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी मुलांच्या भविष्यासाठी हा बदल गरजेचा आहे." सुरुवातीला २०२३ मध्ये हा बदल होणार होतापण विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर तो २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय झाला आहे. डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीमुळे विद्यार्थी यूपीएससीसाठी अधिक सक्षम होतीलअसेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार म्हणाले कीमहाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात आला आहे. संबंधित विभागाच्या मागणीपत्रांनुसार आणि नियमानुसार पीएसआय परीक्षांसाठी एका वर्षाची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोग स्वायत्त असला तरीविविध न्यायालयीन निर्णयविधी व न्याय विभागाचे मत आणि सरकारच्या धोरणाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतचगट क परीक्षांमध्ये देखील PSI, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि ASO परीक्षांसाठी एक वर्ष वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे

बॅटरी वॅट क्षमतेमध्ये बदल केलेल्या ईव्ही बाईक्सवर कारवाई

 बॅटरी वॅट क्षमतेमध्ये बदल केलेल्या ईव्ही बाईक्सवर कारवाई

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबईदि. २६ : मुंबईमध्ये बॅटरी वॅट क्षमतेमध्ये बदल करून ईव्ही बाईक रस्त्यावर चालवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा ईव्ही बाईक्सवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत दिली.

            सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सरनाईक बोलत होते.

            आतापर्यंत बॅटरी क्षमतेमध्ये बदल केल्याप्रकरणी २११ गुन्हे नोंदवण्यात आल्याचे सांगून परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले कीअशा प्रकारे बदल केलेल्या ८८९ ईव्ही बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. काही कंपन्यांकडून क्षमता वाढवून ईव्ही बाईक्स रस्त्यावर फिरवल्या जात आहेत. या चीनी बनावटीच्या बाईक्स सोसायटीमध्ये अंतर्गत वापररासाठीही आणल्या जात  आहेत. अशा सर्वच ईव्ही बाईक्सची नोंदणीही अत्यावश्यक करण्याचे धोरण राबवण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.

एसटी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने अपारंपरीक इंधनावर परावर्तीत करणार

 एसटी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने

अपारंपरीक इंधनावर परावर्तीत करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. २६ : एस टी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने अपारंपरीक इंधनावर परावर्तीत करण्यात येणार आहेत. एसटीच्या   बसेस इलेक्ट्रिक आणि एलएनजी इंधनावर सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.

            सदस्य उमा खापरे यांनी पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील प्रदूषणाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये शशिकांत शिंदेप्रविण दरेकरअनिल परबअमित गोरखेमनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला. 

एसटी महामंडळाकरिता ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीयापैकी ४५० बसेस खरेदी केल्या आहेत. तसेच एसटीच्या सध्याच्या बसेस एलएनजीमध्ये परावर्तीत करण्यात येणार असून एलएनजी पुरवठा करण्यासाठी करार करण्यात आला आहे. राज्यात ईव्हीच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईव्ही धोरण आणले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ३० लाखापेक्षा जास्त किमतीच्या ईव्ही वाहनांवर ६ टक्के कर आकारण्याचे जाहीर केले आहे. परंतु हा कर मागे घेण्याची घोषणा सभागृहात करण्यात येणार आहे. राज्यातील रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांपैकी किमान ८० टक्के ईव्ही वाहने होतील यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. ईव्ही वाहनांचा वापर वाढला की प्रदूषण कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल. तसेच हिंजवडी परिसरातील होणारे प्रदूषण हे मुख्यतः वाहनांमुळे होत असून यासाठी मेट्रो आणि बसेसची कनेक्टिव्हीटी सुरू करण्यात येत आहे. जास्तीत जास्त ईव्ही बसेस घेण्याचा प्रयत्न असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही प्रदूषण मुक्त असावी असे शासनाचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

सर्व शासकीय वाहनेही इलेक्ट्रिक करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीआमदारांनाही देण्यात येणाऱ्या वाहन कर्जावरील व्याज सवलतीही ईव्हीसाठीच देण्यात येतील. सर्व मंत्री यांची वाहनेही ईव्हीमध्ये बदलण्याचे शासनाचे नियोजन असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले कीरेडीमिक्स प्लांटना पूर्ण अच्छादन करण्याचा नियम शासनाने केला आहे. हिजंवडी परीसरात असलेल्या या रेडीमिक्स प्लांटलाही हा नियम लागू आहे. अशा प्रकारे पूर्ण अच्छादन न करणारे प्रकल्प बंद करण्याची कार्यावाही करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या १७२ कोटी रुपयांच्या निधीच्या विनियोगबाबतही चौकशी करण्यात येईलअशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

Featured post

Lakshvedhi