Friday, 21 March 2025

कल्याण - डोंबिवली महापालिका हद्दीतील 'टीडीआर' गैरव्यवहाराबाबत दंडात्मक कारवाई

 कल्याण - डोंबिवली महापालिका हद्दीतील

'टीडीआरगैरव्यवहाराबाबत दंडात्मक कारवाई

मंत्री उदय सामंत

मुंबईदि. २१ : कल्याण - डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील मौजे गावदेवी येथील जमिनीबाबत जमीन विकास हक्क हस्तांतरणात (टीडीआर) गैरव्यवहार झाल्याची चौकशी ठाणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली आहे. या जमिनीच्या 'टीडीआरगैरव्यवहारप्रकरणी ७ कोटी वसुलीची दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेअसे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील जमीन विकास हक्क हस्तांतरण बाबत सदस्य किसन कथोरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री श्री.सामंत म्हणालेया गैरव्यवहारप्रकरणी दोन तलाठ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्हाही दाखल करण्यात आला असून विष्णू नगर पोलिसांमार्फत पुढील तपास सुरू आहे.


पोर्टच्या ससून डॉकला मॉडेल पोर्ट करा - मंत्री राणे

 पोर्टच्या ससून डॉकला मॉडेल पोर्ट करा - मंत्री राणे

            महावाणिज्यदूत श्री. ओस्टबर्ग यांनी पोर्टच्या विकासात स्वीडन कंपनी योगदान देवू इच्छित असल्याने सांगितल्याने मंत्री श्री. राणे यांनी ससून डॉकची पाहणी करण्याची सूचना केली. स्वीडन कंपनीने राज्य शासनाला पोर्टच्या विकासाबाबत प्रस्ताव सादर करावा. वाहतुकीसाठी सुलभ ठिकाणांची पाहणी करून देशात एक नंबर होईलअसे मॉडेल पोर्ट विकसित करावे. यासाठी मेरीटाईम बोर्डाशी चर्चा करून एप्रिलमध्ये पाहणी करून अहवाल सादर करावाअसेही मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

श्री. ओस्टबर्ग यांनी पोर्टचा विकासस्वच्छतासोयी-सुविधागुंतवणुकीबाबतची माहिती दिली.


मुंबईत पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करा

 मुंबईत पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करा

- मंत्री नितेश राणे

देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार

स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणार

 

मुंबईदि. २१ : मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवून ही सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकीदरम्यान केल्या.

मंत्रालयात आज मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री श्री. राणे यांच्याशी महावाणिज्य दूत श्री. ओस्टबर्ग यांनी ई-वॉटर टॅक्सीबाबत चर्चा केली. यावेळी श्री. ओस्टबर्ग यांच्या सल्लागार सलोनी झव्हेरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. राणे यांनी सांगितले कीमुंबई महानगरामध्ये वाहतूक यंत्रणेवर ताण येत असून ई-वॉटर टॅक्सी लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रोजेक्टने मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. स्वीडनच्या कँडेला कंपनीशी झालेल्या करारानुसार त्यांनी नागरिकांची सुरक्षिततावातावरणपर्यावरण यांचा विचार करावा. शिवाय वॉटर टॅक्सीचे नागरिकांना परवडणारे माफक दर ठेवावेत. कंपनीला लागणाऱ्या परवान्याबाबत राज्य शासन दक्षता घेईल.

श्री. ओस्टबर्ग यांनी महाराष्ट्रातील पोर्टच्या विकासात स्वारस्य दाखवित म्हणाले कीस्वीडनची कॅंडेला कंपनी येवून सर्व माहितीचे सादरीकरण करेल. त्यानंतर वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करू.

अमली पदार्थ विरोधी कक्ष

 अमली पदार्थ विरोधी कक्ष

  प्रत्येक पोलीस स्टेशनला अमली पदार्थ विरोधी सेल सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून अमली पदार्थांची विक्रीवाहतूक आणि साठवणुकीवर कारवाई करण्यात येत आहे. अमली पदार्थ विषयी गुन्ह्यांमध्ये पोलिस आढळून आल्यास संबंधित पोलिसाला बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बंद रासायनिक कंपन्यांना नियमित भेट देण्यात येत आहे. यासाठी एमआयडीसीलाही सूचित करण्यात आले आहे. कोडीम घटक आधारित सिरप अमली पदार्थ म्हणून वापरण्यात येते. हे सिरप मेडिकल दुकानदारांनी प्रिस्क्रिप्शन शिवाय न देण्याचे बंधन टाकण्यात आले आहे तसेच त्याचे रेकॉर्डही ठेवाण्यास सांगितले आहे. यामुळे या सिरपची आयात कमी झाल्याचे दिसून येते. गुप्त माहितीच्या आधारे सिंथेटिक ड्रगवर पण कारवाई करण्यात येत आहे.

ऑपरेशन ब्लॅक फेस,लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर

 ऑपरेशन ब्लॅक फेस


लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबतीत बऱ्याच तक्रारी आहेत. अशा प्रकारचे लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ फोटो व साहित्य विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शोधून ते काढून टाकण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक फेस सुरू करण्यात आलेले आहे.

ऑपरेशन मुस्कानचा देशपातळीवर गौरव,१०९८ टोल फ्री क्रमांक वरून मदत देण्यात येत आहे.

 ऑपरेशन मुस्कानचा देशपातळीवर गौरव

लहान मुलांच्या शोधासाठी राज्यामध्ये ऑपरेशन मुस्कान उपक्रम राबविण्यात येत आहे. अशा पद्धतीने १२ उपक्रम पूर्ण करण्यात आले आहे. या उपक्रमाला देश पातळीवर गौरविण्यात आले आहे. राज्यामध्ये ३८ हजार ९१० लहान मुलांचा या ऑपरेशनच्या माध्यमातून शोध घेऊन त्यांच्या पालकांपर्यंत त्यांना पोहोचविण्यात आले आहे. पोस्को कायद्यांतर्गत विशेष कृती दल स्थापन करण्यात आले आहे. तसेच १०९८ टोल फ्री क्रमांक वरून मदत देण्यात येत आहे.

डायल ११२ प्रतिसादात अग्रेसर,मदत मागितल्यास तातडीने महिलांना मदत देण्यात येत आहे

 डायल ११२ प्रतिसादात अग्रेसर

डायल ११२ मध्ये मदत मागितल्यास तातडीने महिलांना मदत देण्यात येत आहे. या क्रमांकाचा प्रतिसाद वेळ देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. हा क्रमांक सीसीटीएनएस प्रणालीद्वारे केंद्र सरकारच्या यंत्रणांशी संलग्नित आहे.

अनैतिक मानवी वाहतूक रोखण्यासाठी समन्वय कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी विशाखा समितीही स्थापन करण्यात आली आहे.

Featured post

Lakshvedhi