Friday, 21 March 2025

अर्थसंकल्पीय अनुदानावरील मागण्या विधानसभेत मंजूर • कामगार, उद्योग आणि खनीकर्म विभागाच्या मागण्या

 अर्थसंकल्पीय अनुदानावरील मागण्या विधानसभेत मंजूर

•      कामगारउद्योग आणि खनीकर्म विभागाच्या मागण्या

 

मुंबईदि. २० : कामगारउद्योग आणि खनिकर्म विभागाच्या सन २०२५- २६ च्या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर विधानसभेत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती या विभागांच्या अर्थसंकल्पीय अनुदानावरील मागण्या मांडण्यात येवूनत्या मंजूर करण्यात आल्या.

कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल चर्चेला उत्तर देताना म्हणालेराज्य शासन इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी सामाजिक सुरक्षेच्या कल्याणकारी योजना राबवित असते. या योजनांच्या माध्यमातून कामगारांना लाभ देण्यात येत आहे. सामाजिक सुरक्षा कायद्यानुसार असंघटित क्षेत्रातील कामगारांना लाभ देण्यात येते आहे. किमान वेतनाकरिता किमान वेतन समिती गठीत करून किमान वेतन देण्याचे निश्चित करण्यात येणार आहे.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी कामगार विभागाच्या ५२५.४४ कोटी रुपयांच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या.

उद्योग विभागाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणालेमहाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये देशात अव्वल आहे. जुलै ते डिसेंबर २०२४ च्या दरम्यान राज्यात १ लाख ३९ हजार ४३४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. ही देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ४० टक्के गुंतवणूक आहे. दावोस येथील आर्थिक परिषदेतही १५ लाख ७२ हजार ६३४ कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले. या कराराच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग येणार आहेत . या कराराचे उद्योगात रूपांतर होण्यासाठी सिंगल विंडोयंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. 

सन २०२५- २६ या आर्थिक वर्षासाठी उद्योग विभागाच्या ७ हजार ९३० कोटी ८० लाख रुपयांच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या.

            खनीकर्म विभागासाठी सन २०२५ - २६ या आर्थिक वर्षाकरिता एकूण ४० कोटी ४२ लाख ८९ हजार रुपये रकमेच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या.

अर्थसंकल्पावरील अनुदानातील तरतुदीमध्ये अनिवार्य आणि कार्यक्रमावरील खर्चाचा समावेश आहे.

००००

शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणार -

 शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणार

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई२० :- शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त होताच नियमानुसार कारवाई केली जाईलअसे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

या लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी अधिक माहिती देताना मंत्री श्री. पाटील यांनी सांगितलेया महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत असलेल्या डॉ. फहिम जहांगीर सय्यद यांना २५ लाख इतका घर बांधणी अग्रिम मंजूर करण्यात आले होता. डॉक्टर सय्यद या सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने शासन नियमानुसार त्यांच्या घरबांधणी  अग्रीमावरील व्याजाची रुपये ८ लाख ४९ हजार २३ रुपये इतकी रक्कम क्षमापित करण्यात मान्यता देण्यात आली. तसेच त्यांना मंजूर करण्यात आलेल्या आक्रम पैकी शिल्लक मुद्दल ९ लाख ६  हजार २५० रुपये त्यांना ते असलेल्या मृत्यु-नि-सेवा उत्पादनातून वसूल करण्यात आले. मात्र या महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य यांनी डॉ. सय्यद यांच्या मुद्दल व व्याजाची रक्कम असे १७ लाख ५५ हजार २७३ इतकी रक्कम त्यांच्या वारसा कडून धनादेशद्वारे मागणे हे नियमबाह्य आहे. याबाबत डॉ. सय्यद यांच्या वारसांनी न्यायालयात दाद मागितली.  न्यायालयाच्या आदेशानुसारकॉलेज प्रशासनाने हे पैसे डॉ. सय्यद यांच्या वारसांना परत करणे आवश्यक आहे.  डॉ. सय्यद यांच्या वारसा वसूल करण्यात आलेली रक्कम  प्रकरणासंदर्भात तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे.

तसेच महाविद्यालयाच्या ताब्यात असणारी जागे संदर्भातही आपण स्वतः लक्ष घालून हा विषय मार्गी लावला जाईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री पाटील यांनी सांगितले. या संदर्भात सदस्य महेश शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.

आंतरराष्ट्रीय वन दिनाच्या दिल्या शुभेच्छा अन्न सुरक्षा, पोषण आणि उपजिविकेसाठी जंगल वाचवूया

 आंतरराष्ट्रीय वन दिनाच्या दिल्या शुभेच्छा

अन्न सुरक्षापोषण आणि उपजिविकेसाठी जंगल वाचवूया

- वन मंत्री गणेश नाईक

 

मुंबईदि. 20 - आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त वन मंत्री गणेश नाईक यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. अन्न सुरक्षापोषण आणि उपजिविकेमध्ये जंगलांचे महत्त्व नेहमीच अधोरेखित झाले असून जंगले वाचली तरच मानवाला चांगले अन्न मिळू शकेलत्यासाठी जंगलांचे संवर्धन व संरक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. 21 मार्च 2025 रोजी आंतराष्ट्रीय वन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने २०१२ मध्ये २१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून घोषित केला. या दिनानिमित्त सर्व प्रकारच्या वनांचे महत्त्व पटवून दिले जाते. आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्तवृक्षलागवडवन आणि झाडांशी संबंधित उपक्रम आयोजित करण्यासाठी स्थानिकराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले जाते.

जंगले केवळ अन्न आणि इंधन पुरवत नाहीततर ते जैवविविधताजलस्रोतआणि हवामान बदल यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त आपल्या पर्यावरणाची आणि जंगलांची काळजी घेण्याची प्रेरणा मिळो आणि आपण सर्वांनी मिळून जंगलाचे संरक्षण करूयाअसे आवाहन श्री. नाईक यांनी केले आहे.

वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट- सप्टेंबर २०२४ कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी ७३.८७ कोटी निधी मंजूर

 वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट- सप्टेंबर २०२४ कालावधीत

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी ७३.८७ कोटी निधी मंजूर

- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

 

मुंबईदि. २० :- वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या  कालावधीत अतिवृष्टीमुळे ६५ हजार ४८४ शेतकऱ्यांच्या ५३,८३५.३२ हेक्टर क्षेत्रावरील झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी ७३.८७ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली.या संदर्भात सदस्य सई डहाके यांनी लक्षवेधी उपस्थीत केली होती.

मंत्री श्री. जाधव-पाटील  यांनी सांगितलेनैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी  शासन त्यांच्या पाठीशी शासन नेहमीच खंबीरपणे उभे राहते.  नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती पिकाच्या नुकसानीसाठी रुपये १३ हजार ६०० प्रति हेक्टरबागायती पिकाच्या नुकसानीसाठी रुपये २७००० प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी रूप ३६००० प्रति हेक्टर मदत देण्यात येते. तसेच ही मदत केंद्र शासनाच्या दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेत वाढवण्यात आली असल्याचे मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितलेवाशिम जिल्ह्यासाठी फेब्रुवारी मार्च व एप्रिल २०२४ कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना १४.१५ कोटी इतका निधी प्रत्यक्षात वितरित केला आहे. मे २०२४ या मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी ७.१३ लक्ष इतका निधी शेतकऱ्यांना वितरीत केला आहे. तर जून- जुलै २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या  शेत पिकांच्या नुकसानीपोटी ६९.५४ लक्ष इतका निधी शेतकऱ्यांना वितरीत केला आहे.

जलनि:स्सारण चर योजनेसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार

 जलनि:स्सारण चर  योजनेसाठी  नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार

- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबईदि. २० :- मोठ्या व मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात उद्भवणाऱ्या पाणथळ व क्षारयुक्त जमिनीच्या समस्या सोडविण्यासाठी व या क्षेत्राच्या  सुधारण्यासाठी जलनिस्सारण चर  योजनेसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणारअसे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

सदस्य डॉ. विश्वजीत कदम यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले कीजलनिस्सारण चर योजना हा कार्यक्रम पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. पाणथळ व क्षारयुक्त जमिनीचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी विहिरींची पाणीपातळी घेऊन तसेच जमिनींचे माती परीक्षण करून पाणथळ व क्षारपड जमिनी निश्चित करण्यात येते. त्यानुसार क्षारपडपाणथळ क्षेत्र निर्मूलनासाठी खुल्या चर योजना प्रस्तावित केल्या जातात. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांच्या लाभक्षेत्रामध्ये ७९९ (२८८२.५४ किमी) योजनांची बांधकामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे २ लाख २३ हजार १०५ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे.

कृष्णा कालव्याच्या लाभ क्षेत्रामध्ये कराडवाळवापलूस व तासगाव या चार तालुक्यांचा समावेश आहे. कृष्णा कालव्याच्या लाभक्षेत्रात ३३ खुल्या चर योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी पलूस तालुक्यात १८ योजना पूर्ण झाल्या असून त्या  कार्यान्वित आहेत. या १८ चर योजनांमुळे पलूस तालुक्यातील ३ हजार ३१२ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

००००

कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेत फेरजल नियोजन अहवाल प्राप्तीनंतर सर्व्हेक्षण मान्यता, निधी उपलब्ध करून देणार

 कुकडी उजनी  उपसा सिंचन योजनेत फेरजल नियोजन  अहवाल प्राप्तीनंतर

सर्व्हेक्षण मान्यतानिधी उपलब्ध करून देणार

- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबईदि. २० :-  नियोजित कुकडी उजनी  उपसा सिंचन योजनेमध्ये रिटेवाडी व केल्तूर या उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. कुकडी प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाबाबतचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर या योजनेच्या सविस्तर सर्व्हेक्षणास मान्यता व आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईलअसे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

कुकडी प्रकल्पतीला लाभक्षेत्रास  प्रकल्प नियोजनानुसार पाणी उपलब्ध करून देण्यात असणाऱ्या अडचणी तसेच प्रकल्पाचे फेर जलनियोजन करून उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र शासनाच्या WAPCOS त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.

करमाळा ( जि. सोलापूर) तालुक्यातील लाभक्षेत्र हे कुकडी डावा कालवा की. मी. २२३ ते २४९ अंतिम भागात असल्याने तालुक्यातील लाभक्षेत्रात पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही मात्र उजनीचे फेर पाणी वाटपानंतर या  ठिकाणी पाणी उपलब्ध होईल,असे जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

सदस्य नारायण पाटील यांनी  करमाळा (जि.सोलापूर) तालुक्यात कुकडी प्रकल्पातून. पाणी मिळावे यासाठी लक्षवेधी उपस्थित केली होती

नागपूर महापालिकेतील ऐवजदार सफाई कामगारांच्या नियमितीकरणाबाबतत शासन सकारात्मक

 नागपूर महापालिकेतील ऐवजदार सफाई कामगारांच्या

नियमितीकरणाबाबतत शासन सकारात्मक

- उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबईदि. २० :-  नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत ऐवजदार सफाई कामगारांच्या नियमितीकरण संदर्भात शासन सकारात्मक असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरावेळी सांगितले.

सदस्य प्रवीण दटके यांनी या संदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य मनीषा चौधरी यांनी सहभाग घेतला.

मंत्री उदय सामंत यांनी सांगितले, ऐवजदार सफाई कामगार हा संवर्ग (कॅटेगिरी) फक्त नागपूर महानगरपालिकेतच आहे. यामध्ये २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या ३८३३ पात्र ऐवजदार कर्मचाऱ्यांन अधिसंख्य पदावर सामावून घेण्यात आलेले आहे. २० वर्ष पेक्षा कमी सेवा झालेले ४२९ कर्मचारी ऐवजदार पदावर सध्या कार्यरत आहेत.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेत सात हजार आपत्कालीन पदांसाठी मंजुरी दिली आहे.  या पदांवर पात्र ऐवजदार सफाई  कर्मचाऱ्यांना घेण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीचे लाभ मिळतील, असेही त्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi