Wednesday, 19 March 2025

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सुधारणा करण्यावर भर,१०८ रुग्णवाहिका सेवा,दरपत्रक सुधारणा,रुग्णांच्या तक्रारींवर लक्ष : :,

 महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सुधारणा करण्यावर भर

- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबईदि. १८ : राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आणि गोरगरिबांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषद सदस्य इद्रिस नाईकवाडी यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

आरोग्य मंत्री श्री.आबिटकर म्हणाले कीराज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ अधिकाधिक मिळावा यासाठी शासनामार्फत सुधारणा केल्या जातील. जसे, दरपत्रक सुधारणा : आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे एकत्रीकरण झाले असले तरी काही दरपत्रकांमध्ये सुधारणा आवश्यक आहे. यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन केली जाणार असूनडॉक्टरअधिकारी आणि इतर संबंधित घटक यामध्ये समाविष्ट असतील.

डॉक्टर भरती : मागील काही महिन्यांमध्ये ४०० एमबीबीएस डॉक्टरांची भरती करण्यात आली असूनएप्रिलनंतर आणखी डॉक्टरांची भरती केली जाईल.

१०८ रुग्णवाहिका सेवा : राज्यात १० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेतील जुन्या गाड्यांची जागा नव्या १७५० गाड्यांनी घेतली जाणार असूनत्या मोठ्या महामार्गरेल्वे स्थानक आणि महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केल्या जातील.

रुग्णांच्या तक्रारींवर लक्ष : अनेक मोठी खासगी रुग्णालये शासनाच्या जागेचा आणि सुविधांचा वापर करूनही योग्य सेवा देत नसल्याच्या तक्रारी आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विधी व न्याय विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त समितीमार्फत कठोर पावले उचलली जातील.

अधिकाऱ्यांसाठी मॉनिटरिंग यंत्रणा : महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत रुग्णालयांना होणाऱ्या बिल देयकास विलंब होऊ नये यासाठी वित्त विभागासोबत समन्वय साधला जाईल.

शासनाने गोरगरिबांसाठी अनेक योजना लागू केल्या असूनत्या प्रभावीपणे राबवण्यासाठी लोकप्रतिनिधींचे आणि प्रशासनाचे सहकार्य आवश्यक आहे. तसेचया योजनेत आणखी कोणत्या सुधारणा करता येतीलयाचा आढावा घेण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल.

या लक्षवेधी सूचनेत विधान परिषद सदस्य भाई जगतापश्रीमती उमा खापरेअभिजित वंजारीधीरज लिंगाडेअमित गोरखेश्रीमती चित्रा वाघसदाभाऊ खोतसुनील शिंदेविक्रम काळे यांनीही भाग घेतला.

वेतन टप्पा अनुदानासाठी शासनाची सकारात्मक भूमिका,प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वाढीव टप्पा देण्यासंदर्भात

 वेतन टप्पा अनुदानासाठी शासनाची सकारात्मक भूमिका

- शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. १८ : राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानासाठी प्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वाढीव टप्पा देण्यासंदर्भात शासन सकारात्मक भूमिका घेईलअसे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले. त्याचबरोबरटप्पा अनुदानाच्या पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना अनुदान मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईलअसेही त्यांनी सांगितले.

शासन निर्णयान्वये अंशतः अनुदानित शाळांना 20 टक्के वाढीव टप्पा देण्यासंदर्भात विधानपरिषद सदस्य किरण सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणाले कीसन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी संच मान्यता प्रक्रिया अंतिम टप्प्यात असूनकाही तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मृत शिक्षक श्री.नागरगोजे यांच्यासंदर्भातील दुर्दैवी घटनेबाबत शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणाले कीश्री.नागरगोजे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षक होते. त्यांच्या संदर्भात सरकार सकारात्मक निर्णय घेईल.

टप्पा अनुदानाच्या अंमलबजावणीसाठी सरकार गांभीर्याने विचार करत असूनयावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाईलअसेही श्री.भुसे यांनी सांगितले.

या लक्षवेधी सूचनेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री जगन्नाथ अभ्यंकरअभिजीत वंजारीविक्रम काळेधीरज लिंगाडेकिशोर दराडे यांनी सहभाग नोंदविला.

000

मुंबईतील अनधिकृत बांधकामांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी

 मुंबईतील अनधिकृत बांधकामांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी

- उद्योग मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. १८ : बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामांच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल..या समितीच्या अहवालानुसारजे शासकीय अधिकारी यात दोषी आढळतीलअशा अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल," असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

विधान परिषद सदस्य सर्वश्री सचिन अहिरॲड.अनिल परबभाई जगतापप्रवीण दरेकरसुनील शिंदे यांनी मुंबईतील अनधिकृत बांधकामासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले कीसध्या आठ प्रभागांमध्ये ७,९५१ अनधिकृत बांधकामे आहेतज्यामध्ये १,२११ बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. याशिवाय२,०१५ बांधकामांसंदर्भात खटले चालू आहेत. अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात शासन गांभीर्याने विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

000

जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी माटुंगा येथे शिबिराचे आयोजन ,pl share

 जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी

माटुंगा येथे शिबिराचे आयोजन

 

            मुंबईदि. १८ : अनुसूचित जातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्रुटी पूर्तता शिबिराचे आयोजन २५ मार्च २०२५ रोजी करण्यात आले आहे. हे शिबिर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयमुंबई शहरपंचशील एम-१तळमजलासिद्धार्थ गृहनिर्माण संस्थामाटुंगा लेबर कॅम्पवाल्मिकी रोडमाटुंगामुंबई येथे होणार आहे. या शिबिराचा अधिकाधिक लाभ घेण्यात यावा असे आवाहन मुंबई शहर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

            जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमुंबई शहरतर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज सादर करून जातीचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 

            ज्या विद्यार्थी किंवा अर्जदार यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केलेला नाहीत्यांनी त्वरित संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज दाखल करावा. www.bartievalidity.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे.

             व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रियेस लवकरच सुरुवात होत आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र नसेलतर  विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू शकते. यासाठी आवश्यक कागदपत्रांसह विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या त्रुटी पूर्तता शिबिराचा लाभ घ्यावाअसे आवाहन समितीचे अध्यक्ष धनंजय निकमसदस्य सलिमा तडवीसंशोधन अधिकारी व सदस्य सचिव सुनिता मते यांनी केले आहे.

०००

काळ जुना होता

 🔹 *काळ जुना होता..* 🔹

*अंग झाकायला कपडे नव्हते,*

*तरीही लोकं शरीर झाकण्याचा प्रयास करायचे, आज कपड्यांचे भंडार आहेत. तरीही जास्तीत जास्त शरीर दाखवायचे प्रयत्न सुरु आहेत*

*समाज सुसंस्कृत झाला आहे*?


✨✨✨✨✨


🔹 *काळ जुना होता..* 🔹

*रहदारीची साधने कमी होती. तरीही कुटुंबातील लोक भेटतं असतं,*

*आज रहदारीचे साधने भरपूर आहेत.*

*अजूनही लोकांना न भेटण्याच्या सबबी सांगत आहे...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे*?


✨✨✨✨✨


🔹 *काळ जुना होता..* 🔹

*घरची मुलगी अख्ख्या गावाची मुलगी होती.* *आजची मुलगी ही शेजाऱ्यापासूनच असुरक्षित आहे...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे*?


✨✨✨✨✨


🔹 *काळ जुना होता..* 🔹

*लोकं गावातील वडीलधार्‍यांची*

*चौकशी करायचे, आज पालकांनाचं*

*वृद्धाश्रमात ठेवले जाते...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे..*?


✨✨✨✨✨


🔹 *काळ जुना होता..* 🔹

*खेळण्यांचा तुटवडा होता. तरी शेजारची मुलं एकत्र खेळायचे.*

*आज खूप खेळणी आहेत, मात्र मुले मोबाईलच्या कचाट्यात अडकलेली आहेत...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे..*?


✨✨✨✨✨


🔹 *काळ जुना होता..* 🔹

*रस्त्यावरील प्राण्यांना सुध्दा* *भाकरी दिली जायची, आज शेजारीचं मुलंही*

*भुकेली झोपी जातात...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे..*?


✨✨✨✨✨


🔹 *काळ जुना होता..* 🔹

*शेजारच्या व आपल्या घरी नातेवाईक भरलेले असायचे, आता परिचय विचारला तर आज मला शेजारचे नावही माहीत नाही...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे..*?


*🙏🏻🙏🏻🙏🏻कोणी लिहिले माहीत नाही, चांगली वाटली म्हणून पाठवली 🌹🙏,*

*धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण आहे;,pl share

 *अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत, त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया.*


*धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण आहे;*


*वाचा गंध लावण्याचे फायदे!*


अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर. प्रज्ञानंधा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, 'तू कपाळावर ही विभूती का लावतोस?'  त्यावर सोळा वर्षीय प्रज्ञानंधा म्हणाला, 'माझी आई मला सांगते म्हणून!'


मित्रांनो, सोळा वर्षीय प्रज्ञानंधाच्या जागी आपण असतो, तर कदाचित आपणही हेच उत्तर दिले असते. कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आजीने घातला आहे.  त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतोसुद्धा! मात्र ते का लावावे? किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते? की ती केवळ धार्मिक खूण आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 


*'देह देवाचे मंदिर' असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरीभावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील, तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देहमंदिराचे स्तंभ आहेत.*


*या देहात भगवंत नित्य वास करतो. या देहस्थित मूर्तीस गंध लावणे, म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठीदेखील वेळ नसतो, त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी.*


*गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे, गंध लावताना अंगुलीस्पर्श होतो. ही अंगुली मध्यमाच असावी, म्हणजे मधले बोट असावे. त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात.*


गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे, गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही. कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर, आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते. जणू काही, आपल्या प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो सीसीटीव्ही कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेटर हृदयसिंहासनावर विराजमान झालेला असतो. आपण कोणाच्या निगराणीत आहोत, हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही, त्याप्रमाणे `माझ्याकडे देव माझा पाहतो आहे' ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते. 


गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाजदेखील संस्कृतीरक्षक या भूमिकेतून पाहतो. ही केवळ धार्मिक खूण नाही, तर स्वत:च्या अस्तित्वाची स्वत:ला करून दिलेली जाणीव असते. म्हणून हिंदूधर्माने आणि आर्यसंस्कृतीने तिलकविधीला धर्मात स्थान दिले आहे.


पूर्वीपासून स्त्री-पुरुष कपाळावर गंध लावीत असत़ त्याची जागा आता टिकल्यांनी घेतली. परंतु, गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणेदेखील आहेत. गंध केवळ सुगंधी म्हणून नाही, तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इ. विविध पदार्थांनी युक्त असते. आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन भुवयांच्या मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे, यासाठीदेखील गंध लावले जाते. 


तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव, मनाची निर्मळता, सात्विकता, सोज्वळता इ. सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते. कोणाही सुवासिनीने हळद-कुंकाची लावलेली दोन बोटं तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात. कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात. तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात. पूर्वीदेखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करांगुलीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई. त्याला विजयतिलक म्हटले जात असे. त्यालादेखील बहुमान होता. बहीण भावाला, पत्नी पतीला, आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जाते. एवढेच काय, तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांनादेखील गंध लावून पूजन केले जाते. 


*अशा रितीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंत:पुरातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे*


*विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा*



पुणे शहर में कौशल विकास केंद्र स्थापित किया जाएगा - मंत्री उदय सामंत

 पुणे शहर में कौशल विकास केंद्र स्थापित किया जाएगा - मंत्री उदय सामंत

मुंबई, 19 मार्च – पुणे शहर में शिक्षा के लिए बड़ी संख्या में विद्यार्थी आते हैंसाथ ही रोजगार की तलाश में भी कई युवा यहां आते हैं। पुणे में विद्यार्थियों और युवाओं के कौशल विकास को बढ़ावा देने के लिए कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) के तहत एक कौशल विकास केंद्र स्थापित किया जाएगाऐसी घोषणा मंत्री उदय सामंत ने आज विधानसभा में ध्यानाकर्षण सूचना के उत्तर में की।

सदस्य विजय शिवतारे ने पुणे महानगरपालिका (PMC) में नव शामिल गांवों की समस्याओं को लेकर ध्यानाकर्षण सूचना प्रस्तुत की। इस चर्चा में सदस्य भीमराव तापकीर भी शामिल हुए।

इस पर प्रतिक्रिया देते हुए मंत्री उदय सामंत ने कहा कि फुरसुंगी और उरुली देवाची गांवों को पुणे महानगरपालिका से अलग कर दिया गया है और इन्हें एक स्वतंत्र नगर परिषद के रूप में स्थापित किया गया है। जनसंख्या को ध्यान में रखते हुएकोंकण विभागीय आयुक्त की रिपोर्ट को स्वीकार कर इस नगर परिषद को ‘A’ श्रेणी का दर्जा दिया जाएगा। जब तक पुणे महानगरपालिका से सेवाओं का हस्तांतरण पूरा नहीं हो जातातब तक इन क्षेत्रों में आधारभूत सुविधाओं का विकास कार्य जारी रहेगा।

इसके अलावाउन्होंने यह भी आश्वासन दिया कि नवीन रूप से शामिल गांवों में संपत्ति कर दोगुना नहीं किया जाएगा। इन गांवों का संपत्ति कर पहले के ग्राम पंचायत कर की दोगुनी सीमा से अधिक नहीं होगाऔर जब तक इस कर की पुनः समीक्षा नहीं हो जातीइसकी वसूली स्थगित कर दी गई है।

मंत्री सामंत ने यह भी आश्वासन दिया कि फुरसुंगी कचरा डिपो के कारण नागरिकों को किसी भी प्रकार की असुविधा नहीं होगी। जांभुलवाड़ी तालाब से जल आपूर्ति योजनाओं के लिए एक विस्तृत परियोजना रिपोर्ट (DPR) तैयार की जाएगी और तालाब का भी सौंदर्यीकरण किया जाएगा।

इसके अलावापुणे महानगरपालिका में हाल ही में शामिल किए गए 32 गांवों की समस्याओं को हल करने के लिए जल्द ही एक बैठक आयोजित की जाएगी। मंत्री ने यह भी कहा कि फुरसुंगी और उरुली देवाची में नागरिकों की सुविधा के अनुसार जल आपूर्ति का समय निर्धारित किया जाएगा।

0000

Featured post

Lakshvedhi