Wednesday, 19 March 2025

मुंबईतील अनधिकृत बांधकामांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी

 मुंबईतील अनधिकृत बांधकामांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी

- उद्योग मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. १८ : बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामांच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल..या समितीच्या अहवालानुसारजे शासकीय अधिकारी यात दोषी आढळतीलअशा अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल," असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

विधान परिषद सदस्य सर्वश्री सचिन अहिरॲड.अनिल परबभाई जगतापप्रवीण दरेकरसुनील शिंदे यांनी मुंबईतील अनधिकृत बांधकामासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले कीसध्या आठ प्रभागांमध्ये ७,९५१ अनधिकृत बांधकामे आहेतज्यामध्ये १,२११ बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. याशिवाय२,०१५ बांधकामांसंदर्भात खटले चालू आहेत. अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात शासन गांभीर्याने विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi