Wednesday, 19 March 2025

काळ जुना होता

 🔹 *काळ जुना होता..* 🔹

*अंग झाकायला कपडे नव्हते,*

*तरीही लोकं शरीर झाकण्याचा प्रयास करायचे, आज कपड्यांचे भंडार आहेत. तरीही जास्तीत जास्त शरीर दाखवायचे प्रयत्न सुरु आहेत*

*समाज सुसंस्कृत झाला आहे*?


✨✨✨✨✨


🔹 *काळ जुना होता..* 🔹

*रहदारीची साधने कमी होती. तरीही कुटुंबातील लोक भेटतं असतं,*

*आज रहदारीचे साधने भरपूर आहेत.*

*अजूनही लोकांना न भेटण्याच्या सबबी सांगत आहे...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे*?


✨✨✨✨✨


🔹 *काळ जुना होता..* 🔹

*घरची मुलगी अख्ख्या गावाची मुलगी होती.* *आजची मुलगी ही शेजाऱ्यापासूनच असुरक्षित आहे...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे*?


✨✨✨✨✨


🔹 *काळ जुना होता..* 🔹

*लोकं गावातील वडीलधार्‍यांची*

*चौकशी करायचे, आज पालकांनाचं*

*वृद्धाश्रमात ठेवले जाते...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे..*?


✨✨✨✨✨


🔹 *काळ जुना होता..* 🔹

*खेळण्यांचा तुटवडा होता. तरी शेजारची मुलं एकत्र खेळायचे.*

*आज खूप खेळणी आहेत, मात्र मुले मोबाईलच्या कचाट्यात अडकलेली आहेत...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे..*?


✨✨✨✨✨


🔹 *काळ जुना होता..* 🔹

*रस्त्यावरील प्राण्यांना सुध्दा* *भाकरी दिली जायची, आज शेजारीचं मुलंही*

*भुकेली झोपी जातात...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे..*?


✨✨✨✨✨


🔹 *काळ जुना होता..* 🔹

*शेजारच्या व आपल्या घरी नातेवाईक भरलेले असायचे, आता परिचय विचारला तर आज मला शेजारचे नावही माहीत नाही...*

*समाज सुसंस्कृत झाला आहे..*?


*🙏🏻🙏🏻🙏🏻कोणी लिहिले माहीत नाही, चांगली वाटली म्हणून पाठवली 🌹🙏,*

*धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण आहे;,pl share

 *अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत, त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया.*


*धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण आहे;*


*वाचा गंध लावण्याचे फायदे!*


अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर. प्रज्ञानंधा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, 'तू कपाळावर ही विभूती का लावतोस?'  त्यावर सोळा वर्षीय प्रज्ञानंधा म्हणाला, 'माझी आई मला सांगते म्हणून!'


मित्रांनो, सोळा वर्षीय प्रज्ञानंधाच्या जागी आपण असतो, तर कदाचित आपणही हेच उत्तर दिले असते. कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आजीने घातला आहे.  त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतोसुद्धा! मात्र ते का लावावे? किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते? की ती केवळ धार्मिक खूण आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 


*'देह देवाचे मंदिर' असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरीभावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील, तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देहमंदिराचे स्तंभ आहेत.*


*या देहात भगवंत नित्य वास करतो. या देहस्थित मूर्तीस गंध लावणे, म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठीदेखील वेळ नसतो, त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी.*


*गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे, गंध लावताना अंगुलीस्पर्श होतो. ही अंगुली मध्यमाच असावी, म्हणजे मधले बोट असावे. त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात.*


गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे, गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही. कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर, आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते. जणू काही, आपल्या प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो सीसीटीव्ही कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेटर हृदयसिंहासनावर विराजमान झालेला असतो. आपण कोणाच्या निगराणीत आहोत, हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही, त्याप्रमाणे `माझ्याकडे देव माझा पाहतो आहे' ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते. 


गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाजदेखील संस्कृतीरक्षक या भूमिकेतून पाहतो. ही केवळ धार्मिक खूण नाही, तर स्वत:च्या अस्तित्वाची स्वत:ला करून दिलेली जाणीव असते. म्हणून हिंदूधर्माने आणि आर्यसंस्कृतीने तिलकविधीला धर्मात स्थान दिले आहे.


पूर्वीपासून स्त्री-पुरुष कपाळावर गंध लावीत असत़ त्याची जागा आता टिकल्यांनी घेतली. परंतु, गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणेदेखील आहेत. गंध केवळ सुगंधी म्हणून नाही, तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इ. विविध पदार्थांनी युक्त असते. आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन भुवयांच्या मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे, यासाठीदेखील गंध लावले जाते. 


तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव, मनाची निर्मळता, सात्विकता, सोज्वळता इ. सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते. कोणाही सुवासिनीने हळद-कुंकाची लावलेली दोन बोटं तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात. कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात. तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात. पूर्वीदेखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करांगुलीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई. त्याला विजयतिलक म्हटले जात असे. त्यालादेखील बहुमान होता. बहीण भावाला, पत्नी पतीला, आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जाते. एवढेच काय, तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांनादेखील गंध लावून पूजन केले जाते. 


*अशा रितीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंत:पुरातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे*


*विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा*



पुणे शहर में कौशल विकास केंद्र स्थापित किया जाएगा - मंत्री उदय सामंत

 पुणे शहर में कौशल विकास केंद्र स्थापित किया जाएगा - मंत्री उदय सामंत

मुंबई, 19 मार्च – पुणे शहर में शिक्षा के लिए बड़ी संख्या में विद्यार्थी आते हैंसाथ ही रोजगार की तलाश में भी कई युवा यहां आते हैं। पुणे में विद्यार्थियों और युवाओं के कौशल विकास को बढ़ावा देने के लिए कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) के तहत एक कौशल विकास केंद्र स्थापित किया जाएगाऐसी घोषणा मंत्री उदय सामंत ने आज विधानसभा में ध्यानाकर्षण सूचना के उत्तर में की।

सदस्य विजय शिवतारे ने पुणे महानगरपालिका (PMC) में नव शामिल गांवों की समस्याओं को लेकर ध्यानाकर्षण सूचना प्रस्तुत की। इस चर्चा में सदस्य भीमराव तापकीर भी शामिल हुए।

इस पर प्रतिक्रिया देते हुए मंत्री उदय सामंत ने कहा कि फुरसुंगी और उरुली देवाची गांवों को पुणे महानगरपालिका से अलग कर दिया गया है और इन्हें एक स्वतंत्र नगर परिषद के रूप में स्थापित किया गया है। जनसंख्या को ध्यान में रखते हुएकोंकण विभागीय आयुक्त की रिपोर्ट को स्वीकार कर इस नगर परिषद को ‘A’ श्रेणी का दर्जा दिया जाएगा। जब तक पुणे महानगरपालिका से सेवाओं का हस्तांतरण पूरा नहीं हो जातातब तक इन क्षेत्रों में आधारभूत सुविधाओं का विकास कार्य जारी रहेगा।

इसके अलावाउन्होंने यह भी आश्वासन दिया कि नवीन रूप से शामिल गांवों में संपत्ति कर दोगुना नहीं किया जाएगा। इन गांवों का संपत्ति कर पहले के ग्राम पंचायत कर की दोगुनी सीमा से अधिक नहीं होगाऔर जब तक इस कर की पुनः समीक्षा नहीं हो जातीइसकी वसूली स्थगित कर दी गई है।

मंत्री सामंत ने यह भी आश्वासन दिया कि फुरसुंगी कचरा डिपो के कारण नागरिकों को किसी भी प्रकार की असुविधा नहीं होगी। जांभुलवाड़ी तालाब से जल आपूर्ति योजनाओं के लिए एक विस्तृत परियोजना रिपोर्ट (DPR) तैयार की जाएगी और तालाब का भी सौंदर्यीकरण किया जाएगा।

इसके अलावापुणे महानगरपालिका में हाल ही में शामिल किए गए 32 गांवों की समस्याओं को हल करने के लिए जल्द ही एक बैठक आयोजित की जाएगी। मंत्री ने यह भी कहा कि फुरसुंगी और उरुली देवाची में नागरिकों की सुविधा के अनुसार जल आपूर्ति का समय निर्धारित किया जाएगा।

0000

पुणे शहरात कौशल्य विकास केंद्र उभारणार

 पुणे शहरात कौशल्य विकास केंद्र उभारणार

- मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. १९ : पुणे शहरात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येत असतात. तसेच रोजगारासाठी येणाऱ्या तरुण - तरुणींची संख्याही मोठी आहे. पुणे शहरात विद्यार्थीतरुणांच्या कौशल्य विकासात वाढ करण्यासाठी सी.एस.आर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्स बिलीटी) अंतर्गत कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात केली.

 

 पुणे महापालिकेत समाविष्ट गावांतील समस्यांबाबत सदस्य विजय शिवतारे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. या लक्षेवधी सूचनेच्या चर्चेत सदस्य भीमराव तापकीर सहभागी झाले होते.

 

याबाबत उत्तरात मंत्री सामंत म्हणालेपुणे महापालिकेतील फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावे वगळून या दोन्ही गावांसाठी नगरपरिषद स्थापन करण्यात आली आहे. लोकसंख्येचा विचार करून ही नगरपरिषद अ वर्ग दर्जाची करण्याबाबत कोकण विभागीय आयुक्त यांचा अहवाल स्वीकारून दर्जा देण्यात येईल. या नगरपरिषदेला सेवांचे हस्तांतरण पुणे महापालिकेकडून होईपर्यंत पायाभूत सोयीसुविधांची कामे सुरू राहतील.

 

महापालिकेत नव्याने सहभागी गावांमध्ये मालमता कर दुपटीने वसूल न करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. या गावांचा मालमत्ता कर आधीच्या ग्रामपंचायत कराच्या दुपटीपेक्षा जास्त होणार नाहीअशा पद्धतीने पुनर्विलोकन करेपर्यंत हा कर वसूल करण्यास स्थगिती देण्यात आलेली आहे. फुरसुंगी कचरा डेपोमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाहीयाची काळजी घेण्यात येईल. जांभुळवाडी तलावातून पाणीपुरवठा योजनांबाबत विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करुन तलावाचे सुशोभीकरणही करण्यात येईल.  पुणे महानगरपालिकेतील नव्याने समाविष्ट ३२ गावांच्या समस्या निकाली काढण्याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल. फुरसुंगी व उरळी देवाची येथे नागरिकांच्या सोयीप्रमाणे पाणीपुरवठा वेळापत्रक बनविण्यात येईलअसेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

अकोला शहरातील मलनि:स्सारण प्रकल्पामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार

 अकोला शहरातील मलनि:स्सारण प्रकल्पामुळे

बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार

- मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. १९ : अकोला शहरात केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानांतर्गत मलनिःसारण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. शहरात भुयारी मल वाहिन्या टाकण्याचे काम मंजुरी प्राप्त व स्थगित ९६ रस्त्यावर प्रथमतः सुरू करण्याचे नियोजन आहे. या मलनिःसारण कामामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतीलअसे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

 

अकोला शहरातील मलनिःसारण प्रकल्पाबाबत सदस्य साजिद पठाण यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य अर्जुन खोतकर यांनीही सहभाग घेतला.

 

याबाबत उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री सामंत म्हणालेमलनिःसारण कामामुळे बाधित होणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ८३ कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. रस्त्यांची कामे करण्याबाबत महानगरपालिकेला निर्देशही देण्यात येतील. या कामाबाबत निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेल्या कामांना निधी कमी पडू दिल्या जाणार नाही. शहरात मलनिःसारण कामाव्यतिरिक्त निधी मंजूर असलेल्या अन्य रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील.

 

जालना महानगरपालिका अमृत २.० योजनेत समावेश करण्याबाबत प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना सबंधित महापालिकेला देण्यात येतीलअसेही मंत्री सामंत यांनी सांगितले

ठाणे येथील खाडी किनारा मार्गाच्या निविदा प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही

 ठाणे येथील खाडी किनारा मार्गाच्या निविदा प्रक्रियेत

कोणतीही अनियमितता नाही

-मंत्री शंभूराज देसाई

मुंबईदि. 18 : ठाणे येथील खाडी किनारा मार्गाच्या कामाच्या ढोबळ अंदाजपत्रकाच्या तुलनेत कामाच्या संख्येत वाढ झाल्याने सविस्तर अंदाजपत्रकात वाढ झाली असून या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झालेली नाहीअसे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजित वंजारीप्रवीण दरेकरशशिकांत शिंदेनिरंजन डावखरेसचिन अहिर आदींनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. देसाई म्हणालेठाणे येथील बाळकुम ते गायमुख या १३.४५ कि.मी लांबीच्या खाडी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी कोस्ट गार्डनौदलकेंद्रीय पर्यावरण विभाग आदींच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन प्रारंभी प्राधिकरणाच्या १६ नोव्हेंबर २०२१ च्या बैठकीत १३१६.१८ कोटींचे ढोबळ अंदाजपत्रक सादर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर ठाणे परिसरातील आठ ठिकाणी भुयारी मार्गांचे कामकास्टिंग गार्डपादचारी पूलतात्पुरता पूलवाढलेले जीएसटीचे दर आदींमुळे २०२४ मध्ये सविस्तर अंदाजपत्रक तयार करताना प्रकल्प खर्चात ३३६४.६२ कोटी रुपये अशी वाढ झाली. याप्रकरणी कोणतीही अनियमितता झालेली नसल्याने एसआयटी स्थापन करण्याची आवश्यकता नाही तथापि सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन चालू अधिवेशन संपण्यापूर्वी सभापतींच्या दालनात संबंधित सदस्यांसोबत बैठक घेण्यात येईल असे मंत्री श्री देसाई यांनी सांगितले.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या प्रश्नाच्या उत्तरात प्रकल्पाबाबतची माहिती दिली.

00000

खडकुना लघु प्रकल्प जलक्षेत्राची मोजणी करणार

 खडकुना लघु प्रकल्प जलक्षेत्राची मोजणी करणार

- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई दि. 18 :- नंदुरबार जिल्ह्यातील खडकुना लघु प्रकल्प (ता. अक्कलकुवा) जलक्षेत्राची अचूक मोजणी केली जाईलअसे जलसंपदा ( विदर्भतापीकोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. सदस्य आमश्या पाडवी यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली. 

जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले कीखडकुना लघु प्रकल्पाचे काम 1980 मध्ये पूर्ण झाले असून आजपर्यंत या प्रकल्पाचे कोणतेही वाढीव काम झालेले नाहीत्यानुसार प्रकल्पाचे जलक्षेत्र मूळ प्रकल्प अहवालातील ठळक वैशिष्ट्यानुसार 123 हेक्टर एवढे आहे.  

या प्रकल्पात मासेमारी संदर्भात श्री.महाजन यांनी सांगितले कीप्रकल्पाचे जलक्षेत्र 100 हेक्टर पर्यंत असल्यास प्रकल्पातील मासेमारीचा ठेका संबंधित ग्रामपंचायतीस दिला जातो. तर 100 हेक्‍टरवरील जलक्षेत्र असल्यास मासेमारीच्या ठेका सोसायटीना दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


Featured post

Lakshvedhi