Wednesday, 19 March 2025

खडकुना लघु प्रकल्प जलक्षेत्राची मोजणी करणार

 खडकुना लघु प्रकल्प जलक्षेत्राची मोजणी करणार

- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई दि. 18 :- नंदुरबार जिल्ह्यातील खडकुना लघु प्रकल्प (ता. अक्कलकुवा) जलक्षेत्राची अचूक मोजणी केली जाईलअसे जलसंपदा ( विदर्भतापीकोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. सदस्य आमश्या पाडवी यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली. 

जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले कीखडकुना लघु प्रकल्पाचे काम 1980 मध्ये पूर्ण झाले असून आजपर्यंत या प्रकल्पाचे कोणतेही वाढीव काम झालेले नाहीत्यानुसार प्रकल्पाचे जलक्षेत्र मूळ प्रकल्प अहवालातील ठळक वैशिष्ट्यानुसार 123 हेक्टर एवढे आहे.  

या प्रकल्पात मासेमारी संदर्भात श्री.महाजन यांनी सांगितले कीप्रकल्पाचे जलक्षेत्र 100 हेक्टर पर्यंत असल्यास प्रकल्पातील मासेमारीचा ठेका संबंधित ग्रामपंचायतीस दिला जातो. तर 100 हेक्‍टरवरील जलक्षेत्र असल्यास मासेमारीच्या ठेका सोसायटीना दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi