आदिवासी आश्रमशाळांमधील
सेंट्रल किचनमधील उणिवा दूर करणार
- आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके
मुंबई दि . 18:- आदिवासी विभागामार्फत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनद्वारे पौष्टिक व शुद्ध भोजन उपलब्ध करून दिले जाते. या व्यवस्थेत काही उणीवा असल्यास त्या दूर केल्या जातील, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी सांगितलेली राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत 497 आश्रमशाळांमध्ये 2 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांना दर्जेदार, पोषक आणि स्वच्छ भोजन मिळावे यासाठी सेंट्रल किचन योजना प्रभावीपणे राबवली जात आहे.
मुंडेगाव सेंट्रल किचनला अन्न व औषध प्रशासन विभागाने या ठिकाणची पाहणी केल्यानंतर त्यांनी केलेल्या निर्देशानुसार आवश्यक सुधारणा करून नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
आश्रमशाळामधील विद्यार्थ्यांना गरम आणि ताज्या पोळ्या मिळाव्यात यासाठी पोळ्या बनवणाऱ्या यंत्रणेतील तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या असल्याचे डॉ. उईके यांनी सांगितले
सदस्य हिरामण खोसकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. त्या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य किरण लहामटे यांनी सहभाग घेतला
००००
No comments:
Post a Comment